* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: JAMAICA INN
  • Availability : Available
  • Translators : SNEHAL JOSHI
  • ISBN : 9788184980592
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTEMBER 2009
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 292
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE COACHMAN TRIED TO WARNHER AWAY FROM THE RUINED, FORBIDDING PLACE ON THE RAINSWEPT CORNISH COAST. BUT YOUNG MARY YELLAN CHOSE INSTEAD TO HONOR HER MOTHER`S DYING REQUEST THAT SHE JOIN HER FRIGHTENED AUNT PATIENCE AND HUGE, HULKING UNCLE JOSS MERLYN AT JAMAICA INN. FROM HER FIRST GLIMPSE ON THAT RAW NOVEMBER EVE, SHE COULD SENSE THE INN`S DARK POWER. BUT NEVER DID MARY DREAM THAT SHE WOULD BECOME HOPELESSLY ENNARED IN THE VILE, VILLAINOUS SCHEMES BEING HATCHED WITHIN ITS CRUMBLING WALLS OR THAT A HANDSOME, MYSTERIOUS STRANGER WOULD SO INCITE HER PASSIONS... TEMPTING HER TO LOVE A MAN WHOM SHE DARES NOT TRUST.
सावल्या त्या निर्जन जागेतून सरकल्या. घोड्याच्या टापांचे आवाज खालच्या दगडी रस्त्यावरून जोरात आले. ते पुन्हा आले होते... ते गूढ पाहुणे, जे अंधाराच्या स्तराखाली जमेका इनमध्ये यायचे. मेरी येलाननं त्यांनी पुटपुटलेल्या त्या शपथा आणि त्यांचं भेसूर हास्य घाबरून ऐकलं. हे कोण लोक होते? तिच्या काकांचा आणि त्यांचा कोणत्या भयानक उद्योग होता? ही कथा आहे अनुराग, फसवणूक आणि मृत्यूची. एका भयानक कारस्थानाच्या जाळ्यात अडकलेल्या एका सुंदर तरुण स्त्रीची आणि न आवरता येणारं तिचं एका पाजी माणसावर जडलेलं प्रेम. डॅफने द्यू मोरियेर ह्याच्या अशा इतर जगप्रसिद्ध कादंब-यांप्रमाणेच ह्या त्याच्या कथेतही तीच अनिश्चितता आणि उत्कंठा आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #JAMAICAINN #JAMAICAINN #जमेकाइन #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SNEHALJOSHI #स्नेहलजोशी #DAPHNEDUMAURIER
Customer Reviews
  • Rating StarBhalchandra Sandbhor

    मला असं वाटतं की लेखकाच्या साहित्याला देशांची कींवा त्यातील राज्यंची सीमा नसते. देश आणि भाषा कोणतीही असो साहित्य उत्तम असेल तर ते वेगवेगळ्या भाषामध्ये अनुवादित होत असतं आणि त्याची लोकप्रियता दिवसें दिवस जगभर वाढतच जाते. आता बरीच मराठी पुस्तेही वेगवेगळया भारतीय तसेच जागतीक भाषामध्ये अनुवादित झाली आहेत. ‘जमेका इन’ ही डॅफने दयु मोरियेर या लेखीकेची १९३६ मधे प्रकाशीत झालेली इंग्लिश कादंबरीचा मराठी अनुवाद नुकताच वाचला एक छान विषय आणी शेवटपर्यंत रंजक होत जाणारं कथानक, कादंबरीची नायिका मेरी येलान चे वडील आणी त्यानंतर होणाऱ्या आईच्या मृत्यू नंतर तिने आईला दिलेल्या वचनानुसार तिचं मुळ आवडत गाव हेलफोर्ड सोडून तिच्या मावशीकडे बोडमीन या गावी जमेका इन या खानावळीत रहायला येते. जमेका इनमधे रहायला आल्यानंतर लवकरच मेरीला समजते की ‘जमेका इन’ ही एकेकाळी नावजलेली खानावळ सध्या मालकाच्या मंजे तिच्या काकांच्या जॉस मेरलीन च्या जहाज तस्करी करणाऱ्या टोळीच्या सावटाखाली आहे. तिच्या मावशीवर तिचा पती मंजे काकांकडून होणारे आत्याचार, तस्करी मालाची गुप्तपणे खानावळीतिल होणारी साठवणूक, यामधून तिच्या मावशीला सोडवण्यासाठी मेरी ऐकटी निर्भीस्तपणे शेवटपर्यंत या तस्करी टोळीशी लढा देते पण तिच्या मावशीला वाचवू शकत नाही. तिच्या मावशीचा शेवटी या लढ्यात दुखत अंत होतो पण ‘जमेका इन’ परत एकदा मोकळा श्वास घेते. आजही ही खानावळ इंग्लंडमधे बोडमीन या ठिकाणी भुकेलेल्या प्रवाश्यासाठी खुली आहे. कादंबरी वाचून झाल्यावर कधी इंग्लंड ला गेलो तर बोडमीनला जाऊन ‘जमेका इन’ ला भेट द्यावी ही ईछ्या मनात पिंगा घालत राहते एवढं मात्र नक्की. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 20-6-2010

    मेरी येलान ही तरुण मुलगी अनाथ झाल्यामुळे आपलं मूळ गाव सोडून इंग्लंडमधल्या कॉर्नवॉल भागात बॉडमिन इथे राहायला येते, तिथे तिची मावशी पेशन्स आणि मावसा जॉस मेरलिन हे ‘जमैका इन’ नावाची प्रसिद्ध खाणावळ चालवत असतात. लवकरच मेरीला कळून चुकतं की, ‘जमैका इन’ला ोक घाबरतात. कारण जॉस मेरलिन हा एक गुन्हेगारी टोळी चालवतोय. हे टोळीवाले कॉर्नवॉलच्या किनाऱ्यावर अंधाऱ्या रात्री प्रवासी गलबतांना चुकीचे इशारे देतात. परिणामी ती गलबतं खडकांवर आपटून फुटतात. मग हे टोळीवाले त्या गलबतांवरच्या सर्व माणसांना ठार मारून सगळा माल लुटतात. मेरी भयभीत होते. आपली मावशी तिच्या नवऱ्याच्या या भयंकर कारस्थानांमध्ये पुरती फसली आहे; आपणच तिला वाचवायला हवं असं समजून त्या दिशेने प्रयत्न करणाऱ्या मेरीला एक दिवस असंही कळतं की, जॉस मेरलिन या टोळीचा मुख्य बॉस नाही. स्वत: जॉस त्या अज्ञात बॉसच्या हातातलं खेळणं आहे. मग कोण असेल तो खरा खलनायक? बॉडमिनच्या मैलोगणती पसरलेल्या माळावर फिरताना मेरीला आणखी तीन व्यक्ती परिचित होतात. जॉसचा धाकटा भाऊ जेम मेरलिन, जमीनदार बसात आणि दयाळू पाद्री डेव्ही, जॉस काका आणि पेशन्स मावशी यांचा खून होतो. मेरीच्या नको तिथे कडमडण्यामुळे अखेर खलनायकाचं भांडं फुटतं, तो मेरीला ओलीस धरून समुद्रमार्गे स्पेनला पळून जाऊ पाहतो, पण अखेर जेम मेरलिनच्या गोळीला बळी पडतो. अशा तोंडावल्याची असंख्य कथानकं आपण गेल्या पन्नास-साठ वर्षांत विविध रहस्य कादंबऱयांमध्ये वाचली आहेत किंवा रुपेरी पडद्यावर पाहिली आहेत. त्यामुळे खरा खलनायक कोण असेल हे आपण तर्काने नक्कीच जाणलं असेल. मूळ इंग्रजी कादंबरी १९३६ साली लिहिली गेली आणि प्राचंड गाजली. दॅफ्ने द्यु मॉरिए या ब्रिटिश लेखिकेची ही चौथी कादंबरी होती. दॅफ्ने द्यु मॉरिएने यात चितारलेला इंग्लंडमधल्या कॉनवॉल भागातला निसर्ग, विशेषत: बॉडमिनच्या अफाट माळाची वर्णनं वाचकाला खिळवून ठेवतात. १९३९ साली या कादंबरीवर याच नावाचा चित्रपट रहस्यचित्र सम्राट आल्फ्रेड हिचकॉक याने काढला. त्यात चार्ल्स लॉटन या त्यावेळच्या प्रख्यात नटाने खलनायाकाची भूमिका केली होती. मात्र स्वत: दॅफ्ने द्यु मॉरिएला चित्रपट पसंत पडला नव्हता. कारण चार्ल्स लॉटनने मूळ कथानक स्वत:च्या पसंतीनुसार बदलून घेतलं होतं. ब्रिटनमध्ये ख्यातनाम पुरुषांना राजघराण्यातर्फे ‘सर’ ही पदवी दिली जाते. तशीच ख्यातनाम स्रियांना ‘डेम’ ही पदवी दिली जाते. डेम म्हणजे बाईसाहेब. डॅफ्ने द्यु मॉरिए आणि अ‍ॅगाथा खिस्ती या दोन महान रहस्यकथा सम्राज्ञींना इंग्लंडच्या राणीने ‘डेम’ ही पदवी दिली होती. डेम दॅफ्ने द्यु मॉरिएच्या प्रस्तुत ‘जमैका इन’चा मराठी अनुवाद मात्र अगदी सपक झाला आहे. मूळ इंग्रजीतल्या निसर्गवर्णनांचा प्रभावी प्रलय मराठीत अनुभवाला येत नाही. मांडणी, मुखपृष्ठ, निर्मिती अगदी तांत्रिक अंगे सुबक. ...Read more

  • Rating StarDAINIK PUNYANAGARI 8-11-2009

    डॅफने द्यू मोरियेर यांच्या ‘जमेका इन’ या पुस्तकाचा अनुवाद स्नेहल जोशी यांनी केला आहे. ही कथा आहे अनुराग, फसवणूक आणि मृत्यूची एका भयानक कारस्थानाच्या जाळ्यात अडकलेल्या एका सुंदर तरुणीची. ही सुंदरी एका पाजी माणसाच्या प्रेमात आकंठ बुडते आणि त्याचा परिणा म्हणून स्वतःवर अनेक संकटं ओढवून घेते. डॅफने द्यू मोरियेर यांच्या इतर जगप्रसिद्ध कादंबऱयांप्रमाणेच या कथेतही तीच अनिश्चितता आणि उत्कंठा आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more