* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KAVITA DOGHANCHI
  • Availability : Available
  • ISBN : 9788184985191
  • Edition : 2
  • Publishing Year : APRIL 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 84
  • Language : MARATHI
  • Category : POEMS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
`THE FRAGRANCE OF FLOWERS IS NOT ONLY FOR FLOWERS, BUT MORE THAN FLOWERS IT IS FOR OTHERS!` SO IS POETRY. IT MAY BELONG TO THE POET UNTIL IT INSPIRES THE POET; BUT THEN THE POET PRESENTS THE POEM SO THAT OTHERS CAN FEEL IT, THAT TOO ONLY FOR LOVERS! IN SHORT, A POEM IS AS MUCH A LOVER AS A POET, IN FACT MORE THAN A POET.
‘फुलांचा सुगंध हा फक्त फुलांसाठीच नसतो, तर फुलांपेक्षासुद्धा जास्त तो इतरांसाठी असतो!’ कवितेचेही असेच असते. ती कवीला स्फुरेपर्यंत कवीची असू शकते; पण त्यानंतर कवितेची अनुभूती इतरांनाही मिळावी, यासाठी कवी ती सादर करतो, तीही केवळ रसिकांसाठीच! थोडक्यात, कविता ही कवीइतकीच किंबहुना ती कवीपेक्षाही जास्त रसिकाची असते. ती दोघांची असते, म्हणून ‘कविता दोघांची...’ या कवितांमध्ये उत्तुंग कल्पनेच्या भरा-या किंवा जीवनातील कूट प्रश्नांची उकल वगैरे काही नाही. सामान्य माणसाला जीवन जगत असताना जो अनुभव प्रकर्षाने येतो, तो साध्या शब्दांत ग्रथित केला आहे. कविता वाचताना रसिकाला वाटेल की, ‘अरेच्चा! मलाही असंच वाटत होतं, मलाही असंच म्हणायचं होतं.’ हेच या कवितांचे गुणविशेष आहे, म्हणून ही ‘दोघांची कविता!’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KAVITADOGHANCHI #KAVITADOGHANCHI #कवितादोघांची #POEMS #MARATHI SURESHVASANTNAIK "
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA - 08-04-2016

    अलीकडच्या काळात सगळ्यांना मुक्तछंदातल्या कवितेची सवयच होऊन गेली आहे. कवीही मुक्तछंदातच लिहितात आणि वाचकांनाही त्यामुळे तेच अपेक्षित असते. पण अचानक एखादी गेय कविता समोर येते आणि कुणीतरी खूप जुन्या ओळखीचं भेटल्याचा आनंद होतो. तोच आनंद शुभदा नाईक आणि सुेश नाईक यांच्या कविता वाचताना होतो. कारण या संग्रहातल्या त्यांच्या सगळ्या कविता येगय आहेत. त्यांना नाद आहे, लय आहे, त्यांची यमकं अतिशय सुंदर रीतीने जुळवलेली आहेत. त्यामुळे त्या वाचायच्या नव्हेत तर गुणगुणायच्या कविता झालेल्या आहेत. सुरुवातीच्या भागात शुभदा नाईक यांच्या कविता आहेत तर नंतरच्या भागात सुरेश नाईक यांच्या कविता आहेत. शब्द शब्द जपुनी ठेव बकुळीच्या फुलापरी, माडांच्या दाटीतून वळणारी वाट हवी, भेटाया उत्सुकली भरतीची लाट हवी, मखमालिशा गाली खळी देवे खोवियली, झिलमिल बालगीत केश पापणी ल्यालेली अशा या शुभदा नाईक यांच्या कविता गुणगुणायल्या सोप्या आणि छान आहेत. तर एकटाच भिरभिरतो वाळूच्या सागरी, रणरणते वाळू पदी भगभगते आगत वरी, अव्यक्त जे शब्दातुनी डोळ्यातुनी समजेल का, बोलू न शकलो तुला कधी, कविता तुला सांगेल का, किंवा लावला जरी न तू लागला तुझा लळा, मुकेपणीच सोसणे असह्य अंतरी कळा अशा सुरेश नाईक यांच्या कविताही गुणगुणायला छान आणि अर्थपूर्ण आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book