* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KRUSHNADEVRAI
  • Availability : Available
  • ISBN : 9788184984217
  • Edition : 3
  • Publishing Year : OCTOBER 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 276
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE VIJAYANAGAR EMPIRE HAS BEEN CONSIDERED AS THE EPITOME OF INDIAN-HINDU CIVILIZATION AND THE ESTABLISHMENT OF A HINDU REPUBLIC. IT HAS MADE AN UNPARALLELED CONTRIBUTION TO RELIGION, CIVILIZATION, THE PERFORMING ARTS, MUSIC AND LITERATURE. AMONGST ALL THE RULERS OF THIS EMPIRE, THE NAME OF KRISHNA DEV RAI STANDS TALL. DURING HIS REIGN, THE VIJAYANAGAR ARMY REMAINED UNVANQUISHED. SHRI CHAITANYA MAHAPRABHU, VALLABHACHARYA, SAINT KANAKDAS, SAINT PURANDARDAS AND OTHER GREAT MEN WERE HONORED BY HIM. THE RENOWNED MADHVACHARYA SHRI VYASTEERTH WAS HIS GURU. KRISHNA DEV RAI WAS NOT ONLY A CAPABLE MILITARY LEADER, BUT ALSO AN EMPEROR WHO TOOK GOOD CARE OF HIS SUBJECTS. HE IMPLEMENTED VARIOUS PROJECTS FOR THE BENEFIT OF HIS POPULACE. WE FIND RELIABLE AND DETAILED INFORMATION ABOUT HIS SOCIAL-CULTURAL WORK IN THE REPORTS OF CONTEMPORARY PORTUGUESE TRAVELLERS. THEY HAD VISITED VIJAYANAGAR AND STAYED THERE FOR SOME TIME. ADDITIONAL INFORMATION ABOUT HIM CAN BE HAD FROM INSCRIBED TABLETS – ‘SHILALEKHA’ HE HAD MADE. HIS EMPIRE EXTENDED IN ALL DIRECTIONS AND INCLUDED BELGAUM, GOA, CUTTACK AND SRI LANKA. KRISHNA DEV RAI’S BOOKS WRITTEN IN KANNADA, TELUGU, TAMIL AND SANSKRIT REVEAL THE WORKINGS OF A SENSITIVE MIND. HIS FAME AS THE ‘BHOJRAJA’ OF ANDHRA HAD SPREAD FAR AND WIDE. GREAT POETS ADORNED HIS DURBAR. HE HAD HONOURED THE POET SHREENATH (KNOWN AS THE ‘TELUGU KALIDASA’) BY DONATING HIS WEIGHT IN GOLD. WITHIN THE SHORT SPAN OF NINETEEN YEARS HE WON ALL THE THIRTY BATTLES THAT HE FOUGHT. ‘AMUKTAMALYADA’, HIS COLLECTION OF POEMS IS CONSIDERED AMONG THE FINEST OF TELUGU POETRY. AS ONE WITH GREAT COMMAND OVER THE SHASTRAS AND TECHNIQUES OF WARFARE, NONE COMES CLOSE TO THE EMPEROR KRISHNA DEV RAI.
विजयनगर साम्राज्य म्हणजे भारतीय हिंदू संस्कृतीचा,हिंदवी स्वराज्य स्थापनेचा `महोन्नत महामेरू` म्हणून ओळखले जाते. धर्म, संस्कृती, नृत्य, नाट्य, साहित्य, संगीत या संदर्भांत या साम्राज्याचे फार मोठे योगदान आहे. या साम्राज्याच्या इतिहासातील सर्व सम्राटात `कृष्णदेवराय` हा अतुलनीय असा सम्राट होता. त्याच्या कारकिर्दीत विजयनगरची सेना दिग्विजयी गणली गेली. श्री चैतन्य महाप्रभू, वल्लभाचार्य, संत कनकदास, संत पुरंदरदास आदी सत्पुरुषांना त्याने सन्मानित केले. प्रख्यात मध्वाचार्य श्री व्यासतीर्थ हे त्याचे गुरू होते. कृष्णदेवराय हा केवळ लष्करी बाण्याचा सम्राट नव्हता, तो लोकहितदक्ष राजाही होता. त्याने आपल्या प्रजेच्या सुखासाठी, लोकहितासाठी अनेक कामे केली. त्याच्या सामाजिक-सांस्कृतिक कार्याविषयी तत्कालीन परकीय पोर्तुगीज प्रवाशांच्या वृत्तांतातून विश्वसनीय माहिती व तपशील उपलब्ध झाले आहेत. या प्रवाशांनी विजयनगरला भेट देऊन तेथे काही दिवस वास्तव्य केले होते. तसेच कृष्णदेवरायाने खोदलेल्या शिलालेखातूनही त्याच्या कार्याची माहिती मिळते. विजयनगरपासून बेळगाव, गोवा, कटक ते श्रीलंकेपर्यंत त्याने राज्य केले. कन्नड, तेलुगु, तमिळ, संस्कृत या विविध भाषांतून त्याचे मनोज्ञ असे ग्रंथलेखन केले. आंध्रचा `भोजराजा` म्हणून त्याची ख्याती सर्वदूर दरवळली होती. त्याच्या दरबारात महान असे अष्टदिग्गज कवी होते. `तेलुगु कालिदास` म्हणून सर्वश्रुत असलेल्या `श्रीनाथ` कवीची त्याने सुवर्णतुला केली. अवघ्या एकोणीस वर्षांच्या कारकिर्दीत त्याने तिसाहून अधिक लढाया केल्या आणि सर्व जिंकल्या. त्याने लिहिलेल्या `अमुक्तमाल्यदा` या काव्यग्रंथाची गणना तेलुगूतल्या सर्वश्रेष्ठ अशा पंचकाव्यात होते. शस्त्र आणि शास्त्र यांच्यावर अभूतपूर्व हुकमत गाजवणारा असा दुसरा सम्राट झाला नाही.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KRUSHNADEVRAI #KRUSHNADEVRAI #कृष्णदेवराय #BIOGRAPHY #MARATHI #DR.LAXMINARAYANBOLLI #डॉ.लक्ष्मीनारायणबोल्ली "
Customer Reviews
  • Rating Starप्रमोद कडवं

    विजयनगरचं साम्राज्य हे भारतीय इतिहासातलं सुवर्णपान. हरिहर-बुक्क या बंधुद्वयांनी मुसलमानी आक्रमणाला विरोध करत हिंदूधर्मीयांचं स्वतंत्र राज्य स्थापन केलं. त्या पुढच्या राजांनी त्याला साम्राज्याचं स्वरूप आणलं. या साम्राज्याच्या भौगोलिक सीमा रुंदावण्याच णि त्याला समृद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवण्याचं काम केलं ते कर्तृत्ववान राजा कृष्णदेवराय याने. हे पुस्तक या कृष्णदेवरायाचं हे कादंबरीमय चरित्र आहे. हा राजा होता तरी कसा, हे थोडक्यात सांगतो म्हणजे हे चरित्र वाचण्याची तुम्हाला नक्कीच उत्सुकता लागून राहील. आपल्या एकोणीस वर्षाच्या कारकिर्दीत राजाने राज्याच्या सीमा संपूर्ण दक्षिण भारतभर आणि श्रीलंकेतही पोचवल्या. कटक प्रांतही त्याने जिंकलेला.आदिलशहाचा पराभव करून रायचूर प्रांत आपल्या ताब्यात घेतला. त्याच्या या पराक्रमामुळेच आदिलशहा, कुतुबशहा, निजामशहा यांच्या दक्षिण भारतातल्या विस्ताराला आळा बसला होता. पण तो नुस्ता साम्राज्यवादी नव्हता तर उत्तम प्रजापालक होता. शेतकऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सरोवर, कालवे बांधणे; सारा वसुलीमधला अन्याय दूर करणे याबाबत तो जागरूक होता. साहित्य, संगीत,कला यांना त्याने उदार राजाश्रय दिला. कन्नड, तेलुगू, तमिळ आणि संस्कृत भाषेतले कितीतरी कवी त्याच्या राजदरबारी होते. "अष्टदिग्गजलु" अशी उपाधी असणारे आठ तेलुगू महाकवी राजाच्या दरबारी होते. राजा बहुभाषिक, रसिक आणि स्वतः कवी होता. कन्नड असूनही "अमुक्त माल्यदा" हे मधुराभक्तीवर आधारित तेलुगू महाकाव्य कृष्णदेवरायाने लिहिले ज्याची गणना तेलुगुतल्या सर्वश्रेष्ठ अशा पंचकाव्यात होते. काव्य आणि वीरता ; शस्त्र आणि शास्त्र यांचा असा मिलाफ दुर्मिळच. त्याच्या कारकीर्दीत वेगवेगळ्या ठिकाणी अतिभव्य आणि शिल्पकलेनी नटलेली मंदिरं, गोपुरं बांधून हिंदुधर्मीयांच्या गौरवस्थानात भर टाकली गेली. या कादंबरीत राजाच्या आगमनाची वर्दी देणारी ललकारी अशी दिलीये श्रीमत समस्त भुवनाश्रय राजाधिराज राजपरमेश्वर पूर्व पश्चिम दक्षिण समुद्राधीश्वर अरि राजाराम गंडभेरुंड यदुकुल संजात तुळूव वंशोद्भव नरासारायडू तनय श्री विरुपाक्ष पद्माधारक हिंदुधर्म प्रतिष्ठापनाचार्य गो-ब्राह्मण प्रतिपालनाचार्य श्रीकृष्णदेवराय ... कन्नड राज्यारमारमण बहुपराक् कर्नाटकरत्न सिंहासनाधीश्वर बहुपराक् ... साहित्य समारांगण सूत्रधार ... अशा या बहुआयामी कर्तृत्ववान सम्राटाने राज्य कसं वाढवलं, अंतर्गत कालाहांचा सामना कसा केला, महाअमात्य तिम्मरसू यांच्या दक्षतेचा यात सिंहाचा वाटा कसा होता, गुरू व्यासराय आणि गुरुबंधु संत पुरंदारदास यांचं मार्गदर्शन कसं मिळालं, नातेवाईकांनी केलेल्या कपटानेच या राजाचं राजपद कसं गेलं हे सगळं वाचण्यासारखंच आहे. चरित्राची शैली ऐतिहासिक कादंबऱ्यांना साजेशी रसाळ, ओघवती, काव्यमय आहेच. कुठेही विनाकारण प्रसंगला ताणलेलं नाहीये. योग्य ऐतिहासिक पार्श्वभूमी दिलेली आहे पण संदर्भांची चर्चा लांबवून कथेचा ओघ रोखला नाहीये. हे पुस्तक वाचताना शिवाजी महाराज आणि कृष्णदेवराय यांची तुलना करण्याचा मोह आवरत नाही. हे पुस्तक ऐतिहासिक दस्तावेज नाही आणि माझा इतिहासाचा अभ्यास जुजबीच आहे तरीही मला जाणवलेले काही मुद्दे असे - कृष्णदेवरायाला साम्राज्य आयते मिळाले होते; शिवाजी महाराजांनी ते शून्यातून निर्माण केले. कृष्णदेवरायाने साहित्य-संगीत-कला इ. ना उदार आश्रय दिला आणि त्यावर भरपूर खर्च केला. महाराजांना तितकी स्वस्थता दुर्दैवाने मिळाली नाही. पूर्ण देशाला मुसलमानी सत्तेपासून मोकळं करून, दिल्लीपर्यंत साम्राज्य विस्तार करायची "थोरली मसलत" महाराजांचं स्वप्न होतं. पण राया मात्र दक्षिण भारतावर संतुष्ट वाटतो. महाराज जास्त राजकारणचतुर वाटतात. इंग्रज आणि पोर्तुगीजांचा कावाही त्यांनी ओळखला होता. राया मात्र पोर्तुगीज लोकांशी मैत्री जपून होता. बंदुका, घोडे यांच्यासाठी त्यांच्यावर अवलंबून होता. गोव्यात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांकडे काणाडोळा केलेला दिसतो. शांततेच्या काळात स्वतःची ताकद वाढवायचे प्रयत्न महाराजांनी केले. स्वतःचं आरमार बनवलं. हा राया मात्र शांततेच्या काळात नवीन युद्धतंत्रज्ञान, विज्ञान याकडे लक्ष न देता साहित्यचर्चेत त्यांना प्रोत्साहन देण्यात रममाण झाला. राया आणि त्याची प्रजा हिंदु धर्माभिमानी असली तरी महाराजांनी प्रत्येक मावळ्यात व पूर्ण रायतेत निर्माण केलेली "हिंदवी स्वराजयाची" आस, धग मात्र वेगळीच. म्हणूनच राया पायउतार झाल्यावर काहीच वर्षांत सिंहासनाच्या लोभापायी झालेल्या सुंदोपसुंदीत साम्राजाचा अंत झाला. उलट महाराजांच्या मृत्यूनंतर गृहकलह होऊनही महाराष्ट्र पुढची २५ वर्षं औरंगजेबाला पुरून उरला. आणि पुढे पेशव्यांनी महाराजांची "थोरली मसलत" पूर्ण केली. आज साडे तीनशे वर्षांनीही "हिंदवी स्वराज्याची" धग मराठी रक्तात सळसळते आहे. असो माझी मल्लिनाथी पुरे. महान व्यक्ती आपापल्या काळात कालानुरूप महानच असतात. त्यांचं चरीत्र वाचणं नेहमीच मार्गदर्शक असतं. ...Read more

  • Rating StarKrrish Patil

    विजयनगर साम्राज्य म्हणजे भारतीय हिंदू संस्कृतीचा,हिंदवी स्वराज्य स्थापनेचा महोन्नत महामेरू म्हणून ओळखले जाते. धर्म, संस्कृती, नृत्य, नाट्य, साहित्य, संगीत या संदर्भांत या साम्राज्याचे फार मोठे योगदान आहे. या साम्राज्याच्या इतिहासातील सर्व सम्राटा कृष्णदेवराय हा अतुलनीय असा सम्राट होता. त्याच्या कारकिर्दीत विजयनगरची सेना दिग्विजयी गणली गेली. श्री चैतन्य महाप्रभू, वल्लभाचार्य, संत कनकदास, संत पुरंदरदास आदी सत्पुरुषांना त्याने सन्मानित केले. प्रख्यात मध्वाचार्य श्री व्यासतीर्थ हे त्याचे गुरू होते. कृष्णदेवराय हा केवळ लष्करी बाण्याचा सम्राट नव्हता, तो लोकहितदक्ष राजाही होता. त्याने आपल्या प्रजेच्या सुखासाठी, लोकहितासाठी अनेक कामे केली. त्याच्या सामाजिक-सांस्कृतिक कार्याविषयी तत्कालीन परकीय पोर्तुगीज प्रवाशांच्या वृत्तांतातून विश्वसनीय माहिती व तपशील उपलब्ध झाले आहेत. या प्रवाशांनी विजयनगरला भेट देऊन तेथे काही दिवस वास्तव्य केले होते. तसेच कृष्णदेवरायाने खोदलेल्या शिलालेखातूनही त्याच्या कार्याची माहिती मिळते. विजयनगरपासून बेळगाव, गोवा, कटक ते श्रीलंकेपर्यंत त्याने राज्य केले. कन्नड, तेलुगु, तमिळ, संस्कृत या विविध भाषांतून त्याचे मनोज्ञ असे ग्रंथलेखन केले. आंध्रचा भोजराजा म्हणून त्याची ख्याती सर्वदूर दरवळली होती. त्याच्या दरबारात महान असे अष्टदिग्गज कवी होते. तेलुगु कालिदास म्हणून सर्वश्रुत असलेल्या श्रीनाथ कवीची त्याने सुवर्णतुला केली. अवघ्या एकोणीस वर्षांच्या कारकिर्दीत त्याने तिसाहून अधिक लढाया केल्या आणि सर्व जिंकल्या. त्याने लिहिलेल्या अमुक्तमाल्यदा या काव्यग्रंथाची गणना तेलुगूतल्या सर्वश्रेष्ठ अशा पंचकाव्यात होते. शस्त्र आणि शास्त्र यांच्यावर अभूतपूर्व हुकमत गाजवणारा असा दुसरा सम्राट झाला नाही. ...Read more

  • Rating StarManjusha Thatte Joglekar

    मधल्या काळात ही कादंबरी वाचून झाली आणि खरं सांगते मन फार विषण्ण झालं... काही काळ मनात एक प्रकारची पोकळी तयार झाली. काय हे, एवढ्या मोठ्या, दिग्विजयी साम्राज्याची ही अशी अवस्था व्हावी ! हा सम्राट श्रीकृष्णदेवराय स्वतः एक धर्मात्मा राजा होता. तो स्राट असताना धर्माची पताका अतिशय उंच रोवली गेली होती, शिवाय तो एक साहित्यिक होता. अत्युत्तम कवी, उत्तम वादक होता. कानडी, तेलगू, तामिळ, संस्कृत या भाषांमध्ये याने लिहिलेले ग्रंथ आहेत. संगीत, साहित्य, नृत्य, संस्कृती, नाट्य, तसेच धर्म म्हणजेच शस्त्र आणि शास्त्र यांचा उत्तम असा हा जाणकार होता. या सगळ्या क्षेत्रांत याचं अतुलनीय योगदान आहे. अतिशय उत्तम शासक असणार्‍या या राजाच्या विजयनगर साम्राज्याची राजधानी हंपी आज कुठल्या अवस्थेत आहे, हे सर्वांना माहीत आहे. का घडावं असं ! या विचारांनी मन दुःखी झालं होतं. पण आज हंपी मुस्लिम अतिरेक्यांच्या राजवटीत नाही आणि आपण काळाच्या ओघात खूप पुढे आलो आहोत असा विचार करून मनाला समजावलं. एक कलाकार कोमल मनाचा, भावनाशील असतो आणि भावनेच्या भरात तो खूप वेळा अतिशय नाजूक क्षणी चुकीचे निर्णय घेतो. हा सम्राट जो एक कलाकारही होता, याच्या बाबतीतही हेच घडलं आणि ज्यावेळी आपली चूक त्याला समजली, तेव्हा त्याला बसलेल्या प्रचंड धक्क्यातून हा सम्राट कधी सावरूच शकला नाही. आणि तिथेच हा सम्राट आणि त्या बरोबरीने त्याचं विजयनगर साम्राज्यही लयाला गेलं. आज हंपी आपल्यासमोर आहे... ...Read more

  • Rating StarDilip Moghekar

    Very well book.I Read it

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more