* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GHARBHINTI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177665932
  • Edition : 9
  • Publishing Year : AUGUST 1992
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 552
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS AN EXCLUSIVE PIECE OF LITERATURE IN THE MARATHI WORLD. IT INCISIVELY REVEALS THE CUTTHROAT COMPETITION AND THE CAMPAIGN DURING THE DAYTO DAY LIFE, REMINDING ABOUT THE MILITANCY OF `MAHABHARAT`. THIS IS A REPRESENTATIVE YET PECULIAR STORY OF A RURAL MIDDLE CLASS FAMILY.THIS IS A STORY OF THE DESPERATE FIGHT OF A YOUNG, SENSITIVE MIND AGAINST THE INESCAPABLE, RELENTLESS FINANCIAL SUFFERINGS.IT IS A STORY OF HIS EFFORTS TO COME OUT OF THE LABYRINTH SUCCESSIVELY WITH THE HELP OF SCANTY EDUCATIONAL FACILITIES. THIS IS YET ANOTHER NOVEL AFTER `ZOMBI`, WOVEN WITH THE STRONG WEFTS AND WARPS, PRESENTING THE UNBELIEVABLE WORST RURAL ADVERSITIES.IT IS VERY GENUINE. THIS IS AN AUTOBIOGRAPHY, YET IT PERFECTLY REVEALS THE DIRECTION IN WHICH THE FUTURE RURAL LITERATURE IS LEADING.IT SUCCESSFULLY EXPLORES THE INS AND OUTS OF THE RURAL LIFE.
मराठी साहित्याचा मोलाचा ठेवा ठरावा, अशी ही साहित्यकृती! आजच्या जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनातही महाभारतसदृश संघर्षपूर्ण घटना केवळ अस्तित्वासाठी घडत असतात, याचे वास्तवपूर्ण, भेदक दर्शन म्हणजे घरभिंती. ग्रामीण समाजाच्या सर्वसाधारण स्तरातील कुटुंबाची ही प्रातिनिधिक तरीही वैशिष्ट्यपूर्ण कहाणी. जन्मप्राप्त, अटळ, जीवघेण्या आर्थिक हलाखीचा चक्रव्यूह भेदून बाहेर पडण्यासाठी केवळ काही शैक्षणिक सुविधांच्या तुटपुंज्या आधारावर एका तरुण, संवेदनशील मनाने दिलेला निकराचा पण यशस्वी लढा, हा या घरभिंतीचा गाभा! ‘झोंबी’ ते ‘घरभिंती’ या प्रवासपटातून प्रभावीपणे ग्रामीण जीवनाचे उभेआडवे ताणेबाणे प्रथमच त्यांतील खया छेदाभेदासकट विस्तृत प्रमाणात साहित्यरूपाने साकार होतात. त्यामुळे अंतर्बाह्य विस्तृतपणे वेध घेणारी ही आत्मचरित्रकथा ग्रामीण साहित्याच्या उद्याच्या प्रवासाची अचूक दिशा प्रभावीपणे दाखविते. – गो. म. कुलकर्णी

No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarSambhaji Sadamate

    झोंबी, नांगरणी नंतरचे आनंद यादव यांचे आत्मचरित्र म्हणजे घरभिंती .... खरतर.... मध्यम वर्गीय माणसाच्या सुखाच्या संकल्पना काय असतात? चांगलं शिक्षण घेऊन उत्तम नोकरी मिळावी... भौतिक सुख सुविधांनी युक्त टुमदार घर बांधावं... सुंदर मुलीशी विवाह करून घ बाळगोपाळांनी भरून जावं... बहुतांशी हीच मध्यमवर्गीय माणसांची सुखाची संकल्पना असते.. याच सुख स्वप्नांच्या परिपूर्ती साठी माणूस रात्रंदिवस शारीरिक किंवा बौद्धिक काम करीत असतो. या योगाने माणूस आपले जीवन समृद्ध बनवून समाजात आपले वेगळे अस्तित्व सिद्ध करत असतो.. अशी स्वप्न उराशी बाळगून सुखदुःखाचे चटके खात परिस्थितीशी दोन हात करीत कागल सारख्या खेड्यात लहानाचे मोठे झालेल्या या गाव खेड्याच्या शेती मातीची नाळ मराठी साहित्याशी जोडून शेती मातीत राबणाऱ्यांच्या वेदना.. संवेदना.. ग्रामीण मराठी साहित्य या नवप्रवाह द्वारे मांडून दुर्लक्षित गाव खेड्यातील माणसांच्या जगण्याला बळ देणारे एकमेवादित्य ग्रामीण साहित्यिक म्हणजे.आनंद यादव.... यांच्या आत्मचरित्राचा तिसरा भाग म्हणजे घरभिंती लौकिकार्थाने एम. ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या पंढरपूर कॉलेजमधून प्राध्यापकाच्या नोकरीची सुरुवात कशी झाली यानंतर कागल मधील घराच्या गळणाऱ्या छताला.. भग्न घरभिंतीला.. कसं नवरूप दिलं या घरातील आई-दादा चार बहिणी तीन भाऊ यांना मळा पिकवण्यासाठी कशी मदत केली आणि याच दरम्यान पंढरपूरची नोकरी सोडून सारस्वतांच् माहेरघर तथा साहित्य पंढरी म्हणून सर्व परिचित असणाऱ्या पुण्यामध्ये प्राध्यापकाची नोकरी स्वीकारून आपली वाड़मयीन आवड कशी जोपासली व वाढवली याचं समर्पक सुंदर वर्णन या आत्मचरित्रा मध्ये त्यांनी केले आहे नोकरी लागल्यानंतर फक्त दहावीपर्यंत शिकलेल्या स्मिताशी त्यांनी विवाह केला, कागलातील कुटुंबाची जबाबदारी सांभाळत स्मिताला पुढील शिक्षण देऊन पुण्यामध्ये स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांनी केलेल्या अपार मेहनतीचे समर्पक वर्णन यामध्ये आहे. त्यांची वांडंमयीन आवड पुण्यातील व गावाकडील घरप्रपंचाची जबाबदारी त्यातून ते करीत असलेले प्राध्यापकाची नोकरी पुण्यामध्ये लहानाच्या मोठ्या होत असलेल्या मुली स्वाती व कीर्ती यांच्या पालकत्वाची जबाबदारी.. स्मिताला नोकरी लागल्यानंतर त्यांच्या पुण्यातील कुटुंबाची होत असलेली परवड.. राखेतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उंच भरारी घ्यावी त्याप्रमाणे साहित्य पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याच्या साहित्य क्षेत्रामध्ये स्वतःचं साहित्यिक वलय निर्माण करून गोतावळा, पाचोळा ,नटरंग, खळाळ या व अन्य साहित्य कृती कशा निर्माण केल्या याच भावस्पर्शी वाचकांना भावनाप्रधान बनवून वाचण्यास भाग पाडणारे हे आत्मचरित्र आहे खरं तर माणसाचं जीवन सुखाने भरलेला पेला नसून कर्तव्याने भरलेले माप आहे.. हे वास्तव सिद्ध करणारे हे आत्मचरित्र आहे धनधान्यान मोटचाड्यांन आणि गाडीबैलांन नांगर कुळवन भरलेलं घर.. दादाच्या ,आईच्या, लहान भावंडांच्या राबणाऱ्या हातांनी फुललेला त्यांचा मळा..तोंडचा घास काढून घ्यावा तसा शासनाने केलेले नवीन कुळ कायद्यामुळे हातचा निघून जातो हे दादांना सहन होत नाही तो सर्व काम धंदा सोडून निराश होऊन बसून राहतो... सर्वांवर मोलमजुरी ची वेळ येते, याही स्थितीमध्ये उंचआकाशात घिरट्या घालणाऱ्या घारीचे लक्ष घरट्यातील तिच्या पिल्लांकडे असते त्याच प्रमाणे घराची वाताहात झाली असता पुण्यात नोकरी करीत असताना लेखकांनी दुसरा मळा कसा खरेदी केला व घराला उभारी देण्यासाठी त्यांची झालेली परवड सुंदर रीतीने यामध्ये मांडली आहे. खेडवळ वळणाची आई व उच्च शिक्षित लेखकांमध्ये उडणारे शाब्दिक खटके यांचे वर्णन समर्पक ग्रामीण बोलीचा वापर करून केलेले असल्याने यामध्ये एक प्रकारची वातावरण निर्मिती लेखकांनी सुंदर साधली आहे वादळात ज्याप्रमाणे दिवा तेवत राहावा त्याप्रमाणे लेखकांनी या प्रतिकूल जीवन संघर्षांमध्ये सुद्धा आपली साहित्यिक आवड जोपासून बेजोड साहित्यकृती निर्माण केल्या त्याचं बरोबर शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पीएचडी पदवी कशी संपादन केली याच समर्पक वर्णन या आत्मचरित्रात असल्याने हे आत्मचरित्र म्हणजे घराला घरपण प्राप्त करून देणाऱ्या एका गाव खेड्यातील बुद्धिजीवी तरुणाची यशोगाथा म्हणल्यास वावगे ठरणार नाही... ...Read more

  • Rating StarAaditya Vishwasrao

    गेले ४ दिवस ही ५४५ पाने अक्षरशः मनाची घालमेल करील होती. ` झोंबी ` मधला आंदु एस.एस.सी पुढे नांगरणी मध्ये एम.ए पर्यंत शिक्षण पूर्ण करत प्राध्यापक होतो आणि प्रसंगी रक्ताच पाणी करून कष्टणाऱ्या आंदूचा प्राध्यापक पदी आनंदराव होतो. ` घरभिंती ` हे नंद यादव ह्यांच्या आत्म चरित्राचा ३ रा भाग . झोंबी व नांगरणी वाचून झाल्यावर नकळतच लेखकाच्या पुढील जीवनाची अनामक हुरहूर लागली त्यामुळे नांगरणी वाचून झाल्यावर लगेच घरभिंती ला हात घातला . झोंबी मध्ये आनंद यादव ह्यांच्या एस.एस.सी पर्यंत चा काळ आलेला , पुढे नांगरणी मध्ये एम.ए होऊन पंढरपूर ल प्राध्यापक पदी नियुक्त होण्यापर्यंत काळ अनुभवला. घरभिंती मध्ये लेखक आनंद यादव ह्यांच्या संसाराची वेल बहरून आली आहे आणि लेखकांचा वाङमयीन विकास व साहित्यिक होण्यापर्यंत चा सुख- दुःख मिश्रित असा काळ आला आहे . स्वतःचा संसार फुलवण्या बरोबरच , गावाकडे २४ तास हाडं उगळून कष्ट सोसत संसाराचा गाडा ओढणारी आई, नुकताच तारुण्यात पदार्पण केलेला शिवा , शिक्षणासाठी धडपडणारे आप्पा आणि दौलत , लग्न होऊन सुद्धा नवऱ्यानं सोडली म्हणून माहेरी आलेली हिरा , मनात नवी स्वप्न उमलू पाहणारी धोंडू बाई या सर्वांचा संसार कसा सुरळीत करायचा याची स्वप्न बघणारा आनंद मनाला भिडतो. आई - वडील ह्यांच्यातील सततची भांडणं , तारुण्यापायी भान गमावून व्यसनात अडकलेला शिवा ह्यांची चीड येते तर दुसरीकडे आई चं दुसरं लग्न झाल्यामुळे आजोळी येऊन पडलेली फुला , नवऱ्यानं सोडल तरीही त्याच्या नावाचं कुंकू लावणारी नाळरोगी, सुजरी - फुगरी हिरा अस्वस्थ करून सोडते. हिराची आत्महत्या , वडिलांचा मृत्यु तर नकळतपणे डोळ्यांच्या पाणकडा ओलावून जाते इतक्या कठीण प्रसंगात सुद्धा लेखकांचा घराला आवरण्याचा प्रयत्न परंतु प्रत्येक वेळी आलेली निराशा वाचकाला च हतबल करते. एवढ्यात ही पुण्यात उमलू पाहणारी लेखकांची संसार वेल त्यावर फुलंनारी फुलं, आप्पा , दौलत ह्यांचं होणारं शिक्षण मनाला सुखकर करून जात. हे पुस्तक खरं तर एक Roller Coaster ची राईड आहे. क्षणात सुखाचे चढाव तर क्षणार्धात दुःखाची खोलच खोल दरी वाचकाला ग्रामीण जीवनातील समस्यांचा घडवून देते. ग्रामीण जीवनाचा पडदा डोळ्यांसमोर उभं करून जाणारं हे पुस्तक कठीण काळातसुद्धा जगण्याची उमेद न सोडता कसं लढत राहावं ह्यांची शिकवण देऊन जातं ...Read more

  • Rating StarSambhaji Desai

    4 hi part khupch chaan aahet ..... mi vachalet ....aanand yadav -jakate tyanch purn naav ....he atmcharitra ek jaganyachi navi umed deun jaat....khupch chaan aahe . jarur wacha

  • Rating StarPopatrao Yamgar

    आवर्जून वाचावे असे पुस्तक

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more