* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ITS NOT ABOUT THE BIKE
  • Availability : Available
  • Translators : ANJANI NARAVANE
  • ISBN : 9788184980127
  • Edition : 4
  • Publishing Year : MARCH 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 287
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
LANCE ARMSTRONG WAS THE FIRST AMERICAN TO WIN THE FAMOUS "TOUR DE FRANCE` CYCLE RACE IN 1999 AND THEN HE WON IT SEVEN TIMES IN A ROW. THIS BECOMES EVEN MORE EXTRAORDINARY BECAUSE HE ACHIEVED THIS AFTER GETTING CURED OF A LAST STAGE CANCER. HIS ENTIRE LIFE HAS BEEN EXTRAORDINARY IN MANY OTHER WAYS TOO. THIS BOOK IS HIS AUTOBIOGRAPHY WRITTEN IN AN ASTONISHINGLY CANDID MANNER. THE GIST OF THE BOOK - ARMSTRONG`S MOTHER WAS ONLY SEVENTEEN WHEN HE WAS BORN. DESERTED BY HER HUSBAND SOON AFTERWARDS, SHE BROUGHT UP LANCE SINGLE-HANDED. SHE DIDN`T EARN MUCH, BUT DID NOT DENY HIM ANY CHILDHOOK PLEASURES, TEACHING HIM TO BE TOUGH AND BRAVE, SUPPORTED HIM IN HIS AMBITION OF BECOMING A CYCLING CHAMPION, AND STOOD BY HIM IN ALL THE DIFFICULTIES THAT HE FACED. "TURN EVERY NEGATIVE INTO POSITIVE` WAS WHAT SHE BELIEVED IN AND THAT IS WHAT SHE TAUGHT HIM. HE WAS EMERGING INTO A FAMOUS CYCLING CHAMPION BY THE TIME HE WAS TWENTYSIX, WHEN ALL OF A SUDDEN HE BECAME ILL AND WAS DIAGNOSED AS HAVING CANCER OF THE TESTICLES, WHICH WAS SPREAD TO THE LUNGS AND ALSO TO THE BRAIN. HIS MOTHER, GIRL-FRIEND AND ALL FRIENDS RALLY ROUND HIM TO GIVE ALL POSSIBLE HELP AND TO GIVE MORAL SUPPORT. BUT OF COURSE HE HAS TO FIGHT THE SHOCK AND THE DISEASE HIMSELF. HE HAS TO FIRST PRESERVE HIS SEMEN IN A SEMEN-BANK SO THAT MAY BE HE CAN HAVE CHILDREN LATER IF AND WHEN HE GETS WELL, HE HAS TO GO AND INQUIRE ALL OVER THE COUNTRY TO FIND THE BEST POSSIBLE HOSPITAL AND DOCTORS FOR SURGERY, CONTACT HIS SPONSORS TO SEE WHO WILL CONTINUE TO SUPPORT HIM AND GIVE HIM MEDICAL INSURANCE. SOME STAND BY HIM, SOME DESERT HIM. HE UNDERGOES SURGERY TO REMOVE THE TESTICLES THEN LUNG SURGERY AND FINALLY THE BRAIN SURGERY. LUCKILY HE IS STRONG ENOUGH TO STAND ALL THE OPERATIONS AND THEN UNDERGO MAXIMUM POSSIBLE CHEMOTHERAPIES. HE IS FINALLY CURED, WHICH IS A WONDER. AS HE GOES THROUGH A LOT OF MENTAL TURMOIL AND SELF-DOUBT, HIS GIRL-FRIEND AND FRIENDS PATIENTLY HELP HIM TO BOOST HIS MORAL TILL HE IS FINALLY MENTALLY STRONG ENOUGH TO START PRACTISING CYCLING AGAIN AND STARTS TAKING PART IN SMALLER RACES; WINNING THOSE GIVES HIM CONFIDENCE. HE MARRIES HIS GIRL-FRIEND WHO UNDERGOES A VERY TIRING ORDEAL TO GET A BABY WITH THE PRESERVED SEMEN. BEFORE THEIR SON IS BORN, ARMSTRONG WINS HIS FIRST "TOUR DE FRANCE` AND GOES ON TO WIN THAT RACE SEVEN TIMES IN A ROW. HE HAS STARTED A CANCER-FOUNDATION TO HELP NEEDY PATIENTS AND TO HELP CANCER-RESEARCH. THE BOOK ENDS WHEN HE RETIRES, BUT RECENTLY, AT THE AGE OF 37, HE HAS MADE A COME-BACK AND IS TAKING PART IN "TOUR DE FRANCE` IN 2009. WHETHER HE WINS OR NOT, THE COME-BACK AGAIN HIGHLIGHTS HIS GRIT, CONFIDENCE AND CAPACITY.
कॅन्सरशी दिलेल्या दीर्घ लढ्याबद्दल, मूल न होण्याच्या शक्यतेनं बसणा-या शारीरिक आणि मानसिक धक्क्याबद्दल, पित्याचं छत्र न मिळता गेलेल्या बालपणाबद्दल पुस्तकं लिहिली जातात. जगातील सर्वांत अवघड आणि महत्त्वाची सायकलस्पर्धा जिंकण्यासाठी किती दृढनिश्चयी असावं लागतं, याबद्दल लिहिलं जातं. – आर्मस्ट्राँगनी हे सगळं अनुभवलं आहे आणि त्या अनुभवांमधून उतरलं आहे एक अप्रतिम पुस्तक. आर्मस्ट्राँग यांचं हे आत्मकथन स्फुर्तिदायक आहे आणि मनोरंजकही! ते रडगाणं गात बसत नाहीत, सांगायला अवघड गोष्टी वेष्टणं घालून सोप्या करून सांगत नाहीत, आणि ज्या खूप चांगल्या लोकांनी त्यांना त्यांच्या ह्या प्रवासात मोलाची मदत केली, त्यांचे आभार मानायला विसरत नाहीत. २००१ मध्ये अमेरिकेतील स्कुल लायब्ररी जर्नलने हायस्कुल विद्याथ्र्यांमधील मोठ्या मुलांसाठी उत्तम म्हणून निवडलेले पुस्तक.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ITSNOTABOUTTHEBIKE #ITSNOTABOUTTHEBIKE #इट्सनॉटअबाउटदबाइक #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHIANJANINARAVANE #अंजनीनरवणे #LANCEARMSTRONGSALLYJENKINS "
Customer Reviews
  • Rating Starजस्मिन जोगळेकर

    इथे गावात माझी एक पुस्तक भिशी आहे. भिशीमधल्या बऱ्याच जणी ७०-७५ वयाच्या पण उत्साही. यात दर महिन्याला एकजण पुस्तकं घालते, मग त्याचं वाचन, चर्चा असं सगळं पार पडतं. तर या भिशीत सलग काही महिने आजारांमधून मात करून बाहेर आलेल्या मंडळींच्या आत्मकथनाचे एक तरीपुस्तक जाणूनबुजून नव्हे पण घातले जात होते. अशी पुस्तकं वाचनात आल्यावर सगळ्या काकूंना जरा नको वाटायला लागलं होतं तेव्हा. त्यांच्या वयाचाही कदाचित परिणाम असेल. पण आजारावर नेटाने, जिद्दीने मात करून आयुष्य वाढवलेल्या या लोकांबद्दल निश्चितच मनातून आदर, कौतुक वाटायला लागतं. मुख्य म्हणजे आजाराला हरवून ही लोकं नुसती जगली असं नाही तर पुढच्या आयुष्यात काही ना काही उल्लेखनीय कर्तृत्व गाजवून ते आयुष्य सत्कारणी लावले हे जास्त महत्त्वाचे. तेव्हाच वाचनात आलेले आणि जवळ असावे असे वाटलेले पुस्तक म्हणजे लान्स आर्मस्ट्राँग याचे `इट्स नॉट अबाउट द बाइक`. लान्स आर्मस्ट्राँगला तर सगळं जग ओळखतं. जगातल्या सर्वात महत्त्वाच्या आणि सुप्रसिद्ध सायकल स्पर्धेचा `तूर द फ्रान्स`चा सलग सात वेळेचा विजेता म्हणून त्याचे नाव प्रसिद्ध आहे. या स्पर्धेत ३५०० किमीपेक्षा जास्त अंतर २३ दिवसात कापायचे असते. याचे वेगवेगळे टप्पे केलेले असतात. प्रत्येक टप्पा पहिल्यापेक्षा कठीण होत जाणारा. मग डोंगराळ भाग, रस्तेच काय पण धड वाटही नसणारे भाग, वेगाने जात टेकड्याचे चढ-उतार असणारे भाग अशा खडतर टप्प्यातून पार पडत आणि फ्रान्स आणि युरोपच्या काही भागांमधल्या हवामानाला, तुफान पाऊस, बर्फवृष्टी, बेभान वारा यांना तोंड देत ही स्पर्धा जिंकणे खरंच सोपे काम नाही. त्यातून जर कॅन्सर सारख्या `आता काही खरं नाही याचं` अशा स्टेज ला पोहोचलेल्या माणसाने त्यातून पूर्ण बरे होऊन ही स्पर्धा जिंकणे म्हणजे तर कसं व्यक्त व्हावं प्रश्न पडेल असं काम. सायकल स्पर्धांमध्ये नाव होत असतानाच लान्स आर्मस्ट्राँगला त्याच्या वयाच्या २५-२६ व्या वर्षीच कॅन्सर झाल्याचे निदान झाले. जेव्हा कळलं तेव्हाच आजार प्रोस्टेट ग्लॅड्स, फुप्फुसे आणि मेंदूत पसरला होता आणि त्यातून लान्स आर्मस्ट्राँग वाचण्याची शक्यता खूपच कमी होती. पण इलाज सुरू झाले. मेंदूवरच्या अनेक गाठी काढायला झालेलं आव्हानात्मक ऑपरेशन आणि नंतर केमोथेरपीच्या ५-६ सायकल्स यातून त्याला जावं लागलं. अक्षरशः याला अग्निदिव्यच म्हणावे लागेल. मुळात लान्स आर्मस्ट्राँगची प्रकृती दणकट होती, स्वभावही कणखर होता. पण याचबरोबर त्याची प्रचंड इच्छाशक्ती, तेवढीच मेहनत आणि तेवढाच निश्चय या गोष्टींमुळे तो यातून सुखरूप बाहेर पडला हे कौतुकास्पद आहे. कॅन्सर झालाय हे कळल्यावर सामान्य माणूस नक्कीच मुळापासून हादरून जातो. पण आता झालाच आहे कॅन्सर तर लान्स आर्मस्ट्राँगने त्याच्याशी संवाद साधायला सुरूवात केली होती. आधीच त्याने कॅन्सरला सांगून टाकले की, `तुला रहायला जागा शोधण्याच्या प्रयत्नात तू एखादं शरीर शोधत होतास, तेव्हा माझं शरीर निवडून तू मोठी चूक केली आहेस.` किती आत्मविश्वासपूर्ण बोलणं हे! जरी कॅन्सर भारी पडेल हे माहीत होतं तरी असं बोलणं, असा विचार सुचावा यातच पुढची विजयाची बीजं रोवली जात असतील न! अशा जीवघेण्या आजारातून सहीसलामत बाहेर पडल्यावर माणसाचे आयुष्य पूर्णपणे बदलून जात असणार. आयुष्याकडे बघण्याच्या दृष्टीत बराच फरक पडत असणार. लान्स आर्मस्ट्राँगच्या बाबतीतही अर्थातच असेच घडले. कॅन्सर मधून बरे झाल्यावर त्याने कॅन्सर फाउंडेशनची स्थापना केली. त्या फाउंडेशन तर्फे सायकल स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि त्यातून गोळा होणारे पैसे कॅन्सर रिसर्च आणि कॅन्सर झालेल्या लोकांच्या मदतीसाठी वापरले जातात. लान्स आर्मस्ट्राँग याचा हा सगळा प्रवास वाचण्यासारखा आहे. नुसता वाचण्यासारखाच नाही तर प्रेरणा घेण्यासारखा आहे म्हणणे जास्त योग्य होईल. फक्त कॅन्सर झालेल्या लोकांनीच नव्हे तर सरसकट सगळ्यांनीच. लान्स आर्मस्ट्राँग आणि त्याच्यासारख्याच दुर्धर आजारातून बाहेर पडून मोठे काम केलेल्या सगळ्यांनाच शतशः प्रणाम! खरंतर शतशः हा आकडाही कमी पडेल. बरोबर न? ...Read more

  • Rating StarNeelima Kulkarni

    मी पण वाचलं आहे.तो संघर्ष जीवघेणा आहे

  • Rating StarShreenivas Ranjnikar

    लान्स आर्मस्ट्राँग यांचं अनुवादित आत्मचरित्र अतिशय सकारात्मक ,प्रत्येक मुलाने वाचावे असे...

  • Rating StarMAHESH HANDE

    भिती वाटणे हे अत्यंत मूल्यवान शिक्षण आहे,एकदा तुम्ही तितकी भीती अनुभवली म्हणजे तुमच्या क्षणभंगुर ते बद्दल इतर चार लोकांपेक्षा तुम्हाला चांगली समज येते आणि ती समज मनुष्याला बदलून टाकते` असाच एक बदललेला बाजीगर लान्स आर्मस्ट्रॉंग याची गोष्ट त्याच्या शब्ात त्याने मांडली आहे. सायकलिंग म्हणजे नियमां शिवाय भटकण्याचा स्वातंत्र्य. संयम म्हणजे कमकुवतपणा नाही हे तत्त्व शिकवणारा खेळ अशा या खेळाचं, स्पर्धेच नीतिशास्त्र आणि राजकारण आपल्या मनाच मनोरंजन तर करतेच त्याशिवाय कुतूहल मिटवून ज्ञानात भरही टाकते. अशा या खेळातील सर्वात अवघड स्पर्धा टूर डी फ्रान्स वाचताना आपण तल्लीनतेत लीन नाही झालात तर आश्चर्यच म्हणायचं. असाच सायकलिंगचा थरार अनुभवता अनुभवता त्याचा कैन्सरशी असलेला नियतीचा करार आपल्याला हादरवून सोडतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book