* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Ranjit Desai`s short stories are different than other short stories. They always take place in wondrous situations, almost have an environment as if in a fairy tale. They are not restrained to Maharashtra. They have a vast background, that of whole India. This author literally lives the line, "India is my country`. The stories are more historical than realistic. Music and romance are the inevitable factors of the stories. The characters are romantic and love to be in their own world, always lost in the dreamy environment. For them, nothing values more than love and art, not even their life. The female characters which meet us through his stories are always beautiful, petite, fragile, willing to sacrifice for love without any hesitation in their minds. He has always penned them down very delicately, whateer their occupation is, be it a singer, a dancer, a prostitute or a housewife. He has always being considerate of the delicate female mind. His stories take us to places far away, make us forget the real world. The background is equally colourful with all the details penned down minutely. This shows his observation skills. Though his stories tend to be more on the wonderous side, the characters are typical human beings. He has sketched them very realistically so much that we automatically and unknowingly get involved, laughing with their happiness and crying with their sorrows.Pralhad Keshav Atre
‘रणजित देसाई यांची लघुकथा सर्वसामान्य मराठी लघुकथेपेक्षा निराळी आहे. अद्भुतरम्य वातावरणात वावरण्याची तिला हौस आहे. निळ्या; सुंदर स्वप्नात ती रंगून गेलेली आहे. तिचे स्वरूप महाराष्ट्रीय असण्यापेक्षा अखिल भारतीय स्वरूपाचे आहे. वास्तवापेक्षा इतिहास तिला अधिक रुचतो. संगीत व शृंगाराच्या रसात ती नखशिखान्त नाहून निघाली आहे... रसिक मनाची नादिष्ट पात्रे त्यांच्या कथेत स्वप्नातल्याप्रमाणे वावरत आहेत. कलेसाठी आणि प्रेमासाठी ती आपले जीवन उद्ध्वस्त करून घेतात; आणि त्याची मुळीच खंत मानीत नाहीत. रणजित देसार्इंच्या कथांत वावरणाया स्त्रिया रूपवान, नाजूक, कलावंत आणि त्यागी आहेत. नायकीण असो, गाणारी असो वा कुलवती असो, त्यांनी तिच्या स्त्रीमनाचा, तिच्या मृदुलतर भावनांचा आविष्कार करताना आपली लेखणी मुलायमपणे वापरली आहे. रणजित देसार्इंच्या लेखणीत प्रसाद आहे, माधुर्य आहे; वाचकाला रम्य वातावरणात नेऊन वास्तवता विसरावयास लावणारी जादू आहे. आपल्या कथेची पाश्र्वभूमीही ते मोठ्या कल्पकतेने, कथेतही स्वप्नमयता वाढावी, अशा तहेने वापरतात. त्यांच्या अवलोकनशक्तीचे आणि कल्पकतेचे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे. त्यांच्या कथांतील वातावरण वास्तवापेक्षा अद्भुततेकडे झुकणारे असले, तरी पण त्यातून आकाराला येणाया व्यक्ती मात्र मानवी जगातल्या आहेत. आपल्या सुखात रंगणाया अन् आपल्या दु:खात पिचणाया त्यांच्या कोमल हृदयाचे त्यांनी केलेले चित्रण इतके जिवंत आणि चटकदार आहे, की ते अवलोकिताना वाचक हसावा नि रडावा...’ – प्रल्हाद केशव अत्रे
Keywords
#RANJEET#DESAI#MEKH#MOGARI #रणजीत#देसाई#मेख#मोगरी
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    रंजक, रोचक पण पसरट कथा... ‘मेख मोगरी’ हा श्री. रणजित देसाई यांच्या पाच कथांचा वाटल्यास त्यांना दीर्घकथा म्हणा– संग्रह आहे, या पाचही कथा आकर्षक तर आहेतच; पण प्रत्येक कथेची पार्श्वभूमी वेगवेगळी आहे. कोठे इतिहासकाराची आठवण व्हावी अशी कोठे दोन पिढ्यांच्ा मागचे समाजजीवन डोळ्यापुढे उभे राहावे अशी, कोठे त्याग आणि भोग यांच्या शाश्वतद्वंद्वाचे दर्शन घडावे अशी, कोठे आजच्या भकास जीवनाचे दर्शन घडवून चित्त थरारून सोडणारी भीषण दाहकता मन कुरतडीत राहील अशी, तर कोठे भारतातील पूर्वकालीन संस्थानातील राजघराण्यात स्वार्थासाठी कोणते कुटिल डाव खेळले जात याचे मोठे प्रयत्ययकारी दर्शन घडवील अशी पार्श्वभूमी आहे. माणसांच्या जीवनातले वेधक क्षण देसाई मोठ्या कौशल्याने टिपतात आणि आपल्या अनलंकृत, काळजाला भिडणाऱ्या भाषेच्या द्वारे कधी आनंदभरी तर कधी दर्दभरी कथा जन्माला येते. प्रणयरम्य कथा त्या संग्रहातली ‘मेख मोगरी’ ही पहिलीच कथा या दृष्टीने मोठी लक्षणीय आहे. माणिकराव निंबाळकर या खानदानी सरदारांच्याकडे तुकोजीराव जाधव या नावाचे दुसरे सरदार पाहुणे म्हणून येतात. मोठ्या अगत्याने आणि आदराने त्यांचे आगत-स्वागत होते. माणिकरावांच्या तरुण कन्येने सखूबाईने जातीने लक्ष घालून स्वागताची सारी तयारी केलेली, खाण्यापिण्याचीच नव्हे तर शिकारीचीही, पण बरोबर आलेल्या तुकाजीरावांच्या मुलाचे म्हणजे अहिररावांचे आणि सखूबार्इंचे परस्परांकडे लक्ष वेधते आणि प्रणयाचे रेशमी धागे गुंफले जातात. ही आहे प्रणयाच्या नाजुक. रेशमी धाग्यांनी विणलेली कथा! या कथेत प्रणयाचे भडक रंग नाहीत की, प्रेमाच्या भाषेची आतषबाजी नाही. सारेच वातावरण कसे सौम्य, मनाला रिझविणारे, गुदगुल्या करणारे आहे. त्यामुहे ही कथा मनाची पकड कधी घेते हे लक्षातच येत नाही. मुलखावेगळी कथा ‘संस्कार’ ही एका सतरा-अठरा वर्षांच्या कोवळ्या वयाच्या मुलाची मोठी मुलखावेगळी कथा आहे. केशव कुलकर्णी शास्त्री या एकेकाळच्या नामवंत कीर्तनकाराचा नारायण हा पोरका मुलगा. ना आई, ना बाप, ना घर, ना दार! भिक्षेची झोळी घेऊन पोट भरण्यासाठी बाहेर पडलेला हा मुलगा योगायोगाने विश्वंभटशास्त्रांच्या घरी येतो. त्याने नाव सांगताच ओळख पटते. ‘‘मोठा पाहुणा आला आहे, त्याच्या भोजनाची व्यवस्था करा,’’ असे ते पत्नीला आणि सुनेला सांगतात तशी सुनबाई ‘‘घराची एकदा धर्मशाळा केली की सुटले!’’ अशी सासऱ्याची केली की सुटले!’’ अशी सासऱ्याची संभावना करते; पण तो राहतो, जेवतो पण घरातली एखादी वस्तू दिसेनाशी झाली की सूनबाई त्याचा संशय घेते. तो वेदपठनाचे नित्यकर्म करीत राहतो. त्याच्या वागण्याने घरातली माणसे हळूहळू बदलतात आणि निपुत्रिक असलेल्या सूनबाईला तर वात्सल्याचा पान्हा फुटतो. चांगल्या संस्कारात वाढलेला; पण संकटानी ग्रासलेला माणूस ही वेळ आली की कसा वागतो आणि इतरांचे धन्यवाद मिळवितो. याचे मोठे रसरशीत चित्र देसाई यांनी आपल्या शब्दसामर्थ्याने वाचकांपुढे उभे केले आहे. ‘सूरसिंगार’ ही कथा आहे. सूरसिंगार नावाच्या जहागिरीची आणि तिच्या गादीवर आलेल्या परस्पर विरोधी राजाची. योगराज गादीवर होते. तेव्हा लोक त्यांना मानीत; पण भोगराज हे योगराजांच्या मृत्यूनंतर जहागिरीच्या गादीवर आले आणि सारा मनु पालटला. भोगराजांनी आपल्या कृतीने आपले नाव सार्थ केले. भोग-उपभोगांना सीमा राहिल्या नाहीत. योगराज प्रजेचे दैवत होते, तर भोगराजांचे नाव ऐकताच प्रजेचा भीतीने थरकाप होऊ लागे. अशी ही चित्त थरारून सोडणारी कथा! करुण कहाणी ‘मोकळे आकाश’ ही आजच्या समाजजीवनाचीच एक करुण कहाणी. सारे ऐषआराम मिळूनही बॅरिस्टर असलेल्या अभिजित देशापांडेचे सारे जीवनच कसे उद्ध्वस्त झाले हे लेखकाने अशा काही कौशल्याने सांगितले आहे की, मनाला गहिवर यावा! गोव्यातल्या मंगेशीजवळ लीलावती या भाविणीसाठी अभिजितच्या वडिलांनी एक बंगला बांधला. अभिजित वडिलांच्या बरोबर तेथे जाऊ लागला. आईविना पोरका झालेल्या अभिजितला लीलाईचा लळा लागला आणि मग वडील गेले तरी तो मंगेशीला येतच राहिला. लीलाईची मुलगी अबोली आणि तो ‘यांच्यामध्ये भावा-बहिणीचे नाते निर्माण झाले. आपणावर कोणी तरी प्रेम करावे, जपावे अशी एक भूक त्याच्या मनात होती. तीही पूर्ण होत होती. त्यातच वैजयंतीसारखी पत्नी त्याला लाभली होती; पण मग हळूहळू सारे पालटले. वैजयंती त्याला सोडून गेली. रशीद नावाच्या मुसलमानाबरोबर अबोलीचे लग्न झाले आणि ती दुबईला निघून गेली. काही काळानंतर ती परत आली; पण तिच्या घरी त्याला जाता येईना. घरात कोणी नसताना परक्या पुरुषाबरोबर बोलत बसण्याचा त्यांच्या घरात रिवाज नव्हता. त्यातच लीलाईचा मृत्यू झाला. स्नेहाने, प्रेमाने आपुलकीने आणि सौहार्दाने काठोकाठ भरलेले त्याच्या मनाचे आकाश मोकळे झाले आणि ज्या गोव्यावर त्याने मनोमन प्रेम केले होते त्या गोव्याचा कायमचा संबंध सुटला होता! आणि संग्रहातली ‘शेवटचा शिवाजी’ ही अखेरची कथा जुन्या काळातल्या संस्थानातील घराण्यात सत्तेसाठी जी कारस्थाने होत त्यांची कहाणी सांगते. वैफल्याची किनार ‘मेख मोगरी’ कथासंग्रहातील कथांचे स्वरूप हे असे आहे. या सर्वच कथांना कारुण्याची, उदासीनतेची आणि क्वचित वैफल्याची जी एक किनार आहे त्यामुळे या कथा वाचताना वाचक अनेकदा अंतर्मुख होतो, त्याचे मन गलबलून जाते आणि ‘असे का?’ या विचाराचे प्रश्नचिन्ह त्याच्या मनात उभे राहून तो अस्वस्थ होतो. कथांच्या यशस्वीतेचाच हा साक्षात पुरावा आहे. या सर्वच कथा रंजक आणि रोचक आहेत आणि व्यक्तींची मोजक्या शब्दात शब्दचित्रे रेखाटणे यात तर कथाकाराचा हातखंडा आहे; पण कथेचा आघात वाचकांच्या मनावर होण्यासाठी साऱ्या निवेदनाला जो टोकदारपणा यावा लागतो. तो निवेदनाच्या पसरटपणामुळे येत नाही आणि या कथांचे उणेपण जाणवल्यावाचून राहत नाही. या साऱ्या कथा घटनाप्रधान आहेत त्यामुळे कथेतील घटना निवेदनाच्या सूत्रांत गुंफण्यात लेखक किती कौशल्य दाखवितो यावरच कथेची परिणामकारकता अवलंबून असते. घटनांना अर्थ वाचकांच्या मनात उलगडत जाऊन त्याचे मन आनंदित या व्यथिंत होण्यातच कथेचे सारे यश सामाविलेले असते याचे विस्मरण रणजित देसार्इंसारख्या समर्थ कथा-लेखकालाही व्हावे याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहवत नाही. तरीही चांगली कथा वाचली की वाचकांच्या मनाला जी एक तृप्तता येते तिचा अनुभव या कथा वाचूनही वाचकाला येतो हे मान्य करावेच लागेल. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 29-1990

    सामान्य वाचकाला रिझवणाऱ्या कथा... ‘स्वामी’कार रणजित देसार्इंच्या पाच कथांचा संग्रह ‘मेखमोगरी’ या नावाने प्रसिद्ध झाला आहे. रणजित देसार्इंनी मराठी कादंबरीला ‘स्वामी’मुळे नवी शैली दिली. नवे परिमाण दिले. स्वामीच्या आवृत्त्या पुन्हापुन्हा प्रसिद्ध होत आेत. केवळ ऐतिहासिक कादंबरी म्हणूनच याकडे न बघता एकूण मराठी कादंबरीचा ढाचा देसार्इंनी पार बदलला. त्यातून परिणामकारक निवेदनपद्धती दिसली. कथानक रचनेचे चातुर्य प्रकटले. संवादांची मार्मिकता जाणवली. हे सारे नव्याने प्रत्ययास आले. म्हणून स्वामींचे नाविन्य आजही कायम आहे यात वादच नाही. हे सारे येथे थोडक्यात अशासाठी सांगितले की, ‘मेखमोगरी’ हा कथासंग्रह वाचताना स्वामीच्या विनेदनशैलीची दाट छाया या साऱ्याच कथांवर आहे; किंबहुंना अद्यापही देसाई स्वामीच्या शैलीच्या कचाट्यातून सुटलेले नाहीत, असे जाणवते. यातल्या प्रत्येक कथेचा आरंभ स्वामीच्या प्रकरणांचा तुकडाच वाटतो. यातल्या प्रत्येक कथेला आरंभ करतानाचा ऐसपैसपणा लेखक स्वीकारतो. पण खेचक प्रसंग फार पुढे येतो, बाकी दिवाणखान्याची, महालाची, किल्ल्यांची, परिसरांची वर्णने वाचताना स्वामीमधली वर्णने आपण वाचीत आहोत, अशी टोचणी सरखी लागून राहते. ढोबळपणा या कथासंग्रहात तीन कथा ऐतिहासिक आहेत, तर दोन कथा सामाजिक आहेत. या कथासंग्रहाचे शीर्षक असलेली मेखमोगरी ही दीर्घ कथा आहे. माणिकराव निंबाळकर व तुकोजीराव जाधव यांच्यातल्या मैत्रीची ही कथा आहे. सरदार माणिकराव निंबाळकरांच्या वाड्यातल्या प्रवेशद्वाराच्या उंच कमानीवर एक मोत्याची भरगच्च मोगरी टांगली होती. त्याच्याजवळ रौप्य मेखला होती. तुकोजीरावांचे चिरंजीव अहिराव यांनी ती बघितली. ती निंबाळकरांची वंशपरंपरेची मिजास आहे हे कळताच अहिराव जाधवांचे रक्त तापले. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जो वाडा लुटेल त्याला ती मेखमोगरी मिळेल असे निंबाळकर सांगतात. अहिराव हे आव्हान स्वीकारतात. माणिकरावांची सुस्वरूप कन्या सखुबार्इंना ते लागते. अहिराव पराक्रमाने दिवसभरात वाडा लुटतात. त्यांची थोप तरवार व ताम्रपटही लुटतात. ठरल्याप्रमाणे मेखमोगरी उतरवतात. पण अहिराव ती उतरू देत नाहीत. दोघे व्याही होतात. मैत्रीचे रुपांतर नात्यात होते. सखुबार्इंचे स्वप्न साकारते. या कथानकात सुक्ष्म छटा आहेत. त्या अधिक यायला हव्या होत्या. त्यामुळे कथानक ढोबळपणाने वाचकाच्या समोर आले, तसे आले नसते. शेवटही गुंडाळल्यासारखा वाटला नसता. सूरसिंगार या कथेत मेवाड आणि उदेपूर यांच्या सीमेवर असणाऱ्या एका छोट्या जाहिरातीच्या पडत्या काळातली घटना आहे. या जहागिरीस सूरसिंगार म्हणत. राजा भीमदेवाचा तो मुलुख होता. यात राखी नाम गढी होती. याचे मालक चंद्रराज होते. हे योजराजांचे दिवाण होते. योगराजांच्या मृत्यूनंतर भोगराज आले नि जहागिरीला ग्रहण लागले. यातून चंद्रराज व भोगराज एकमेकांचे वैरी झाले. याचे चित्रण या कथेत आहे. तर ‘शेवटचा शिवाजी’ या कथेत हिंदवी स्वराज्यसंस्थापक छत्रपती यांच्या वंशांतले इंग्रजांची लाचारी पत्करणारे अखेरचे शिवाजी यांचे चित्रण आले आहे. यातील महाराजांच्या अस्वस्थ माचे चित्रण प्रत्ययकारी झाले आहे. घराण्यातल्या गादीच्या संघर्षातली कुजलेली मने यात दिसतात. या तीनही ऐतिहासिक कथांत ही कथा त्यातल्या त्यात प्रभावी वाटते. बाळबोध कथा संस्कार व मोकळं आकाश या दोन सामाजिक बाळबोध कथा आहेत. कथा अतिशय सरळ नि नेहमीच्याच प्रश्नांच्या वा त्याच त्याच कथानकातल्या आहेत. केशवशास्त्र्यांचा मुलगा नारायण विश्वंभर अण्णांच्या घरात गरिबीमुळे माधुकरी मागतो. तो कुणाचे काहीही चोरत नाही. शेवटी अण्णांच्या एकादशीच्या कीर्तनात खंड पडू नये, म्हणून तो कीर्तनही करतो. आपल्या संस्काराच्या प्रभावाने तो सर्वांना आपलासा करतो. शेवटी तो अण्णांचे पूर्ण घर सांभाळतो. मोकळ्या आकाशामध्ये अभिजित गोव्यातल्या लीला भाविणीला आई मानतो. तिची कन्या अबोली हिला बहीण मानतो. आईसाठी कष्टही करतो. त्याची पत्नी त्याचा संशय घेते. शेवटी तीही निघून जाते. अभिजित गोव्याला आईकडे येतो. तीही देवाघरी विसावते. अबोली मुसलमानाशी विवाहबद्ध होते. पुन्हा अभिजित एकटा उरतो. या कथेत अभिजितच्या मनाचे चित्रण बऱ्यापैकी केलेले आहे. अशा या एकूण कथा सामान्य वाचकाला रिझविणाऱ्या, सुजाण वाचकाच्या मनात प्रश्न निर्माण करणाऱ्या यातल्या स्वभावनाच्या अंतर्मनांचा ठाव अधिक खोलात जाऊन बारकाईने घेता आला असता तर या कथांना वेगळे मूल्य प्राप्त झाले असते. मुळात मेख इथेच आहे. मात्र काही कथांतले संवाद चित्रदर्शी आहेत. म्हणून कथासंग्रह वाचावयास वाटतो. -यशवंत पाठक ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    या कथासंग्रहात तीन कथा ऐतिहासिक आहेत, तर दोन कथा सामाजिक आहेत. या कथासंग्रहाचे शीर्षक असलेली मेखमोगरी ही दीर्घ कथा आहे. माणिकराव निंबाळकर व तुकोजीराव जाधव यांच्यातल्या मैत्रीची ही कथा आहे. सरदार माणिकराव निंबाळकरांच्या वाड्यातल्या प्रवेशद्वाराच्या उं कमानीवर एक मोत्याची भरगच्च मोगरी टांगली होती. त्याच्याजवळ रौप्य मेखला होती. तुकोजीरावांचे चिरंजीव अहिराव यांनी ती बघितली. ती निंबाळकरांची वंशपरंपरेची मिजास आहे हे कळताच अहिराव जाधवांचे रक्त तापले. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जो वाडा लुटेल त्याला ती मेखमोगरी मिळेल असे निंबाळकर सांगतात. अहिराव हे आव्हान स्वीकारतात. माणिकरावांची सुस्वरुप कन्या सखुबार्इंना ते लागते. अहिराव पराक्रमाने दिवसभरात वाडा लुटतात. ठरल्याप्रमाणे मेखमोगरी उतरवतात. पण अहिराव ती उतरू देत नाहीत. दोघे व्याही होतात. मैत्रीचे रूपांतर नात्यात होते. सखुबार्इंचे स्वप्न साकारते. या कथानकात सुक्ष्म छटा आहेत. त्या अधिक यायला हव्या होत्या. त्यामुळे कथानक ढोबळपणाने वाचकाच्या समोर आले, तसे आले नसते. शेवटही गुंडाळल्यासारखा वाटला नसता. सूरसिंगार या कथेत मेवाड आणि उदेपूर यांच्या सीमेवर असणाऱ्या एका छोट्या जहागिरीच्या पडत्या काळातली घटना आहे. या जहागिरीस सूरसिंगार म्हणत. राजा भीमदेवाचा तो मुलूख होता. यात राखी नामक गढी होती. याचे मालक चंद्रराज होते. हे योगराजांचे दिवाण होते. योगराजांच्या मृत्यूनंतर भोगराज आले नि जहागिरीला ग्रहण लागले. यातून चंद्रराज व भोगराज एकमेकांचे वैरी झाले. याचे चित्रण या कथेत आहे. तर ‘शेवटचा शिवाजी’ या कथेत हिंदवी स्वराज्यसंस्थापक छत्रपती यांच्या वंशातला इंग्रजांची लाचारी पत्करणारे अखेरचे शिवाजी यांचे चित्रण आले आहे. यातील महाराजांच्या अस्वस्थ मनाचे चित्रण प्रत्ययकारी झाले आहे. घराण्यातल्या गादीच्या संघर्षातली कुजलेली मने यात दिसतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Latest Reviews

JOHAR MAI BAAP JOHAR
JOHAR MAI BAAP JOHAR by Manjushri Gokhale Rating Star
Ujjwala Dharma

आताच संत चोखामेळा यांच्या जीवनावरील कादंबरी "जोहार मायबाप जोहार"ही वाचून संपवली। मंजुश्री गोखले यांनी ही सुंदर,मनोवेधक कादंबरी लिहिली आहे।मला संत चोखामेळा यांच्याबद्दल फारच थोडी माहिती होती। अगदी मोजके अभंग माहिती होते।पण या कादंबरीने त्यांचा मनाला पळ पाडणारा,डोळ्यात वेळोवेळी पाणी उभे करणारा जीवनपट उभा केला।लहानपणची अंधुक आठवण आहे-गावातील संडास स्वच्छ करायला माणसे यायची त्याची।आता आठवले तरी काटा येतो अंगावर आणिएक माणूस दुसरया माणसाला इतका हीन कसा लेखू शकतो याची शरम वाटते।लेखिकेने तो सगळा काळ इतका सुंदर चितारले आहे।चोखोबांचं रोजचं जीवन,पदोपदी आलेल्या अडचणी, समाजाकडून झालेले भयंकर हाल आणि या सगळ्यातून त्यांचा विठ्ठलावरचा अढळ विश्वास आणि ती निस्वार्थ ,निष्पाप,निर्मळ भक्ती। नमन,शतशहा नमन चोखोबा तुम्हाला। ...Read more

ULKA
ULKA by V. S. Khandekar Rating Star
विश्वास सानप

तत्त्वनिष्ठ आणि तत्त्वशून्य माणसांमधील संघर्ष याचे चित्रण साहित्यामध्ये फार जुन्या काळापासून होत आहे. यात बदलत काय असतील, तर ती तत्त्वं. "उल्का` या कादंबरीमधील तत्त्वांच्या संघर्षाची पाश्र्वभूमी विसाव्या शतकातील पूर्वार्धातील आहे. पुनर्विवाह केलेल्यातत्त्वनिष्ठ भाऊसाहेबांची कन्या- तारा, जन्मापासून बंडखोर असते. तीच भाऊसाहेबांची उल्का. समाजाने या गरीब शिक्षकाला आपल्यापासून दूर सारलेले असते. मोठी होताना उल्का, आत्याबाई, माणिकराव, इंदू, बाबूराव अशांच्याद्वारे माणसं जगताना कशी लबाडी करतात, काय तडजोडी करतात, कसे एकमेकांचे पाय ओढतात, हे तर ती बघतेच; पण त्याबरोबर तिला भाऊसाहेब आणि चंद्रकांत अशांच्या वागण्यातून प्रखर तत्त्वनिष्ठता पाहायला मिळते. ...Read more