* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: COMA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664881
  • Edition : 7
  • Publishing Year : 1979
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 148
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THEY WERE BENT UPON THE PATIENT, THEY WERE OBSERVING HIM. THERE WAS NO ONE AROUND TO GIVE ANESTHESIA AND EVEN THE OPERATING TABLE WAS NOT AROUND. THE PATIENT WAS SLEEPING ON SOME KIND OF WIRES. SHE LISTENED TO THE DIALOGUES BETWEEN THE TWO DOCTORS INTENTLY. `WHERE IS THE HEART FROM THE LAST PATIENT GOING TO GO?` `OH! SAN FRANCESCO`, THE SECOND SURGEON REPLIED. `WE ARE GETTING ONLY 75 THOUSAND DOLLARS FOR IT!, BUT IT WAS AN EMERGENCY.` `WE MIGHT END UP GETTING 2 MILLION DOLLARS FOR THE KIDNEY THIS TIME, BECAUSE IT IS A GOOD MATCH. MAY BE, AFTER A FEW DAYS THE SECOND KIDNEY WILL ALSO BE REQUIRED,` THE FIRST SURGEON ANSWERED. `BUT NOT UNTIL WE GET ORDER FOR HEART.` IF THE DALLAS CHILD GETS A PERFECT MATCH FOR KIDNEY THEN WE MIGHT GET 10 MILLION DOLLARS, HIS FATHER IS VERY RICH AND IS IN OIL BUSINESS.` THE SECOND SURGEON WHISTLED, `WOW! SO IS THERE ANY PROGRESS?` `THERE IS AN OPERATION IN THE MEMORIAL NEXT FRIDAY, LET US SEE HOW FAR IT MATCHES.`
ते खाली वाकून पेशंटकडे बघत होते. भूल द्यायला कुणीच दिसत नव्हतं. आणि ऑपरेशनचं टेबलही नव्हतं. पेशंट तारांवरच झोपला होता. दोघांचं संभाषण ती कान देऊन ऐकू लागली. ``गेल्या केसचं हृदय कुठे जाणार आहे कोणास ठाऊक?`` ``सॅन फ्रान्सिस्को,`` दुसरा सर्जन म्हणाला. ``त्याचे फक्त पंचाहत्तर हजार डॉलर्स मिळणार आहेत. पण ऑर्डर घाईची होती.`` ``या किडनीचे बहुतेक दोन लाख डॉलर्स मिळतील. कारण ती चांगली मॅच होणार आहे. कदाचित थोड्याच दिवसात दुसरी किडनी लागेल.`` पहिला सर्जन म्हणाला. ``हो, पण हृदयाला मार्केट मिळाल्याशिवाय ती देता कामा नये.`` ``दलासमधल्या मुलाला योग्य किडनी मिळाली तर दहा लाखाची ऑफर आहे. त्याचे वडील तेल उद्योगात आहेत.`` दुस-या सर्जननं शीळ वाजवली. ``मग काही प्रगती?`` ``पुढच्या शुक्रवारी मेमोरियलमध्ये एक ऑपरेशन आहे; बघू या किती मॅच होते.``
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #प्रमोदजोगळेकर #रोबिनकुक #COMA #TOXIN #SONS OF FORTUNE #FALSE IMPRESSION #CONTAGION #SEIZURE #CRISIS #CRITICAL #NOT A PENNY MORE, NOT A PENNY LESS #MARKER #कोमा #टॉक्सिन #कन्टेजन #सीजर #क्रायसिस #क्रिटिकल #मार्कर "
Customer Reviews
  • Rating StarShailesh Purohit

    १० जानेवारी २०२१ बरेच वर्षांपूर्वी एका इस्पितळात नोकरी करीत होतो. तेव्हाचे एक चित्रपटाशी संबंधित तंत्रज्ञ त्याच इस्पितळात बरेच दिवस कोमा मध्ये होते. त्या नंतर बरेच दिवसांनी - कदाचित महिन्यांनी एकदा वाचनालयात पुस्तकं चाळत असताना अचानक रॉबिन कुक ांच्या ‘कोमा’ या इंग्रजी कादंबरीचे रवींद्र गुर्जर यांनी केलेले मराठी भाषांतर हाताला लागलं. अर्थात आमच्या इस्पितळात दाखल झालेल्या तंत्रज्ञाचा आणि या कादंबरीचा अथवा कादंबरीतील व्यक्तीरेखांचा दूरान्वयानेही संबंध नाही. पुस्तक पाहिल्यावर मला केवळ त्याची आठवलं झाली इतकंच. एक छोट्याश्या शस्त्रक्रियेसाठी रुग्ण इस्पितळात दाखल होतो. शस्त्रक्रियेनंतर काही तासांत घरी जाणार या तयारीने आलेला रुग्ण बेशुद्धावस्थेत जाण्याचे काय कारण असावं ? तो शुद्धीत येत नाही. डॉक्टरांकडून काही चूक झाली, भुलतज्ञांकडून काही कर्तव्यच्युती झाली ? की आणखी काही… डोक्याला मुंग्या आणणारे कथानक, नाट्यपूर्ण मांडणी, उत्तरोत्तर ताणलं जाणारं रहस्य. त्याचा मागोवा घेणारी सुझान. एक भन्नाट वाचनानुभव. जर मी चुकत नसेन तर या कादंबरीवर चित्रपट देखील आला होता. ...Read more

  • Rating StarSumit Deshmukh

    सत्तरच्या दशकातली ही कथा आहे. बोस्टन शहरातील `मेमोरियल` हे एक प्रतिष्ठित व भव्य रुग्णालय. दरवर्षी प्रमाणे त्यावर्षी सुद्धा मेडिकल च्या पाच विद्यार्थ्यांचा एक समूह तिथे प्रशिक्षणासाठी येतो. त्यांतलीच एक म्हणजे कथेची नायिका - सुसान. तिथे तिला अज्ञातव रहस्यमय कारणाने कोमात गेलेल्या रुग्णांच्या काही केसेस पाहायला मिळतात. बुद्धिमान सुसान तशी अभ्यासू असल्यामुळे व तसेच काही रुग्णांबद्दल वाटणाऱ्या सहानुभूतीमुळे तिच्या मनात अशा अज्ञात कारणाने कोमात जाणाऱ्या रुग्णांच्या केसेस बद्दल कुतूहल निर्माण होतं. आणि मग ती त्या प्रकरणांचा छडा लावायचा कसा प्रयत्न करते, तिला कोणकोणते अडथळे येतात आणि शेवटी भीषण वास्तव कसं समोर येतं ते सांगणारी ही रंजक कथा. कथेतील बरेच प्रसंग हे थरारक असले तरी पुढे काय होईल त्याचा अंदाज लागतो. तसेच मलपृष्ठावरील परिचय देणाऱ्या मजकुरामुळे रुग्ण कोमात का जातायत त्याचा थोडा अंदाज वाचकाला आधीच आलेला असतो. त्यामुळे रहस्याचा घटक थोडा कमी झालेला आहे. अनुवाद नेहमीप्रमाणे उत्तम. एकदा नक्कीच वाचण्यासारखी कादंबरी. अभिप्राय- 3.5/5 #थरारकथा ...Read more

  • Rating StarKIRAN BORKAR

    वैद्यकीय विश्वात खळबळ माजविणारी कादंबरी डॉ. सुसान ही प्रशिक्षणार्थी डॉक्टर बोस्टन मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये जॉईन होते . हे अतिशय नावाजलेले हॉस्पिटलमध्ये आहे . पण त्या हॉस्पिटलमध्ये अचानक एका वर्षात सहा पेशंट कोमामध्ये गेले आहेत . एक वीस वर्षीय खेळाडू ुढग्याच्या छोट्या ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होतो आणि आठ नंबरच्या ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन चालू असतानाच कोमामध्ये जातो . त्या आधी ही नॅन्सी नावाची तरुणीही असेच छोटे ऑपरेशन चालू असतानाच कोमामध्ये जाते . डॉ सुसान या घटनेच्या मुळाशी जायचे ठरविते . मग तिच्यावर संकटे कोसळू लागतात . तर दोनवेळा प्राणघातक हल्लाही होतो . हॉस्पिटलमधून तिची बदली होते . तरीही न डगमगता ती या प्रकरणाच्या मुळाशी जाते . सत्य समजताच तिला धक्का बसतो पण अजूनही तिला काही धक्के बसणार आहेत .आता तिचा जीवच धोक्यात आहे . ज्या आठ नंबरच्या ऑपरेशन थिएटरमध्ये हे घडतेय तिथेच तिला ऑपरेशनसाठी नेले जातेय . यातून कोण तिला वाचवेल ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book