* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: I AM MALALA
 • Availability : Available
 • Translators : SUPRIYA VAKIL
 • ISBN : 9788184987256
 • Edition : 2
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 316
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
"I COME FROM A COUNTRY THAT WAS CREATED AT MIDNIGHT. WHEN I ALMOST DIED IT WAS JUST AFTER MIDDAY." WHEN THE TALIBAN TOOK CONTROL OF THE SWAT VALLEY IN PAKISTAN, ONE GIRL SPOKE OUT. MALALA YOUSAFZAI REFUSED TO BE SILENCED AND FOUGHT FOR HER RIGHT TO AN EDUCATION. ON TUESDAY, OCTOBER 9, 2012, WHEN SHE WAS FIFTEEN, SHE ALMOST PAID THE ULTIMATE PRICE. SHE WAS SHOT IN THE HEAD AT POINT-BLANK RANGE WHILE RIDING THE BUS HOME FROM SCHOOL, AND FEW EXPECTED HER TO SURVIVE. INSTEAD, MALALA`S MIRACULOUS RECOVERY HAS TAKEN HER ON AN EXTRAORDINARY JOURNEY FROM A REMOTE VALLEY IN NORTHERN PAKISTAN TO THE HALLS OF THE UNITED NATIONS IN NEW YORK. AT SIXTEEN, SHE BECAME A GLOBAL SYMBOL OF PEACEFUL PROTEST AND THE YOUNGEST NOMINEE EVER FOR THE NOBEL PEACE PRIZE. I AM MALALA IS THE REMARKABLE TALE OF A FAMILY UPROOTED BY GLOBAL TERRORISM, OF THE FIGHT FOR GIRLS` EDUCATION, OF A FATHER WHO, HIMSELF A SCHOOL OWNER, CHAMPIONED AND ENCOURAGED HIS DAUGHTER TO WRITE AND ATTEND SCHOOL, AND OF BRAVE PARENTS WHO HAVE A FIERCE LOVE FOR THEIR DAUGHTER IN A SOCIETY THAT PRIZES SONS. I AM MALALA WILL MAKE YOU BELIEVE IN THE POWER OF ONE PERSON`S VOICE TO INSPIRE CHANGE IN THE WORLD.
"निसर्गसौंदर्याचं लेणं लाभलेल्या स्वात खोऱ्याचा तालिबानने ताबा घेतला तेव्हा एका मुलीनं आवाज उठवला. ती मुलगी म्हणजे – मलाला युसूफजई. तिने तिच्या शिक्षणाच्या हक्कासाठी लढा द्यायचं ठरवलं... पण, मंगळवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०१२ रोजी तिला याची किंमत मोजावी लागली. शाळेतून बसने घरी परतत असताना, वाटेत तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. आणि एकाएकी तिचं आयुष्य जीवन-मरणाच्या खोल दरीत लोटलं गेलं... पण ती या हल्ल्यातून आश्चर्यकारकरीत्या वाचली, आणि तिच्या ध्येयासाठी त्याच निर्धारानं कार्य करत राहिली... ही आहे मलालाची कहाणी – एक कोवळा आवाजसुद्धा परिवर्तनाची पहाट जागवू शकतो याची साक्ष देणारी...!"
Keywords
Customer Reviews
 • Rating StarDAINIK LOKMAT 15-04-2018

  ९ ऑक्टोबर, २०१२ रोजी मलालावर हल्ला झाला. मेंदूला मोठी इजा झाली होती. २०१३ साली मलालाने क्रिस्टिना लॅम्ब या लेखिकेच्या मदतीने तिच्या अनुभवांवर ‘आय एम मलाला’ हे पुस्तक लिहिले. अर्थात लगेचच पाकिस्तानमध्ये हे पुस्तक बॅन करण्यात आलं. तिथल्या अनेकांना तिच्ा कामाची कदर वाटत असली तरी, या पुस्तकामुळे ती पाश्चिमात्य देशांची हस्तक वाटायला लागली आहे, असं त्याचं म्हणणं होतं. हा विषय मुळातून कळण्यासाठी आपण हे पुस्तक वाचणं महत्त्वाचं आहे. -प्रज्ञा शिदोरे ...Read more

 • Rating StarRJ Suvarna Kshemkalyani

  नुकतच "मी मलाला" हे पुस्तक वाचलं .. पुस्तक वाचण्यापूर्वी मनात बरेच प्रश्न होते .. त्यांची उत्तरं तर मिळालीच पण त्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी कळल्या आणि आपण आपल्या देशात किती सुरक्षित आहोत याची पुन्हा एकदा जाणीव झाली.. प्रत्येकाने वाचावं असं पुस्तक...!! ...Read more

 • Rating StarSunetra Dharmadhikari

  मी वाचले आहे हे पुस्तक. खूप प्रेरणादायी आहे

 • Rating StarMAHARASHTRA TIMES 16-8-2015

  अक्षरशक्तीसाठी झुंजणाऱ्या मुलीची गोष्ट प्रगती बाणखेले बंदुकीच्या गोळ्यांनी आणि दहशतीच्या बळावर मुलींना कुणी पुस्तकापासून दूर ठेऊ शकत नाही, असं खणखणीतपणे बजावणाऱ्या नोबेल पुरस्कारविजेत्या मलाला युसूफजईचं ‘मी मलाला’ हे पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊसनं माठीत आणलं आहे. या पुस्तकातून उलगडणाऱ्या मलालाच्या चित्तथरारक आयुष्याचा घेतलेला वेध... परवाच पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन झाला. स्वातंत्र्याची सात दशकं पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या या देशात अद्याप मुलींना शिकण्यासाठी जिवावर उदार होऊन झुंजावं लागतं, बाकी माणूस म्हणून त्यांना कसं वागवलं जातं, हा त्यापुढचा प्रश्न. बंदुकीच्या गोळ्यांनी आणि दहशतीच्या बळावर मुलींना कुणी पुस्तकापासून दूर ठेऊ शकत नाही, असं खणखणीतपणे बजावणी शाळकरी मुलीला भेकडपणे शाळेच्या वाटेवर डोक्यात गोळ्या घातल्या जातात.... जगण्या-मरण्याच्या सीमेरेषेवर मृत्यूशी कडवी झुंज देत ही मुलगी प्रचंड जीवनेच्छा आणि जगभरातील कोट्यवधी लोकांच्या शुभेच्छांमुळे बरी होते आणि पुन्हा उमेदीने शिक्षणापासून वंचित असलेल्या हजारो मुलींचा आवाज बनून जगासमोर येते... अशा मुलीची, मलाला युसूफजईची कहाणी म्हणजे ‘मी मलाला’ हे क्रिस्टिना लॅम्ब या सहलेखिकेसह तिने लिहिलेलं पुस्तक. सुप्रिया वकील यांनी या पुस्तकाचा मराठीत उत्तम अनुवाद केलाय आणि मेहता पब्लिशिंग हाऊसनं ते प्रकाशित केलंय. मलालानं गेल्याच महिन्यात अठरावा वाढदिवस साजरा केला. त्याआधी वर्षभर या बहाद्दर मुलीनं नोबेल शांतता पुरस्कारावर आपलं नाव कोरलं होतं. मलालाचं गाव आहे स्वात खोऱ्यात. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात अफगाणिस्तानच्या सीमेला खेटलेलं, हिंदुकुश पर्वताच्या कुशीत वसलेलं हे स्वात नदीचं खोरं अतिशय निसर्गसंपन्न आहे. एकेकाळी बुद्धानं दिलेला शांततेचा संदेश जगणारं हे खोरं आज दहशतवादाच्या जाळामध्ये होरपळतं आहे. मलाला तिच्या या भागाला स्वर्गीय राज्य म्हणते. पुस्तकभर अधूनमधून स्वातच्या अप्रतिम निसर्गाची अभिमानानं केलेली वर्णनं येत राहतात. हा प्रदेश ती आपल्या नजरेसमोर जिवंत करते. डोंगराच्या कुशीतलं बरकाना हे तिच्या कुटुंबाचं मूळ गाव, पण मलाला जन्मली, वाढली मिंगोरामध्ये. हे स्वातमधलं मध्यम आकाराचं शहर. झियाउद्दिन हे मलालाचे वडील. शिक्षण हा वंचिताच्या जगण्याला प्रकाश देणारा मार्ग आहे, यावर विश्वास असणारा, स्वातमधल्या मुलांसाठी उत्कृष्ट शिक्षणाचं स्वप्न बघणारा, शून्यातून आधुनिक शिक्षण देणारी उत्तम शाळा उघडणारा आणि त्या शाळेसाठी सारं आयुष्य वाहणारा हा माणूस म्हणजे मलालाची प्रेरणा आहे. मलालाची गोष्ट तिची एकटीची नाही. तिच्या शिक्षणाला पाठिंबा देणारा, तिच्या सर्वांगीण विकासासाठी वाट्टेल ते झेलायला तयार असणारा अन् जग बदलण्याचा स्वप्न तिच्या डोळ्यात पेरणारा तिचा पिता, अशा दोघांची ही गोष्ट आहे. गंमत म्हणजे शिक्षणाच्या प्रसारासाठी नोबेल मिळवणाऱ्या मलालाची आई, तोर पेकई कधी शाळेतच जाऊ शकलेली नाही. खुशाल आणि अटल हे मलालाचे धाकटे भाऊ. अत्यंत धार्मिक असलेल्या तोर पेकईची धर्मावर नितांत श्रद्धा आहे. ही श्रद्धा त्यांनी मलालामध्ये रुजवली आहे. मलाला तिच्या जगण्याबद्दल, कुटुंबाबद्दल, शाळेबद्दल जितक्या सहजतेनं सांगते, तेवढ्याच सहजतेनं ती पाकिस्तानच्या इतिहासाबद्दल सांगते. बुद्ध राजांच्या काळापासून, ब्रिटिश राजवट, फाळणीनंतरचा कालखंड, झिया उल हक यांची धार्मिक कट्टरतावाद पोसणारी अकरा वर्षांची काळी राजवट, बेनझीर भुत्तोंवर पाक जनतेनं केलेलं प्रेम, त्यांची हत्या झाली, तेव्हा हादरलेला देश, जनरल मुशर्रफ यांचा आधुनिकतेचा स्पर्श झालेली एकाधिकारशाही... हे सारं मांडताना हे १६ वर्षांच्या मुलीनं लिहिल्याचा नवखेपणा कुठेही नाही, उलट अत्यंत समतोलपणे गरज असेल तेव्हा परखडपणे तिने हे मांडलंय. मलाला पश्तून आहे. अत्यंत लढाऊ, विश्वासू आणि शब्दाला जागणारे, उपकार आणि वैर कधीही न विसरणारे अशी त्यांची ख्याती. पश्तुनांची संस्कृती, त्यांच्या बऱ्या-वाईट सवयी याबद्दल ती लिहिते. अफगाणिस्तानातील थोर वीरांगना मैवंद इथल्या मलालाईच्या नावावरूनच मलालाचं नाव तिच्या वडिलांनी ठेवलंय. कुठल्याही सर्वसामान्य मुलीसारखंच मलालाचं बालपण आहे. तिच्या मैत्रिणी आहेत. सगळ्यांत जास्त भांडणारी तरीही सर्वांत जवळची मोनिबा आहे. अभ्यासात स्पर्धा करणारी मल्का ए नूर आहे. शेजारीण सफिना आहे. या मुली गप्पा मारतात, गाणी ऐकतात, गोष्टी वाचतात. टीव्ही पाहतात, पण या मुलींना शिक्षणाची प्रचंड आवड आहे. जगापासून दूर पर्वताच्या कुशीतल्या छोट्या शहरातल्या या मुलींची स्वप्नं मोठी आहेत. त्या चित्र काढतात, लिहितात, वत्तृâत्व स्पर्धा गाजवतात. हातांवर मेंदी काढताना पान, पुâलं न काढता रसायनशास्त्राची समीकरणं लिहितात. मलाला जन्मापासून वडिलांचा शाळा सुरू करण्यासाठी, ती वाढवण्यासाठी आणि नंतरच्या काळात ती जिवंत ठेवण्यासाठी सुरू असलेला संघर्ष पाहते आहे. एका अर्थाने शाळेच्या अंगणातच ती वाढली आहे. घरात आईच्या धार्मिक संस्कारासोबत वडिलांचे विचार, त्यांच्या कविता ती ऐकते. कचऱ्यात भंगार वेचणारी छोटी मुलं, हिशोब करता येत नाही म्हणून संत्रे विकताना रेषा ओढणारी मुलगी, शाळा अर्धवट सोडून संसाराला लागलेल्या तिच्या वयाच्या मुली हे सारं तिला अस्वस्थ करतं. दहा-बारा वर्षांच्या मुलीची ही संवेदनशीलता आणि ते दर्शवणारे पुस्तकातले प्रसंग मुळातून वाचण्यासारखे. आजूबाजूचं बदलतं राजकारण मलाला बारकाईने टिपते. ९/११ च्या घटनेनंतर अफगाणिस्तानच्या टेकड्यांमध्ये पोसलेला तालिबान स्वातमध्ये उतरला. त्याआधी नाटो फौजांविरुद्ध पाक लष्कराच्या अनुमतीने गेलेले १२ हजार स्वाती तरुण कधी घरी परतलेच नव्हते. याच काळात मिंगोरात आलेल्या एका मुफ्तींनी मुलींच्या शाळा बंद करण्यासाठी कारवाया सुरू केल्या. मुलींचं शाळेत जाणं धर्मविरोधी असल्याचं सांगत लोकांना फितवायला सुरुवात केली. त्यानं स्वातमधलं संगीत बंद केलं. एका नृत्यांगनेला ठार करून तिचा मृतदेह चौकात आणून कसा ठेवला, तो प्रसंग मलालाच्या शब्दांत वाचताना अंगावर शहारे येतात. स्वातचं तालिबानीकरण होण्याचा प्रक्रिया मलाला विस्ताराने सांगते. बुरखे घालण्याची सक्ती झाली, जुन्या बुद्धमूर्ती फोडल्या, टीव्ही बघायला बंदी केली, बायकांचं घराबाहेर पडणं बंद झालं. मुलींच्या शाळा बंद पाडल्या जाऊ लागल्या, सांगूनही ऐकलं नाही तर उडवून दिल्या गेल्या, शिक्षकांवर हल्ले झाले. या वातावरणात मुलं कशी वाढत होती, हे ऐकताना अक्षरश: धक्का बसतो. क्रिकेट अन् विटीदांडूऐवजी मुलं लष्कर विरुद्ध तालिबान खेळत. मलालाने लिहिलंय, एकदा तिचा धाकटा भाऊ बागेत त्वेषाने खणत होता, कारण विचारले तर म्हणाला, ‘कबर खणतोय...’ याच दरम्यान मलाला आणि तिचे वडील वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर जाऊन स्वातमधल्या मुलींच्या शिक्षणाबद्दल, त्यांच्या हक्कांवरील अतिक्रमणांबद्दल बोलत होते. गुल मकई या टोपण नावानं मलालानं बीबीसीसाठी एक कॉलमही लिहिला. स्वातमधल्या मुली भयाच्या सावटाखाली कशा जगताहेत, हे जगभर पोहचलं. दुसरीकडे शाळेतून मुलींची गळती सुरूच होती. २००९ मध्ये मलालाच्या वर्गात २७ पैकी १० मुली उरल्या. अख्ख्या स्वातमध्ये ५० हजार मुलींना शाळेत जाण्यापासून रोखलं गेलं होतं. परिस्थिती इतकी बिघडली की तालिबान्यांना हुसकवण्यासाठी लष्कराने स्वातचा ताबा घेतला. स्वाती लोकांना आपल्याच गावातून, आपल्याच घरातून परागंदा व्हावे लागले. मलालाच्या लेखणीतून हा प्रसंग आणि त्याकाळात झालेली फरपट वाचताना संताप येतो. दोन महिन्यांत तिच्या कुटुंबाला चार गावं फिरावी लागली. तीन महिन्यांनी ती मिंगोरात परतली, तेव्हा संपूर्ण गाव उद्ध्वस्त झालं होतं. मलाला आणि पाकिस्तानात महत्त्वाची व्यक्ती झाली होती. कराची, लाहोर, इस्लामाबादच्या भेटी देऊन तिथल्या महत्त्वाच्या व्यक्तींशी स्वातमधल्या मुलींची प्रतिनिधी म्हणून शिक्षणाच्या हक्कासाठी आग्रह धरत होती. याच काळात एका दौऱ्यादरम्यान मलालाला इंटरनेटवरून पहिली धमकी आली. भय आणि दहशत घरापर्यंत येऊन पोहोचलं होतं. याआधी तिच्या वडिलांना धमक्या येत होत्या, पण यावेळचं प्रकरण गंभीर होतं. हे भीतीचं सावट इतक होतं की मलालाला गोळ्या घातल्याची, अ‍ॅसिड फेकल्याची स्वप्नं पडू लागली. प्रार्थना सुरू झाल्या आणि... एक दिवस ते घडलंच. परीक्षा देऊन परतत असताना तिच्या बसवर गोळीबार झाला. गोळी थेट डोक्यात घुसली. त्यानंतर तिच्यावर पेशावर, इस्लामाबादेत झालेले उपचार, त्यातलं राजकारण, तिला परदेशी हलवण्याचा निर्णय, लष्करप्रमुख कयानी यांनी त्यात बजावलेली कळीची भूमिका मलालाच्या हल्ल्यादरम्यान दोन ब्रिटिश डॉक्टर पाकिस्तानात असण्याचा योगायोग... हे सारं रोमांचक. बर्मिंगहॅममध्ये तिच्यावर झालेल्या उपचारांचे ती एखाद्या तज्ज्ञांच्या भूमिकेत जाऊन वर्णन करते. यादरम्यान साऱ्या जगातून तिला तब्बल ८ हजार भेटकार्ड आली. हजारो भेटी आल्या. या हॉस्पिटलच्या मुक्कामातला एक हळवा क्षण मलालानं सांगितलाय. तिला मिळालेली सर्वांत मोठी भेट होती ती, बख्तावर आणि बिलावल या बेनझीर यांच्या मुलांनी मलालाला पाठवलेली त्यांच्या आईची शाल. त्या शालीवर तिला एक लांबसडक काळाभोर केस सापडला होता. अनेक छोट्या-मोठ्या ऑपरेशन्सला सहजपणे सामोरी गेलेली मलाला प्रदीर्घ उपचारांनंतर पुन्हा सामान्य आयुष्य जगतेय, पण तिच्या कुटुंबाला सुरक्षेच्या कारणास्तव पुन्हा मायदेशात जाता आलेलं नाही. मलालानं लिहिलंय, ‘असं म्हणतात की, कोणताही पश्तून त्याच्या भूमीचा स्वेच्छेने त्याग करत नाही. त्याला गरिबीमुळे जावं लागतं किंवा तो प्रेमासाठी जातो’.... पण तिचं देशाबाहेर राहणं याहून वेगळं आणि वेदनादायी आहे. पुन्हा मायदेशी जायचं तिचं स्वप्न आहे, मात्र बर्मिंगहॅममध्ये राहूनही तिनं तिचं काम सुरू ठेवलंय. मलाला आता केवळ पाकिस्तानची नव्हे साऱ्या जगाची कन्या आहे. अक्षरांची ताकद तिनं ओळखलीय. ही शक्ती जगभरातल्या मुलींना मिळावी यासाठी तिनं गोळ्या झेलल्यात आणि त्यातूनही ती पुन्हा उभी आहे. लहानपणी उंची वाढवण्यासाठी प्रार्थना करणारी मलाला आता आभाळाएवढी उंच झालीय... म्हणूनच स्वप्न बघणाऱ्या प्रत्येक मुलीने अन् तिच्या स्वप्नांना फुलवण्यासाठी खंबीरपणे मागे उभे राहणाऱ्या सगळ्यांनीच मलालाची गोष्ट वाचायला हवी. Pragati.bankhele@timesgroup.com ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SATTANTAR
SATTANTAR by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Mayur Sarkale

व्यंकटेश माडगूळकर हे फार `पट्टीचे` कथालेखक म्हणून प्रसिद्ध आहेत.त्यांच्या कथा वाचताना आणि आपल्या डोळ्यासमोर घडताना त्यांची प्रतिभा आणि वरील वाक्य सतत जाणवत राहते. माडगूळकरांनी त्यांच्या एकंदरीत लेखन प्रपंचात २०० हून अधिक कथा लिहिल्या, याव्यतिरिक्त ८कादंबऱ्या देखील त्यांच्या नावावर आहेत, त्यापैकीच एक म्हणजे "सत्तांतर" होय.आपल्याला कादंबरी म्हणल्यावरती ३००-४०० पानांचा आराखडा - गठ्ठा समोर येतो. सत्तांतर ही केवळ ६३ पानांमध्ये घडते. मराठी साहित्य क्षेत्रात आणि त्यातला त्यात कादंबरीच्या प्रांतात अशी कादंबरी माझ्यामते फक्त पाश्चिमात्य साहित्यात पाहायला मिळेल. (असावी. उदा. अँनिमल फार्म -जाँर्ज ओरवेल). सत्तांतर ला साहित्य अकादमीचा पारितोषिक तर आहेच पण त्याहून या पुस्तकाच्या धाटणीचा ( आताच्या भाषेत प्लॉट ) चं अधिक कौतुक केलं गेलं होतं. मला ह्या धाटणीचा निवडीपेक्षा माडगूळकरांच्या विषयनिवडीच, धाडसाचं कौतुक वाटतं. सत्तांतर ही संपूर्ण कथा माणसाच्या पूर्वजांमध्ये माकडांमध्ये घडते. सत्तांतर मधील वानरांची जात ही `हनुमान लंगुर` ही आहे. समाजामध्ये संघर्ष हा सतत पेटता असतो फक्त त्याला थोडीफार वाऱ्याची झुळूक लागली की मग तो उफाळून उग्रता दाखवतो, ४ हात भाजवतो, डोळ्यांत भीती निर्माण करतो आणि प्रसंगी तर जीव ही चाखून,चाटून -पुसून खातो. लेखक कथेतील वानरांच्या टोळ्यांना, त्यांच्या प्रमुखांना त्यांच्या शरीरवैशिष्टानुसार नावे देखील देतात त्यामुळे कथेतील रंजगता सतत आपल्याला धरून ठेवते. समाज आणि जगणं म्हणलं की संघर्ष हा आलाच आणि त्यातल्या त्यात त्यामध्ये साम्राज्यवादाची झळ असेल,भूमिका असेल,उद्देश असेल तर मग हे सत्तांतर अटळच आहे. संघर्ष करून एखादा स्वतःचा असा प्रदेश तयार करतो, आपली स्वतःची माणसं तयार करतो,आपली ताकत वाढवण्यासाठी तो हवे ते करतो हे सर्व कोणी ना कोणी पाहत असत त्याला हे सर्व आवडत असतं इथपर्यंत हिथपर्यंत ठीक पण त्याला हेच सर्व जेव्हा हवंहवंसं वाटू लागतं तेव्हा घडतं " "सत्तांतर" सत्तांतर म्हणजे सत्तेमधला बदल. दुसऱ्याची उलथवून आपली उभी करणं म्हणजे सत्तांतर. लेखकाच्या बाकी ७ कादंबऱ्याना प्रस्तावना नाही. सत्तांतरला आहे कारण त्यावर लेखकाची अप्रतिम छाप पडलेली आहे. सत्तांतर मागे लेखकाचा खरा कस जाणवतो. प्रस्तावनेमध्ये त्यांनी विषयाची पार्श्वभूमी ही अगदी १८३६ पासून मांडली आहे. सत्तांतरसाठीचे विविध शास्त्रज्ञांनी लिहून ठेवलेली संदर्भ, त्यांची निरीक्षण आणि "लंगूर्स ऑफ अबू" या ग्रंथाचा त्यांना झालेला उपयोग असं बरंच त्यांनी लिहिलेलं आहे. माडगूळकरांची स्वतः ची काही महिन्यांची अभयारण्यातली निरीक्षण,छायाचित्र ही सत्तांतर मधून,त्या निवेदनामधून अक्षरशः बोलतात,उभी राहतात समोरासमोर. मला वाटत पुस्तकाची प्रस्तावना एक पूर्ण वेगळी कथा आणि पुस्तकातली कथा अश्या वेगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे प्रस्तावणेच वेगळं भाष्य करायचं प्रयत्न केला. एका बैठकीत संपूर्ण होईल आणि आपण अजब आणि जंगलामध्ये फिरून आलो की काय ? असा अनुभव आपल्यालाही येईल अशी अपेक्षा. ...Read more

AND THE MOUNTAINS ECHOED
AND THE MOUNTAINS ECHOED by Khaled Hosseini2 Rating Star
लोकसत्ता 17 मार्च 2019

विपरीततेची परीकथा... अफगाणिस्तान हा एक दुर्दैवी देश. धर्माधतेची परिणती कशात होते, हे अफगणिस्तानकडे बघून कळतं... आपण बहुतांश पौर्वात्य आपली घट्ट विणलेली कुटुंबसंस्था आणि शिस्तबद्ध पितृसत्ताक व्यवस्था याविषयी अभिमान बाळगतो. पण हे मजबूत वाटणारे धागे मळापासून गदागदा हलवले, उचकटून फेकून दिले तरीही उरतं माणसा-माणसांमधलं निखळ प्रेम, ममता आणि माणूसकी. हीच मूल्यं शेवटी महत्त्वाची असतात, हे ‘अ‍ॅण्ड द माऊंटन्स एकोड’ या कादंबरीत सांगितलंय. ‘द काईट रनर’ या गाजलेल्या कादंबरीचे लेखक खालिद हुसनी यांची ही तिसरी कादंबरी. अफगाणिस्तान हा एक दुर्दैवी देश. धर्माधतेची परिणती कशात होते, हे अफगणिस्तानकडे बघून कळतं. आपण अफगणिस्तानच्या भीषण अवस्थेकडे नीट पाहायला हवं. आपल्याला आपल्या सुस्थित घराची, अजूनही बऱ्यापकी घट्ट विण असलेल्या कुटुंबपद्धतीची कदर वाटत नाही. हे सगळं कायम असणार आहे असं गृहीत धरून आपण जगतो. मात्र, अचानक एके दिवशी कुटुंबातील आपलं सगळ्यात जवळचं असलेलं माणूस गमावणं ही कमालीची भयावह गोष्ट असते. अचानक एके दिवशी आपल्याला आपला देशच नसणं ही अत्यंत भीषण गोष्ट असते. ‘अ‍ॅण्ड द माऊंटन्स एकोड’ ही या अशा भयानकतेची कादंबरी आहे. देश, भाषा, रक्त यांच्या आयुष्यभराच्या शोधाची ही कादंबरी आहे. या कादंबरीत चितारलेला काळाचा पट मोठा आहे. प्रदेशविस्तार अफाट आहे. तीत अनेक पात्रं आहेत. मात्र, मूळ कथा आहे अब्दुल्ला व परी या भावा-बहिणीची. दहा-बारा वर्षांचा अब्दुल्ला हा तीन-चार वर्षांच्या परीचा भाऊ नसून जणू आईच आहे. त्यांची आई परीच्या जन्माच्या वेळेस वारली आहे. परवाना ही त्यांची सावत्र आई आहे. ती सावत्रपणा करत नसली तरी त्यांच्याशी तुटकपणे वागते. आपल्या अपत्यांमध्ये ती रमली आहे. अत्यंत गरिबीत हे कुटुंब कसंतरी जगतं आहे. अब्दुल्ला व परीच्या सावत्रमामाच्या कृपेनं परीचं आयुष्य बदलायची संधी चालून येते. नबी हा सावत्रमामा काबूलमधल्या अतिश्रीमंत सुलेमान वाहदाती परिवाराचा नोकर आहे. त्याची मालकीण- सुलेमानची तरुण बायको नीला वाहदाती अर्धी फ्रेंच आहे. ती अत्यंत सुंदर, बंडखोर आणि स्वैर स्त्री आहे. ती अपत्यहीन आहे. तिला काही वैद्यकीय कारणामुळे मूल होऊ शकत नाही. नीला उत्तम कवी आहे. नबी परीला नीलाला देऊन तिच्या आयुष्यातली पोकळी भरू पाहतो. सुलेमान, नबी आणि नीला हा एक विचित्र प्रेमाचा त्रिकोण आहे. त्या काळात अफगाणिस्तानात समलैंगिक असणं हे केवळ गुपितच असू शकतं. सुलेमानचं नबीवर अव्यक्त प्रेम आहे. नबी नीलावर अव्यक्त प्रेम करतो. नीला मात्र फक्त स्वतवर प्रेम करते. नशिबाचे फासे असे पडतात, की नीला परीला घेऊन पॅरिसला कायमची निघून जाते. सतानी तालिबानच्या उदयापूर्वी हे घडतं. परी आणि नीलाची कथा पॅरिसमध्ये पुढे सुरू राहते. नीला वाहदाती, जुलिन आणि परी यांचाही प्रेमत्रिकोण आहे. नीला वाहदाती हे पात्र लेखक हुसनी यांनी फार प्रेमाने लिहिलंय. नीला मनस्वी, आत्मघाती प्रवृत्तीची आहे. दुसऱ्याच्या आयुष्यात पोकळी निर्माण करून स्वतची पोकळी भरता येत नाही, याची जाणीव नीलाला फार उशिरा होते. नबी आणि सुलेमानची कथा काबूलमध्ये सुरू राहते. पुढे अफगाणिस्तानात तालिबानी येतात. अपार विध्वंसानंतर पुन्हा जीवन सुरू होतं. सुलेमान आता वारला आहे. नबी वाहदातींच्या खिळखिळ्या हवेलीचा मालक बनला आहे. मार्कोस वर्वरीस हा ग्रीक प्लास्टिक सर्जन नबीकडे भाडेकरू म्हणून येतो. मार्कोसची एक वेगळीच कथा आहे. थालिया ही त्याची घट्ट बालमत्रीण. थालियाचा लहानपणीच कुत्र्याने जबडा फाडला आहे. ती भीषण कुरूप आहे. ओडेलिया ही मार्कोसची आई. ती शिक्षिका होती. ती खंबीर व कणखर विधवा बाई आहे. थालिया ही ओडेलियाच्या बालमत्रिणीची मुलगी आहे. या दुर्दैवी मुलीला तिची अभिनेत्री आई चक्क ओडेलियाकडे टाकून पळून जाते. स्वतच्या कुरुपतेशी झगडणारी, तीक्ष्ण वैज्ञानिक बुद्धीची थालिया, भटक्या वृत्तीचा छायाचित्रकार (आता प्लास्टिक सर्जन झालेला) मार्कोस आणि आयुष्यभर मार्कोस व थालियावर मूक प्रेम करणारी ओडेलिया हादेखील नातेसंबंधांचा एक विलक्षण त्रिकोण म्हणायला हवा. या एका कादंबरीत अनेक कादंबऱ्या वेगवेगळ्या काळांत सुरू आहेत. तीत कॅलिडोस्कोपप्रमाणे प्रत्येक नातेसंबंधांची नक्षी अलग आहे. त्यामुळे मुख्य पात्रांखेरीज अनेक पात्रं येतात. अमेरिकेत स्थलांतरित होऊन यशस्वी आयुष्य जगणारे तमूर बशिरी आणि डॉ. इद्रिस बशिरी हे दोघे चुलतभाऊ आहेत. घरगुती भांडणात संपूर्ण कुटुंब गमावलेली आणि मेंदूवर घाव झेलून उभी राहिलेली लहानगी रोशी आहे. इस्टेटीच्या कामासाठी इद्रिस आणि तमूर काबूलमध्ये येतात. योगायोगाने रोशीला भेटतात. इद्रिस रोशीवर माया करू लागतो. पण तिला मदतीची गरज असते तेव्हा मात्र काहीच करत नाही. स्वार्थी वाटणारा तमूर मात्र रोशीला अमेरिकेत येऊन उपचारांसाठी, जगण्यासाठी मदत करतो. अब्दुल्ला आणि परीची सावत्र आई परवाना, वडील सबूर आणि परवानाची जुळी, देखणी बहीण मासुमाची एक वेगळीच कथा आहे. परवाना क्रूर स्वभावची स्त्री आहे. हा प्रेमाचा त्रिकोण मासुमाला आयुष्यभराचं पांगळेपण देतो. एकेकाळी अब्दुल्ला आणि परीचं जिथं घर होतं, ती जागा बळकावून तिथे हवेली बांधून राहणारा शादबागमधला अफू माफिया बाबाजान व त्याचा निरागस मुलगा आदेल आहे. या सगळ्यांचे आपापसातले नातेसंबंध आणि कडय़ा जुळवताना वाचकाची पार दमछाक होते. अर्थात कादंबरी हा साहित्यातील बडा ख्याल असतो. सुरांच्या अनेक लडय़ा उलगडत जाव्यात तशी कादंबरी उलगडत जायला हवी. कधी कधी मात्र कादंबरी वाचकाच्या संयमाची परीक्षा बघते. या ३७० पृष्ठांच्या कादंबरीचा अनुवाद वैजयंती पेंडसे यांनी केला आहे. अनुवाद प्रवाही आहे. परीकथेपासून सुरू होणारी ही कथा वास्तव आयुष्यदेखील परीकथेपेक्षा कमी चमत्कारिक नसतं हे सांगते. लेखक खालिद हुसनी यांनी ११ वर्षांचे असताना अफगाणिस्तान सोडला. काही र्वष त्यांनी फ्रान्समध्ये काढली. नंतर ते अमेरिकेत गेले आणि तिथेच डॉक्टर होऊन स्थायिक झाले. २००१ नंतर स्वतच्याच देशात ते एखाद्या पर्यटकासारखे फिरले. तिथे त्यांना त्यांच्या कादंबऱ्या सापडल्या. अशावेळी परवीन कुमार अश्क यांचा एक शेर आठवतो : ‘तमाम धरती पे बारूद बिछ चुकी है खुदा, दुआ जमीन कही दे तो घर बनाऊ मैं’ ..आणि ‘अ‍ॅण्ड द माऊंटन्स एकोड’ ही संपूर्ण मानवजातीच्या निर्वासितपणाच्या दुखाची आणि ताटातुटीची कादंबरी होते. - जुई कुलकर्णी ...Read more