* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HASAL TAR VACHAAL
  • Availability : Available
  • ISBN : 9788184989243
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 96
  • Language : MARATHI
  • Category : HUMOUR
  • Available in Combos :MEERA SIRSAMKAR BIRTHDAY OFFER
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DO YOU HAVE SHEER INFORMATION OF PUNE ?? HAVE YOU EVER SAID ‘LET IT RAIN BUT CONTROL YOUR POEMS’ TO ANY NEW SELF PROCLAIMED POET ?? HAVE YOU EVER TASTED ‘CHAPSUI’ OR ‘KAANSOUP’ IN A HOMEMADE CHINESE RESTAURANT ?? HAVE YOU EVER HEARD THE NAMES OF SAREE WITH ITS CONDITION, SUCH AS A TORN OR OLD SAREE AS ‘’VIRKALI’ OR ‘TARKALI’ ?? IF YOU HAVE EXPERIENCED SUCH THINGS , THIS BOOK WILL HELP YOU IN RECOGNIZING SIMILAR SIGNS AND WILL MAKE YOU LAUGH LIKE INSANE !! THE PATH OF ‘COMEDY’ IS FAR MORE HARD, AND SLIGHTLY PROHIBITED FOR WOMEN’S, BUT MEERA SIRSAMKAR IS TRYING TO GET ALONG THIS DIFFICULT PATH, FLAWLESSLY !! WITH THE HELP OF MINUTE OBSERVATION, GIGGLING ACTIONS, THE POWER TO CAPTURE CONTRAST THINGS GOING AROUND, SHE IS TRYING TO PASS THIS WAY. I WISH ALL THE VERY BEST FOR HER JOURNEY AND MAY PEOPLE ENJOY THIS “FUNTASTIC” RIDE !!
कोणाला, किती आणि कशा प्रमाणात उपहास, विनोद समजतो याचं प्रमाण वेगवेगळं असेल कदाचित, पण आपण स्वत:ला विनोदाचं पात्र केलं की मात्र तो विनोद लोकांना लगेच समजतो. असा विनोद समजण्याचं प्रमाण १०० आहे. पण पुन्हा यातही एखाद्या स्त्रीनं स्वत:ला विनोदाचं पात्र करून, स्वत:वरच विनोद केला तर मात्र, तो विनोद ५० लोकांनाच कळतो! बाकीचे ५० लोक त्या स्त्रीला समजावत असतात, `ताई असं नाही ..तसं नाही .. होतं असं कधी कधी! जाऊ द्या ना, वाईट वाटून घेऊ नका`.....तेव्हा मात्र हसावं का रडावं ते कळत नाही. काही का असेना- हसण्याचा मार्ग मात्र फार सोयीचा असतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात `हसाल तर वाचाल`!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #HASALTARVACHAAL #HASALTARVACHAAL #हसालतरवाचाल #HUMOUR #MARATHI #MEERASIRSAMKAR #मीरासिरसमकर "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 27-03

    दैनंदिन जीवनातल्या विविध प्रसंगातल्या विसंगत बाबींवर विनोद करून हास्य निर्माण करणाऱ्या लेखांचा हा संग्रह. मीरा सिरसमकर यांनी या लेखांमध्ये गाडी चालवण्याचे किस्से, साडी खरेदी करताना येणारे अनुभव, मोबाइलचा वाढता वापर यातून विनोदाच्या जागा शोधल्या आहेत.प्रसंगाचं सूक्ष्म निरीक्षण आणि शब्दांचा चपखल वापर करून त्यांनी विनोद निर्मिती साधलीय. ...Read more

  • Rating StarDIVYA MARATHI, NASIK 14-10-2016

    लेखिका, कवयित्री मीरा सिरसमकर यांनी लिहिलेल्या हसाल तर वाचाल या पुस्तकात विनोदी कथा आहेत. छोट्याशा १५ कथांचं हे छोटंसं मनमुराद हसवणारं पुस्तक आहे. या पुस्तकाबद्दल मंगला गोडबोले लिहितात की, तुम्हाला पुण्याच्या रस्त्यांची ‘खड्डान-खड्डा’ माहिती आहे?, पास नको पण कविता आवर असं कोणा कवीला म्हणण्याची वेळ तुमच्यावर आली आहे? चायनीज विकणाऱ्या हॉटेलातली ‘चापसुई’ किंवा ‘कानसूप’ तुम्ही चाखलंय? एखाद्या विरलेल्या साडीला ‘विरकली’ किंवा फाटेल्या साडीला ‘टकरली’ म्हणण्याची पद्धत तुम्ही ऐकली आहे? असं असेल तर या पुस्तकात तुम्हाला पुष्कळ खुणेच्या जागा सापडतील आणि ओळख पटल्याचं हसूही फुटेल. विनोदाची वाट मुळात बिकट, त्यात बायकांसाठी काही प्रमाणात निषिद्धही, मीरा सिरसमकर नव्या उमेदीने तिच्यावर जाऊ बघताहेत. सूक्ष्म निरीक्षण, भाषिक करामती, विसंगती हेरण्याची वृत्ती यांची मदत त्या घेत आहेत. या पुस्तकातील केवळ कथाच आपल्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटवत तर यातील व्यंगचित्रही मस्त-मजेशीर आहेत. मुळातच या पुस्तकातील कथा फार मोठ्या नाहीत त्यामुळे त्या कंटाळवाण्या होत नाहीत. पटकन संपतात आणि आपण नवीन कथा लगेच वाचू लागतो. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 7-2-2016

    कोणाला, किती आणि कशा प्रमाणात उपहास, विनोद समजतो याचं प्रमाण वेगवेगळ असेल कदाचित, पण...आपण स्वत:ला विनोदाचं पात्र केलं की, तो विनोद लोकांना लगेच समजतो. असा विनोद समजण्याचं प्रमाण १०० टक्के आहे. पण पुन्हा यातही एखाद्या स्त्रीनं स्वत:ला विनोदाचं पात्र रून, स्वत:वरच विनोद केला तर मात्र, तो विनोद ५० टक्के लोकांनाच कळतो! बाकीचे ५० टक्के लोक त्या स्त्रीला समजावत असतात, ‘ताई असं नाही... तसं नाही... होतं असं कधी कधी! जाऊ द्या ना, वाईट वाटून घेऊ नका’... तेव्हा मात्र हसावं की रडावं ते कळत नाही. काही का असेना हसण्याचा मार्ग मात्र फार सुखाचा असतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात हसाल तर वाचाल! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book