* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GRAYSON
  • Availability : Available
  • Translators : VIDULA TOKEKAR
  • ISBN : 9788184980004
  • Edition : 2
  • Publishing Year : MARCH 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 104
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"IT WAS THE DARK OF EARLY MORNING; LYNNE WAS IN 55-DEGREE WATER AS SMOOTH AS BLACK ICE, TWO HUNDRED YARDS OFFSHORE, OUTSIDE THE WAVE BREAK. SHE WAS SWIMMING HER LAST HALF-MILE BACK TO THE PIER BEFORE HEADING HOME FOR BREAKFAST WHEN SHE BECAME AWARE THAT SOMETHING WAS SWIMMING WITH HER. THE OCEAN WAS CHARGED WITH ENERGY AS IF A SQUALL WAS MOVING IN; THOUSANDS OF BABY ANCHOVY DARTED THROUGH THE WATER LIKE LIT SPARKLERS, TRYING TO EVADE SOMETHING LARGER. WHATEVER IT WAS, IT FELT LARGE ENOUGH TO BE A WHITE SHARK COURSING BENEATH HER BODY. IT WASN’T A SHARK. IT BECAME CLEAR THAT IT WAS A BABY GRAY WHALE—FOLLOWING ALONGSIDE LYNNE FOR A MILE OR SO. LYNNE HAD BEEN SWIMMING FOR MORE THAN AN HOUR; SHE NEEDED TO GET OUT OF THE WATER TO REST, BUT SHE REALIZED THAT IF SHE DID, THE YOUNG CALF WOULD FOLLOW HER ONTO SHORE AND DIE FROM COLLAPSED LUNGS. THE BABY WHALE—EIGHTEEN FEET LONG!—WAS MIGRATING ON A THREE-MONTH TREK TO ITS FEEDING GROUNDS IN THE BERING SEA, AN EIGHT-THOUSAND-MILE JOURNEY. IT WOULD HAVE TO BE CARRIED ON ITS MOTHER’S BACK FOR MUCH OF THAT DISTANCE, AND WAS DEPENDENT ON ITS MOTHER’S MILK FOR FOOD—BABY WHALES DRINK UP TO FIFTY GALLONS OF MILK A DAY. IF LYNNE DIDN’T FIND THE MOTHER WHALE, THE BABY WOULD SUFFER FROM DEHYDRATION AND STARVE TO DEATH. SOMETHING SO ENORMOUS—THE MOTHER WHALE WAS FIFTY FEET LONG—SUDDENLY SEEMED VERY SMALL IN THE VAST PACIFIC OCEAN. HOW COULD LYNNE POSSIBLY FIND HER? THIS IS THE STORY—PART MYSTERY, PART MAGICAL TALE—OF WHAT HAPPENED . . . "
"पहाटेचा अंधार होता. काळ्या, बर्फासारख्या गुळगुळीत आणि पंचावन्न डिग्री तपमानाच्या पाण्यात लिन होती. वादळ येण्यापूर्वी असतो तसा समुद्र ऊर्जेनं भारला गेला होता. तिला जाणीव झाली, की आपल्याबरोबर कुणीतरी पोहत आहे. कुणातरी ’मोठ्या’पासून वाचण्यासाठी अँकोव्हीची हजारो पिल्लं ठिणग्यांसारखी सैरावैरा उडत होती. ते जे काही होतं, ते तिला पांढर्‍या शार्कइतकं मोठं वाटत होतं... ...तो शार्क नव्हता, तर मैलभरापासून लिनच्या मागं येणारं एक देवमाशाचं पिल्लू होतं. लिन एक तासापेक्षा जास्त वेळ पोहत होती आणि विश्रांतीसाठी तिला पाण्यातून बाहेर येण्याची गरज होती. पण तिच्या लक्षात आलं, की तिनं जर तसं केलं तर ते पिल्लूही तिच्या मागोमाग येईल आणि फुप्फुसं फुटून मरून जाईल. देवमाशाचा बच्चा बेरिंग समुद्राकडे जाणार्‍या अठरा हजार मैलांच्या, तीन महिने चालणार्‍या स्थलांतराच्या सफरीवर होता. त्यातलं बरंचसं अंतर त्याची आई त्याला पाठीवरून नेणार होती आणि दुधासाठी तो आईवर अवलंबून होता. लिननं जर आई देवमाशाला शोधून काढलं नसतं, तर या पिल्लाच्या शरीरातील पाणी कमी झालं आणि उपासमारीनं तो मृत्युमुखी पडला असता. एवढा प्रचंड आई देवमासा अचानक त्या अफाट महासागरात किरकोळ वाटू लागला. लिन तिला कशी शोधू शकणार होती? सत्यघटनेवर आधारित... "
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #BALMASA #GRAYSON #बाळमासा #BIOGRAPHY&TRUESTORIES #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VIDULATOKEKAR #LYNNECOX "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more