* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MERA MUJHMEIN KUCHH NAHIN
  • Availability : Available
  • Translators : BHARATI PANDE
  • ISBN : 9788177666823
  • Edition : 3
  • Publishing Year : JULY 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 156
  • Language : Translated From HINDI to MARATHI
  • Category : RELIGIOUS & SPIRITUALS
  • Available in Combos :OSHO COMBO SET - 33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHAT IS THE VALUE OF MEDITATION AND PRAYER IN DEVOTION? ASKS KABIR. MEDITATION AND PRAYER ARE TWO DIFFERENT ASPECTS. PRAYER SIGNIFIES THE FEELINGS WHILE MEDITATION SIGNIFIES THE MIND. PRAYER STARTS FROM THE BASE OF THE HEART. IT TAKES THE LOVE HIDDEN UNDERNEATH ON AN UNIVERSAL LEVEL. AT THAT MOMENT THE ME DIES WITHIN. MEDITATION STARTS FROM THE BRAIN. IT ALTOGETHER STOPS THE THINKING PROCESS. AS ONE GOES ON MEDITATING, PRAYER STARTS DISCLOSING AUTOMATICALLY AND AS THE PRAYER INCREASES, THE MEDITATION STARTS DISCLOSING. THEN, AT ONE PRECISE MOMENT THEY BOTH DISSOLVE INTO ONE ANOTHER. THIS IS DEVOTION. THIS BOOK INCLUDES THE INTERPRETATION OF KABIR WRITING BY OSHO. THIS WILL SURELY ANSWER MANY QUESTIONS IN THE MINDS OF DEVOTEES ON THE PATH OF DEVOTION.
कबीराच्या मते भक्तिसाधनेमध्ये ध्यान आणि प्रार्थनेचं काय स्थान आहे? ध्यान आणि प्रार्थना हे दोन वेगवेगळे मार्ग आहेत. प्रार्थना ही भावदशा आहे; तर ध्यान ही चित्तदशा आहे. प्रार्थनेचा प्रवास हृदयातून सुरू होतो. प्रार्थना हृदयातील प्रेमाला वैयक्तिक पातळीवरून वैश्विक पातळीवर नेते. तेव्हाच प्रार्थना करणारा `मी` संपून जातो. ध्यानाचा उगम मस्तकातून सुरू होतो. ध्यानाने मस्तकातील विचारच संपून जातात. जसजसे ध्यान वाढू लागते तसतशी प्रार्थना प्रकट होऊ लागते आणि जशीजशी प्रार्थना वाढू लागते तसतसे ध्यान प्रकट होऊ लागते. शेवटी असा क्षण येतो की, ध्यान आणि प्रार्थना एकमेकात विलीन होऊन जातात. याच अवस्थेला भक्ती म्हणतात. कबीरांच्या सुंदर आणि भावात्म दोह्यांचे हे ओशोंनी केलेले अत्यंत रसाळ विवेचन या पुस्तकात समाविष्ट केले आहे. भक्ती मार्गावर वाटचाल करणा-यांच्या मनातील प्रश्नांची सविस्तर उत्तरे या पुस्तकातून निश्चितच मिळतील.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"BANDAKHOR# BHAKTIT BHIJALA KABIR# EK EK PAUL# MAZE MAZYAPASHI KAHI NAHI #HA SHODH VEGALA# HASAT KHELAT DHYANADHARANA# MEERA EK VASANT AAHE # MEERA SHYAMRANGI RANGALI # MEERECHI MADHUSHALA # MEERECHYA PREMTIRTHAVAR # MHANE KABIR DIWANA # MI DHARMIKTA SHIKAVTO DHARM NAHI # MRUTUCHE AMARATVA # MRUTYAYUSHI # MRUTYU AMRUTACHE DWAR # MUGDHA KAHANI PREMACHI # NANAK NIRANKARI KAVI # NANAK PARMATMYACHA NAD OMKAR # NANAK SANSAARI SANYASTA # NANAK SUR SANGEET EK DHUN # SAD GHALTO KABIR # SAKSHATKARACHI DENGI # SHIVSUTRA-PART 1 # SHIVSUTRA-PART II-2 # SWATHACHA SHODH #VIDROHI ##मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% "
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 12-11-2006

    ओशोंच्या मुखातून कबीरवाणी!... ‘ओशो’ नाव घेतलं की भारतीय मनासमोर धर्माच्या विरोधात बंड करून उठलेली आणि स्वैराचाराला प्रोत्साहन देणारी व्यक्ती डोळ्यासमोर येते. अशी सर्रास धारणा असलेल्या व्यक्तींनी एकतर ओशोंचं साहित्य वाचलेलं नसतं किंवा त्याबद्दल ते वचलेल्यांकडून काही ऐकलेलंही नसतं. एक गॉसिप म्हणून ओशो बऱ्याचवेळा चघळले जातात. पण वस्तुस्थिती तर अशी आहे की, फ्रेडरिक नित्शे फ्रॉइड, रामकृष्ण, राजकारण, समाजकारण अशा सर्व विषयांवर अधिकारवाणीने मार्गदर्शन ओशोंनी केलंय. त्यांच्यावर धर्माच्या विपरित शिकवण केल्याचा आरोप केला जातो. तर त्यांच्याच भाषेत सांगायचं तर ‘मी धार्मिकता शिकवतो, धर्म नाही’ त्यामुळे अनेक संतांचे दाखले, त्यांचे विचार ओशो आपली धार्मिकता विषद करण्यासाठी मांडतात. दोह्यांमुळे आपल्याला माहिती असलेल्या कबीरांवर त्यांनी दिलेली व्याख्याने ‘मृत्यू अमृताचे द्वार’, ‘माझे माझ्यापाशी काही नाही’ आणि ‘भक्तीत भिजला कबीर’ या पुस्तकात संग्रहित करण्यात आली आहेत. ओशोंचा मुख्य विषय नेहमीप्रमाणेच परमेश्वर आणि मानव असा आहे. त्या ईश्वराला शोधण्यासाठी बाहेर नाही तर आत बघायला पाहिजे, हा उपदेश सर्वमान्य असला तरी सर्वसामान्यांच्या काही तो गळी उतरत नाही. पण कबिराच्या दोह्यांमध्ये नीट डोकावून बघितलं तर लक्षात येतं, परमेश्वर कसा आहे; तर तो जिथे हवा तिथे तसा आहे. आणि हे असं का आहे, हे ओशो मग अत्यंत रंजक अशा भाषेत पानापानात समजावत राहतात. या आशेने की, कधीतरी आपल्या मनातला अंधकार दूर होईल आणि या प्रचंड विश्वातल्या आपल्या आणि ईश्वराच्या बाबतीतल्या सत्य स्वरुपाचं आपल्याला ज्ञान होईल. साधारणपणे कुठलाही धार्मिक विषय हा रुक्ष असतो. एकदम कपाळावर भरपूर आठ्या घालून विश्वाचं ओझं आपल्याच डोक्यावर असल्यासारखी भावमुद्रा बुवांना आणि भक्तांना म्हणजे आपल्याला वागवावीच लागते. पण ओशोंच्या धार्मिकतेत मात्र निखळ विनोदाला स्थान आहे, समाजाच्या सबलीकरणाला स्थान आहे, शांततेला स्थान आहे, नृत्याला स्थान आहे. संगीताला स्थान आहे, थोडक्यात म्हणजे जीवनाला स्थान आहे. आणि जीवन आहे तर मृत्यूही आहे. या वास्तवाची जाणीव ज्यादिवशी खऱ्या अर्थी आपल्याला होते, त्यावेळी जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोनही बदलतो. मृत्यू आहे म्हणून जीवनाला काही अर्थ आहे. हे पटतं. मग कबीराचं ‘सारे जग ज्या मृत्यूला घाबरते त्याच मृत्यूने माझे मन आनंदित होते’ हे वचन आपल्याला आतल्या प्रवासाला जायला उद्युक्त करतं. लोकांनी आतल्या प्रवासाला सुरुवात करावी या उद्देशाने, धार्मिक बनावं या हेतूने असे हे कबीर आपल्याला ओशो या तीन पुस्तकांतून समजावून देतात. त्यामुळे अक्षरश: प्रत्येक व्यक्तीने ही पुस्तकं वाचणं ‘मस्ट’च आहे. -योगेश मेहेंदळे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more