* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHICKEN SOUP FOR THE SOUL AT WORK
  • Availability : Available
  • Translators : SHYAMALA GHARPURE
  • ISBN : 9788184980639
  • Edition : 3
  • Publishing Year : SEPTEMBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 232
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :CHICKEN SOUP SERIES COMBO OFFER-61 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WORK IS AN IMPORTANT PART OF LIVING, WHETHER YOU WAIT ON CUSTOMERS, BUILD A BUSINESS OR COOK FOR YOUR FAMILY. AS SUCH, WE ALL HAVE IMPORTANT STORIES TO TELL ABOUT OUR WORK. FROM THIS RICH TREASURE CHEST OF EXPERIENCES, CANFIELD, HANSEN AND COMPANY HAVE GATHERED A SPECIAL COLLECTION OF INSPIRING TALES THAT SHARE THE DAILY COURAGE, COMPASSION AND CREATIVITY THAT TAKE PLACE IN WORKPLACES EVERYWHERE. CHICKEN SOUP FOR THE SOUL AT WORK WILL NOURISH YOUR SPIRIT WITH STORIES OF COURAGEOUS LEADERS AND WILL FOSTER YOUR CREATIVITY WITH EXAMPLES OF INSPIRING BREAKTHROUGHS. IT WILL ALSO TEACH YOU HOW TO ENRICH YOURSELF AND YOUR COWORKERS THROUGH HEARTFELT ACKNOWLEDGMENT. THIS POWERFUL BOOK GIVES YOU NEW OPTIONS, NEW WAYS TO SUCCEED AND, ABOVE ALL, A NEW LOVE AND APPRECIATION FOR YOURSELF, YOUR JOB AND THOSE AROUND YOU. SHARE IT WITH YOUR MENTOR, COWORKERS OR STAFF, AND ENJOY RENEWED JOY AND PLEASURE IN YOUR CHOSEN VOCATION. SPECIAL STORIES BY DILBERT`S SCOTT ADAMS, BEVERLY SILLS, DAVE THOMAS AND MANY MORE MAKE THIS COLLECTION COMPLETE.
माणसं काम करताना पाट्या टाकतात असं जरी दिसत असलं तरी सर्वसामान्य माणूस प्रसंगी प्राणही पणाला लावून अंत:करणपूर्वक, सेवावृत्तीनं काम करतो. त्या कामाचं कार्यात रूपांतर होतं. त्याचा आदर, गौरव अभिनव पद्धतीनं करणं ही उदात्त कार्यसंस्कृती. अनुभवांच्या खजिन्यातून इथे उलगडत जाते अनोखी कार्यप्रणाली. साहस, करुणा आणि प्रेरणा देणाया, मनाला तरतरी आणि जगायला बळ देणाया त्या अनुभवांना सलाम!

No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #CHICKENSOUP #USHAMAHAJAN #JACK CANFIELD #MARKVICTORHANSEN #PRADNYAOAK #SHYAMALGHARPURE
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMACHAR 06-09-2009

    मनाला सावरणाऱ्या गोष्टी… गेल्या काही वर्षांमध्ये अनुवादीत साहित्याला मराठी रसिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. विविध विषयांवरील अन्य भाषातील पुस्तके मराठी अनुवादित झाली आणि त्याला वाचकांचा चांगला प्रतिसाद लाभला, विशेषत: इंग्रजी भाषेतील अनुवादित पस्तकांनी मराठीत मोठी बाजारपेठ काबीज केली. अशाच तीन अनुवादित पुस्तकांचे प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊनसने नुकतेच केले आहे. ‘चिकन सूप फॉर द सोल’ ही मालिका इंग्रंजी साहित्यविश्वात खूप लोकप्रिय आहे. याच मालिकेतील ‘चिकन सूप फॉर द टीनएज सोल.’ ‘चिकन सूप फॉर द मदर्स सोल’ आणि ‘चिकन सूप फॉर द सोल अ‍ॅट वर्क’ ही तीन पुस्तकं मराठीत अनुवादित झाली आहेत. ‘चिकन सूप फॉर द सोल अ‍ॅट वर्क’ या पुस्तकाचा अनुवाद श्यामला घारपुरे यांनी केला असून अन्य दोन पुस्तकं सुप्रिया वकील यांनी अनुवादित केली आहेत. ‘चिकन सूप फॉर द सोल अ‍ॅट वर्क’ या पुस्तकात कामाच्या ठिकाणचं धैर्य, अनुकंपा आणि सर्जनशीलता यांच्या कथा आहेत. ‘चिकन सूप फॉर द टीनएज सोल’ या पुस्तकात वयात येणाऱ्या मुलांना जीवनमूल्य कळावीत या दृष्टीने जीवन, प्रेम आणि शिकणं या विषयीच्या कथा आहेत तर ‘चिकन सूप फॉर द मदर्स सोल’ या पुस्तकात ‘आईपण जागवणाऱ्या कथा आहेत. वेगवेगळ्या घटकांचा विचार करून पुस्तकं लिहिण्यात आल्यामुळे त्या त्या घटकांना प्रेरणा देणाऱ्या अशा या कथा आहेत. मनाला सावरणाऱ्या, धीर देणाऱ्या आधाराचा खंबीर हात देणाऱ्या कथा ‘चिकन सूप फॉर द टीनएज सोल’ या पुस्तकातून भेटीस येतात. ‘चिकन सूप फॉर द मदर्स सोल’ या पुस्तकातील कथा ‘आई’पणा भोवती गुंफलेल्या आहेत. ‘चिकन सूप फॉर द सोल अ‍ॅट वर्क’ या पुस्तकातून आदर्श जात, सुप्रिया वकील आणि श्यामला घारपुरे यांनी ओघवत्या भाषेत या मूळ इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद केला आहे. ‘चिकन सूप’ मालिका… जॅक कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सन हे ‘चिकन सूप’ या पुस्तकमालेचे संस्थापक सदस्य आणि निर्माते. या दोघांनी ‘चिकन सूप’ या मालिकेंतर्गत जवळजवळ २०० शीर्षकांची पुस्तके लिहिली. किम्बर्ली किर्बर्जर यांनीही त्यांना सहकार्य केले. तसेच जेनिफर हॉथॉर्न, मॅसी शिमॉथ या दोघींनीदेखील या पुस्तकमालेच्या लेखनात सहभाग घेतला आहे. छोट्या छोट्या कथांचे संकलन असलेली ही मालिका जगभर लोकप्रिय ठरली. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येदेखील या पुस्तकाची नोंद झालेली आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने ही पुस्तके मराठीत आणली आहेत. ही पुस्तके म्हणजे निराश मनाला प्रेरणा देणारी आणि जीवनाकडे वेगळ्या पद्धतीने पाहायला शिकवणारी अशी आहेत. चिकन सूप फॉर टीनएज सोल हे पुस्तक जीवन, प्रेम व शिकणे याविषयी मार्गदर्शन करतील, तर चिकन सूप फॉर द सोल अ‍ॅट वर्क हे कामाच्या ठिकाणी घडणाऱ्या अनुभवांचे संकलन आहे. चिकन सूप ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली असून, या मालिकेत आतापर्यंत ६८ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. दरवर्षीयामध्ये आणखी पुस्तकांची भर पडतच आहे. चिकन सूप या मालिकेतील पुस्तकांमध्ये आईविषयीचेही पुस्तक आहे. या तिन्ही पुस्तकांमधील छोट्या छोट्या कथा या अनुभवांवर आधारलेल्या असून, त्या प्रत्येक कथेतून एक वेगळा संदेश निश्चितच मिळतो. ‘वपुर्झा’ हे व. पु. काळे यांचे पुस्तक जसे कधीही, कुठूनही, कुठल्याही पानापासून वाचण्याचा आनंद घेता येईल, अशा धर्तीचे आहे, तसेच या तीन पुस्तकांचे आहे. अनेक लोकांनी आपल्याला आयुष्यात आलेले अनुभव या लेखकांकडे पाठविले, त्याचे उत्कृष्ट संकलन व संपादन करून ही पुस्तके आकारास आली आहेत. मराठीमध्ये आपल्याकडे पंचतंत्र किंवा हितोपदेश यामध्ये जो संदेश छोट्या छोट्या गोष्टींतून मिळतो, त्याची आठवण ही पुस्तके वाचताना आवर्जून होते. या पुस्तकांमधील सर्व कथा या आजच्या काळातील असून, अत्यंत व्यक्तिगत अशा असल्याने प्रत्येक वाचक त्याच्याशी आपले नाते जोडू शकतो. ‘चिकन सूप’च्या ‘लज्जत’दार कथा… इंग्रजी साहित्यविश्वात ‘चिकन सूप फॉर द सोल’ ही पुस्तकांची मालिका चांगलीच लोकप्रिय आहे. समाजातील वेगवेगळ्या घटकांना छोट्या छोट्या कथांमधून मार्गदर्शन करणारी ही पुस्तकं जगभर प्रसिद्ध आहेत. या मालिकेतील ‘चिकन सूप फॉर द टीनएज सोल’, ‘चिकन सूप फॉर द मदर्स सोल’ आणि ‘चिकन सूप फॉर द सोल अ‍ॅट वर्क’ ही पुस्तकं मराठीत अनुवादित झाली असून मेहता पब्लिशिंग हाऊसने ती प्रकाशित केली आहेत. धकाधकीच्या आयुष्याचा प्रवास करताना प्रत्येकालाच स्वत:ची अशी एक ‘स्पेस’ हवी असते. ती मिळाली नाही तर मानसिक आणि शारीरिक पातळीवर अनेक समस्या उभ्या राहू शकतात. संवाद, शेअरींग ही प्रत्येक जीवमात्राची नैसर्गिक गरज आज बदलत्या जीवनशैलीत पूर्णत्वास जातेच असं नाही. वेगवेगळ्या विषयांवर, स्वत:च्या समस्यांबद्दल कोणाशी तरी बोलावं, असं वाटत असलं तरी प्रत्येकवेळी ते शक्य होतंच असं नाही. किंबहुंना एखाद्याचे प्रश्न ऐकण्यामध्ये दुसऱ्या व्यक्तिला क्वचितच रस असतो. त्यामुळे बहुतेकवेळा मनातले प्रश्न मनातच राहतात. दबून ठेवलेले हे प्रश्न मग कधी अन्य मार्गाने डोकं वर काढतात. मनातल्या या विचारांना मोकळी वाट मिळावी, यासाठी आवश्यक असणारं ‘आउटलेट’ मिळण्यासाठी पुस्तकांसारखा दुसरा पर्याय नाही. आपल्याकडे ग्रंथांना गुरू मानलं जातं. ते खरंही आहे. वेगवेगळ्या विषयांवरही पुस्तकं आपली संवादाची, ज्ञानवृद्धीची भूक भागवत असतात. यातून आपल्या मनातील भावनांना वाटही मिळत असते आणि माहिती-ज्ञानाच्या कक्षाही रुंदावत असतात. एका नव्या जगाची ओळख यातून आपल्याला होते आणि आपण स्वत:कडे तटस्थ वृत्तीने पाहू शकतो. यातून स्वत:मधील गुण, अवगुण, व्यक्तिमत्त्वातील दोष यांचीही जाणीव होते. ते दूर करण्यासाठी काय करता येईल, याचं मार्गदर्शन पुस्तकातून होतं. त्यामुळेच ग्रंथ हे गुरु असतात तसेच ते मागर्दशक मित्रही असतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांच्या वेगवेगळ्या समस्या असतात, वेगवेगळ्या नात्यांची जबाबदारी पार पाडताना, वेगवेगळ्या भूमिका निभावताना तारेवरची कसरत करावी लागते. या प्रत्येक घटकाला मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरलेली ‘चिकन सूप फॉर द सोल’ ही मालिका इंग्रजी साहित्यविश्वात खूप लोकप्रिय आहे. जॅन कॅनफिल्ड आणि मार्क व्हिक्टर हॅन्सन यांनी ही मालिका लिहिली असून त्यामध्ये प्रेरणा देणाऱ्या, वेगवेगळ्या प्रसंगातून यशाचा मंत्र सांगणाऱ्या छोट्या छोट्या कथा आहेत. या मालिकेअंतर्गत वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. ‘चिकन सूप फॉर द प्रिझनर्स सोल’, ‘चिकन सूप फॉर द व्हॉलेंटिअर्स सोल’, ‘चिकन सूप फॉर द ओशन लव्हर्स सोल’, ‘चिकन सूप फॉर द हॉर्स लव्हर्स सोल’ अशी वेगवेगळी पुस्तकं याआधीच बरीच लोकप्रिय झाली आहेत. जगभरातील विविध भाषांमध्ये या पुस्तकांचे अनुवाद करण्यात आले असून त्यांनाही ही चांगली लोकप्रियता लाभली आहे. याच मालिकेतील ‘चिकन सूप फॉर द टीनएज सोल’, ‘चिकन सूप फॉर द मदर्स सोल’ आणि ‘चिकन सूप फॉर द सोल अ‍ॅट वर्क’ ही तीन पुस्तकं मराठीत अनुवादित झाली असून मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे ती प्रकाशित करण्यात आली आहेत. ‘चिकन सूप फॉर द सोल अ‍ॅट वर्क’ या पुस्तकाचा अनुवाद श्यामला घारपुरे यांनी केला असून अन्य दोन पुस्तकं सुप्रिया वकील यांनी अनुवादित केली आहेत. ‘चिकन सूप फॉर द सोल अ‍ॅट वर्क’ या पुस्तकात कामाच्या ठिकाणचं धैर्य, अनुकंपा आणि सर्जनशीलता यांच्या कथा आहेत. ‘चिकन सूप फॉर द टीनएज सोल’ या पुस्तकात वयात येणाऱ्या मुलांना जीवनमूल्य कळावीत या दृष्टीने जीवन, प्रेम आणि शिकणं याविषयीच्या कथा आहेत तर ‘चिकन सूप फॉर द मदर्स सोल’ या पुस्तकात ‘आई’पण जागवणाऱ्या कथा आहेत. जॉन कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सन हे चिकन सूप मालिकेचे निर्माते आणि संस्थापक आहेत. या दोघांनी लेखन आणि संकलन केलेल्या ‘चिकन सूप’ मालिकेची सध्या दोनशे शीर्षकं आहेत आणि जगभरातील चाळीस भाषांमधील वाचकांपर्यंत ती पोहोचली आहेत. आता मराठीतही ही पुस्तकं आल्याने मराठी वाचकांना त्याचा आनंद घेता येईल. छोट्या छोट्या गोष्टींतून जीवनाची मूल्य सांगणं हे मालिकेचं वैशिष्ट्य. समाजातील वेगवेगळ्या घटकांचा विचार करून पुस्तकं लिहिण्यात आल्यामुळे त्या त्या घटकांना प्रेरणा देणाऱ्या अशा या कथा आहेत. आयुष्याच्या प्रवासात किशोरवय हा नाजूक टप्पा असतो. एकीकडे जाणिवा उमलत असतात, डोळ्यात नवी स्वप्नं हसत असतात. त्याच वेळी व्यवहारी जगाचं करकरीत वास्तवही समोर येतं. अशा वेळी मनाला सावरणाऱ्या, धीर देणाऱ्या आधाराचा खंबीर हात देणाऱ्या कथा ‘चिकन सूप फॉर द टीनएज सोल’ या पुस्तकातून भेटीस येतात. ‘चिकन सूप फॉर द मदर्स सोल’ या पुस्तकातील कथा ‘आई’ पणाभोवती गुंफलेल्या आहेत. जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी ‘आईपण’ सारखंच असतं. या कथांमधून स्थळ, काळ या साऱ्या भेदाच्या पलीकडे जाऊन आईच्या वात्सल्याचा स्पर्श घडतो. ‘चिकन सूप फॉर द सोल अ‍ॅट वर्क’या पुस्तकातून आदर्श कार्यपद्धती उलगडत जाते. माणसं काम करताना पाट्या टाकतात, असं म्हटलं जात असलं तर सर्वसामान्य माणूस प्रसंगी प्राणही पणाला लावून अंत:करणापूर्वक सेवावृत्तीने काम करतो. त्या कामाचं कार्यात रुपांतर होतं. त्याचा आदर, गौरव अभिनव पद्धतीने करणं ही उदात्त कार्यसंस्कृती आहे. या पुस्तकातून याच संस्कृतीची ओळख होते. या तिनही पुस्तकातून जीवनविषयक आगळी मूल्यं प्रत्ययास येतात. सुप्रिया वकील आणि श्यामला घारपुरे यांनी ओघवत्या भाषेत या मूळ इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद केला आहे. समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांचे अनुभव वेगवेगळे असतात, त्याचबरोबर त्यांच्या समस्याही वेगवेगळ्या असतात. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधण्याचं काम या मालिकेतील पुस्तकांनी केलं आहे. शाळकरी मुलं, नुकताच कॉलेजच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलेले विद्यार्थी, वयात येणाऱ्या मुली, कॉलेज शिक्षण संपवून बाहेर पडणारे विद्यार्थी अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर ही पुस्तकं मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना होणारी तारांबळ, आई, वडील, पती, भाऊ, बहीण अशा भूमिका पार पाडताना होणारी कसरत, कामावरचे ताण-तणाव, सहकाऱ्यांशी असणारं वर्तन, वेगवेगळ्या कारणाने सतावणारी असुरक्षितता अशा वळणांवर ‘चिकन सूप’ मालिकेतील पुस्तकं प्रेरणादायी ठरतात. छोट्या छोट्या कथांमधून मिळणारी उर्जा वाचकाला एक नवी दृष्टी देते. या पुस्तकांचे अनुवाद आता प्रसिद्ध झाल्याने मराठी वाचकांना त्याची खुमारी अनुभवता येणार आहे. ...Read more

  • Rating StarLOKSATTA 13-10-2009

    जॅक कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सन हे `चिकन सूप` या पुस्तकमालेचे संस्थापक सदस्य आणि निर्माते. या दोघांनी `चिकन सूप` या मालिकेअंतर्गत जवळजवळ २०० शीर्षकांची पुस्तके लिहिली. किम्बर्ली किर्बर्जर यांनीही त्यांना सहकार्य केले. तसेच जेनिफर हॉथॉर्न, मॅसी शिमॉथ य दोघींनीदेखील या पुस्तकमालेच्या लेखनात सहभाग घेतला आहे. छोट्या छोट्या कथांचे संकलन असलेली ही मालिका जगभर लोकप्रिय ठरली. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येदेखील या पुस्तकांची नोंद झालेली आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने ही पुस्तके मराठीत आणली आहेत. ही पुस्तके म्हणजे निराश मनाला प्रेरणा देणारी आणि जीवनाकडे वेगळ्या पद्धतीने पाहायला शिकवणारी अशी आहेत. चिकन सूप फॉर टीनएज सोल हे पुस्तक जीवन, प्रेम व शिकणे याविषयी मार्गदर्शन करतील, तर चिकन सूप फॉर द सोल अ‍ॅट वर्क हे कामाच्या ठिकाणी घडणाऱ्या अनुभवांचे संकलन आहे. चिकन सूप ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली असून, या मालिकेत आत्तापर्यंत ६८ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. दरवर्षी यामध्ये आणखी पुस्तकांची भर पडतच आहे. चिकन सूप या मालिकेतील पुस्तकांमध्ये आईविषयीचेही पुस्तक आहे. या तिन्ही पुस्तकांमधील छोट्या छोट्या कथा या अनुभवांवर आधारलेल्या असून, त्या प्रत्येक कथेतून एक वेगळा संदेश निश्चितच मिळतो. `वपुर्झा` हे व.पु. काळे यांचे पुस्तक जसे कधीही, कुठूनही, कुठल्याही पानापासून वाचण्याचा आनंद घेता येईल, अशा धर्तीचे आहे, तसेच या तीन पुस्तकांचे आहे. अनेक लोकांनी आपल्याला आयुष्यात आलेले अनुभव या लेखकांकडे पाठविले, त्याचे उत्कृष्ट संकलन व संपादन करून ही पुस्तके आकारास आलेली आहेत. मराठीमध्ये आपल्याकडे पंचतंत्र किंवा हितोपदेश यामध्ये जो संदेश छोट्या छोट्या गोष्टींतून मिळतो, त्याची आठवण ही पुस्तके वाचताना आवर्जून होतो. या पुस्तकांमधील सर्व कथा या आजच्या काळातील असून, अत्यंत व्यक्तिगत अशा असल्याने प्रत्येक वाचक त्याच्याशी आपले नाते जोडू शकतो. ...Read more

  • Rating StarDAINIK DESHDOOT NASIK 28-3-2010

    चिकन सूपच्या मालिकेतले आणखी एक पुस्तक मध्यंतरी वाचले. याचं शीर्षक होतं ‘चिकन सूप फॉर द सोल अ‍ॅट वर्क’ काम करणं काही जणांसाठी कंटाळवाणं, पाट्या टाकण्याचं काम असतं, तर काही जणांसाठी जास्तीत जास्त स्वत्त्व ओतून उत्तम परिणाम साधणे हे असतं. काही सामान्य लक सामान्य आणि रोजच्या कामकाजातून अलौकिक अशी कामगिरी पार पाडतात की ज्यामुळे कंपनीचं, संस्थेचं हित जपलं तर जातंच पण त्याबरोबर तो माणूस सगळ्यांच्या माणूसपणाच्या जाणिवा समृध्द करून जातो. चिकन सूप मालिकेच्या लेखक मंडळाने सतत कार्यरत असणाऱ्या माणसांना, त्यांच्या मेहनतीला, सेवाभावी वृत्तीला, उच्च उद्दिष्टांना सलाम किंवा मानाचा मुजरा म्हणूनच या गोष्टी लिहिल्या. जगभरातल्या काम करणाऱ्या लोकांना हे पुस्तक अर्पण केलंय गोष्टी वाचताना पुन्हा एकदा आपण भावनाविभोर होतो हे नक्की. त्यांच्या पध्दतीप्रमाणे त्यांनी महत्त्वाचे विचार मांडून त्यावर स्पष्टीकरणाची उदाहरणे दिली आहेत; उदा. खऱ्याखुऱ्या सेवाभावनेने केलेले कोणतेही काम म्हणजेच खरी ईश्वरभक्ती किंवा विन्स्टन चर्चिल यांच्या मते, ‘तुम्हाला जे मिळतं त्यावर तुमचा उदरनिर्वाह होऊ शकतो; पण तुम्ही जे देता, त्यामुळे एकूण जीवन सफल होते.’ खलील जिब्रान म्हणतात की, ‘आपल्या कामातूनच आपण इतरांचे प्रेम (मन) जिंकू शकतो.’ या पुस्तकात नऊ विभागांतून लघुकथांची विभागणी केलेली आहे. काही कथा तर डोळ्यात पाणी आणि मनाला उभारी देणाऱ्या आहेत. दोन पिकलेली केळी, उंबरठ्यावरील देवदूत, हेटाळणीतून यशप्राप्ती, अपेक्षेच्या पलीकडे, गिऱ्हाईकांची भाषा या आणि अशाच प्रकारच्या दाखल्यातून लोकांच्या कामाप्रती असलेलय निष्ठेचा प्रत्यय येतो. ज्या क्षणी आपल्याला वाटतं सगळं संपलं त्या वेळेसही एखाद्या पानासारख्या क्षीण भासणाऱ्या गोष्टीमुळे पुनर्जन्म होऊ शकतो. इच्छाशक्ती पणाला लावली तर काहीही अशक्य नाही. वाचकांनी हे पुस्तक जरूर वाचावं. मनाला तरतरी येते. या पुस्तकात दिलेल्या घटना परकीय भाषेत किंवा जमिनीवर घडल्या असल्या तरीही मानवी हृदय सगळीकडे एक आहे, भावना एक आहेत. म्हणून चटकन हृदयाला भिडतात श्यामल घारपुरे यांनी भाषेच्या सोप्या, ओघवत्या शैलीत त्या आपल्यापुढे मांडल्या आहेत. चिकन सूप मालिकेची आजपर्यंत ६८ विषयांवरची पुस्तकं बाजारात उपलब्ध आहे. सगळीच वाचण्यासारखी आहेत. ...Read more

  • Rating StarSAKAL TODAY PUNE 2-9-2009

    ‘चिकन सूप फॉर द सोल अ‍ॅट वर्क’ या पुस्तकात ‘कचरा व्यवस्थापन’ या विषयावर एक स्वतंत्र लेख आहे. कार्यसंस्कृतीची उदात्तता सर्वसामान्यांना शिकविण्यासाठी जगभर अनेक पुस्तके लिहिले गेली आहेत. सध्या अशा पुस्तकांना वाढती मागणी आहे. व्यवस्थापनकौशल्य शिकविणाऱ्ा संस्थाही सध्या दैनंदिन जीवनातील विविध पैलूंचा बारकाईने विचार करतात. अशा पुस्तकांमध्ये कचरा व्यवस्थापनाबाबतचे विवेचन समाविष्ट होणे हे आधुनिक माणूस सर्वांगीण व्यवस्थापनाकडे निघाल्याचे निदर्शक आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या या अनुवादित पुस्तकात कामाच्या ठिकाणाचे धैर्य, अनुकंपा आणि सर्जनशीलता यांच्या कथा आहेत. जॅक कॅनाफिल्ड, मार्क व्हिक्टर हॅन्सन, मार्टीन रूट, मायदा रॉजरसन व टीम क्लूस यांनी लिहिलेल्या व संकलित केलेल्या या कथांचा मराठी अनुवाद श्यामल घारपुरे यांनी केला आहे. या पुस्तकातील ‘कचरा व्यवस्थापन’ या लेखात ब्राझीलमधली एक गोष्ट सांगितलेली आहे. वास्तुतज्ज्ञ जॅमी लेर्नर ब्राझिलच्या क्यूरीटोबाचा नगराध्यक्ष झाला. प्रथम छोटासा कसबा असलेले ते गाव हळूहळू पाच लाखांची वस्ती वाढलेल्या शहरात परिवर्तित झाले होते. तेथे सुका कचरा शहरात आणण्यासाठी बसचा प्रवास फुकटात होता. त्यामुळे शहरात उद्योगधंद्यांसाठी येणे त्यांना सोपे झाले. उद्योग नसलेले शहरात येऊन रोजगार मिळवू शकत होते. ओल्या कचऱ्यापासून खत तयार होऊ लागले.’ हे वर्णन मुळातून वाचण्याजोगे आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more