* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MEGHDOOT
  • Availability : Available
  • Translators : SHANTA J SHELAKE
  • ISBN : 9788177661392
  • Edition : 9
  • Publishing Year : FEBRUARY 1994
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : Translated From SANSKRIT to MARATHI
  • Category : POEMS
  • Available in Combos :SHANTA SHELKE COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE ORIGINAL `MEGHDOOT` IS AN EPIC BY THE FAMOUS SANSKRIT POET, `MAHAKAVI KALIDAS`. THE FIGURE OF SPEECH MAINTAINED THROUGHOUT THE EPIC IS `MANDAKRANTA`. EVERY LINE OF THE EPIC IS MEANINGFUL, REVEALING THE MEANING OF NATURE AND MIND, EXPLAINING THE BEAUTY OF NATURE AND MIND.ACTUALLY, EACH AND EVERY PART OF THE EPIC IS STRONG AND BEAUTIFUL ITSELF, BUT THE STRONGEST IS THE WAY HE HAS DESCRIBED THE HERO`S ANGUISH ON SEPARATION FROM HIS WIFE WHO IS ALSO HIS LOVER. BEFORE SHANTABAI SHELKE TOOK THE DIFFICULT TASK OF TRANSLATING THIS EPIC MANY HAD ATTEMPTED TO DO SO. HER STYLE IS SIMPLE, NOWHERE COMPLEX, HER STANZAS HAVE A RHYTHM AND A PARTICULAR FIGURE OF SPEECH IS MAINTAINED THROUGHOUT. WHILE DOING SO, SHE TAKES IMMENSE CARE TO KEEP THE ORIGINAL FORM AS IT IS. HER TRANSLATION IS SO PERFECT THAT AT TIMES WE FORGET THAT WE ARE READING THE MARATHI VERSION OF THE EPIC AND NOT THE ORIGINAL SANSKRIT ONE. THOSE TENDER AND SENSITIVE MINDS WHO ARE FANS OF THE EPIC `MEGHDOOT` WILL SURELY WELCOME THIS TRANSLATION AND THOSE WHO COULD NOT GO THROUGH IT FOR SOME REASON OR OTHER WILL ALSO LOVE THIS NEW `MEGHDOOT`.
आशयाला धक्का न लावता केलेली प्रतिकृती. महाकवि श्रीकालिदास याचे "मेघदूत" ही संस्कृत साहित्यातली एक स्वभावरमणीय अलौकिक कलाकृती आहे. "मन्दाक्रान्ता" सारखे रसोचित वृत्त, प्रत्ययकारी निसर्गवर्णने, वेधक स्थलचित्रणे, विरहाच्या पाश्र्वभूमीवर व्यक्त झालेला उत्कट प्रणयभाव आणि हे सारे समर्थपणे शब्दांकित करणारी कालिदासाची सुश्लिष्ट शैली यांमुळे "मेघदूता"ला अम्लान टवटवीत लावण्य लाभले आहे. मराठीत "मेघदूता"चे अनेक अनुवाद झाले आहेत. आता प्रसिद्ध कवयित्री शान्ता ज. शेळके या आपला अनुवाद रसिकांना सादर करीत आहेत. साधी सरळ निवेदनपद्धती, छंदोबद्ध प्रवाही रचना, मूळ काव्याच्या रसवत्तेला बाध न आणता किंवा आशयाला ढका न लावता केलेली त्याची प्रतिकृती हे शान्ताबाईच्या अनुवादाचे लक्षणीय विशेष आहेत. "मेघदूता"च्या रसलुब्ध प्रेमिकांना तर हा अनुवाद आवडेलच, पण स्वतंत्रपणे वाचणारांनाही तो आस्वाद्य वाटेल.

No Records Found
No Records Found
Keywords
#MEGHDOOT #KALIDAS #SHANTASHELKE #TRANSLATIONINMARATHI
Customer Reviews
  • Rating StarMamatta Mungilwar

    ::मेघदूत:: * * आषाढास्य प्रथम दिवसे ** आषाढास्य प्रथम दिवसे,अशी सुरुवातच महाकवी कालिदास लिखित "मेघदूत " ह्या काव्याची. भारतीय मनाला नेहमीच भुरळ घालणार काव्य. महाकवी कालिदास यांचे मेघदूत हेसंस्कृत साहित्यातील एक अलौकिक कलाकृती आहे. मंदाक्रांता सारखे वृत्त , वेधक स्थळचित्र आणि पार्श्वभूमीवर व्यक्त झालेल्या उत्कट प्रणय भाव आणि हे सारे समर्थपणे शब्दांकित करणारे कालिदासाची शैली ....... प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीने ,,सरळ निवेदन पद्धतीने , मूळ काव्याचा रस व आशय वाचका पर्यंत पोहचवला आहे. || कुबेर सेवक यक्ष एक कुणी सेवे माझी आपल्या चुकला प्रिया वियोगे अधिकच दुस:ह वर्षाचा त्या शाप मिळाला जनक सुतेच्या स्नाना योगे पावन झाले जिथे जलाशय घनच्छाय त्या रामगिरीवर विविध आश्रमी घेई आश्रय|| एका यक्षाला त्याच्या कर्तव्यचुकीमुळे यक्षराज कुबेर ,एक वर्षाची हदपारीचा शाप ( शिक्षा )देतो. ते पण अलका नगरी पासून लांब अशा रामगिरी पर्वतावर राहण्याची. विरहात तळमळणारा हा यक्ष आकाशातल्या मेघाला पाहतो आणि दूत बनवून आपल्या पत्नीला निरोप पाठवतो. रामगिरी पासून ते अलकानगरी पर्यंत जाताना लागणारे, अवंती देश, विदिशा नगरी, ब्रह्मवर्त, कुरुक्षेत्र, गंगोत्री, दिमधवल पर्वत, त्यातील लागणारी नगरे आणि निसर्ग ह्याचे वर्णन तो मेघाला विस्तृत पणे सांगतो. ही झाली मेघदूतातली काव्यकल्पना. कालिदासाच्या प्रतिभा संपन्नतेला प्रणाम🙏 आणि शांता बाईच्या अनुवादाला सुद्धा प्रणाम. "पादा कुलाक" वृतांत अतिशय प्रवाहिपणे आपल्या डोळ्यासमोर चित्र कृती उभी राहते. Mamata`s विचार:: ढगातून निरोप देण्यावरून----- आज कालची पिढी म्हणे, आपले पर्सनल msg , डेटा, cloud मध्ये save करतात. हे पण प्रतिभावंत कालिदासाच्या प्रतिभेचं सत्य रूप का?? असंख्य प्रश्न?? ©️®️....... ममता मुनगीलवार ...Read more

  • Rating StarANK - FEB 2000

    महाकवी कालिदासाच्या सदाबहार मेघदूताचा रम्यमनोहर अनुवाद महाकवी कालिदास याच्या मेघदूत या खंडकाव्याला भारतीय साहित्यात एक विशेष स्थान आहे. आपल्या प्रियेपासून वर्षभरासाठी दूर जावे लागलेला कुबेर सेवक यक्ष तिला मेघदूतामार्फत संदेश पाठवत आहे अशी रोमँटिक कलपना या काव्याच्या केंद्रस्थानी आहे. रामगिरीच्या आश्रमातून आषाढाच्या पहिल्या दिवशी गिरिशिखरावर दिसलेला मेघाला तो आवाहन करतो, आणि आपल्या प्रियेला निरोप देण्यासाठी गळ घालतो. प्रियेकडे कोणत्या मार्गाने जावे, जाताना वाटेत काय काय दृष्टीस पडेल याचेही वर्णन करतो आणि कैलास पर्वताजवळच्या अलकापुरीत पोचल्यावर प्रियेला आपली खूण पटवून काय संदेश द्यावा याचेही विवरण करतो. मंदाक्रांता वृत्तातील १२० चतुष्पदींचे हे छोटेखानी काव्य प्रत्ययकारी निसर्गवर्णने, वेधक स्थलचित्रणे आणि विरहार्त प्रणयभावना यांचा त्रिवेणी संगम साधते. आतील स्थलचित्रणांची वास्तवता आजही रसिकांना मुग्ध करते. विमानातून मेघदूताच्या मार्गाने प्रवास केला तर कालिदासाने केलेल्या स्थलवर्णनांची अचूकता लक्षात येते. मेघदूताचे मराठीत भाषांतर, अनुवाद करणे हे आपल्या काव्यप्रतिभेला आव्हान आहे असे प्रत्येक संस्कृतच्या जाणकार कवीला वाटले. त्यामुळे मराठीत मेघदूताचे वीसबावीस अनुवाद उपलब्ध आहेत. कविवर्य कुसुमाग्रज, वसंत बापट, माधव जूलियन, बा. भ. बोरकर यांच्यासारख्या ज्येष्ठ कवींनीही मेघदूतला मराठी रूप दिले आहे. सी. डी. देशमुख, ‘सुश्लोक’ श्रीखंडे प्रभृती संस्कृत पंडितांनीही ‘मेघदूत’च्या निमित्तने आपल्या काव्यरचनेचा कस अजमावून पाहिला आहे. इ. स. १९९४ मध्ये शांता शेळके यांनी एके दिवशी सहजपणे मेघदूतातील काही आवडत्या श्लोकांचे मराठीकरण सुरू केले आणि संपूर्ण मेघदूताचा अनुवाद केल्यावरच त्या थांबल्या. झपाटल्यासारखे त्यांना जणू झाले होते. कॉलेजमध्ये अभ्यासलेल्या मेघदूतातील अनेक श्लोक मनात घोळवत राहण्याचा त्यांचा छंद. त्याची परिणती अशी अनुवादात सत्तरीच्या घरात आल्यावर झाली. शांताबाई प्रारंभीच्या निवेदनात म्हणतात, ‘‘मराठीतील अनेक कवींना, लेखकांना असा अनुवाद करून बघावा असे वाटले. हे सारे वाचन मी एका अनावर ओढीने, प्रेमाने करीत राहिले. त्यामुळे माझी मेघदूताची जाण कितपत सूक्ष्म वा प्रगल्भ झाली ते मला सांगता येणार नाही, पण मेघदूताचे आकर्षण अधिकाधिक वाढत गेले हे मात्र खरे... अशाच एका भारलेल्या मनाच्या अवस्थेत अगदी सहज, निर्हेतुक वृत्तीने मेघदूतातील काही आवडत्या श्लोकांचा मी अनुवाद केला... अनुवाद करून बघणे हा मूळ कलाकृत्तीचा अधिक उत्कटपणे रसास्वाद घेण्याचा एक सुंदर मार्ग आहे... माझा अनुवाद सरळ, साधा, पादाकुलकासारखा प्रवाही छंदात केलेला आहे. तो करताना मुळातील आशयाला, रसवत्तेला हानी पोचू नये याची मी शक्य तेवढी काळजी घेतली आहे. मुख्य म्हणजे माझ्या पदरचे त्यात काहीही, कुठेही घालण्याचे धाष्टर्य मी केले नाही.’’ शांताबार्इंच्या मेघदूताला आपला अंतरिक्षातून काढतानाही फारसे अवघड गेलेले नाही. जेट विमान देखील ढगांच्या गर्दीतून मार्ग काढताना कधी कधी वादळी हेलकावे घेते. तेव्हा कवितेच्या चरणांनीही थोडेफार गचके वाचकांना बसले तर त्यात काही विशेष मानण्याचे कारण नाही. आषाढाच्या पहिल्या दिवशी बघ तो शिखरी मेघ वांकला टक्कर देण्या तर भिंतीवर क्रीडातुर गज जणू ठाकला ! ।।२।। (आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टानुं वप्रक्रीडा परिणतगज प्रेक्षणीयं ददर्श) जन्मलास तू, घना, जाणतो, प्रथित पुष्करावर्तक वंशी इंद्राचा तू प्रधान सेवक, रूप हवे ते धारण करिशी म्हणून याचना तुझीच करतो वियुक्त जन मी प्रियेपासुनी क्षुद्रांच्या उपकारापेक्षा विफलही बरवी सुजन विनवणी ।।६।। जिवा तापल्या तूच निवविसी म्हणुनि याचितो मेघा तुजला धनपतिशापे विरहतापल्या निरोप माझा पोचव सखिला यक्षांची प्रिय अलकानगरी तिथेच आहे तुजला जाणे शिवमस्तकिंच्या चंद्रकलेचे जिथे पुâलतसे नित्य चांदणे ।।७।। अनिर्वेध तू जाता ऐसा, घना, पाहशील अपुली वहिनी एकएक दिन मोजुनियां ती काळ कंठिता असेल शिणली ललनाहृदये विगलित होती फुलांपरी ती कोमल जात्या आशा तंतू चिवट परंतु वियोगकाली सावरितो त्या ।।९।। असा हा यक्ष मेघदूताला आपल्या ‘भाभीच्या’ भेटीला निरोप देऊन पाठवत आहे; त्यामुळे वाचकांनाही त्याच्या विषयी आत्मीयता वाटणे स्वाभाविक ठरेल. अधूनमधून मूळ संस्कृत शब्द कमी जास्त फरकाने तसेच येतात. भ्रमरपंक्तिसम कटाक्ष तिरपे टाकतील तुजवरी कामिनी (नामोक्ष्यन्ते त्वयि मधुकरश्रेणिदीर्घान्कटाक्षान), मेघचन्द्रस्वर गंभीर गर्जित (मामन्द्राणां गर्जितानाम्) वामअंक मुकलासे जो आता माझ्या नखक्षतांना (वामाश्चाया: कररूहपदैमुच्यमानो मदियै मुक्ताजालं) अंगराग मिसळले जयातुन जलकेलीस्तव येता युवती अशा संस्कृत - मराठी मिश्रित ओळी या अनुवादात भरपूर दिसतात. स्वरामध्ये स्वर मिसळुन जाया सज्ज सदाही असती किन्नर रात्र घालवी तिथे, प्रियाही असेल शिणली तव लखलखुनी, सूय उगवता पुन्हा पहाटे प्रवास आपुला सुरू करी तू... गारांचा वर्षाव करूनिया दाणादाण करी तू त्यांची भलते साहस करू बघते जे, गत त्यांची तर हीच व्हायची ! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more