* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: JIHAD
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667271
  • Edition : 4
  • Publishing Year : MAY 1993
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 328
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHAT IS JIHAD? IT MEANS PUTTING IN OUR GREATEST EFFORTS TO ACHIEVE OUR MISSION AND AIM. ‘JIHAD’ IS NOT JUST A WAR PLAYED FOR RELIGION. THERE ARE PEOPLE WHO TAKE PRIDE IN ACHIEVING THEIR PERSONAL AIMS. THEY ARE FOREVER ACHIEVERS. THEY LEAVE NO STONE UNTURNED WHILE TRYING TO CONQUER THE SET AIM. THEY OFFER BLOOD, SWEAT AND SOUL IN THE PROCESS. THEY WORE THEMSELVES OUT. IN REALITY, THEY ARE THE TRUE ‘JIHADIS’.
एखाद्या ध्येयाच्या सिद्धीसाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावणे व जिवाच्या आकांताने प्रयत्न करणे म्हणजे `जिहाद` होय. जिहाद म्हणजे केवळ धर्मयुद्धा नव्हे. जी व्यक्ती सदा-सर्वकाळ आपल्या ध्येयाच्या धुंदीत मग्न असते, आपले धन, आपली वाणी, आणि आपली लेखणी आदींनी ध्येयाच्या पूर्ततेसाठी प्रयन्तशील असते व त्यासाठी स्वतःला क्षीणवत असते, ती वास्तवात `जिहाद` च करत असते.
* भैरू रतन दमाणी पुरस्कार १९९३ * महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार १९९४
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #JIHAD #JIHAD #जिहाद #AUTOBIOGRAPHY #MARATHI #HUSSAINJAMADAR "
Customer Reviews
  • Rating StarSurya Misal

    जिहाद हुसेन जमादार मुस्लिम समाजातील अनिष्ट प्रथा रूढी परंपरा यांच्या विरोधात जाऊन समाजप्रबोधन करायचं असा ध्यास घेतलेल्या हमीद दलवाई यांच्या प्रेरणेने ऊर्जा मिळवलेल्या एका मुस्लिम तरुणाची ही कहाणी आहे. 1)मुस्लिम तोंडी तलाख पद्धत बंद करा. 2) ताख भेटलेल्या स्त्रियांना पोटगी मिळावी अशा अनेक अनिष्ट प्रथा विरुद्ध लढा देताना त्यांना आलेल्या संकटाना तोंड देत उभारलेली चळवळ खरच स्तुत्य आहे एक वाचनीय पुस्तक. ...Read more

  • Rating StarDyneshwar

    samaj sudharnesathi avirat prayatnachi kahani

  • Rating Starप्रभाकर करंजकर

    कोर्टाचा आढावाच आपण या पुस्तकात घेतलेला आहे. सामाजिक काम करताना येणाऱ्या अडचणी फक्त अडचणीच कसल्या? अडचणींचा डोंगरच तो. तो अडचणींचा डोंगर चढून उतरल्यानंतर पुन्हा नवीन उत्साहाने समाजासाठी मार्गक्रमणा चालुच! आपल्यासारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या आदर्ामुळेच आमच्यासारखे कार्यकर्ते कार्यरत असतात. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    हुसेन जमादार यांचे जिहाद हे आत्मकथन हे मराठी भाषेतले पहिलेच मुस्लिम आत्मकथन असावे. आपले बाझ आणि आंतर जीवन यथातथ्यपणे त्यांनी प्रस्तुत केले आहे. त्यांच्या जीवनाच्या प्रारंभीच्या काळाचे त्यांनी रेखाटलेले चित्र हृदयात कालवाकालव निर्माण करते. खरे म्हणजे ारतातील गरीब, दुबळ्या समाजाची ही एक प्रकारची सामाईक कहाणीच आहे. हुसेन जमादारांनी ती सुबोध मराठीत प्रस्तुत केली आहे. त्यांच्या आत्मकथनाचा प्रारंभ कर्नाटक, महाराष्ट सीमा भागातील मुसलमानी बोली भाषेत आलेला आहे. मुसलमानांची मातृभाषा उर्दू असते हा सनातनी मुसलमानांचा आग्रह किती बेबुनियाद असतो ते हुसेन जमादारांनी फार सूचकपणे व्यक्त केले आहे. मुसलमानांच्या कौटुंबिक संबंधांच्या गुंतागुंतीचे जे चित्र जमादारांनी प्रस्तुत केले आहे ते फार विदारक आहे. सनातनीपणामुळे किती धडधडीत अन्याय मुस्लिम समाजात घडतात त्याची जमादारांनी प्रस्तुत केलेली कहाणी माणुसकी जागी असणारया कोणाच्याही हृदयाला घरे पाडल्यावाचून राहणार नाही. एका व्यक्तीच्या जीवनात घडलेल्या या घटनांना एक व्यापक प्रातिनिधिक स्वरूपही आहे. सर्व समाजात अन्यायाची कुहाड चालते ती प्रामुख्याने स्त्रीवर. त्यामुळे धर्मचिकित्सेचा प्रारंभ स्त्रियांच्या प्रश्नांच्या अनुषंगानेच होतो. मुस्लिम समाजही त्याला अपवाद नाही. इस्लाममध्ये जिहादची कल्पना आहे ती अधर्म आणि अन्याय यांच्या विरुद्ध प्राणपणाने लढण्याची, पण त्याचे विकृतीकरण धार्मिक नेत्यांनी केले आणि स्वधर्मातील सुधारकांविरुद्धच जिहाद शब्दाचा उपयोग होऊ लागला. हुसेन जमादार यांनी त्याचे परिशुद्ध स्वरूप आपल्या या आत्मकथनातून स्पष्ट केले आहे. मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळीचा इतिहासही पुस्तकात ओघाओघाने विविध घटनांच्या अनुषंगाने आला आहे. धर्माला विरोध करणे वेगळे आणि धर्मात शिरलेल्या अनिष्ट प्रथा, परंपरा आणि अन्याय यांना विरोध करणे वेगळे, पण धार्मिक अंधत्व आलेल्यांना एवढा पोच नसतो. समाजातील अगतिकता, अज्ञान आणि अंधश्रद्धा यांचा फायदा उठवून धार्मिक नेते सामान्य माणसांना आपल्या जरबेत ठेवत असतात. त्यांची विचारशक्ती पांगळी करून टाकतात. जो धर्मग्रंथ त्यांना धड वाचता देखील येत नाही, समजणे लांबच, त्या धर्मग्रंथाचा वापर करून ते सामान्य माणसाला छळतात, त्याची कोंडी करतात, धर्माच्या नावाने चालणारया या अधर्माशी शांततापूर्ण मार्गाने लढणे हे खरेखुरे जिहाद आहे, असे हुसेन जमादारांना वाटते. त्यांचे आत्मकथन ही अशा प्रकारे जिहादची जाणीवपूर्वक घेतलेली नोंदच आहे. मुळात हुसेन जमादार हे पापभिरू आणि इस्लाम प्रेमी. ग्रंथाच्या पहिल्या खंडात त्यांच्या धडपडीची हकिगत त्यांनी तपशिलात सांगितली आहे. आपल्या तारुण्यसुलभ भावना त्यांनी धर्मकारणी लावण्याचा कसोशीचा प्रयत्न केलेला आहे, परंतु हळूहळू त्यांचा मुस्लिम धार्मिक नेतेच भ्रमनिरास करतात. धर्मवचने आणि धार्मिक वर्तन यात मेळ बसत नाही तेव्हा ते विचाराला प्रवृत्त होतात. खऱ्या धर्माची शिकवण सर्वसामान्य मुसलमानाला मिळत नसल्याने त्याची दुर्दशा होते अशा समजुतीने ते खऱ्या धर्माची शिकवण देऊ पाहतात. तवलिघच्या नावाखाली तर्कहीन व बुद्धिविरोधी प्रकार घडतात. ज्या बहिणीच्या शिक्षणासाठी त्यांनी कळकळीने प्रयत्न केलेले असतात ती बहीण तवलिघच्या नादी लागून जे प्रकार करते ते पाहून हुसेन जमादार विषण्ण होतात. या निमित्ताने जमादार वाचन करु लागतात, महात्मा गांधीच्या आत्मकथेच्या वाचनाचा विलक्षण परिणाम त्यांच्यावर होतो. मग त्यांचे हात लिहिण्यासाठी शिवशिवू लागतात. जीभही वळवळू लागते. या वेळापर्यंत वेगवेगळ्या नोकऱ्या उदरनिर्वाहासाठी ते करतात आणि उरलेला वेळ आपल्या समाजाच्या सेवेसाठी खर्च करतात. पण नंतर त्यांना उच्च शिक्षणाची तळमळ लागते. ते पदवी संपादन करतात जेव्हा एकदा समाज अपरिहार्य असलेली सुधारणा आत्मबळाने करण्याला नकार देतो तेव्हा तो अप्रत्यक्षपणे बाह्य हस्तक्षेपाला आमंत्रणच देत असतो. सती बंदीच्या बाबतीत असे घडले. इंग्रजी राज्यकर्त्यांनी लेखणीच्या एका फटकाऱ्यासारखी सतीबंदी केली आणि बहुसंख्य हिंदूंनी ती निमूटपणे मान्यही केली. मागास देशात शासनाने अशी पावले टाकली तर समाज निमूटपणे त्या गोष्टी मान्य करतो. पण शासन पक्ष मताच्या मतलबापोटी आपली ही ऐतिहासिक जबाबदारी पार पाडण्याबाबत अंगचुकारपणा करतो. तलाक मुक्ती मोर्च्यांच्या संदर्भात या गोष्टी ढळढळीतपणे पुढे येतात. आपल्या संविधानाशी राज्यकर्त्यांनी सतत द्रोह मांडला आहे. जात, वंश, धर्म, भाषा आणि यौनभेदापायी नागरिका-नागरिकता भेद न करण्याच्या संविधानातील आश्वासनाला राज्यकर्ते बिनदिक्कत हरताळ फासतात. गैर मुस्लिम स्त्रियांना असणारे अधिकार मुस्लिम स्त्रीला नाकारले जातात. संविधानाने असे स्पष्ट आश्वासन दिले आहे की, कायद्यासमक्ष सर्व नागरिकांना समान समजले जाईल आणि सर्वांना कायद्याचे समान संरक्षण दिले जाईल. पण त्यासाठी समान कायदा असायला हवा तो मात्र केलेला नाही. हिंदू स्त्रीला जे संरक्षण आहे ते मुस्लिम स्त्रीला नाही. जबानी तलाक आणि चार सवतींच्या कात्रीत मुस्लिम स्त्री अडकली आहे. या कात्रीतून तिची सोडवणूक करण्यासाठी वा सुधारणावादी मंडळींनी किती निकराचे प्रयत्न केले ते वाचले की, कोणीही सहृदय माणूस विपण्ण होईल. आपल्याला एक वाईट खोड जडली आहे, अस्पृश्यता हा हिंदूंचा आपसातला मामला, त्यांचे ते पाहून घेतील असे गैरहिंदूंनी मानणे आणि जबानी तलाक आणि चारपर्यंत सवती नांदवण्याची मुभा हा मुसलमानांचा अंतर्गत प्रश्न असल्याने त्यांचा ते सोडवतील. सुदैवाने हमीद दलवाई, हुसेन जमादार, सैयद भाई, वजीर पटेल, रजिया पटेल यांना राष्ट्र सेवा दलातील व साने गुरुजींना मानणाऱ्या आंतर भारतीयाच्या कार्यकर्त्यांनी समाजवाद्यांनी नेहमीच साथ दिली. त्याची कृतज्ञतापूर्वक नोंद हुसेन जमादारांनी केली आहे. धर्मनिरपेक्षता मानणाऱ्यांची साथ सुधारणावाद्यांना मिळावी इ. स्वाभाविकच म्हटले पाहिजे. राजर्षी शाहू महाराजांमुळे कोल्हापूरमध्ये सुधारणावाद्यांना अनुकूल अशी पार्श्वभूमी मिळालेली आहे. मुस्लिम समाज प्रबोधनाच्या कार्यालाही पार्श्वभूमी उपकारक ठरली असे म्हटले पाहिजे. मुस्लिम सत्य शोधक मंडळाची स्थापना पुण्यात झाली. तिथे त्याने मूळ धरले पण मुसलमानांच्या सुधारणावादी चळवळीला कोल्हापूरकरांनी नेहमीच साथ दिली. हुसेन जमादारांचे तेच कार्यक्षेत्र असल्याने त्यांना या गोष्टींचा फायदा झाला. आजही त्यांना तेथे अनेकांची साथ मिळत आहे. सुधारणवाद्यांना त्यामुळे स्वाभाविकच आनंद झाला होता. पण जमातवाद्यांपुढे सरकारचे गुडघे टेकले आणि सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा धाब्यावर बसवून त्यांनी मुस्लिम स्त्रीला पुन्हा वाऱ्यावर सोडणारा कायदा केला. देशात मताधिकोशाचा व्होट बँक जो खेळ चालला आहे त्याचाच हा प्रताप आहे. ज्या सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आपल्या राजकीय सोयीकरता धाब्यावर बसवला तेच सरकार राम-जन्मभूमी-बाबरी मशीद वादात सर्वोच्च न्यायालयाकडे बोट दाखवते तेव्हा त्यांच्या ढोंगीपणाची चीड आल्यावाचून राहत नाही. मुस्लिम सनातनी सुधारणवाद्यांना काफिरची उपाधी उत्साहाने देतात. त्या शब्दाचा आपल्या लोकांवर जादूसारखा परिणाम होतो असे त्यांना वाटते. कारण मग युक्तिवाद करण्याची गरजच राहात नाही. प्रत्येक सुधारणवादी नास्तिक असतो असे नाही, हुसेन जमादार नास्तिक नाहीत, पण अंध धर्मश्रद्धही नाहीत. हमीद दलवाई हे नास्तिक होते, तसे जाहीरपणे ते सांगत आणि त्यामुळे येणाऱ्या अडचणींना ते हिमतीने तोंडही देत. पण तरी ते स्वतःला मुसलमान म्हणवत. त्यांना जेव्हा एक मौलानांनी बिनतोड वाटणारा प्रश्न विचारला की, तुम्ही मुसलमान आहात काय तेव्हा दलवाई म्हणाले की, मी जोवर स्वतःला मुसलमान म्हणवतो तोवर कोणाही मुल्ला मौलवीला मी मुसलमान नाही असे लेखण्याचा अधिकार नाही, पण हल्ली काही मंडळींनी धर्माची प्रमाणपत्रे वाटण्याचा अधिकार स्वतःकडे घेतला आहे. हुसेन जमादारांच्या लिखाणाच्या एका वैशिष्ट्याचा खास उल्लेख केला पाहिजे. हा एक दुर्मिळ गुण आहे. त्यांच्या लिखाणामागची भूमिका रागे भरावे कवणासी अशी सर्वांबद्दलच्या करुणेची आहे. आपलेच दात आणि आपलेच ओठ. फासावर लटकविणाऱ्यांबद्दल खिस्त म्हणाला होता, ‘देवा त्यांना क्षमा कर. ते काय करत आहेत ते त्यांना कळत नाही.’ - यदुनाथ थत्ते ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book