* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BHOGALE JE DUKHA TYALA...
  • Availability : Available
  • ISBN : 9788177669510
  • Edition : 4
  • Publishing Year : MARCH 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 296
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MY EXISTENCE WAS DENIED NOT AFTER I WAS BORN, ON THE CONTRARY IT WAS DENIED BEFORE I WAS BORN. I WAS NEGLECTED THROUGHOUT. I WAS CURSED WITH MANY WORDS, OFTEN, ALWAYS. I WAS HOLD RESPONSIBLE FOR THE THINGS WHICH I HAD NOT DONE, IN WHICH I WAS NOT INVOLVED IN ANY WAY. MY OWN MOTHER WAS THE ONE WHO HARASSED ME; SHE NEVER TOOK PITY OF MY TEARS, MY PLEADINGS. SHE TRAMPLED MY HOPES, FEELINGS, RIGHTS, PRIVILEGE; WHATEVER SHE COULD AND TOOK A PRIDE IN THAT. FOR HER, MY LIFE WAS NOT A LIFE, IT WAS A THING, WHICH SHE COULD USE AS AND HOW SHE WISHED, AND SHE PRACTICED IT, ALWAYS. SHE EVEN PLEDGED ME FOR HER HAPPINESS, FOR HER SATISFACTION. MY LIFE WAS ACTUALLY PLEDGED IN HER HANDS. I REALISED MY SLAVERY, STRONGLY. I WANTED TO COME OUT OF IT; FOREVER. I KEPT ON ENCOURAGING MYSELF, `ASHA, YOU HAVE TO COME OUT OF THIS, NOW OR NEVER. DO NOT LET THE LIFE FLICKER OUT OF YOU, COME ON, STRIVE, STRUGGLE, SET YOURSELF FREE.`
माझ्या जन्मापासून नाही तर माझ्या जन्माअगोदरही माझ्या अस्तित्वावर नकारात्मक शब्दांचे आसूड ओढले गेले. पांढऱ्या पायाची, अपशकुनी, काळी, कुरूप, काळ्या जिभेची अशी कितीतरी अभद्र लेबलं मला लावली गेली. अनेक घटनांना, परिस्थितीला मलाच जबाबदार धरून माझा छळ केला. जन्मदात्री आई असूनही माझ्या आसवांनी तिचं हृदय कधीही हेलावलं नाही. माझी प्रत्येक आशा, आकांक्षा, भावना, हक्क, अधिकार आपल्या टाचेखाली ती तुडवत आली. माझं अख्खं आयुष्य जणू तिनं आपल्यासाठी एक वस्तू मानली. केवळ एक वस्तू, जी गहाण ठेवून त्यावर कर्ज काढता येतं. स्वत:साठी, स्वत:च्या गरजपूर्तीसाठी. मा नं माझं आयुष्य आपल्याकडं गहाण ठेवलं. मला माझ्या गुलामीची प्रखरतेनं जाणीव झाली. यातून आपण सुटायला हवं, नव्हे सुटका करून घ्यायला हवी. ‘घाबरू नकोस. कितीही वादळ होऊ दे, विझू देऊ नकोस त्या आशेच्या पणतीला. आत्ता हरलीस तर मग पुढं कधीच नाही. कधीही नाही.’ मी स्वत:ला पुनःपुन्हा बजावत होते. स्वत:च स्वत:ला धीर देत होते.
* महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे कीर्तनसंजीवनी डॉ. पुष्पलता रानडे पुरस्कृत `लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार` २००८ * गाडगीळ भगिनीतर्फे दिल्या जाणाऱ्या `मातृ पितृ` पुरस्कारांतर्गत कै. काकासाहेब गाडगीळ पुरस्कार * भैरू रतन दमाणी पुरस्कार २००९ * महाराष्ट्र राज्य पुरस्कार-यशवंतराव चव्हाण पुरस्कार- २००८-२००९ * साहित्यप्रेमी भगिनी मंडळ , पुणे तर्फे `सुधाताई जोशी जी.ए.` पुरस्कार २००९ * जागतिक महिला दिनानिमित्त उल्लेखनीय कार्याबद्दल आशा आपराद यांस २०१० सालचा `हॉटेल व्हिक्टर पॅलेस पुरस्कार` कोल्हापूर *आर्य महिला समाज तर्फे काशीबाई नवरंगे पुरस्कार २०१०
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #भोगलेजेदु:खत्याला… #आशाआपराद #ASHAAPARAD #BHOGALEJEDUKHA TYALA… #AUTOBIOGRAPHY
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    मूर्तिमंत जिद्द उभी!... कुरूप, अपशकुनी, पांढऱ्या पायांची, पालीच्या तोंडाची, दळभद्री, रडकी, तुटक्या चपलेच्या तोंडाची. टांग्याच्या टपासारखी मरतुकडी, बिसरी, बेअकली अशी काही विशेषणे घेऊन मुस्लीम समाजातल्या एका मुलीनं आपलं आयुष्य गळ्यातल्या ओढण्यासारखं अेक वर्षे वाहून नेलं. तिच्या ठेचकाळलेल्या जीवनाच्या पूर्वार्धात ना आनंदाचे क्षण आले. ना शरीर वा मनाला विश्रांती लाभली. शिक्षणाला बंदी. त्यातच मन वा शरीराची कोणतीही तयारी नसताना लग्न करून दिलेलं आणि वयाच्या वीस वर्षांच्या आतच पदरात चार मुली. या मुलीनं उभारी तरी धरायची कोणाच्या आधारानं. कारण त्या मुलीवर हा अन्याय कोणी शत्रू, शेजारी, सावत्र आई वा परके नातेवाईक करीत नव्हते, तर खुद्द तिच्या सख्ख्या आईनंच तिचं आयुष्याच आपल्याकडं ‘गहाण’ ठेवलं होतं. तिच्या ‘व्यक्तिमत्त्वा’चा जणू ‘बोन्साय’च करून टाकला होता. त्या मुलीनं वडिलांकडे मदतीसाठी बघावं तर आईनं त्यांचाही पालापाचोळा केलेला. सतत कानांवर पडणाऱ्या तू कुरूप, अपशकुनी आणि पांढऱ्या पायांची अशा शब्दांनी ती घायाळ होत होती. असले टोमणे आई अन्य मुलींना न मारता आपला व वडिलांचाच पाणउतारा का करते या प्रश्नाचा भुंगा पुढे आयुष्यभर काही सोडवता आला नाही. पण एक टप्पा असा येतो की, गुलामीची तिला जाणीव होते, ती शिकते, नोकरी करते. अपमानाचे असंख्य प्रसंग येतात. पण सर्व जबाबदाऱ्या कुशलतेनं पार पाडते... तिच्या मुलींनाही शिक्षाणात गोडी असते आणि तिची सारी स्वप्ने त्या पूर्ण करतात... ज्या आईनं तिचं आयुष्य नकोसं मानलं. त्या आईला तिनं स्वत:च्या घरातून ‘हद्दपार’ केलं असलं तरी देखभाल करण्यात ती कुचराई करीत नाही. तीच आई नंतर लोकांना सांगू लागली, ‘मेरी बडी बेटी पोपेसर हाय. उन्हेच सब मेरा देखतिया.’ खरंच कोण होती ही मुलगी? स्वत्त्वाची जाणीव होताच आपली ‘स्पेस’ तयार करणारी ही मुलगी होती तरी कोण? आशा आपराद हीच ती मुलगी. आता आयुष्याचं अर्धशतक पार केलेल्या आशानं जीवनाचे अनेक रंग अनुभवलेत. त्या अनुभवानं कधी ती थरारली. उद्ध्वस्त झाली संघर्षमय कालखंडाचा हा पट तिनं गहिरेपणानं मांडलाय. संवेदनशील वडील आणि असंवेदनशील आईच्या पोटी जन्मलेली ही आशा वडिलांची आवडती; पण आईची तितकीच नावडती. आशा म्हणते, ‘आईला वस्तू गहाण ठेवून गरज भागविण्याची सवय. तिनं कधी भांडी, दागिने, वडिलांचा लग्नातला जरीचा पटका, कधी मंगळसूत्रही गहाण ठेवलं. तिनं गहाण ठेवलेल्या वस्तू मी सोडवत आले. मला आईपाशी ‘गहाण’ ठेवलेलं आयुष्यही सोडवून घ्यावं लागलं. वडील असेतो आशा शिकत गेली आणि ती नववीत असताना तिचे प्राणप्रिय ‘भई’ मरण पावले. त्याच क्षणी आई पाटी-दप्तर फेकून देऊन तिचं शिक्षणच संपूवन संसाराला जुंपते. ऐन लग्नात सासरच्या मंडळींशी भांडते आणि आशा नवऱ्यासह आईकडेच राहायला लागते. वस्ताद आई त्यांचंही पोतेरं करते. आशाची सारी स्वप्ने आईच्या काळजाच्या दगडावर चक्काचूर होत जातात. धर्म, रूढी, परंपरा दहशत आणि दरारा अशा अनेक दगडांच्या तुरुंगात ती चिणून जाते; पण सभोवतालची चार चांगली माणसं मदतीला धावतात आणि आशाची जडणघडण होते... तिची प्रेरणा घेऊन तिच्या चारही मुली स्वत:च्या पायांवर उभ्या राहतात. नवरेही समजूतदार मिळतात आणि आयुष्याच्या उताराच्या वळणावर तीच आशा त्याच अबोल आणि समजून घेतलेल्या नवऱ्याच्या साथीनं स्वत:च्या गाडी-बंगल्यासह राहते आहे... अलौकिक नात्यानं भोवतालच्या समाजानं जे प्रेम आणि साथ दिली त्या स्नेहसंबंधाचं प्रतीकही पुस्तकातून उमटत राहतं... ही लोकं तरी कोण होती? तिचे शिक्षक, गल्लीतले लोक, कॉलेजातले गुरुवर्य, आधारवड बनलेल्या प्राचार्या लीला पाटील. दलितमित्र बापूसाहेब पाटील. दलितमित्र बापूसाहेब पाटील, रवींद्र सबनीस, अनेक संस्था, महिला दक्षता समिती आणि असंख्य मायेची माणसं. ती ज्या हिंदू गल्लीत जन्मली आणि वाढली तेथल्या संस्काराने ती कवेळ मुस्लीम न राहता भारतीय मुस्लीम बनली. जाती आणि धर्मभेदाच्या पलीकडच्या समाजाच्या प्रेमातून पुढे जाण्याची प्रेरणा मिळत गेली... पण त्यासाठी जन्म ते नंतरची पंचवीस वर्षे अक्षरश: नकारात्मक शब्दांचे आसूड आणि अभद्र लेबलं सोसावी लागली. त्या लेबलातून वाट काढण्यासाठी जी धडपड झाली त्या धडपडीची कहाणी म्हणजे ‘भोगले जे दु:ख त्याला... हे पुस्तक. १४ एप्रिल १९५२ रोजी मुस्लीम कुटुंबात कोल्हापुरात आशाचा जन्म झाला. वडील इस्माईल देसाई त्याकाळच्या इंग्रजी विषयातले एम. ए. व इतर भाषांचे जाणकार. इंग्रजांकडे ते दुभाषा आणि खजिनदार म्हणून काम पाहत. स्वातंत्र्यानंतर इंग्रज परतले आणि इकडे नोकरी-जमीन सारेच गेले. मित्राची जामिनकी अंगावर येऊन प्रेसचा व्यवहार संकटाचा ठरला. गांधी हत्येनंतरच्या कोल्हापुरातल्या दंगलीत सायकलीचं दुकानही लुटलं गेलं. आशाची आई पन्हाळ्याची. तिचे वडील तलाठी. घरात आबादी. सोनं-नाणं भरपूर. सर्व्हिस मोटारीच्या धंद्यातल्या भागीदारीसाठी अम्माचे सगळे दागिने सादोबा मुलावरच्या चुलत भावाकडं दिले जातात आणि शिकारीच्या दौऱ्यावर आईच्या वडिलांचा हृदयविकारानं मृत्यू होतो. नातलग हुसकावून लावतात आणि पहिल्यांदाच ती घरकामासाठी म्हणून घराबाहेर पडते. पुढली तीस वर्षे वडलांच्या श्रीमंतीचा विषय निघाला की, ‘क्या जलाने की उनकी शिरमंती, बडेजावी? बडा घर, पैसा, दागिना हामना क्या मिला?’ अशी ती उपेक्षा करीत राहिली. नवऱ्यावरचा राग मुलीवर काढीत राहिली. आशाचे वडील भई मेहता कंपनीत नोकरीला लागले असले तरी पैसा पुरायचा नाही. भई कविमनाचे तर आई ‘की गे कुत्ते’ असं म्हणून बोलणारी, ‘आगे ए छिनाल इधर आ’ असा ओरडा तर दिवसातून हजारवेळा होई. कोणाकडून आणा घेतला म्हणून तापलेलं उलथनं तळहातावर चर्रकन ओढण्याचीही तिनं तमा बाळगली नव्हती. आठव्या वर्षीच सकाळी लवकर उठून असंख्य कामं मागं लागलेली. थोडा कंटाळा केला की, ‘क्या गे चिपलककी मूँ की’ अशी शेरेबाजी. कामानं थकायला व्हायचं. कधी ताप यायचा, गालगुंडही होत असे, पण आईनं हात लावून कधी विचारपूसही केली नाही. एकदा तर चुलीच्या कोपऱ्यातले जळणाचं लाकूड तिने दोनही पायांवर इतक्या जोरात मारलं की, ती कुत्र्यासारखी केकाटत घराबाहेर पळाली. कधी घरात मटणरस्सा असला तरी भईच्या ताटात मात्र डाळ-आमटीच. अचानक भई आजारी पडून मरण पावतात आणि त्याबाबत आशा म्हणते, ‘आईकडून होणारी उपेक्षा, छळ ते बघत, सोसत आले होते. ते मुकाट राहत. भर्इंनी प्रेम निर्माण केलं, तर आईनं निर्माण केली दहशत. भीती.’ पंधरा दिवसांनी आशा शाळेत निघाली तर आईनं दप्तर ओढलं आणि फेकून देताना ती म्हणाली, ‘चुल्हे में चाल तेरी साळा.’ भर्इंची इच्छा होती. आशानं बॅरिस्टर व्हावं, पण आता शज्ञळा सुटली, शाळेत निबंध स्पर्धेच्या बक्षिसांचा चषक मिळाला तर आईने तो रस्त्यावर फेकून दिला. चेपलेला तो चषक नंतर पेटते कोळसे घालून धूप म्हणून वापरला. आईनं आशाचं लग्न लावून दिलं तो दिवस अमावस्येचा. लग्नानंतर नवऱ्याबरोबर ही सिनेमा पाहायला गेली तर आल्यावर नवऱ्यासकट तिची कबख्तीच निघाली. पाच बहिणींना स्वातंत्र्य होतं, नव्हतं फक्त आशालाच. कारण तिच्यादृष्टीनं आशा म्हणजे अपशकुनी. पहिले गरोदरपण, कावीळ, अशक्तपणा आणि दिवसभर कानांवर पडणारे ‘ए टांगे के टप के मूँह की’ असले शब्द. बाळंतपणात तर बघालाही कोणीच नाही आणि अशी चार बाळंतपणं. दवाखान्यात कोणी न्यायचं नाही वा बाळंतपणानंतर कोणी भेटायला गेलेलं आईलाही आवडायचं नाही. एकटीनं खुरडत खुरडत घरी यायचं, चारही बाळंतपणाच्या काळातल्या ज्या आपत्तीचं वर्णन आशा आपराद यांनी पुस्तकात केलं आहेत ते पुढं पुढं वाचवत नाही. कधी विजेचा शॉक बसतो. कधी नाहक चोरीचा आळ घेतला जाऊनही नवरा तिची चौकशीही करीत नाही. बहिणींच्या लग्नात भांडी घासायची पाळी आशावर आली. थांबलेले शिक्षण पुन्हा सुरू करण्याचे आशा ठरविते तेव्हा माने केलेला घरातला दंगा अभूतपूर्वच; पण सारा जाच आणि त्रास सोसून आशा शिक्षणाला उभी राहते हा तिच्या आयुष्यातला पहिला निर्धार असतो आणि हेच वेगळे वळण ठरते. या पुस्तकात हादरवून सोडणारे अनेक प्रसंग आहेत. करुणा वाटते तसे प्रेमाचे उमाळेही येतात. आत्मकथेत असंख्य व्यक्तिरेखा आहेत. त्या इतक्या ठसठशीत आहेत की, त्यांच्या वर्तनातूनही आशाचं व्यक्तिमत्व काही अंशी उलगडत जातं. यातली हिंदी भाषाही वेगळीच आहे. याआधी मराठी मुस्लिमांची आत्मकथनं मराठीत आली असली तरी हे आत्मकथन त्यातल्या अनुभवानं वेगळं ठरतं. ...Read more

  • Rating Star LOKSATTA 4-1-2009

    आशा आपराद यांचे आत्मचरित्र `भोगले जे दु:ख त्याला...` हे अनेक अर्थांनी वाचनीय आहे. मनोगतातच त्या म्हणतात की, हे एका सामान्य स्त्रीचे आत्मचरित्र आहे. पुस्तक वाचताना मनात आले की कदाचित म्हणूनच ते वेगळे व सच्चे झाले आहे. म्हणजे प्रसिद्ध व्यक्तींना आत्मचरत्र लिहिताना अनेकदा स्वत:च्या वागण्याचे समर्थन द्यावेसे वाटते किंवा आजूबाजूच्या व्यक्ती दुखावल्या जाण्याचे भय वाटते. आपराद यांच्या आजूबाजूला कुणीही प्रसिद्ध व्यक्ती - तशा लीलाताई पाटील आहेत - नाहीत. त्यामुळे मनमोकळेपणाने जसे घडले तसे त्या सांगत गेल्या. त्यांच्या आईचा स्वकेंद्री व अकल्पनीय स्वभाव, त्यामुळे त्यांची झालेली घुसमट, वडिलांचा लवकर झालेला मृत्यू परंतु मृत्यूपूर्वीच त्यांनी आशावर केलेले संस्कार यांचे चित्रण मनाला भिडेल असे झाले आहेच; परंतु सुशिक्षित वडिलांच्या प्रेमामुळे व जवळिकीमुळे त्यांच्यात असलेली शिक्षणाची जिद्द व त्यामुळे तेराव्या वर्षी आईने जबरदस्तीने लावलेल्या लग्नानंतर पाठोपाठच्या चार मुलींना जन्म देऊन मग परत शिक्षणाला सुरवात करून प्राध्यापकीपर्यंत मारलेली मजल थक्क करणारी आहेच, परंतु हे सर्व करत असताना त्यांच्या आजूबाजूच्या समाजाचे जे चित्रण आहे ते विलोभनीय आहे. लेखिकेचा समाज म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातील मुस्लिम समाज. हा समाज बरीच जमीन बाळगून असणारा खेडवळ समाजही आहे व अशिक्षितपणामुळे गरिबी आलेली कुटुंबेही आहेत. तिचे कुटुंब गरिबी प्राप्त झालेले आहे. परंतु आजोळ हे दरगाहची सेवा करणारे `मुजावर` कुटुंब. दरवर्षीच्या ऊरुसाचे वर्णन वाचताना प्रत्येक ठिकाणाच्या संस्कृतीमुळे विकसित झालेली संमिश्र (कंपोझिट कल्चर) संस्कृती काय असते त्याचा पट आपल्यापुढे उलगडला जातो. उरुसाच्या आधी सर्व मुजावरांनी `संदल` चंदनाचे दाट गंध उगाळून हांडे भरावयाचे - पीराला ते माखायचे. पहिल्या दिवशी सवाष्णींनी शाकाहारी जेवण करून नैवेद्य दाखवायचा. दुसऱ्या दिवशी बकरा कापला तरी इतर जेवण म्हणजे मसालेभात, धपाटे, वाटाण्याची उसळ इत्यादी. पापड - कुरड्या, ओटी भरणे वगैरे गोष्टींचे वर्णन वाचताना गंमत वाटते. त्यांची मुसलमानी भाषाही अशीच, `आशा आटप जल्दी. आज दस्तगीर, तू,मैं, छोऱ्या जंजीर देखने जइंगे, लई भारी पिक्चर हाय, उसमें का एक गाना मुजे लई पसंत आया देक...` त्यांचे शेजारी पाजारी हिंदू अठरापगड जातीचे. त्यांच्याबरोबर लेखिकेवर गौरी-गणपती, हादगा, यांचे संस्कार झालेले. मदतीला हेच शेजारी. त्यांच्याबरोबर भावा-बहिणीचे मनापासून निभावलेले नाते हा खरा आपला समाज. याच समाजातील काही नातेवाईक, शुद्ध शाकाहारी, खुद्द लेखिकेचा नवरा शाकाहारी त्यामुळे त्यांची तब्बेत सुदृढ. हे सर्व सहज. यातलाच एक दीर धर्माची टिंगल उडवणारा तर एक अचानक नमाजी बनलेला. इतके वैविध्य, मान्यता धर्माचा लवचिकपणा याचे मनोरम चित्रण या आधी वाचलेले आठवत नाही. एक स्त्री शिकली की सारे कुटुंब शिकू लागते हे आशा आपराद यांच्याकडे बघून पटते. त्यांच्या शिक्षणाच्या धडपडीला प्रचंड विरोध करणारे नातेवाईक पुढे आपल्या मुलांना शाळेत घातल्यावर त्यांचे उदाहरण देऊन `आशा भाभी कैसे कष्ट में शिखे, तुमना अब्यास करनं क्या जान जातिया क्ता?` म्हणून त्यांना (मुलींनाही) शिकण्यासाठी उत्तेजन दिले. त्यांच्या चारही मुली शिकल्याच, परंतु त्यांच्या बहिणीचीही काही मुलेही उच्च शिक्षणाकडे त्यांच्या उदाहरणावरुन वळली. आशाताई अभ्यास करत असतानाच आजूबाजूच्या शेतमजूर स्त्रियांशी जिव्हाळ्याचा संबंध प्रस्थापित केला. या स्त्रियांना बचत करायला शिकवून जोडधंदा करायला मदत करून त्यांना आत्मनिर्भर केले. याच स्वभावामुळे कॉलेजमधील विद्यार्थी व नंतर कोल्हापुरातील सामाजिक कामाशी त्यांनी स्वत:ला जोडून घेतले. आजही त्या स्वाधारसारख्या संस्थांत काम करत आहेत. लेखिकेने स्वत:च्या लोकांकडून उभे केलेले अडथळे पार करत स्वत:च्या प्रगतीचा प्रवास केला. असा प्रवास आजवर अनेकांनी केला आहे.परंतु एक मुस्लिम स्त्री म्हणून समाजाने त्यांच्या मार्गात जे अडथळे आणले त्यामुळे विचार आला की सर्वसामान्य लोक स्वभावाने एकमेकांशी वागत असतात. हीच आपली संस्कृती आहे. परंतु स्वत:ला धर्माचे ठेकेदार समजणारे समाजात तेढ निर्माण करतात. हा समाज जो सहजतेने आपला धर्मधारयते इति धर्म - निभवत असतो त्याला कृत्रिमतेने - उर्दूत शिक्षण, पोशाख वगैरे जगायला लावतात. लेखिकेची आई व इतर स्त्रिया नऊवारी नेसत होत्या, मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या , पाटल्या घालणे महत्त्वाचे मानत होत्या. त्यांना अलगतावादाचे धडे देऊन व हिंदूंनी त्यांच्यावर आक्रमकपणे बोलण्याने गटाने राहण्याची गरज वाटून, आपणच आपल्या समाजाच्या एकसंधपणाच्या वैविध्याच्या चिरफळ्या करत आहोत का? असो. पश्चिम महाराष्ट्रातील मुसलमान समाजाच्या जगण्याचे, त्यांच्या प्रश्नाचे व त्यावरील काही मार्गाचे लोभस चित्रण आल्याने आशा आपराद यांची कहाणी सामाजिक चित्रणही झाली आहे. या त्यांच्या समाजाविषयी अभ्यासू दृष्टीकोनातून त्यांनी आणखीही लिहावे. महाराष्ट्राच्या सामाजिक दस्तावेजीकरणाच्या दृष्टीने हे अत्यंत आवश्यक ठरेल. ...Read more

  • Rating StarTANISHKA Jan 2010

    मेहता पब्लिशिंग हाऊस (पुणे) यांनी प्रकाशित केलेल्या आशा अपराद यांच्या ‘भोगले जे दु:ख त्याला’ या आत्मचरित्राला आतापर्यंत महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार, सोलापूरचा भैरू रतन दमाणी पुरस्कार, दिल्लीचा काकासाहेब गाडगीळ मातृपितृ पुरस्कार असे सात पुरस्कार मिाले आहेत. आयुष्यात येणाऱ्या संकटांशी सामना करत लढत राहिलं तर जगणं मनासारखं जगता येतं, हा संदेश देणाऱ्या आशा आपराद यांचं हे मनोगत. प्रसिद्ध अभिनेते सुधीर दळवींचा मला फोन आला. ओलावलेल्या स्नेहमयी आवाजात ते म्हणाले, ‘‘मी तुमचं आत्मचरित्र थांबून थांबून वाचतोय.’’ मला क्षणभर त्याचा अर्थच कळला नाही. ते म्हणाले,‘‘थोडं पुस्तक वाचतो. रडतो. डोळे पुसून पुढचा प्रसंग वाचतो.’’ ते ऐकून माझं मन शब्दांतून त्यांच्यापर्यंत पोहोचल्याचं समाधान मिळालं. या पुस्तकामुळे दळवींबरोबर श्रीकांत मोघे यांसारख्या दिग्गजांपर्यंत, चंद्रपूरच्या मनोहर सप्रे यांच्यासारख्या कलंदर व्यक्तीपासून ते मुंबईच्या विद्यासारख्या तरुणींपर्यंत अनेक व्यक्ती आणि घरांशी मी स्नेहाच्या धाग्यांनी जोडली गेले. मी जे भोगलं ते प्रतिनिधिक आहे. माझ्या प्रतिकूल स्थितीतही घराबाहेरच्या अनेक मायेच्या हातांनी मला जाणलं, आधार नि धीर दिला, यथाशक्ती मदत केली. समाजाबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. मदत करणाऱ्या असंख्य प्रेमळ ‘हातांना’याच कृतज्ञतेनं मी मोठ्या विश्वासानं माझं पुस्तक अर्पणही केलं आहे. मी समाजावर जितकं प्रेम केलं, समाजानं त्याच्या कैकपटींनी मला अधिक प्रेम दिलं, समृद्ध केलं. समाजात वाईट गोष्टी आहेत, पण सारा समाज कृतघ्न नाही. समाजात चांगल्या माणसांची संख्या खूप मोठी आहे. माझं दु:ख, सोसणं मी मोकळेपणानं व्यक्त केल्यावर समाजानंही मला तितक्याच आपलेपणानं स्वीकारलं, माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला. माझं पुस्तक वाचून अनेकांना रडू आलं. त्यातल्या शब्दांचा कीस काढावा किंवा त्यांची चिरफाड करावी असं वाटलं नाही, हे त्याचंच प्रतीक नाही काय? कोल्हापूर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात हिंदी विषय शिकविणारी मी प्राध्यापिका. अत्यंत सामान्य मुस्लिम घरात जन्मले. वडील सुसंस्कृत, पण आई अक्षरशत्रू. लहानपणापासून, किंबहूना जन्मापूर्वीपासूनच तिने माझा रागराग केला, छळ मांडला. माझ्या नवऱ्यासह तिने मला अक्षरश: राबवलं. माझं जीवन पणाला लावण्याचा तिने जणू विडा उचलला. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी मी चार मुलींची आई बनले होते. प्रतिकूलतेचा कळस सोसत होते. परिस्थितीच्या या वादळी प्रहारातही माझी अभ्यासाची, ज्ञानाची आस जिवंत राहिली हे माझं भाग्य. कठोर निग्रहाच्या आणि अभ्यासानंतर मनाला मिळणाऱ्या अननुभूत आनंदाच्या आधारानं मी सारे चटके सोसत दहावीपासूनचं शिक्षण घेतलं. बी.ए., एम.ए., एम.फिल. झाले. आता प्राध्यापकाची नोकरी करते आहे. माझं स्वत:चं प्रशस्त, सुंदर, मनाजोगतं घर झालं. महत्त्वाचं म्हणजे माझ्या मुली शिकल्या-सवरल्या, शहाण्या झाल्या, सुस्थळी पडल्या. माझ्या मनीचं गुज समाजरूपी आईजवळ उघड करताना इतरांना प्रेरणा देण्याची सुप्त इच्छा होती. आपण प्रतिकूल परिस्थितीत तग धरू शकतो. मी जे भोगलं ते प्रातिनिधिक आहे. माझ्या प्रतिकूल स्थितीतही घराबाहेरच्या अनेक मायेच्या हातांनी मला जाणलं, आधार नि धीर दिला, यथाशक्ती मदत केली. मदत करणाऱ्या असंख्य प्रेमळ ‘हातांना’याच कृतज्ञतेनं मी मोठ्या विश्वासानं माझं पुस्तक अर्पणही केलं आहे. माझा निखळ प्रामाणिकपणा, दु:ख हे धागे मला घराघरांशी जोडणारे ठरले. एका अर्थानं माझं दु:ख वैश्विक ठरलं. मी खरं तेच लिहिल्यामुळे पश्चात्ताप होण्याचा प्रश्नच आला नाही. माझं पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर मला रसिकांकडून मिळणारी दाद मनस्वी आनंद देणारी ठरली. तसंच होऊ शकतं, शिक्षणानं माणूस शहाणा होऊ शकतो, आपली इच्छा प्रामाणिक आणि चांगली असेल तर अडचणी सुटू शकतात, हे मला समाजाला सांगायच होतं. शिवाय आयुष्याच्या आणि वयाच्या एका टप्प्यावर आल्यावर गत आयुष्याकडे पाहताना मी तटस्थ राहू शकत होते. त्या त्या वेळी मला जे वाटलं ते मी प्रामाणिकपणे लिहिलं. माझ्या घरची माणसं माझ्याशी वाईट वागलीच होती. त्यांनी मारलेल्या बाणांच्या जखमा मी झेलल्या होत्या. त्यामुळे मी पूर्ण विचार करूनच आत्मचरित्र लिहिलं. माझा निखळ प्रामाणिकपणा, दु:ख हे धागे मला घराघरांशी जोडणारे ठरले. एका अर्थानं माझं दु:ख वैश्विक ठरलं. मी खरं तेच लिहिल्यामुळे पश्चात्ताप होण्याचा प्रश्नच आला नाही. माझं पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर मला रसिकांकडून मिळणारी दाद मनस्वी आनंद देणारी ठरली. मी समाजाप्रति आणखी कृतज्ञ, नम्र झाले आहे. कोकणातल्या एका तरुणाने या पुस्तकामुळे आत्महत्येपासून परावृत्त झाल्याचं सांगितलं. अर्चनाने मनातलं इतरांना सांगता न येण्याजोगं दु:ख माझ्याजवळ बोलून मोकळं केलं. मुंबईची विद्या तर फोन करून रडली. नवऱ्याजवळ हट्ट करून ती कोल्हापूरला आली. माझ्या आवडत्या रंगाची साडी, माझा आवडता मोगऱ्याच्या फुलांचा गजरा दिला. माझ्या कुटुंबीयांना मुंबईला बोलावून तिने यथायोग्य आदरसत्कार केला. चंद्रपूरचे मनोहर सप्रे. त्यांचं सुरेख पत्र आलं आहे. सप्रे यांनी परिचितांना लिहिलेल्या निवडक पत्रांचा संग्रह ‘सांजी’ या नावाने प्रसिद्ध झाला आहे. त्याच्या आगामी आवृत्तीत मला लिहिलेल्या पत्राचा समावेश ते करणार आहेत. अरुण फडके यांचा ‘मम आत्मा गमला’ असा एक कार्यक्रम आहे. भाषेचा वेगवेगळा लहेजा असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण संवादाचा त्यात समावेश आहे. त्यामध्ये माझ्या पुस्तकातील मी ‘ह्यांच्या’ पाया पडून, विनवण्या करून शिकण्याची परवानगी मागते, तो प्रसंग घेतलेला आहे. त्याचं नाट्यरूपांतर सादर केलं जातं. मुंबई-पुण्यात त्याचे प्रयोग झाले आहेत. गेल्या महिन्याभरात मला सतत पुरस्कार जाहीर झाले. महाराष्ट्र राज्य शासनाच्या पुरस्कारांपासून ते लक्ष्मीबाई टिळक, सोलापूरचा भैरू रतन दमाणी, दिल्लीचा काकासाहेब गाडगीळ मातृपितृ पुरस्कार, अशा दर्जेदार संस्थांच्या पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. मी सामान्य स्त्री आहे, पुरस्कारांमागे धावणारी तर मुळीच नाही, तरी असे चांगले पुरस्कार मला शोधत आले. लहानपणी माझ्यावर माया करणारी पण मध्यंतरी काही काळ सहवासात नसणारी माणसं पुन्हा भेटली. घरातल्या काही व्यक्तींना त्यांचं काय चुकलं हे कळलं. मुख्य म्हणजे अगदी तरुणवर्गाच्या काळजातही मला जागा मिळाली. काहीजणांना जगण्याची प्रेरणा मिळाली. अनेकांना माझ्या भावनांशी समरसता साधता आली. हे सारं माझ्यासाठी आनंदाचं, समाधानाचं, कृतज्ञ आणि नम्र बनविणारं आहे. आज मी कृतार्थ आहे! ...Read more

  • Rating StarLOKSATTA 17-10-2009

    अशिक्षित, अडाणी, अठराविश्व दारिद्र्य असलेल्या एका मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या आशा अपराद यांचं `भोगले जे दु:ख त्याला...` हे आत्मकथन परिस्थितीच्या कोंडीत सापडलेल्या एका अबलेचं शिक्षणाच्या अविश्रांत ध्यासातून एका सबलेत झालेलं रूपांतर दर्शवितं. आठवीत असतनाच जबरदस्तीनं शाळा सोडायला लावून लग्न झालेल्या आणि अवघ्या १९ व्या वर्षीच चार मुलींची आई बनलेल्या आशा अपराद यांनी सासरच्या प्रतिकूल, कर्मठ व पारंपारिक विचारसरणीच्या कुटुंबीयांना आपल्या शिक्षणासाठी राजी करून मोठ्या जिद्दीनं उच्च शिक्षण घेतलं आणि आपलं व आपल्या कुटुंबाचं भवितव्य घडवलं. ही सगळीच कहाणी आश्चर्यकारक आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more