* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: FIT FOR 50 PLUS FOR WOMEN
  • Availability : Available
  • Translators : SUBHASH JOSHI
  • ISBN : 9788184982008
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 92
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
OFFERS DIFFERENT EXERCISES FOR WOMEN WHO WANT TO LIVE HEALTHIER LIVES, AS WELL AS LONGER ONES. THE AUTHOR OFFERS A FRIENDLY FITNESS PROGRAM DESIGNED WOMEN IN THEIR MIDDLE AGE.
पन्नाशीनंतरची तंदुरुस्ती, या पुस्तकात मध्यमवयाकडे झुकत असलेल्या स्त्रीयांसाठी फार साध्या आणि सोप्या भाषेत तंदुरुस्तीच्या व्यायामांची आखणी सादर केलेली आहे. पन्नाशीकडे झुकलेल्या स्त्रिया नेहमीच आपल्या स्वास्थ्याविषयी, कमी होत चाललेल्या लवचीकपणाविषयी फारच काळजी करताना आढळतात. याशिवाय व्यायामाच्या अभावामुळे ऑास्टओपोरॉसिसचा (हाडं ठिसूळ होण्याचा), दुस-या क्रमांकाचा मधुमेह, कर्करोग आणि हृदयविकार यांचा त्रास होण्याची शक्यता डोक्यावर सतत टांगत्या तलवारीसारखी असतेच. या पुस्तकात दिलेले व्यायामाचे प्रकार हे मध्यमवयीन स्रियांना डोळ्यांसमोर ठेवूनच आखलेले आहेत. यामध्ये एरोबिक्स, वजन उचलण्याचे व्यायाम, बळकटी वाढविण्याचे व्यायाम आणि कटिभागाला मजबुती देणारे व्यायामाचे प्रकार दिलेले आहेत. हा व्यायामाचा वास्तव, चपखल आणि संतुलित आराखडा आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KARYAMAGNAVYASTALOKANSATHIYOGSADHANA #YOGAFORBUSYPEOPLE #कार्यमग्नव्यस्तलोकांसाठीयोगसाधना #HEALTHCARE&PSYCHOLOGY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #ARUNDHATIMAHAMBARE #BIJOYLAXMIHOTA #बिजयालक्ष्मी होता "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK PUNYANAGARI 01-03-2011

    व्यायाम, आहार आणि विश्रांती - तंदुरुस्तीची त्रिसूत्री : काहीही होत नसतानाही चाळिशीनंतर प्रत्येक स्त्रीने वार्षिक तपासणी करायला हवी आहे. व्यायाम, आहार आणि पुरेशी विश्रांती याबाबतीत स्त्रियांनी आपल्या काळात काळजी घेण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ स्त्ीरोग तज्ज्ञ डॉ. वैजयंती खानविलकर यांनी पन्नाशीनंतरची तंदुरुस्ती याविषयी बोलताना व्यक्त केले. मेहता पब्लिशिंग हाऊस यांच्या वतीने ‘फिट फॉर ५० प्लस’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादाच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना डॉ. खानविलकर बोलत होत्या. त्यांच्या हस्ते ‘फिट फॉर ५० प्लस फॉर विमेन’ आणि हृदयरोग तज्ज्ञ डॉ. महेश तुळपुळे यांच्या हस्ते ‘फिट फॉर ५० प्लस फॉर मेन’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. डॉ. वैजयंती खानविलकरांनी यावेळी तिशीनंतरच फिटनेसविषयीची जागरूकता महिलांमध्ये निर्माण होण्याची गरज व्यक्त केली. स्त्रियांच्या आरोग्यविषयक प्रश्नांकडे त्यांनी आपल्या बोलण्यातून लक्ष वेधले. मला काय झालंय? माझ्यावर कशाला खर्च? अशा विचारांनी स्त्री आरोग्याकडे डोळेझाक करीत आहे. घराला, संसाराला एक भक्कम आधार स्त्रीचा असतो. तिनेच आरोग्याची हेळसांड केली तर घराची इमारतच कोसळते, असे सांगून डॉ. खानविलकरांनी स्वतःच्या आयुष्यातही तिने आनंद घ्यायला हवा. यासाठी स्वतःच्या शरीराची आजच्या तणावाच्या काळात काळजी घेणे हे अत्यावश्यक आहे, असा सल्लाही त्यांनी दिला. डॉ. महेश तुळपुळे यांनी तंदुरुस्तीकडे लहानपणापासूनच लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले. मात्र पन्नाशीनंतर फिटनेसकडे लक्ष देणे आवश्यक असून, चरबी वाढणार नाही यासाठी जिभेवर ताबा मिळवणे आवश्यक असल्याचे सांगितले. यात योग्य आहार, पुरेसा व्यायाम आणि योग्य वेळी योग्य चाचण्या व आवश्यक त्या लसीकरणाकडे लक्ष असावे याकडे लक्ष वेधले. आपल्या मनाशी, स्वभावाशी सुसंगत असा व्यायाम ठेवण्याची गरज सांगताना आपल्या शरीराशी भांडू नका असा सल्ला डॉ. तुळपुळे यांनी दिला. पळण्यापेक्षाही रोज नियमित चालणे हा सर्वांत चांगला व्यायाम असून तो सोपा आणि वर्षभर करता येतो असे आवर्जून सांगितले. या दोन्ही पुस्तकांचे अनुवादक सुभाष जोशी यांनीही जिममध्ये न जाता चालण्यावर भर द्यावा अशी सूचना केली. कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही डॉक्टरांनी उपस्थितांच्या आरोग्यविषयक प्रश्नांची उत्तरे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनिता आपटे यांनी तर अभय भावे यांनी आभार मानले. -डॉ. खानविलकर ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more