* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KACHVEL
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662887
  • Edition : 7
  • Publishing Year : AUGUST 1997
  • Weight : 320.00 gms
  • Pages : 336
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
KACHVEL” IS THE SUCCESSOR OF ANAND YADAV`S AUTOBIOGRAPHIES; "ZOMBI`’, "NANGARANI`’, AND "GHARBHINTI`’. IN THE RURAL AREAS IT IS A CUSTOM TO MAKE A DESIGN ON THE FLOOR USING THE BROKEN GLASS BANGLES. THIS IS ALWAYS SHAPED IN THE FORM OF A VEIL INDICATING THE COMING GENERATION. EVERY HOUSEWIFE CONSIDERS HERSELF TO BE THE VEIL, HER OFFSPRING BEING THE VARIOUS BUDS AND FLOWERS BLOOMING. SHE DRAWS AS MANY BRANCHES AS HER CHILDREN. MY MOTHER POSSESSED THIS DIVINE FOLK ART, I SAW HER DIVINITY FOR THE FIRST TIME. IN THE COMING YEARS, ALL MY SIBLINGS CRAWLED ON THE VEIL. IN ITS PRESENCE, I COMPLETED MY STUDIES. THE "KACHVEL` WAS ALWAYS THERE FOR MANY YEARS, RESEMBLING A CARPET. THERE ONWARDS, FOR THE PAST 60 YEARS, I HAVE TRIED TO COLLECT AS MANY BROKEN GLASS PIECES AS POSSIBLE. I HAVE PRESERVED ALL THE GLASS PIECES I THOUGHT WORTHY. THEY WERE GIVEN TO ME BY MANY EXPERIENCED AND DEXTEROUS ARTISTS. THEY HAVE MOULDED ME AS A PERSON. AT THE END, I HAVE FELT THAT THIS `KACHVEL` IS A SYMBOL OF MARATHI COMMUNITY AND CULTURE; WITH ME AS A MERE PORTER.
आनंद यादव ह्यांच्या आत्मकथनात्मक लेखनाचा हा अंतिम मनोहरनयनमनोहर टप्पा `झोंबी`, `नांगरणी` आणि `घरभिंती` या आत्मचरित्राच्या तीन खंडांनंतरचा हा चौथा खंड काचवेल. नव्या घरातील सोप्याच्या भुईवर ग्रामीण भागात काचवेल काढण्याची लोकप्रथा आहे. काकणांच्या काचतुकड्यांनी ही वेल रेखली जाते. ही वेल वंशवेलीचंही प्रतीक असते. त्या घराची गृहिणी नकळत स्वतःला वंशवेल मानते. तिची मुलं ही त्या वेलीवरच्या कळ्या, फुलं असतात. जेवढी मुलं, तेवढे तागोरे ती काढते... आईची ही दैवी लोककला मी पहिल्यांदा बघत होतो. यथाकाळ माझी सगळी भावंडं त्या वेलीवर रांगली. मी सोप्यात बसून अभ्यास केला; त्या अभ्यासालाही काचवेलीचा कशिदा मिळाला. पंधरासोळा वर्षे ही वेल तिथं पायघडीसारखी पहुडली. तेव्हापासून मी साठ वर्षांच्या आयुष्यात खूप काचा तुकड्यातुकड्यांनी गोळा केल्या. मला आकर्षक वाटणारे रंगीत तुकडे जपून ठेवले. जागोजागी भेटलेल्या कसबी कासारांनी मला ते प्रेमाने देऊ केले. त्या तुकड्यांनीच माझ्या व्यक्तिमत्त्वाची वेल सिद्ध झाली. अंतिमत: ही काचवेल आणि तिची भूमी ही मराठी समाजाचं आणि संस्कृतीचं प्रतीकही आहे, असं जाणवलं. मी फक्त भारवाही.

No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarJagannath Garje

    आज डाॅ.आनंद यादव यांच्या आत्मचरित्राचा शेवटचा खंड काचवेल हे पुस्तक वाचून पुर्ण झाले.सुरूवातीला जेव्हा झोंबो वाचली तेव्हा पुढे काय झालं असेल याची खूप उत्सूकता लगली होती.मग मी झपाटल्यासारखा पुढचे भाग नांगरणी,घरभिंती,आणी काचवेल वाचत गेलो.प्रत्येक पुस्तकवाचताना पुढे काय झाल असेल याची ओढ लागत होती.एखादा राग आळवावा तसा लेखक झोंबीपासून काचवेलपर्यंत आपल्या आयुष्याचे प्रसंग आळवीत होते.ह्या कलापूर्ण आळवण्यामूळे हा केवळ त्यांच्या आयुष्यातील नानाप्रकारच्या कडूगोड घटनांचा अहवाल न होता ही एक सुंदर कलाकृती झाली.ललित साहीत्यात घटना केवळ सत्य असून चालत नाही तर सत्य हे कल्पनेहून अदभूत असते हे जरी खरे असले तरी त्यातला अदभूतपणा कीवा त्या घटनेतील नाट्य जाणवायला त्या घटनेच्या कथानाला मिडासाच्या स्पर्शासारखा कलेचा स्पर्श घडवावा लागतो..तो इथे झाला आहे.हे आत्मचरित्र वाचताना सतत कधी स्वस्थ करणारे,कधी अस्वस्थ करणारे,कधी सुखावणारे,कधी खूप दुखवून जाणारे,नानाप्रकारच्या भाववृत्तीचा कल्लोळ उत्पन्न करणारे असे हे आत्मचरित्र म्हणजे एक शब्दशिल्प आहे..... हे चारही भाग जेव्हा मी वाचले तेव्हा खरच मला असे वाटू लागले साने गूरूजींची श्यामची आई वाचताना जी आपल्या मनाची अवस्था होते तसी अवस्था वारंवार होत होती..लेखकाच्या हळव्या मनाची,संवेदनशिल मनाची,समाजाच्याप्रती कृतज्ञता असणा-या मनाची प्रचिती येते. शेवटचा भाग वाचताना सतत जाणवत होते आज लेखक पुणे विद्यापीठात मराठी विभागप्रमुख झाले होते,साहीत्यक्षेत्रात कथा कांदबरी कवितांचा लेखक म्हणून त्यांचे कर्तूत्व गौरवाला पात्र ठललेले आहे..हे सगळे असून सुद्धा ते ज्या मातीत वाढले ज्या समाजात लहानाचे मोठे झाले ,ज्या गावात आयुष्याची झोंबी सुरू झाली त्या सर्वांशी त्यांची नाळ अजूनीही घट्ट होती..ती आंतरिक ओढ अजून कायम होती.. हे पुस्तक वाचताना लेखक ही आता आयुष्याच्या शेवटाकडे झूकलेले आहेत आणि आत्मचरित्राचाही शेवट होत असताना लेखकाच्या मनाची अवस्था खूप हळवी झालेली दिसून येत असतानाच आपल्याही मनाची अवस्था तशीच शुन्यात गेल्यासारखी होते.... आनंद यादव यांचे हे पुस्तक वाचल्याशिवाय त्यांचे आत्मचरित्र वाचल्याचे समाधान होत नाही तेव्हा आपणही नक्की वाचा.... ...Read more

  • Rating StarSaroj Bhattu

    मी ही चारही पुस्तकं वाचली आहेत, दीर्घकाळ स्मरणात राहणारी अशी पुस्तके

  • Rating Star Manisha Dhande

    "काचवेल" हे पुस्तक आनंद यादव यांच्या आत्मचरित्राचा शेवटचा चौथा भाग आहे. पहिल्या तीन भागात (झोंबी, नांगरणी,घरभिंती) यात लेखकाचा अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून, कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसतांना प्राध्यापक पदापर्यंतचा प्रवास मांडलेला आहे. तर पोटापा्याचा प्रश्न सुटून, आर्थिक स्थैर्य लाभलेल्या, गावाकडच्या आपल्या घरातील माणसांच्या प्रापंचिक जबाबदारीतून मुक्त झालेल्या लेखकाची प्रतिथयश साहित्यिक म्हणून झालेली यशस्वी वाटचाल या पुस्तकात आहे... स्वत: ग्रामीण भागातून आल्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना आदर्श साहित्यनिर्मितीची जाणीव व्हावी म्हणून आनंद यादव यांनी ग्रामीण साहित्यिकांचे मेळावे यशस्वीपणे भरविले.असंख्य अडचणींवर मात करून "ग्रामीण साहित्य चळवळ" भारतीय समाजाचा गाभा असलेल्या खेडोपाड्यात यशस्वीरित्या राबविली. पुण्यामुंबई सारख्या ठिकाणी ग्रामीण भागातील तरुणांना पैशाअभावी येणं जमत नसल्याने आनंद यादव यांनी स्वत: महाराष्ट्रभर फिरून छोट्या छोट्या गावात ग्रामीण साहित्य संमेलने आयोजित केली.व ग्रामीण साहित्य चळवळीला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले. आता आपण शैक्षणिक बाजारीकरण या विषयावर बरेच वाचतो, ऐकतो पण आनंद यादव यांनी १९७० ते १९८० च्या दशकात शिक्षणविषयक होणाऱ्या बाजारीकरणा बाबतीत परखड मत या पुस्तकात मांडलेले आहे. एका प्रगल्भ साहित्यिकाचा आपल्या साहित्याविषयी असणाऱ्या प्रगल्भ विचारांचा, जाणिवांचा प्रत्यय म्हणजे "काचवेल"..... ...Read more

  • Rating StarDAINIK PUDHARI

    ‘झोंबी, नांगरणी, घरभिंती’ नंतर काचवेल... ‘झोंबी’, ‘नांगरणी’, ‘घरभिंती’ या तिन्ही पुस्तकांनंतर सुप्रसिद्ध लेखक आनंद यादव यांचे ‘काचवेल’ हे आत्मचरित्राचे पुस्तक आले आहे. वेगवेगळ्या पंचवीस लेखांच्या मदतीनं ‘काचवेल’ फुलली आहे. या खंडात मुख्यत: त्यांच्य वाङ्मयीन प्रेरणांचा व लेखनाचा आलेख आहे. त्यांची साहित्यिक जडणघडण, त्यांचं लेखन, वाङ्मयीन चर्चांमधून घडत गेलेलं, पक्कं होत गेलेलं साहित्यजीवन, एक खोल अभ्यासक व उत्तम आस्वादक होण्यासाठी त्यांची स्वत:ची मननचिंतनाची ‘प्रोसेस’ त्यांना जीवनप्रवासात भेटलेले-विशेषत: वाङ्मयीन रूचीतून जवळ आलेले त्यांचे मित्र, गुरू, संपादक, त्यांचा विचारांवरचा, लेखनावरचा प्रभाव याचं नेमक्या शब्दात केलेलं चित्रण ‘काचवेल’मध्ये आहे. ग्रामीण साहित्याच्या चळवळीबद्दलची त्यांची तळमळही काही लेखांतून व्यक्त होते व त्यामागची त्यांची भूमिका स्पष्ट करते. श्री. आनंद यादव यांचं कुटुंब, त्यांची आई, त्यांच्या मनात सदैव जागं असलेलं त्यांचं कागल गाव वगैरे उल्लेख प्रसंगात येतात. ‘आईचे शेवटचे दिवस’, ‘मायगावाचा दिवस’, ‘संसार संसार’, ‘मुलींच्या शिक्षणाची फरपट’मधून कौटुंबिक चित्रण आहे. ग्रामीण साहित्य चळवळीच्या निमित्तानं त्यांनी सगळा ग्रामीण महाराष्ट्र तुडवला आहे. निराशेनं ग्रासलेली तरुण पिढी जवळून पाहिली आहे. ग्रामीण समाजानं शाश्वत स्वरूपाच्या विकासाच्या मार्गानं जाण्यासाठी काय काय सुधारणा त्याला स्वत:ला करायला पाहिजेत त्याबद्दल श्री. आनंद यादव यांची अभ्यासपूर्ण मतं आहेत. तशा परिस्थितीतून ते स्वत: पार पडले आहेत. या वाटचालीचा आलेख आत्मचरित्राच्या रूपानं विस्तृत स्वरूपात नव्या तरुण पिढीसमोर मांडावा या उद्देशानं त्यांनी हे लेखन केलं आहे. श्री. यादव म्हणतात की, ‘आत्मचरित्र हे जीवनभाष्य असतं.’ पण त्यांनी जीवनभाष्य करण्याचं स्वरूप लेखनाला न देता ललित साहित्याच्या अंगानं ‘जीवनदर्शन’ घडवलं आहे. ‘मनात येणाऱ्या भावभावना, विचार आणि एकूणच अस्वस्थ करणारे जीवनातील अनुभव संपूर्ण विश्वासानं आणि निर्वेधपणानं ज्याच्याजवळ सांगावेत असं आयुष्यात एकमेव ठिकाण म्हणजे साहित्य असं मला वाटलं. हे ठिकाण मला मिळालं नसतं तर संवेदनशील आणि जगाची अकारण चिंता वाहणाऱ्या भावनाशील मनाचं आरोग्य बिघडलं असतं.’ अशा शब्दांत त्यांनी साहित्याशी ‘जवळीक’ त्याच्याशी असलेलं नातं व्यक्त केलं आहे. तर अंतर्बाह्य निरोगी राहण्याची देणगी आपल्याला साहित्यानं दिली असं साहित्याचं ऋण ते मानतात. ग्रामीण भागात सोप्याच्या भुईवर ‘काचवेल’ काढण्याची लोकप्रथा आहे. काचेच्या बांगड्यांच्या (काकणांच्या) तुकड्यांनी ही वेल काढली जाते. वंशवेलीचं प्रतीक असणारी ही दैवी लोककला त्यांनी आईच्या हातून रेखलेली पाहिली. वेळावेळी, जागोजागी त्यांना भेटलेल्या कसबी कारागीरांनी त्यांना ते प्रेमानं देऊ केलं. त्यांचे स्वभावगुण, स्वभावरंग बनलेल्या या तुकड्यांनी सजलीय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारी काचवेल! ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book