Dr. Anand Yadav Ek Sahityik Pravas by MULIK KIRTI MILIND

* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Availability : Available
 • ISBN : 9789387319905
 • Edition : 1
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 184
 • Language : Marathi
 • Category : Literature
 • e-Book AMAZON
 • e-Book GOOGLE PLAY
Quantity
Dr. Anand Yadav is an accomplished personality in the field of Marathi literature. The literary world has bestowed titles like,"Gramin Sahitya Chalavaliche Pravartak","Gotavlakaar" "Natarangkaar" and "Zombeekaar" upon him. The former is because he is the Pioneer of rural literary movement in Maharashtra. His writing brought the rural life in Maharashtra in the spotlight and the latter three pertain to his three famous novels. Experimentation is the prominent strength of Dr. Yadav`s writing style. He has dabbled in almost every form of writing, be it stories, Novels, poems, critiques or biographies. During his illustrious career, he was honored with 40 prestigious awards including the Sahitya Akademi Award. "Dr. Anand Yadav: Eke Sahityik Pravas" is a collection of articles that discuss the distinct nature of Dr. Yadav`s writing in the world of Marathi literature, the role of his craft in giving Marathi literature a new direction, and the merits of his writing style.This book chronicles the fifteen-year odyssey of Dr. Yadav`s leadership role in the rural literary movement in Marathi literature. The book contains interviews that highlight his contribution, his realistic and critical approach towards rural Marathi literature. Apart from his remarkable literary voyage, the book features various heart touching write-ups that talk about Dr. Yadav`s personal life, memories of his near and dear ones, his close association with numerous people, and his pure unfeigned persona. This book showcases Dr. Yadav`s multifaceted personality. It also has a rare collection of never before seen photographs clicked by an ace photographer. The book is a valuable offering for academicians and connoisseur readers.
आनंद यादव यांची प्रत्येक कलाकृती लोकप्रिय ठरली. असे असले तरी स्वतःत न रमता, त्यांनी आपुलकीने अनेक नवोदित लेखकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या लेखनाला प्रोत्साहन दिले; ग्रामीण साहित्य चळवळ केली नि त्या बाबतीत सामाजिक धुरा आपल्या खांद्यावर घेतली. यादव यांची ही सामाजिक बांधिलकी मोठी आहे. ‘कलावंत केवळ स्वतःत रमणारा असतो,’ या विधानाला यादव अपवाद आहेत. साहित्यदिंडीतील प्रत्येक वारकरऱ्याला त्यांनी आपल्यात सामावून घेतले. त्यामुळे साहित्यरसिकांनी त्यांना संतपद दिले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांना मोठ्या संख्येने मतं देऊन निवडले. यादव यांना मिळालेली लोकमान्यता सहन न होऊन काही मतलबी व्यक्तींनी कुटिल राजकारण केले. वैचारिक वाद ही हिंदू संस्कृती आहे; परंतु हे वाद हिंसक पातळीवर नेण्यात आले. यादव या साहित्यसंमेलनासाठी येऊ शकले नाहीत. ही या समाजाची शोकांतिका आहे. प्रतिभावंतांना या गोष्टींविषयी जीवनात ना खंत, ना खेद राहतो. त्यांच्या दृष्टीने धरला. स्वतःच्या कथा, कविता, कादंबऱ्यामधून त्यांनी बोली भाषेतून निवेदन व संवादलेखन केले. स्वतंत्र लेख लिहून त्यांनी बोली भाषेचे सामथ्र्य जाणकारांच्या लक्षात आणून दिले. यादव यांच्या या कृतीमुळे मराठी ग्रामीण साहित्याला नवे परिमाण प्राप्त झाले. अनेक ग्रामीण लेखकांनी आपल्या बोली भाषेतून साहित्यकृती निर्मिण्यास सुरुवात केली. आजही ही परंपरा सुरू आहे. ‘मराठी ग्रामीण साहित्याची चळवळ’ सुरू करून यादव यांनी ग्रामीण जीवनाचे मराठी साहित्यातून होणारे कृतक दर्शन नाकारले. विविध पातळ्यांवर होणारी ग्रामीण लेखकांची कोंडी फोडली. त्यांच्या लेखनाला वाङ्मयीन दृष्टी प्राप्त करून दिली.
Keywords
Customer Reviews
 • Rating StarPROF. DR. D- T- BHOSALE

  एखाद्या लेखकांची वाङ्मयनिर्मिती प्रक्रिया, त्याचा वाङ्मयीन विकास, त्याचे साहित्याला लाभलेले योगदान, विषयांची नाविन्यता, रचनेतील प्रयोगशिलता, साहित्य आणि मानवी जीवनाचा असणारा अनुबंध, त्याने यशस्वी केलेले वाङ्मयीन प्रकार आणि त्याची समीक्षादृष्टी या साऱया गोष्टींचा सुंदर परिचय तुमच्या या डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास’ या देखण्या आणि दर्जेदार ग्रंथातून झाला आहे. प्रा. यादवांच्या साऱ्या साहित्यकृतींचे प्रत्येकाने वेगळेपण सांगितले आहे आणि ग्रामीण चळवळीला दिलेले नेतृत्व यांचाही परामर्श घेतलेला आहे. त्या प्रमाणेच एक माणूस म्हणून, कुटुंबवत्सल गृहस्थ म्हणून व गावाकडच्या नातेवाईकांचा कर्ता म्हणून घडविलेले दर्शन मनोज्ञ आहे. सारेच लेख खूप दर्जेदार असल्याने त्यांचा स्वतंत्र्यपणे उल्लेख केला नाही. मी घेतलेली त्यांची मुलाखतही लेखक म्हणून स्वीकारलेल्या भूमिकेवर प्रकाश टाकणारी आहे. तुम्ही हा ग्रंथ मनापासून अगदी जीव ओतून सिद्ध केला आहे. ग्रंथाचा आकार, मांडणी, लेखांची सजावट, त्यांचे दिलेले फोटो अन् सुंदर मुद्रण यामुळे इतका परिपूर्ण आणि उच्च निर्मितीमूल्य असणारा ग्रंथ खूप दिवसांनी पाहिला. उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचा पुरस्कार तुमच्या या ग्रंथाला मिळायला हवा. तो जर मिळाला नाही तर परीक्षकांना निर्मितीसौंदर्याची जाण अल्प वा अपुरी आहे असेच म्हणावे लागेल. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Latest Reviews

BONOBO : EK SHANTODOOT
BONOBO : EK SHANTODOOT by Vanessa Woods Rating Star
DAINIK SAKAL 17-06-2018

आफ्रिकेतल्या जंगलात चिंपाझी आणि बानोबो या वेगळ्या जातीचे चिंपाझी यांच्याबरोबर काम करणाऱ्या व्हेनेसा वूड्स या तरुणीनं लिहिलेलं हे पुस्तक. एक वेगळ्याच प्रकारचं विश्व व्हेनेसाच्या लेखनातून आपल्यासमोर येतं. एकीकडं जंगलातले, आफ्रिकी संस्कृतीतले एकेक विलक्ण अनुभव मांडत असताना, बोनोबोंबरोबरचं आपलं नातं उलगडून दाखवत असताना व्हेनेसा स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यावरसुद्धा लिहिते. जंगलांमध्ये तिला सापडत गेलेलं कौटुंबिक आयुष्य, माणूसपण ती या पुस्तकात मांडते. ‘बोनोबो हँडशेक’ या मूळ इंग्लिश पुस्तकाचा अनुवाद शर्मिला फडके यांनी केला आहे. ...Read more

And The Mountains Echoed
And The Mountains Echoed by Khaled Hosseini Rating Star
DAINIK LOKMAT 17-06-2018

दोन भावंडांची हृदय हेलावणारी कथा... खालिद हुसैनी या अत्यंत लोकप्रिय कादंबरीकाराची ‘अँड द माउंटन्स एकोड’ ही कादंबरी म्हणजे अफगाणी खेड्यातल्या, आईच्या मायेला पारख्या झालेल्या दोन भावंडांमधल्या हृदय हेलावणाऱ्या घट्ट भावबंधाची कथा आहे. आशयघन आणि विस्तृतअवकाश असलेली, शहाणपण आणि माणुसकीच्या गहिवराने ओथंबलेली ही कादंबरी माणूस म्हणून आपली व्याख्या करणाऱ्या मानव्याच्या खऱ्या अर्थाची लेखकाला असलेली गहिरी जाण अधोरेखित करते. एका छोट्याशा अफगाणी खेड्यात ही कथा सुरू होते. तीन वर्षांच्या परीसाठी तिचा थोरला भाऊ अब्दुल्ला हा तिच्या भावापेक्षा तिची आईच अधिक आहे, तर दहा वर्षांच्या अब्दुल्लाचं लहानगी परी हे सर्वस्व आहे. त्यांच्या आयुष्यात जे जे घडतं त्याचे त्यांच्या आणि त्यांच्या भोवतालच्या अनेकांच्या आयुष्यात जे पडसाद उमटतात, त्यातून मानवी आयुष्यातली नैतिक गुंतागुंत स्पष्ट होते. अनेक पिढ्यांमध्ये घडणारी ही कथा केवळ आईवडिलांच्या आणि मुलांच्या नात्याबद्दलची राहत नाही, तर भाऊ-बहीण, चुलत भावंडे, नोकर, मालक, विश्वस्त, पाल्य या साऱ्या नात्यांची होते. त्यांच्या एकमेकांवर प्रेम करण्याच्या, एकमेकांसाठी त्याग करण्याच्या नाना परी लेखक पडताळून पाहतो. ...Read more