* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BANJARYACHE GHAR
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663235
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2003
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 192
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :YASHODHARA KATKAR BIRTHDAY OFFER
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"A HOUSE, A DEFINITE FORM GIVEN TO SPACE BY MAN. HUMANS BUILT HOUSES ON EARTH AND STARTED RESIDING IN THEM. SINCE THEN, OUR DWELLING HAS HAD A SPECIAL PLACE IN OUR MINDS. THE STRONG RELATION BETWEEN A HOUSE AND A PERSON HAS EVER SINCE BEEN PRESENT STRENGTHENING IN EACH ERA. FOR THE SAKE OF PROTECTION, MAN FIRST BUILT A CLAY HOUSE. TO PROTECT THE SOUL, MAN CONSIDERED HIS BODY AS THE ABODE. SINCE THEN, THE SOUL HAS BEEN SUPPORTING THE BODY. THE HOUSE HAS ALWAYS HELPED TO SUSTAIN ON EARTH WHEREAS THE SOUL HAS HELPED TO REMAIN FIRM. WITHOUT HOUSE AND SOUL, A PERSON BECOMES HELPLESS. HENCE, A HUMAN MIND ALWAYS SEEKS A HOUSE AND THE SOUL. A HOUSE ENVELOPES US FROM WITHIN AND FROM OUTSIDE. HENCE A HOUSE HAS EXTREMELY IMPORTANT PLACE IN OUR LIFE. LIKEWISE, THE IMAGES OF HOUSE ARE VITAL FOR US, BE IT OUR PHYSICAL SURROUNDING OR OUR IMAGINARY WORLD. (AN EXCERPT FROM ‘GHARACHI ADIPRATIMA ANI NATSAMRAT MADHIL GHAR’-PROF. GANGADHAR PATIL; NATSAMRAT-SAMIKSHA-EDITED BY PROF. G. T. PATIL) "
घर हे मानवस्पर्शी अवकाशाचे एक रेखीव रूप. माणसाने पृथ्वीवर घर बांधले व तो घरात राहू लागला. तेव्हापासून हे राहते घर मानवी मनात `घर करून` राहू लागले. आणि त्याच क्षणी या घराचे आणि मनाचे अगदी पहिले नाते जुळले - आणि युगायुगातून ते वाढत राहिले. मानवाने आपल्या देहाच्या रक्षणासाठी मातीचे घर बांधले आणि आपल्या आत्म्या च्या निवासासाठी स्वतःच्या देहाचेच घर उभारले. या देहामन्दिरातच मानवी आत्म्याला पहिला निवास मिळाला. तेव्हापासून मानवी आत्मा माणसाला आधार देत आला आहे. या अनंत अवकाशाच्या पोकळीत घराणेच माणसाला आधार दिला. घराप्रमाणेच आत्मा हा माणसाला दुसरा आधार लाभला. घराशिवाय व आत्म्याशिवाय माणूस निराधार, परत्मा होईल. पोरका, एकाकी पडेल. म्हणूनच माणसाला जशी घराची एक मूलभूत ओढ असते. तशीच त्याला आपल्या आत्म्याची, स्वस्था ची पण मूलभूत ओढ असते. घर हे माणसाला आतून व बाहेरून ओढीत व वेढीत असते. म्हणून मानवाच्या भावस्रुष्टीत व प्रतीकस्रुष्टीत मनाला व आत्म्याला साकार करताना-या घराच्या आदिबंधरूप प्रतिमांना महत्वाचे स्थान आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #BANJARYACHEGHAR #BANJARYACHEGHAR #बंजाऱ्याचेघर #SHORTSTORIES #MARATHI #YASHODHARAKATKAR "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 09-01-2005

    यशोधरा भोसले यांचा ‘बंजाऱ्याचे घर’ हा ललित लेखसंग्रह विविध गुणांनी संपन्न आहे. प्रसिद्ध लेखिका माधवी देसाई यांच्या या कन्या. या संग्रहातील पाचही लेख यशोधरा भोसले यांचे वास्तव्य झालेल्या घरासंबंधीच्या आहेत. या लेखामध्ये स्मरणरंजन आहे. आत्मकथन आहे. त्यतून प्रकट होणारी मानसिकता खूप काही सोसून पचवलेल्या प्रगल्भ परिपक्वतेची आहे. घराशी निगडित असलेल्या त्या-त्या वेळच्या भाविश्वात घेऊन जाणारे हे लेख आहेत. आयुष्याच एकेका ठप्प्याशी रेंगाळणारे आहेत. त्या-त्या टप्प्यांवरील व्यक्तींवर लक्ष केंद्रित करणारे आहेत. लेखिकेचे हे पहिलेच पुस्तक असूनही लेखन, वर्णन, शैलीतील सहजता व सफाई लुब्ध करणारी आहे. एका स्त्रीमधून वेगळी दृष्टी या लेखांना लाभली आहे. अनेक रंग या घरांना आणि घरातल्या माणसांना लाभलेले आहेत. कलावंतांचे मन आणि नजर या लेखातील अगणित तपशीलातून दिसते. घराभोवतालच्या निसर्गाची चैतन्यशील रूपे नजरेसमोर येतात, तशीच एखाद्या चित्रकृतीची सौंदर्यस्थळेही सहजपणे शब्दरूप धारण करतात, ‘बंजाऱ्याचे घर’ मधील शेवटचे घर वगळता बाकीच्या सर्व घरांशी लेखिकेचा वैयक्तिक संबंध आल्यामुळे त्यातील तपशीलांना व्यापक संदर्भ लाभलेला आहे. चित्रतपस्वी, भालजी पेंढारकर (आजोबा), लीलाबाई पेंढारकर (आजी), माधवी देसाई-काटकर (आई), काटकर (वडील), मीरा तारळेकर (बहीण), रणजित देसाई (पितृतुल्य दादा), प्रभाकर पेंढारकर (मामा) आणि जाई (कन्या) या कुटुंबीयांसमवेत इतरही व्यक्तींचे उल्लेख येतात. पहिले घर आहे ते गावाकडचे पिढ्यान् पिढ्या पासूनचे शंभर वर्षंचे या घरात पूर्वजांच्या पिढ्या वर्षानुवर्षे वाढल्या. लेखिकेचे या घरात पाय ठेवताच सगळे ताण कमी होऊन जातात. चिडचिड् कमी होते. दुसरे घर भेटते ते माहेरचे गोव्यातले बांदोड्याचे. काटकरांशी लग्न करून गोव्यात आल्यावर येथील सुखासीन जीवनाला उबगलेल्या माधवीताई मुंबईसारख्या शहरात नशीब अजमावायला पतीसह गाव सोडतात. कल्याणजवळच्या मोहोन्याच्या कंपनीच्या क्वार्टरमध्ये चार खोल्यांत हौसेने घर सजवतात. परंतु काटकरांच्या मृत्यूनंतर आणि रणजित देसार्इंच्या कोवाडच्या घरातून बाहेर पडल्यावर, बेळगावमधल्या अल्प वास्तव्यानंतर आपल्या मूळ सासरच्या घरी गोमंतकात येण्याचा निर्णय माधवी घेतात आणि वर्षानुवर्षे बंद असलेल्या बांदोड्यातल्या देवळाच्या परिसरातल्या या घराला घरपण येते. तिसरे घर आहे ते कोवाडमधले रणजित देसाई यांचा खानदानी वाडा. काटकरांच्यानंतर रणजित देसाई लेखिकेचे वडील, गुरू, मित्र आणि मार्गदर्शकही बनतात. त्यांच्या बद्दलचे मनोभाव येथे संयतपणे प्रकट झाले आहेत. चौथे घर आहे ते चित्रकार रमेशच्या स्टुडिओमधले.’ ‘१२ ए-रेशम’ हा टेन परसेंट कोट्यातील फ्लॅट लेखिकेला मिळालेला असतो. या फ्लॅटमध्ये राहताना त्या घराचे आणि आपले सूर चांगले जुळून आल्याचे समाधान त्यांच्या लेखामधून व्यक्त होते. अशाप्रकारे एक प्रदीर्घ प्रवास या घरांद्वारे लेखिकेप्रमाणेच वाचकांनाही घडतो. -प्रा. शिवाजी पाटील ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 23-03-2003

    स्त्री मनाचा गुंता उकलणारं ललित लेखन... ‘घर’ या विषयाभोवती घुटमळणाऱ्या ललित लेखांचं पुस्तक आहे ‘बंजाऱ्याचे घर’. यशोधरा भोसलेंनी ते लिहिलं. पुस्तकात ‘घर’ विषयाची एक कथाही आहे. शेवटी ‘कुणी घर देता कां घर?’ असा टाहो फोडणाऱ्या नटसम्राटाची आंतरिक घालमेल ेऊन येणारं हे पुस्तक ‘घर’ या विषयाशी जोडलेल्या स्त्री मनाचा गुंताही उकलतं. व्हर्जिनिया वुल्फनी ‘ए रूम ऑफ वन्स ओन’ची कल्पना मांडली होती. पंजाबी कवयित्री अमृता प्रीतमनी तीच कल्पना ‘चौथा कमरा’ म्हणून स्पष्ट केली आहे. शांताबाई शेळकेंनी ‘चोली का अपना दामन’ म्हणून समाजाच्या आसमंतातील स्त्री मनाचा अवकाश वर्णिला होता. यशोधरा भोसले आजोळ, माहेर, सासर, मित्र अशी घरांची स्थित्यंतरं अनुभवतात. जीवनात कोसळलेलं आकाश पेलत यशोधरा भोसले आपलं आकाश, अंगण, आसमंत निर्माण करतात. जीवनातल्या प्रतिकूल क्षणी आपली असणारी माणसं जेव्हा दुरावतात तेव्हा दगडमातीची निर्जीव वाटणारी घरंच ऊब देतात. कधी काळी स्वत: बंजारा असलेला मुख्यमंत्री यशोधरा भोसलेंसारख्या निराधार परागंदा स्त्रीस मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून देतो तेव्हा ती आई-बाबांची पुण्याई म्हणूनच; पण या साऱ्या प्रवासात लेखिकेस सावरतात ती घरंच तेच तिचे खरे गणगोत. ‘बंजाऱ्याचे घर’ जीवनाच्या अवघड वळणावर स्त्रीस बळ देणाऱ्या घराच्या घरंदाजपणाची स्वगतंच होतं! घर बोलतंय की, लेखिका असा कधी कधी भ्रम पडावा अशा एकात्मिक लालित्याने लिहिलेले घरांसंबंधी ललित लेख वाचताना वाचकाला स्वत:चं घरदेखील मनी-मानसी बोलू-डोलू लागल्याच्या अपसूक भास होऊ लागतो. हे असतं यशोधरा भोसले यांच्या ललित नि संवेदी शैलीचं यश. पुस्तक वाचताना लेखिका कधी काळी उभारीच्या वयात इंग्रजीमय झाली होती. हे खरं नाही वाटत. साऱ्या घरांच्या वर्णनामागे एक अंधुक, अलिखित सूत्र जाणवतं. जागतिकीकरणाच्या कचाट्यात सापडलेल्या घरानं मनुष्यपण मारलं, हवा, पाणी, परिसर, विद्रूप, विरूप होऊ लागलेला आहे. अशा स्थितीत घराचं घरपण आपण जपलं-जोपासलं तरच सुख-समृद्धी, स्वास्थ्य, संस्कार, संस्कृतीचं पंचशील सुरक्षित राहणार हे समजविणारे हे ललित लेख! सुंदर तितकेच सामाजिक भान देणारे!! ‘बंजाऱ्याचे घर’ लेखिकेनी ऋणमोचन भावनेनं केलेलं लेखन आहे. त्यात कृतज्ञता आहे तशी कणवही. गावाकडचं घर पहिल्या भेटीतच आपलं होतं. कौलारू, कृष्णवेलींनी वेढलेलं. आजीच्या मायेनं मंतरलेलं हे मातृधर्मी घर. म्हणूनच लेखिकेला त्याचं कोण अप्रूप? घर आपलं असलं की, यायला निमित्त नाही लागत. ते नित्यनेमाने आपणाकडे आपल्या माणसांना ओढत राहतं. जंगलाच्या कुशीत दडलेलं हे घर. या घरातली माणसं पण घरासारखीच आतून-बाहेरून एक. साकाळलेलं आयुष्य मोकळं करणारं हे घर लेखिकेला म्हणून तर आप्त, स्वकीय, आत्मीय वाटत. राहतं मावशी, रखवालदार भीम, त्याची मुलं सारी कशी स्वभाव गर्द, मनानं हिरवी स्वभावानं गुलमोहर, बोगनच्या फुलासारखी जर्द! दुसरं घर लेखिकेचं गोव्यातलं आजोळ, बांदोड्याचं सभामंडप, नगारखाना, आगरशाळा, असं ऐसपैस चौसोपी. महालक्ष्मी मंदिराच्या ओवऱ्यांनी वेढलेलं, भट-भिक्षुकांच्या घरांनी घेरलेलं. चिऱ्यांचा गडगा, पाण्याचं तळं... लेखिका घर सजीव करते ती शब्द वर्णनांनी नाही, तर आठवणींच्या शिंपणांनी, पोर्तुगीजी थाटाचं हे घर अगडबंब कुलूप-किल्लीनी; पण प्राचीन असल्याच्या खुणा उठवतं. उतरती कौलं, अर्धगोल महिरपी दरवाजे, खिडक्या, देवळी, दगडं साऱ्यांनी हे घर आपणास केव्हा भूतकाळात घेऊन जातं ते कळलं नाही. खेड्यातलं असलं तर खानदानी कोंदणात वसलेलं नि म्हणून लोभसही! कोवाडचं घर तिसरं. स्वामीकार रणजित देसार्इंचं, हे बांदोड्यासारखच खानदानी घर; पण याची चेहरेपट्टी वेगळी नाही म्हणून तरी कर्नाटकी मुलखाच्या सीमेवर वसलेलं. या घरानं लेखिकेचं हरवलेलं मराठीपण बहाल केलं. भाषा, साहित्य, कलेचे संस्कारांनी भरलेलं घर. पायाखालची वाळू सरकलेल्या भुसभुशीत दिवसात मायमराठीबरोबर याच घरानी सुप्त कलेचे धुमारे फुलवले. आपल्या रणजितदादांचं तुटलेपण लेखिकेनं अनुभवलं ते हेच घर. साऱ्या विस्कटलेल्या आयुष्याचे धागेदोरे जोडणारे हे घर; पण कसं सुन्न ...मौन ...‘यार की कोई खबर लाता नही’ असं काव्यात्मक, भावस्पर्शी शीर्षक देऊन यशोधरा भोसले यांनी एका उद्ध्वस्त जीवनाची अबोल करुण कहाणीच पेश केली आहे. ‘कोलाज हे चौथं घर. कोलाज ही एक चित्रशैली. आपल्या ठिगळ जोडीच्या आयुष्यात भेटलेल्या चित्रकार मित्राचं हे घर. मुकुंदनगर, चेंबूर, मुंबईचा परिसर ज्यांना माहिती आहे त्यांना कोलाज वाचताना लेखिकेच्या निरीक्षण नि:शब्द सामर्थ्याची कल्पना यावी. ‘बंजाऱ्याचे घर’ पुस्तक म्हणजे चित्रशैलीचा सुंदर नमुना. या पुस्तकाचं सारं सौंदर्य शैलीत सामावलंय. पत्ता हरवलेल्या घराआधीचं ‘१२-ए रेशम’ हे घर महानगरातील फ्लॅट संस्कृतीचं व्यवच्छेदक रूप. पैसा, प्रतिष्ठा सर्वत्र असलेल्या महानगरात मुख्यमंत्री मोठा की बिल्डर? मुख्यमंत्री कोट्यातील घर मिळवण्याचं दिव्य पार केल्यानंतर मिळालेलं हे घर लेखिकेला आपली जागा, आपलं जग मिळवून देत. या पुस्तकातील प्रत्येक लेखास लाभलेली सूचक, समर्पक, शीर्षकं या पुस्तकाचं आगळं वैशिष्ट्य. या प्रत्येक कथात्मक लेखाच्या सुरुवातीस व शेवटी मनोज आचार्य यांची रेखाटनं पुस्तकास बोलकी करतात. पुस्तकाच्या मुखपृष्ठात हिरवे, निळे, पिवळे जर्द रंग ओतून निसर्गाचं गहिरंपण चित्रकारांनी असं चित्रित केलंय की, त्या घरांची ओढ वाचकांना दाटून आल्याशिवाय राहत नाही. ‘बंजाऱ्याचे घर’मधील ‘पत्ता हरवलेलं घर’ ही एक स्वतंत्र कथा आहे. कथेची विषयक पार्श्वभूमी घर असली तरी दोन पुरुषांमधील वैशिक संबंधांची ही कथा. एक गंभीर विषय पेलणारी कहाणी. कथात्मक ललित लेखांबरोबर देणं औचित्यपूर्ण खचितच नाही. लेखिकेनं संग्रहभर कथा होईपर्यंत या कथेसाठी थांबायला हवं होतं. हे पुस्तक सदरचा अपवाद वगळता समाज व व्यक्तीसंबंधांची ललित अंगांनी केलेली मांडणी असली, तरी त्यामागची सल सतत वाचकास अस्वस्थ करत राहते. ...Read more

  • Rating StarJyotsna Aphale

    हे पुस्तक वाचले आहे अप्रतिम

  • Rating StarSharmila Phadke

    माझं अत्यंत आवडीचं पुस्तक

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more