* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KARUNASHTAK
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983753
  • Edition : 11
  • Publishing Year : SEPTEMBER 1982
  • Weight : 190.00 gms
  • Pages : 136
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :VYANKATESH MADGULKAR COMBO SET - 41 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS THE STORY OF A FAMILY. DADA, AAI, SIX SONS AND TWO DAUGHTERS. DADA CALLED HIS WIFE ‘FAUZDAR’ AS SHE WAS A VERY STRICT AND CURD LADY. ONCE SHE STARTED SHOUTING, NO ONE WOULD BE ABLE TO STOP HER. BUT THE HOUSE WHICH HAD PROVIDED SHELTER TO ALL, BURNT ONE DAY. DADA LOST ALL HIS STRENGTH, HE SURRENDERED TO THE CRUEL HANDS OF DEATH AND THAT LEFT AAI SPEECHLESS, LITERALLY. NOW SHE WAS PULLING ON BUT SHE WAS NOWHERE INTO ANY OF THE ACTIVITIES. SHE NOW HAD TO TACKLE EIGHT PROBLEMS IN THE FORM OF HER EIGHT CHILDREN. LIFE HAD LEFT HER ALONE TO DEAL WITH THESE EIGHT PUZZLES, THE ‘ASHTAK’ FULL OF PITY AND COMPASSION. EACH MOTHER HAS TO FACE THIS PUZZLE; FULL OF PITY AND COMPASSION. SINCE THE ANCIENT AGE, EACH WOMAN IS DESTINED TO CARRY BURDEN, ONE OR THE OTHER…SINCE THEN SHE HAS TO BEAR THE FRUITS THAT HER FEMININITY HAS BESTOWED UPON HER… HER CHILDREN…A BURDEN, IT SEEMS
ही आहे एक कुटुंबकहाणी... दादा, आई, सहा मुलं आणि दोन मुली यांची. आईचा कडक स्वभाव आणि फाडफाड बोलणं यामुळे दादा तिला म्हणायचे ‘फौजदार’. पण सगळ्या कुटुंबाला सावली देणारं घर जळलं; दादा खचले, वारले आणि आई अबोल झाली. स्वत:च्या संसारात अलिप्तासारखी वागू लागली. मुलं मोठी होत होती. या मुलांच्या रूपानं आईपुढे आठ समस्या उभ्या राहिल्या. जणू ही आठ मुलं म्हणजे नियतीनं आईला घालून ठेवलेली आठ कोडी. हेच तिचं करुणाष्टक. खरं म्हणजे कोणत्याही आईचं. कारण, वाट चालताना ओझं वागवणं हे स्त्रीच्या भाळी अगदी इतिहासपूर्व काळापासून आलेलं आहे. तेव्हापासून आपल्या स्त्रीत्वाला आलेलं फळ–मूल हे सुद्धा आईला ओझंच होऊन राहिलं असलं पाहिजे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#VYANKATESH MADGULKAR#MANTARLELE BET#BIG CITY LITTLE BOY#MANUEL KOMROFF#MANHATAN# #व्यंकटेश माडगुळकर#मंतरलेले बेट#बिग सिटी लिटील बॉय#कॉमरॉफ#
Customer Reviews
  • Rating StarSudanshu Naik

    पुस्तक परिचय या लेखमालेतील आजचं पुस्तक एका सुप्रसिध्द कलावंताचं. मराठी साहित्यक्षेत्रात ज्यांनी आपला अमीट असा वेगळा ठसा उमटवलाय त्या व्यंकटेश माडगूळकर यांचं. मला अतिशय भावणारा हा लेखक. ग्रामीण जीवन, कलाक्षेत्र, परदेश, वन्यजीवन आदिंबाबत समर्थपणे अन् सजसोप्या भाषेत लिहिणं हे त्यांचं वैशिष्ट्य. त्यांच्या अनेक गाजलेल्या पुस्तकांसोबतच एक हळवं, स्वानुभवाचं पुस्तक आहे करुणाष्टक. बहुतांश रसिकांनी माडगूळकरांची विविध पुस्तके वाचलेली असतात करुणाष्टक मात्र कित्येकांनी वाचलेलं नसतं. का ते माहीत नाही. ज्यांनी वाचलंय त्यांच्या काळजात नक्की या पुस्तकानं घर केलं असेलच. “करुणाष्टक - व्याकूळ करणारा अस्वस्थ अनुभव...!” - सुधांशु नाईक करुणाष्टक म्हटलं की मराठी माणसाला समर्थ रामदासस्वामी यांची करुणाष्टके आठवतात. “ तुजवीण रामा मज कंठवेना...” अशा शब्दांतून ओसंडणारी त्यातली आर्तता मनाला भिडलेली असते. तीच भावना हे पुस्तक वाचतानाही मन भरून राहते. करुणाष्टक हे अवघ्या १५७ पानांचं लहानसं पुस्तक. अगदी पहिल्या २-३ पानांपासूनच थेट काळजाला भिडतं. “करुणाष्टक” ची नायिका आहे या थोर भावंडांची आई. दारिद्र्याने हे कुटुंब देशोधडीला लागलं, त्याचीच ही कहाणी. मराठीत आईवरच्या कविता खूप आहेत पण आईवरची पुस्तकं कमीच आहेत. त्यातलं हे एक महत्वाचं. चार भावंडं, आई-बाप आणि आजी असं हे कुटुंब घर सोडून निघतं तिथूनच कहाणी सुरु होते. जिथं अनेक वर्षे वावरलो ते सारं असं सोडून जाताना होणारी उलघाल वाचक म्हणून आपल्यालाही अस्वस्थ करु लागते. ती आजी तर प्रथमच गाव ओलांडून दूर देशी निघालेली. ती भयंकर अस्वस्थ आहे. त्यात ते मिरजेच्या रेल्वे स्टेशनवर येतात. तिथं ते रूळ ओलांडताना सगळ्यांचीच तारांबळ उडते. आपल्याला रेल्वे चिरडून तर जाणार नाही ना असं जे अजाण बालकांना वाटतं, अगदी तसं या खेडुतांना वाटतं. शेवटी रूळ ओलांडताना आजी पडतेच. मग कसेबसे तिला उचलून बाजूला आणतात. तिचं ते भेदरलेपण, तुटलेपण मांडताना माडगूळकर म्हणतात, “ या प्रसंगानंतर मुळे उघडी पडलेल्या वेलीसारखी आजी सुकत सुकत गेली...” आणि अंगावर काटा येतो..!! व्यंकटेश माडगूळकर हे उत्तम चित्रकार. प्राणी,पक्षी, वनस्पती अशा निसर्गात रममाण झालेले. उत्तम निरीक्षण शक्ती तर त्यांच्याकडे होतीच पण पाहिलेलं सारं नेमक्या व मोजक्या शब्दांत मांडायचं त्यांचं कसबही अफाट होतं. अनेक छोट्या छोट्या गोष्टी नोंदवत ते शब्दांतून जणू चित्र तयार करत जातात. नवं गाव, माणसं, त्यांचं वागणं, त्या सगळ्याशी एक हाती झुंजत आई कशी अफाट कष्टत रहायची याचं चित्र मांडत राहतात. नव्या गावात पाण्याचे फार हाल असायचे. इथल्या ओढ्यात खड्डे करून लहान झऱ्यातून पाणी काढावं लागे. मग घरापर्यंतच्या चढावरून ते पाणी आणून घरी भरावे लागे. याबाबत एक प्रसंग ते सांगतात, “ या पाणी भरण्याचा आईने धसकाच घेतलेला. कधीही मध्यरात्री जग येताच ती ओढ्यावर जायला निघायची. घरात घड्याळ नव्हतंच. आभाळ पाहून अंदाज घ्यायचा, दिशा उजळल्याहेत, डोळ्यांना थोडं दिसतंय असं बघून बाहेर पडायचं. मात्र कधी हा अंदाज साफ चुकायचा. किट्ट काळोखात फक्त बेडक्यांचे आवाज येत. बिचारी आई एकटीच झऱ्याशी बसून पाणी भरायची. जड घागरी घेऊन धापा टाकत घरी यायची. बऱ्याच वेळानं पहाटवारे सुटायचे आणि मग हिच्या लक्षात यायचं की आपण तीन वाजायच्या सुमारासच ओढ्यावर जाऊन आलो...”हे सारं वाचताना आपण त्यात कधी गुंतत जातो ते कळतच नाही. एका प्रसंगात ते वडील, ज्यांना ते दादा म्हणत त्यांच्याविषयी ते फार आत्मीयतेने लिहितात. ते म्हणतात,“ इथं आल्यावर दादांना दम्याचा जास्त त्रास होऊ लागला. तरीही ते दूरवरच्या एका विहिरीवरून पाणी आणायचे. ती चव त्यांना आवडायची. मग एकदा मी पाणी आणायचं व त्यांना चकित करायचं ठरवलं....” असं म्हणत ते तो प्रसंग रंगवू लागतात. होतं काय तर रहाटावरून दोर सोडून घागर भारून घेताना लहानग्या व्यंकटेशाची चड्डी अचानक विहिरीत पडते, मग ती आणायला तो पाण्यात उडी मारतो. मात्र वर परत कसं यायचं हे कळत नाही. शेवटी घरात आल्यावर घागर जागेवर नाही हे पाहून घाबरे घुबरे दादा विहिरीकडे येतात, त्यांना वर काढतात.... माडगूळकर हा खूप साधासा प्रसंग अशा काही खुमारीने रंगवत सांगतात की आपण तो प्रसंग जणू पाहू लागतो. आणि शेवटी ते म्हणतात, “ पुढे असा गर्तेत पडण्याचा उद्योग मी आयुष्यात आणखी काही वेळा केला, पण दादा तेंव्हा मरून गेले होते... आणि आई सतत दूर होती.मला कुणीही शेंदून वर घेतलं नाही...” अचानक असं वाक्य समोर येतं की वाचता वाचता आपणही ब्रेक लागल्यासारखे थांबतो. विचार करू लागतो. काळजात काहीतरी खूप टोचत रहातं. कालांतराने शिक्षणासाठी दूर जाऊन राहिलेला मोठा भाऊ लेखक / कवी म्हणून मान्यताप्राप्त ठरला, तरी घराचं दारिद्र्य काही लवकर उणावले नव्हते. किंबहुना तो दहावी नापास होऊन प्रथम जेंव्हा घरी आला आणि आई कशी कडाडली ते सांगत म्हणतात, “ तुम्हाला कशी परिस्थितीची जाणीव नाही रे? जेंव्हा तेंव्हा गोष्टींची पुस्तकं नाकाला लावून बसतोस लाज कशी वाटत नाही? तुमच्यासाठी किती हाडाची काडे करतो आम्ही? अपेशी तोंड दाखवायला आलासच का? त्यापेक्षा तिकडं राहिला असतास, माधुकरी मागून जेवला असतास, रस्त्यावरील दिव्याखाली अभ्यास करून पास होऊन माझ्यापुढे आला असतास तर तुझा अभिमान वाटला असता...!”... आणि भाऊ घराबाहेर पडला तो काही बनूनच मग पुन्हा समोर आला...! पुढे ४२ च्या लढ्यात व्यंकटेश माडगूळकर सहभागी झालेले. त्यामुळे पुन्हा घरदार सोडून भटकत राहिले. त्यांची आई कायमच चिंता करत राही. आपली मुलं काहीबाही करू लागली आहेत हे पाहून साठीनंतर पुन्हा त्यांचे आईबाप मूळ गावी परतले. तिथेच जुन्या पडक्या वाड्यात राहिले. शिक्षकी पेशा असलेला भाऊ त्यांचं पाहू लागला. मात्र तिथं राहायचं सुख नशिबी नव्हतंच. देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि लगेच नंतर गांधीजींची हत्या झाली. गावचं घर जाळले गेले. पुन्हा हे सगळे मोठ्या भावाकडे जाऊन राहिले. मात्र वडिलांची जगण्यावरची वासनाच उडाली. भावाने गावातले घर जमेल तसं पुन्हा पत्रे घालून उभं केलं मात्र शेवटी वडील गेलेच. तिथून पुढची तीस वर्षांची वाट आई मग एकटीनेच चालत राहिली. तिची आठ मुलं म्हणजे जणू वेगवेगळ्या समस्या होत्या. कोडी होती. ती आपापल्या परीने सोडवत राहिली. तिचा जावई अकाली गेला. दोन्ही मुली अपघातात गेल्या. एक अन्य मुलगा जो शिकून मोठा झाला त्याला मोठ्या राजकारणामुळे बदनाम केलं गेलं. त्याची निंदा-नालस्ती झाली. कर्तृत्ववान म्हणून नावाजलेला, महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेला थोरला मुलगाही मोठ्या आजाराने ग्रासला गेला. आईच्या डोळ्यातली झोप यामुळे कशी उडालेली हे वाचताना आपणही ती वेदना जगू लागतो. अचानक आयुष्याच्या शेवटच्या दिवसात “आदर्श माता” म्हणून तिचा जाहीर मोठा सत्कार समारंभ ठरतो. आजवर कुणी तिचा कधी वाढदिवसही साजरा केलेला नसतो. साठी, पंचाहत्तरी वगैरे काही साजरं झालेलं नसते. अशा वेळी हा सत्कार म्हणजे तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा सुवर्णक्षण असतो... मात्र ...... नियती या आईला तो एक सत्कारसुद्धा, त्याचा अपार आनंदही भोगू देत नाही. सोबत भल्या मोठ्या दु:खाचं दान देते. हे वाचताना आपणही उरी तुटत राहतो...! आपल्या आईच्या जीवनाविषयी लिहिताना माडगूळकर म्हणतात, “ तिचा प्रवास हा परिस्थितीच्या वाळवंटातून केलेला जीवन प्रवास होता. डोक्यावर आग ओकणारा सूर्य आहे. अचानक आडवे येत मार्ग खुंटवणारी वाळूची टेकाडे आहेत. धुळीची वादळे आहेत. तहान तहान आहे. जराशी हिरवळ आणि पाणी ही आहे... पुष्कळ काहीबाही आहे...” या थोर कुटुंबाची प्रसिध्दी, नावलौकिक आपण पाहिलाय. मात्र सगळ्याला पुरून उरलेलं जे कारुण्य आहे ते मला अंतर्बाह्य व्याकूळ करून टाकतं. डोळ्यांना ओलं व्हायला तेवढं निमित्त पुरेसे असतं...!! सुधांशु नाईक, कोल्हापूर ...Read more

  • Rating Starप्राजक्ता विनायक

    मेहता पब्लिशिंग हाऊसच्या सर्व वाचनीय पुस्तकांपैकी नुकतेच वाचलेले ‘करुणाष्टक’ ही व्यंकटेश माडगूळकरांची कादंबरी अतिशय आवडली. ते १२८ पानी पुस्तक एका अडीच तासांच्या बैठकीत वाचून निघाले, असं म्हणण्यापेक्षा ते वाचत असताना मध्ये थांबा घेऊ वाटला नाही. कारण ी फक्त एक कादंबरी नव्हे, तर एका बाईचा ‘आईपणाचा दाखवलेला प्रवास’ होता. आणि कमी अधिक फरकाने प्रत्येक बाईला किंबहुना आईला तो चुकलेला नसतो. अगदी कालच्या आईप्रमाणे. आजच्या मॉडर्न ममाला सुद्धा तो चुकलेला नाही. कादंबरीतील थोरला मुलगा जेव्हा व्ह. फा. नापास होतो. त्यावेळी उद्वेगाने बोलणारी आई आणि तोच मुलगा जेव्हा घर सोडून जातो ती आई. ही खरंच अगतिकतेची रूपे आहेत. कादंबरीचा शेवट मात्र नि:शब्द करतो. आई असताना आणि नसतानाची पोकळी मात्र जन्मभर राहते. आणि कधीकाळी आईचं न ऐकणारे आपण ते करायला लागतो. शिवाय कुठलीही व्यक्ती ही अमरत्व घेऊन आलेली नसते. हे आपल्याला माहीत असतं, पण ती जाणीव कधी कधी कामाच्या व्यापात आपण बऱ्याचदा विसरतो. ती जाणीव जागृत करण्याचे काम हे पुस्तक करत आहे, असं जाणवतं. आजच्या काळात दोन पिढ्यांमध्ये अंतर हे बरंच वाढलं आहे. आपण कुणाचा अनादर करत नसते. जो तो आपल्या जागी हा बरोबरच असतो. अशा वेळी थोडं जागं करण्याची भूमिका या पुस्तकाने पार पाडली. शिवाय, आई हा सर्व भावंडांमधील पूल असतो याचं उदाहरण ही यातून दिसून आलं. ...Read more

  • Rating StarSushama Haribhau Deshmukh

    "करूणाष्टक " व्यंकटेश माडगूळकर यांची कथा सरळ सोप्या भाषेत मनात घर करणारी व्यक्तीमत्व. जिवनातील चढऊतारात , साधनांची कमतरता असताना, अनेक संकटे पेलत, आठ मुलांना लहानाचे मोठे करताना आयुष्याचे वर्णन त्या काळात नेते. किती मायाळु माणस होती , एकमेकाच्या अडीअचणीला उपयोगी येत. आई तर किती कष्टाळू , करारी , मायेचा डोह जणु. वाटत ही लोक खर जिवन जगले. साधी सरळ माणस जिवनात कितीही संकट आली तरी एकमेकांचा हात धरून पुढे जाणारी. अशा माऊली पोटीच महाराष्ट्रातील साहित्य रत्न आले. आजही गदिमा, व्यंकटेश माडगूळकर ह्यांच्या साहित्य संपदा मनाला भरभरून आनंद देते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book