* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SATREIN AUR SATREIN
  • Availability : Available
  • Translators : RAJANI BHAGWAT
  • ISBN : 9788184980646
  • Edition : 2
  • Publishing Year : OCTOBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 196
  • Language : Translated From HINDI to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WHY DOES IT HAPPEN? YOU LOVE SOMEBODY WITH ALL YOUR SOUL AND THAT SOMEBODY JUST LEAVES YOU IN ANNOYANCE. WHY? YOU EXPECT LOVE FROM THOSE WHO ARE NEAR TO YOU, CLOSER TO YOU AND THEY SIMPLY LEAVE YOUR SIDE, LIKE A BREEZE TOUCHING YOU FOR AN INSTANT... WHY DOES THIS HAPPEN?? YOU TURN INTO A DRIED TREE, DRIED FOREVER.... AGAIN THE SAME QUESTION, WHY DOES THIS HAPPEN? YOUR SOLITUDE ITSELF TRIES TO TURN YOU INTO A MAD PERSON.... WHY DOES THIS HAPPEN? WHY DOES IT BECOME IMPOSSIBLE FOR YOU TO LIVE WITHOUT LOVE? WHY DO YOU FEEL LIKE ENDING YOUR LIFE IN LACK OF LOVE? PEOPLE DO NOT SEEM TO UNDERSTAND YOU, WHY... WHY...? ANITA RAKESH.
तुम्ही ज्यांच्यावर बेहद्द प्रेम करता ते तुमच्यावर रुसून निघून जातात... असं का होतं? तुम्ही आपल्या जवळपास असलेल्या लोकांकडून प्रेमाची मागणी करता आणि ते सरळ सळसळणाऱ्या हवेबरोबर तुमच्या जवळून निघून जातात... असं का होतं? प्रेमावाचून तुम्ही एक शुष्क, वठलेलं झाड होऊन जाता... असं का होतं? तुम्हाला एकटेपणी वेड लागायची पाळी येते... असं का होतं? प्रेमावाचून तुम्हाला जगणं अशक्य का होतं? प्रेमावाचून तुम्हाला मरून जावंसं का वाटतं? लोक तुम्हाला समजून घेऊ शकत नाहीत... असं का होतं? असं का होतं...?
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MEEANITARAKESHSANGATEY #SATREINAURSATREIN #मीअनीताराकेशसांगतेय #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMHINDITOMARATHI #RAJANIBHAGWAT #ANITARAKESH "
Customer Reviews
  • Rating Starअनीता राकेश, नवी दिल्ली.

    मेहता पब्लिशर्सद्वारा प्रकाशित मेरी पुस्तक `सतरें ओर सतरें` का मराठी भाषा में प्रो. रजनी भागवतजीने `मी अनीता राकेश सांगतेय` इस नामसे जो अनुवाद किया है, वो पुस्तक नववर्ष २०१० को मिल गई। धन्यवाद। पुस्तक बहुत ही सुरूचिपूर्ण प्रकाशित की गई है और साथ ही ह भी जोड़ना चाहूँगी की पुस्तक के आवरण के लिए श्री चंद्रमोहन कुलकर्णीजी को भी मेरी बधाई दें क्योंकि उनका किया आवरण पुस्तक का सही आईना या फिर प्रतीक है। चाहूँगी कि एक बार और आपके तहेदिलसे धन्यवाद करूं क्योंकि इससे बढ़िया मेरे लिऐ और कोई तोफा (तोहफा) नहीं हो सकता था। राजधानी में भयंकर सर्दी पड़ रही है... इसी से शब्द इतना स्पष्ट नहीं दिख रहे... लेकिन भावना अवश्य समझ जाये, यही अनुरोध है... शुभकामनाओं सहित.... ...Read more

  • Rating Starअरुण भट, ठाणे

    नुकतेच `मी अनीता राकेश सांगतेय` हे अनुवादित पुस्तक वाचले. अनुवाद प्रभावी, प्रवाही झाला आहे. मूळ आत्मकथनाने जशी पकड घेतली तशीच पकड अनुवादानेही घेतली. या आत्मकथनाद्वारा अनीता राकेश यांचा समजूतदारपणा, सहनशीलपणा, संवेदनशीलपणा, सच्चेपणा मनाला चांगलाच भिडत. डॉ. इंद्रनाथ मदान, कमलेश्वर यांचे अभिप्राय थोडक्यात बरंच काही सांगून जाणारे आहेत. या अनुवादाने मराठी साहित्यविश्वात मोलाची भर पडेल ही आपली अटकळ बरोबर आहे. सतत दु:खाशी सामना करणाऱ्या अनीताजींना अनुवांशिकरीत्या आईकडून साहित्यिक गुण मिळाले ही सुखाची गोष्ट आहे. लेखनाच्या वारशामुळे त्यांचं वेदनामय जीवन आपल्यासमोर प्रकट झालं. पुस्तकाचं मुखपृष्ठ आकर्षक व मार्मिक आहे. मेहता प्रकाशन म्हणजे दर्जेदार पुस्तकं हे समीकरण आता घट्ट होत चाललं आहे. आपल्या आगामी लेखन प्रवासास शुभेच्छा़ ...Read more

  • Rating StarPRABHAT / 21-02-2010

    मोहन राकेश यांच्या पत्नी अनिता राकेश यांच्या ‘सतरें और सतरें’ या आत्मकथनाचा ‘मी अनिता राकेश सांगते’ हा मराठी अनुवाद रजनी भागवत यांनी केला आहे. अनिता राकेश यांचे हे दुसरे आत्मनिवेदन. मोहन राकेश यांच्यासारख्या नाट्य-साहित्यक्षेत्रातल्या दिग्गजाची पत्नीअसणाऱ्या अनिता राकेश यांच्या जीवनात घडलेल्या नाट्यपूर्ण घटनांचा हा प्रामाणिक आढावा आहे. अनिता राकेश यांच्या जीवनाबरोबर मोहन राकेश यांचे व्यक्तिमत्व एकरुप झाले होते. मात्र, मोहन राकेश यांच्या मृत्यूनंतर विस्कटून गेलेले जीवन पुन्हा उभारण्यासाठी यांना टोकाची धडपड करावी लागली. ही धडपडही शंभर टक्के यशस्वी झाली असे म्हणता येत नाही. याचे महत्त्वाचे कारण त्यांनी केलेले दुसरे लग्न यशस्वी झाले नाही. संवेदनशील मनाच्या अनिता राकेश आणि त्यांचे दुसरे पती यांचे संबंध कायम तणावाचे राहिले. त्यानंतर त्यांनी पदरातील दोन लहान मुलांसाठी जीवन जगण्याचा निर्णय घेतला. त्यांना सुखाचा मार्ग मोकळा करुन देणे याची कथा म्हणजे ‘मी अनिता राकेश सांगतेय’ हे आत्मनिवेदन आहे. ...Read more

  • Rating StarSAKAL / 28-02-2010

    अनीता राकेश यांच्या `सतरें और सतरें` या प्रसिद्ध हिंदी आत्मकथनाचा हा रजनी भागवत यांनी केलेला अनुवाद. या आत्मकथनात अनीता राकेश यांच्या जीवनाबरोबरच त्यांचे पती मोहन राकेश यांच्याशी, त्यांच्या असामान्य व्यक्तिमत्वाशीही वाचकांचा परिचय होतो. निवेदनातील सचचेपणा हे या आत्मकथनाचे सामथ्र्य होय. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book