* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DIGVIJAY
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662368
  • Edition : 10
  • Publishing Year : FEBRUARY 1996
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 612
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :B.D.KHER COMBO SET- 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE NOVEL BEGINS WITH THE NAPOLEAN`S ENTRY IN THE POLITICAL SCENARIO AND HIS ROLE AS A COMMANDER. IT PROGRESSES WITH HIS VICTORIES OVER THE EUROPEAN COUNTRIES, HIS UNSUCCESSFUL CAMPAIGN IN RUSSIA, HIS DEFEAT IN THE BATTLE OF LEIPZIG, HIS EXILE ON THE ISLAND OF ELBA, HIS LAST DEFEAT AT THE WATERLOO AND HIS TWILIGHT DAYS IN THE BRITISH IMPRISONMENT. THE POLITICAL ATMOSPHERE IN THE NOVEL IS FULL OF INTRIGUES AND INTRICACIES, THE STRATEGIES AND DIPLOMACIES, GRID AND ANGER, LOYALTY AND DECEPTIONS, WAR AND PEACE. THE AUTHORS HAVE BEAUTIFULLY PRESENTED NAPOLEAN`S TENDER, DELICATE LOVE AFFAIRS AND THE PROMISES AND COMPROMISES HE HAD TO MAKE. THE DESCRIPTIONS OF HIS DEFEAT AT THE WATERLOO, HIS UNSUCCESSFUL CAMPAIGN IN RUSSIA AND HIS LONELY LAST DAYS ON SAINT HELENA ISLAND ARE EXTREMELY TOUCHING. NAPOLEAN HAD A VERY SHORT STATURE COMPARED TO AN AVERAGE EUROPEAN, HE WAS NEITHER AN EXPERT HORSE RIDER NOR A SHARP SHOOTER, STILL HE WON 40 BATTLES. HE KNEW WHERE TO ATTACK. THE AUTHORS HAVE HIGHLIGHTED HIS AMAZING PRESENCE OF MIND, HIS FAST CALCULATIONS IN HANDLING THE ARMY AND HIS POSITIVE APPROACH TOWARDS CHALLENGES. SO IT IS RIGHTLY SAID THAT `HE CAME, HE SAW.. AND HE CONQUERED!` HE HAD TREMENDOUS WILL POWER, SELF CONFIDENCE AND EXCEPTIONAL LEADERSHIP QUALITIES. HE NEVER GUIDED HIS ARMY FROM THE BACKGROUND BUT ALWAYS KEPT HIMSELF ON THE FOREFRONT. THE AUTHORS HAVE DONE JUSTICE TO NAPOLEAN BY DEPICTING HIM NOT MERELY A POLITICAL LEADER OR A GENERAL BUT ALSO AS A SOCIAL REFORMER, THE FOUNDER OF THE FAMOUS `CIVIL CODE` AND THE `CENTRAL BANK OF FRANCE.` THOUGH HE HAD FAILED IN CONQUERING THE WHOLE WORLD, HE CONQUERED THE MINDS OF HIS SOLDIERS AND THE FRENCHMEN.
‘इटलीचीच काय; पण कोणतीही मोहीम हाती घ्यायची धडाडी असलेला असा एकच जनरल फ्रान्समध्ये आहे. त्याची उंची असेना का कमी; पण त्याच्या महत्त्वाकांक्षेची झेप विशाल आहे. त्याचा स्वत:चा नेम नसेना का चांगला; परंतु चढाई नेमकी कुठे आणि केव्हा करायची, हे तो उत्तम जाणतो. त्याची घोड्यावरची मांड कशी का असेना; पण संपूर्ण सैन्यावर त्याची विलक्षण पकड आहे. तो ओढीना का सारखा तपकीर; परंतु शत्रूच्या मात्र तो नाकी दम आणू शकतो!... ...नेपोलियन बोनापार्टसारखा जनरल आपल्या हाती आहे, हे मी आपलं भाग्य समजतो. या माणसाच्या हाती आपण सैन्याची सूत्रं देऊ या. अन्यथा उद्या तो ती स्वत:हून आपल्या हातांत घेतल्याशिवाय राहणार नाही!’ प्रेम-विरह, फितुरी-हेरगिरी, डाव-प्रतिडाव, युद्ध-शांती अशा विविध अंगांनी नटलेली नेपोलियन बोनापार्ट याच्या जीवनावरील पिता-पुत्रांनी संयुक्तरीत्या लिहिलेली अद्भुतम्य, रससिद्ध कादंबरी : दिग्विजय!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#DIGVIJAY #CHANAKYA #PRABUDDHA #B. D. KHER #RAJENDRA KHER #दिग्विजय #चाणक्य #प्रबुद्ध #बि.डी.खेर #राजेंद्र खेर
Customer Reviews
  • Rating StarRavindra Parse

    दिग्विजय, नेपोलीयन बोनापार्ट... ही कादंबरी वाचायला घेतली आणि काय सांगु मित्रांनो ती ख़ाली ठेवलीच जात नव्हती.. या पुस्तक़ात मी अक्षरशः गुन्तलो होतो. नेपोलीयन ग्रेट होता ही माहीत होतं पण या कादंबरी नंतर तर मी त्याचा फ़ैनच झालोय. ४ दिवसात वाचुन संपावलेी कादंबरी आनी बोनापार्ट चे आयुष्य यावर अजुनहि विचार चालू आहें ज़णूकाही बोनापार्ट फ़ीवरच चढलाय मला.... ...Read more

  • Rating StarShrikant Adhav

    DIGVIJAY by B. D. KHER, RAJENDRA KHER ज्या माणसाच्या शब्दकोषात "अशक्य" नावाचा शब्दच नाही असा दूर्दम्य इच्छाशक्ती असणारा माणूस म्हणून नेपोलियन बोनापार्ट कडे पाहिलं जातं !! आज आपण जगभर ज्या फ्रेंच राज्यक्रांतीचे दाखले देत असतो ,ज्या राज्यक्रांतीने रजेशाही नष्ट झाली आणि लोखशाही मूल्ये रुजी .....खरं तर ही राज्यक्रांती फसली आणि या फसलेल्या राज्यक्रांतीमुळेच नेपोलियनला बळ मिळालं आणि एक दिवस त्याने फ्रान्सच्या गादीवर बसून स्वतः चा राज्याभिषेक केला..... नेपोलियनच्या बाबतीत आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो जन्माने फ्रेंच नव्हता.....फ्रान्सच्या अंकित असणार्या दक्षिणेतील कॉर्सिका बेटावरचा त्याचा जन्म....याच नेपोलियनच्या वडीलांनी आणि कॉर्सिकावासीयांनी फ्रेंचांच्या सत्तेविरोधात लढा दिला त्याच कॉर्सिकाचा युवक एक दिवस बलाढ्य अशा फ्रान्सच्याच गादीवर बसला..... उंचीने बुटका,ज्याला घोड्यावर नीट मांड टाकता येत नाही.ज्याचा बंदूकीचा निशाणा अचूक नाही मात्र त्याची सैन्यवर भक्कम मांड आहे,त्याचा घोडा ऐन लढाईत सर्वांच्या पुढे असतो अशा नेपोलियनचे सैनिक आपल्या सेनापतीसाठी सूदूर रशियाची मोहीम असो,इजिप्त,इटलीची मोहीम असो जीवावर उदार होऊन लढत असत...... नेपोलियन च्या वैयक्तिक महत्वकांक्षा प्रचंड असल्या तरी त्याने जनतेसाठी मोठे रस्ते,बागा,अनेक शैक्षणिक संस्था उभारणे आशी लोकोउपयोगी कामे केलीच त्याचबरोबर अमिर उमरावांचे वर्चस्व कमी केले....अशा नेपोलियनचं वैयक्तिक आयुष्यमात्र एका अर्थाने दुःखद होतं....पहिल्या प्रेयसीसाठी त्याने केलेला देशत्याग एकीकडे आणि सत्तेच्या जवळ जाण्यसाठी एका विधवा उमराव स्त्री शी केलेला विवाह एकीकडे....ज्या नेपोलियनने फ्रान्सला महासत्ता बनवून जगात उभं केलं त्याच नेपोलियन च्या सख्या बहीणीने सत्तेसाठी त्याचा केलेला विश्वासघात एकीकडे ....अशा प्रकारे निष्ठा,पराक्रम,महत्वकांक्षा फितुरी,विश्वासघात,प्रेम ,विरह अशा रोमांचक गोष्टीने भरलेलं आयुष्य आणि अतिमहत्वकांक्षे पोटी आयुष्याची अखेरची वर्षे इंग्रजांच्या कैदेत सेंट हेलेना बेटावर काढताना खचितस त्याला अशक्य नावाचा शब्द शिवला असेल.....त्याच्या मृत्यू नंतर 19 वर्षांनी त्याचं शव फ्रान्सला नेई पर्यंत त्यांच्या कबरीची देखभाल खरणार्या एका सैनिकाची निष्ठा उदारहरणा दाखल दिली जाते की त्याच्या सैन्यचा त्याच्यावर किती जीव होता.....अशा नेपोलियन बद्दल तो साधा जनरल असताना बोलं जाई कि लवकरच त्याला संपूर्ण सैन्याचा ताबा द्यायला हवा नाही तर तो स्वतः आपल्या हाताने तो घेईल ...अशा महत्वाकांक्षी फ्रेंच नायकाच्या युध्द मोहीमा आशाच अशक्य ,अतर्क्य कोटीतल्या होत्या....त्याच्या लढाईतील सैन्य डावपेचांचा अभ्यास आजही जगभरातील सैनिकी शिक्षण संस्थामधे केला जातो.....अशा नायकावर मराठीत लिहलेली ही कादंबरी त्याच्या कर्तुत्वाला न्याय देणारीच अतिशय छान आशा गुंतून जावं अशा शैलीत लिहली आहे ....प्रेम-विरह, फितुरी-हेरगिरी, डाव-प्रतिडाव, युद्ध-शांती अशा विविध अंगांनी नटलेली नेपोलियन बोनापार्ट याच्या जीवनावरील पिता-पुत्रांनी संयुक्तरीत्या लिहिलेली अद्भुतम्य, रससिद्ध कादंबरी : दिग्विजय! ...Read more

  • Rating Starशितल घोडके

    मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेली ‘दिग्विजय’ ही कादंबरी वाचली. खूप आवडली. खरंच शेवटी नेपोलियन बोनापार्टसाठी डोळ्यांत अश्रू उभे राहिले. पुस्तकाची उत्तम मांडणी व खूप आपलीशी वाटणारी कादंबरी. त्यासाठी भा. द. खेर आणि राजेंद्र खेर यांना आणि मेहता पब्िशिंग हाऊसला माझे खूप खूप धन्यवाद! माझ्या खूप खूप शुभेच्छा! ...Read more

  • Rating StarMakarand Kalamkar

    खुप छान पुस्तक आहे. सर्व तरूणांनी वाचावं असं, स्वकर्तुत्वातुन नेता वराज्य कसं ऊभ रहातं हे नेपोलियन यांच्या कहानितुन कळतं, व प्रेरणा देतं

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book