* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GARVEL
  • Availability : Available
  • ISBN : 9788184981223
  • Edition : 7
  • Publishing Year : MARCH 1980
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 164
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :SHANKAR PATIL COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
GARVEL, A TYPE OF VEIL WHICH KEEPS THE SURROUNDINGS COOL WAS THERE SINCE SHIVA’S CHILDHOOD. NOW IT HAD REACHED THE HUGE TAMARIND TREE AND HAD ACTUALLY HALFCOVERED IT. IT HAD CLEVERLY AND ARTISTICALLY WOVEN ITSELF THROUGH THE DENSE BRANCHING OF THE TAMARIND, OCCUPYING EVERY INCH OF ITS BLOSSOM. SO MANY YEARS HAVE PASSED. IT WAS STILL STANDING ERECT, FACING THE STORMS, READING BETWEEN THE RAINS. IT WAS MANY TIMES TORN APART FROM THE STORMY WINDS AND THE TORRENTIAL RAINS. YET, IT WAS THERE, FACING EVERYTHING BRAVELY. NEITHER THE WINDS NOR THE RAINS HAVE BEEN ABLE TO ROOT IT OUT OF ITS BIRTHPLACE. BUT NOW THE STORY HAD TAKEN ANOTHER ROUTE, COMPLETELY. THE FAMINE SINCE THE LAST THREE YEARS WAS STARTING TO SHOW ITS EFFECT DESTRUCTING THE GARVEL. THERE WAS HARDLY ANY TINGE OF GREEN LEFT, FORGET THE FLOWERS. THE BRANCHES WERE AS GOOD AS THE DRIED STICKS. IT WAS SOMEHOW SURVIVING, LOOKING FORWARD TO THE DRY SUMMER PASS AWAY. IT WAS SURE OF FLOURISHING THROUGHOUT THE MONSOON, IF IT COULD ENDURE THROUGH THE SCORCHING SUMMER. BUT THIS WAS NOT TO HAPPEN. THE FAMINE CONTINUED THROUGHOUT. THE SUN BAKED EVERYTHING. IT MADE THE GARVEL LIMP AND GO LAME, IT LOST ITS LAST STRUGGLE AND SLID DOWN FROM THE AGEOLD TAMARIND TREE GIVING AWAY ITS VERY LIVING. IT WAS SO SUDDEN; THE OLD TAMARIND LAY FLABBERGASTED OVER THIS LOSS.
आपल्या बाळपणापासून शिवा त्या गारवेलाचा संसार बघत आला होता. एवढी दांडगी, डेरेदार चिंच गारवेलानं निम्मी झाकली होती. वर्षांनुवर्षं भरतकाम करावं तसे टाके घालीत बसला होता. दरसाल आपलं जाळं विणतच होता. बघावं तिकडं सगळीकडं त्या झाडावर ती हिरवी वेलबुट्टी आणि फूलं दिसत होती. किती पावसाळे आणि किती उन्हाळे त्यानं पाहिले होते! किती वादळांशी झोंबी घेतली होती! गरजणाया वळवानं झोडलं, झंझावातानं झिंजाडून विस्कटून बघितलं; पण आजवर त्यानं कधी कुणाला दाद दिली नव्हती, नमतं घेतलं नव्हतं. असा हा एवढा जिद्दीचा गडी, पण लागोपाठ पडलेल्या या तीन वर्षांच्या दुष्काळात डेंगला होता. त्याची सगळी रयाच गेली होती. यंदाच्या ह्या उन्हाळ्यात तर अंगावर एक हिरवं पान नव्हतं मग फूल कुठलं? नुसत्या जाळ्या राहिल्या होत्या. त्याही वाळून पळकाट्या झाल्यागत दिसत होत्या. तरी तग धरली होती. एवढा उन्हाळा पार झाला असता म्हणजे त्याला डग नव्हता. पुन्हा टाके घालत बसला असता. ती हिरवी जरतार खुलली असती. पण जगाव्हर्त अशा ह्या दुष्काळानं त्यालाही नाक घासायला लावलं. ना वादळ, ना वारा. एकाएकी कोसळला बाबा. संपला त्याचा शेर! ती म्हातारी चिंचसुध्दा गदगदली. हे काय झालं, म्हणून ओणवी होऊन बघत राहिली.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#GARVEL#JALE#UMALA#TAKICHEGHAV#KARVAN#AAG#AANN#EKJORDARKARYAKARTA#DHANYADHANYAHANARDEHO#RANDAVPUNAV#MIFEDALELEEKKARJ#GHAT#STORYANIBANITALI#NEMANEMI#DAV#MITING#KHADDA#KADHANI#
Customer Reviews
  • Rating StarAmit Raut‎

    आपल्या बाळपणापासून शिवा त्या गारवेलाचा संसार बघत आला होता. एवढी दांडगी, डेरेदार चिंच गारवेलानं निम्मी झाकली होती. वर्षानुवर्ष भरतकाम करावं तसे टाके घालीत बसला होता. दरसाल आपलं जाळं विणतच होता. बघावं तिकडं सगळीकडं त्या झाडावर ती हिरवी वेलबुट्टी आणि फुं दिसत होती. किती पावसाळे आणि किती उन्हाळे त्यानं पाहिले होते! किती वादळांशी झोंबी घेतली होती! गरजणाऱ्या वळवानं झोडलं, झंझावातानं झिंजाडून विस्कटून बघितलं; पण आजवर त्यानं कधी कुणाला दाद दिली नव्हती, नमतं घेतलं नव्हतं. असा हा एवढा जिद्दीचा गडी, पण लागोपाठ पडलेल्या या तीन वर्षाच्या दुष्काळात डेंगला होता. त्याची सगळी रयाच गेली होती. यंदाच्या ह्या उन्हाळ्यात तर अंगावर एक हिरवं पान नव्हतं - मग फूल कुठलं? नुसत्या जाळ्या राहिल्या होत्या. त्याही वाळून पळकाट्या झाल्यागत दिसत होत्या. तरी तग धरली होती. एवढा उन्हाळा पार झाला असता म्हणजे त्याला डग नव्हता. पुन्हा टाके घालत बसला असता. ती हिरवी जरतार खुलली असती. पण जगाहर्त अशा ह्या दुष्काळानं त्यालाही नाक घासायला लावलं. ना वादळ, ना वारा. एकाएकी कोसळला बाबा. संपला त्याचा शेर! ती म्हातारी चिंचसुध्दा गदगदली. हे काय झालं, म्हणून ओणवी होऊन बघत राहिली. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book