* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: BEDHUND
 • Availability : Available
 • ISBN : 9789353170257
 • Edition : 1
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 184
 • Language : MARATHI
 • Category : FICTION
 • Available in Combos :17TH FEBRUARY AVINASH LONDHE BIRTHDAY OFFER
Quantity
This gripping story about love, friendship, betrayals, responsibilities, addictions amidst the dreams about the future of five young souls will keep you glued and will definitely leave an indelible imprint on your lives.
‘बेधुंद’ ही जयंत, अक्षय, सुरेश, समीर आणि अण्णा (फाइव्ह स्टार्स) या पाच मित्रांची कहाणी आहे. एकाच कॉलेजमध्ये शिकणारे हे पाच जण वसतिगृहात राहत असतात. या पाच तरुणांच्या निमित्ताने कॉलेज जीवनाचा वेध या कादंबरीतून घेतला आहे. जया आणि हर्षलाच्या निमित्ताने आंतरजातीय विवाहाला होणारा विरोध, या पाच जणांवर सुरुवातीला सीनिअर्सकडून झालेल्या रॅगिंगच्या चित्रणातून रॅगिंगचा प्रश्न, अक्षा आणि सोनिया आणि अन्य मुलामुलींच्या माध्यमातून ‘सेक्स’चा अनुभव, या पाचही जणांच्या दारू पिण्यातून व्यसनाधीनता, सुऱ्या आणि पिया यांच्यात होणारं सेक्स चॅटिंग, काही उत्सव साजरे करत असताना विद्याथ्र्यांमध्ये जातीयवादावरून झालेली भांडणे इ. विषयांचं वास्तव चित्रण या कादंबरीतून केलं गेलं आहे. कॉलेज जीवनाची ही काळी बाजू समाजावरही विघातक परिणाम करू शकते, असा गर्भित इशारा या कादंबरीतून मिळतो. तेव्हा कॉलेज जीवनातील हे दाहक वास्तव जाणून घेण्यासाठी ही कादंबरी अवश्य वाचली पाहिजे.
Keywords
Customer Reviews
 • Rating StarDAINIK PRABHAT 08-02-2019

  कॉलेज जीवनाचा प्रवास करायला लावणारे पुस्तक... अविनाश लोंढे लिखित ‘बेधुंद’. ही कथा सुरू होते पाच मित्रांच्या कॉलेज मैत्रीपासून. जयंत, अक्षय, सुरेश, समीर आणि अण्णा हे फाईव्ह स्टार इंजिनिअिंरगच्या पहिल्या वर्षाला... पहिलेच वर्ष अन् तिथे चालणारी चोरीछुपे रॅगिंग अन् त्यातून निर्माण झालेली मैत्री अन् दुश्मनी घेऊन बेधुंद जगात त्यांचा प्रवास चालू होतो. जयंतच्या आयुष्यात हर्षला येते अन् तिचा भाऊ हर्षलसोबत वादाच ठिणगी पडते आणि सुरुवात होते दुश्मनीला... अक्षय सरळ अन् घरातील परिस्थितीची जाणीव असलेला... एका कार्यक्रमादरम्यान सोनिया म्हणजे कॉलेजमधील सगळ्यात सुंदर अन् हुशार मुलगी. हिच्याशी त्याची मैत्री होते... अश्विनी या फाईव्ह स्टारची जवळची मैत्रीण... हुशार अन् वेळीच स्वत:ला सावरणारी. धाब्यावर यांची मैत्री फुलते खरी पण पुढे यांच्या आयुष्यात एक एक घटना अशा घडत जातात की सगळे सुन्न होतात. हे पुस्तक तुमच्या आयुष्यातील काही सोनेरी क्षण परत आणेल. हे बेधुंद क्षण थोड्या फार फरकाने तुम्ही नक्की जगलेले असणार. लेखकाने भाषासुद्धा कॉलेजच्या मुलांच्या तोंडी असणारी लिहिली आहे. प्रेम आणि त्यापलीकडे असलेले संबंध, मैत्री, रात्रभर अनोळखी मुलीसोबत केलेले चॅटिंग त्यातून निर्माण झालेली मैत्री, परीक्षा, अभ्यास, स्वप्न, दुश्मनी त्यातून घेतलेला सूड, ताटातूट, बेधुंद वातावरणातील व्यसन, ओढ, जातीवरून होणारी भांडणे, मजा मस्ती अन् या सगळ्यांचा प्रत्येकाच्या आयुष्यावर होणार वेगवेगळा परिणाम... थोडक्यात निसरड्या रस्त्याची ही वाट कोणी कशाप्रकारे पार करायची ज्याने त्याने ठरवायचे. हे वय धुंद होण्याचे आहे, की आपल्या आयुष्याला योग्य वळण देणारे आहे, याचा सारासार विचार देणारे पुस्तक आहे. लिखाण बिनधास्त आहे, नातेसंबंध उघड आहेत, कॉलेजच्या मुलांच्या तोंडी असणारी भाषाही आहे, पण कुठे तरी वास्तव दर्शविणारे पुस्तकं आहे. हे पुस्तक वाचून नक्कीच महाविद्यालयीन मुलांना कसे वागू नये कळेल. कदाचित होणाऱ्या चुका टाळता येतील. कथेमध्ये अनेक पात्र आहेत त्यांचे परस्परांशी येणारे संबंध कथेमध्ये खिळवून ठेवतात अन् क्षणाक्षणाला उत्सुकता वाढवतात. जया अन् हर्षालीचे प्रेम, अक्षय आणि सोनियात असलेले नाते तिच्या आयुष्यात असलेला आधीचा प्रियकर... अक्षयच्या आयुष्यात येणाऱ्या इतर मुली, सुरेश आणि अण्णा यांचे शैक्षणिक निकाल. मोठ्या पदावर पोहोचलेले विद्यार्थी, अन् सुन्न करणारा शेवट... विचार करायला लावणारा शेवट. अनपेक्षित धक्कादायक शेवट. बेधुंद जगा पण आयुष्यावर त्याचा काय परिणाम होतोय याचा विचार करा. सहज सोपा दिसणारा पण अडवळणाचा रस्ता जपून पार करा असा संदेश डोळसपणे देणारे पुस्तक करमणूक करणारे तर आहेच पण तितकेच खूप काही शिकवून जाणारे आहे. या पुस्तकाचे प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस यांचे आहे. तर नक्की वाचा ही तरुणाईला बेधुंद करणारी कादंबरी... -मनीषा संदीप ...Read more

 • Rating StarDAINIK PRABHAT 08-02-2019

  कॉलेज जीवनाचा प्रवास करायला लावणारे पुस्तक... ही कथा सुरू होते पाच मित्रांच्या कॉलेज मैत्रीपासून. जयंत, अक्षय, सुरेश, समीर आणि अण्णा हे फाईव्ह स्टार इंजिनिअिंरगच्या पहिल्या वर्षाला... पहिलेच वर्ष अन् तिथे चालणारी चोरी छुपे रॅगिंग अन् त्यातून निर्माणझालेली मैत्री अन् दुश्मनी घेऊन बेधुंद जगात त्यांचा प्रवास चालू होतो. जयंतच्या आयुष्यात हर्षला येते अन् तिचा भाऊ हर्षलसोबत वादाच ठिणगी पडते आणि सुरुवात होते दुश्मनीला... अक्षय सरळ अन् घरातील परिस्थितीची जाणीव असलेला... एका कार्यक्रमादरम्यान सोनिया म्हणजे कॉलेजमधील सगळ्यात सुंदर अन् हुशार मुलगी. हिच्याशी त्याची मैत्री होते... अश्विनी या फाईव्ह स्टारची जवळची मैत्रीण... हुशार अन् वेळीच स्वत:ला सावरणारी. धाब्यावर यांची मैत्री फुलते खरी पण पुढे यांच्या आयुष्यात एक एक घटना अशा घडत जातात की सगळे सुन्न होतात. हे पुस्तक तुमच्या आयुष्यातील काही सोनेरी क्षण परत आणेल. हे बेधुंद क्षण थोड्या फार फरकाने तुम्ही नक्की जगलेले असणार. लेखकाने भाषासुद्धा कॉलेजच्या मुलांच्या तोंडी असणारी लिहिली आहे. प्रेम आणि त्यापलीकडे असलेले संबंध, मैत्री, रात्रभर अनोळखी मुलीसोबत केलेले चॅटिंग त्यातून निर्माण झालेली मैत्री, परीक्षा, अभ्यास, स्वप्न, दुश्मनी त्यातून घेतलेला सूड, ताटातूट, बेधुंद वातावरणातील व्यसन, ओढ, जातीवरून होणारी भांडणे, मजा मस्ती अन् या सगळ्यांचा प्रत्येकाच्या आयुष्यावर होणार वेगवेगळा परिणाम... थोडक्यात निसरड्या रस्त्याची ही वाट कोणी कशाप्रकारे पार करायची ज्याने त्याने ठरवायचे. हे वय धुंद होण्याचे आहे, की आपल्या आयुष्याला योग्य वळण देणारे आहे, याचा सारासार विचार देणारे पुस्तक आहे. लिखाण बिनधास्त आहे, नातेसंबंध उघड आहेत, कॉलेजच्या मुलांच्या तोंडी असणारी भाषाही आहे, पण कुठे तरी वास्तव दर्शविणारे पुस्तकं आहे. हे पुस्तक वाचून नक्कीच महाविद्यालयीन मुलांना कसे वागू नये कळेल. कदाचित होणाऱ्या चुका टाळता येतील. कथेमध्ये अनेक पात्र आहेत त्यांचे परस्परांशी येणारे संबंध कथेमध्ये खिळवून ठेवतात अन् क्षणाक्षणाला उत्सुकता वाढवतात. जया अन् हर्षालीचे प्रेम, अक्षय आणि सोनियात असलेले नाते तिच्या आयुष्यात असलेला आधीचा प्रियकर... अक्षयच्या आयुष्यात येणाऱ्या इतर मुली, सुरेश आणि अण्णा यांचे शैक्षणिक निकाल. मोठ्या पदावर पोहोचलेले विद्यार्थी, अन् सुन्न करणारा शेवट... विचार करायला लावणारा शेवट. अनपेक्षित धक्कादायक शेवट. बेधुंद जगा पण आयुष्यावर त्याचा काय परिणाम होतोय याचा विचार करा. सहज सोपा दिसणारा पण अडवळणाचा रस्ता जपून पार करा असा संदेश डोळसपणे देणारे पुस्तक करमणूक करणारे तर आहेच पण तितकेच खूप काही शिकवून जाणारे आहे. या पुस्तकाचे प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस यांचे आहे. तर नक्की वाचा ही तरुणाईला बेधुंद करणारी कादंबरी... -मनीषा संदीप ...Read more

 • Rating Starशिरीष राणे....

  अविनाश लोंढे लिखित बेधुंद कादंबरी वाचनात आली. कॉलेज जीवनातील आठवणी म्हणजे मनाच्या मरुभूमी वर कायमस्वरूपी उमटलेले ठसे. ही कादंबरी वाचताना जीवनाच्या प्रवासात मनाच्या तळाशी गेलेल्या आठवणींच्या पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. कादंबरीतील प्रत्येक पात्र जिवंत ेखाटलं गेलय. अस्सल व्यक्तिचित्रण हे या कादंबरीचं बलस्थान आहे. त्याच बरोबर प्रसंगी bold वाटणारी भाषा आजच्या पिढीच प्रतिनिधित्व करते. वाचताना कुठे तरी सुहास शिरवाळकरांच्या दुनियादारी कादंबरीचा पुढचा भाग वाचतोय असा भास होतो. आजच्या काळात जर दुनियादारी ही कादंबरी लिहिली असती तर या पेक्षा वेगळं लिहिलं गेलं नसत. कादंबरी एकदा वाचायला घेतली की संपवल्या शिवाय ठेऊ शकत नाही, या बद्दल अविनाश लोंढे या लेखकाचं खास अभिनंदन. आजच्या बेधुंद तरुणाईला कस वागू नये, हा संदेश कुठेही उपदेशाचे डोस न पाजता देणं हे अवघड काम लेखकाने अगदी लीलया पेललं आहे. आवर्जून वाचवी अशी ही कादंबरी लवकरच रुपेरी पडद्यावर बघायला मिळेल. ...Read more

 • Rating Starशेखर जोशी

  `बेधुंद` महाविद्यालयीन जीवनाचे प्रतिबिंब खरगपूर येथील आयआयटीमधून एम.टेक ही पदवी मिळविलेले अविनाश लोंढे यांची `बेधुंद` ही कादंबरी भान हरपलेल्या आजच्या काही महाविद्यालयीन तरुणांच्या बेबंद आणि बेधुंद जीवनाचे प्रतिबिंब आहे. अर्थात सर्वच महाविद्यालयीन रुणाई अशीच असते असे नाही. नक्कीच काही अपवाद आहेत. शाळेच्या शिस्तीतून बाहेर पडल्यानंतर महाविद्यालयीन जीवन (मग ते कोणत्याही शाखेतील असो) हे फुलपाखरासारखे स्वच्छंदी जगावे असे त्या वयात प्रत्येकाला वाटत असते. काही जण घरच्या संस्कारामुळे किंवा चांगल्या मित्रांच्या संगतीमुळे वाहावत जात नाहीत. पण काही जणांचे भान महाविद्यालयीन जीवनात पूर्णपणे हरपते आणि अनेकदा शाळेत हुुशार म्हणून गणल्या जाणाऱया काहींची महाविद्यालयीन जीवनात घसरण सुरु होते. रॅगिंग, वेगवेगळी व्यसने, प्रेम प्रकरणे, अश्लील गप्पा, चित्रपट पाहणे, संदेश पाठविणे, दारुच्या पार्ट्या, भटकणे, दुचाकीवरुन भटकणे आणि इतर अनेक गोष्टी करणे म्हणजेच महाविद्यालयीन जीवन, तीच खरी मजा असा काहींचा गैरसमज झालेला असतो. हे सर्व करणे भूषणावह वाटत असते आणि हे न करणारा बावळट ठरत असतो. लोंढे यांच्या `बेधुंद` या कादंबरीत पाच मित्रांची गोष्ट सादर करण्यात आली आहे. आज आपण समाजात महाविद्यालयीन किंवा तरुण पिढीच्या बाबतीत जे ऐकतो, वाचतो, पाहतो त्याचे चित्र लोंढे यांनी यात मोकळेपणाने मांडले आहे. ही कादंबरी फाईव्ह स्टार ग्रुपची म्हणजे जयंत, अक्षय, सुरेश, समीर आणि अण्णा या पाच मित्रांची, त्यांच्या आयुष्यात घडणाऱया घटनांची आहे. महाविद्यालयीन आणि वसतीगृहावरील जीवन, तेथील रॅगिंग यासह रोहित, सोनिया, एच.डी. संग्राम, विनय, हर्षला, सचिन सर आदी व्यक्तिरेखाही कादंबरीत येतात. रॅगिंग, शिवजयंती, मेस कमिटी, निवडणूक तसेच जया-हर्षला आणि अक्षय-सोनिया यांचे प्रेमप्रकरण याचाही मसाला यात आहे. महाविद्यालयीन जीवनात घेतलेला लैंगिक सुखाचा अनुभव आणि अन्यही तरुणाईशी निगडीत असलेल्या गोष्टी कादंबरीत दाखविण्यात आल्या आहेत. कादंबरीतील व्यक्तिरेखांचे टवाळ आणि अश्लील बोलणे, शिव्यांचा वापरही पाहायला मिळतो. लोंढे यांनी आजच्या तरुणाईची भाषा, त्यांचे प्रश्न, विषय बिनधास्त आणि बेधकपणे `बेधुंद`मध्ये मांडले आहेत. त्यामुळे काही जणांना ही कादंबरी आपल्या महाविद्यालयीन आणि वसतीगृहातील जीवनाची आठवण करुन देईल. काही जणांना सुहास शिरवळकर यांची `दुनियादारी` किंवा त्यांच्याच अन्य काही कादंबऱया वाचत आहोत का, असाही प्रश्न पडेल. कादंबरीची लेखनशैली काहीशी विस्कळीत, तुटक आहे. पण अशा शैलीतील लिखाणाची आवड असणाऱयांना कदाचित तसे वाटणारही नाही. बेधुंद आणि बेभान जीवन म्हणजे सर्वस्व नाही आणि अयोग्य मार्गावरुन चालणे किती धोकादायक असू शकते त्याचे चित्र `बेधुंद`च्या निमित्ताने मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केली असून १८२ पृष्ठांच्या या कादंबरीचे मूल्य २५० रुपये इतके आहे. लेखक अविनाश लोंढे यांचा ई मेल avi4u.iitkgp@gmail.com ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Latest Reviews

PARYAY SHABDKOSH
PARYAY SHABDKOSH by V.S THAKAR Rating Star
Usha N Koudinya

Just out of a vernacular medium of up to your neck in translation or in deep conversation? Are you stammering stuttering searching for the right word then here is a book to rescue you from those tongue-tied situations? The first ever Marathi-MarathiEnglish Thesaurus is the answer. It hit the stands in January 2000 and the first edition has been sold out already. The thesaurus is the brain-child of Mr V. S. Thakaar and is his single handed effort. He took the Datte and Karve Marathi dictionary and the Roget`s Thesaurus as the two foundation stones, Thakaar has written this 830 page comprehensive book in six months. The words are arranged in alphabetical order like the Roget`s thesaurus. However, Marathi like othe Indian Languages encompasses the `barakhadis` in addition to the regular vowels and consonants. You could pick up a word and look up for synonyms in Marathi and in English through this book. It contains 1900 main words. ...Read more

PARYAY SHABDKOSH
PARYAY SHABDKOSH by V.S THAKAR Rating Star
MAHARASHTRA TIMES 19-11-2000

ग्रंथजगत समृद्ध करणारा ग्रंथ... काय गंमत असते पाहा. मला सर्वस्वी अपरिचित अशा वि. शं. ठकार यांनी तयार केलेला मराठी पर्याय शब्दकोश खरेदी करून मी परतत होतो. बसमध्ये साहजिकच तो चाळत होतो. तेव्हा काही एक आगापिछा नसताना मला विनोबा भावे यांचं स्मरण झालं निवाटलं, त्यांना हा कोश फार आवडला असता. काही आगापिछा नसलेले, मनात उनाडक्या करणारे विचार तसे अर्थहीनच. शब्दकोशांचं परिशीलन करण्यात विनोबा रंगून जात, ही वाचलेली किंवा ऐकलेली आख्यायिका याच्या मुळाशी असणार, हे उघड आहे. परंतु गेले काही दिवस हा कोश चाळल्यानंतर लक्षात आलं, तो विचार सार्थच होता. या कोशाची गुणवत्ता तशीच मोठी आहे. वेगळेपण सर्वसाधारण शब्दकोशापेक्षा पर्याय शब्दकोश भिन्न असतो. शब्दकोशात शब्दांचा अर्थ नेमकेपणे देण्यात येतो. शब्दांच्या वाच्यर्थाबरोबर लक्षणेने शब्दांना प्राप्त झालेले अर्थही त्यात द्यावे लागतात. पर्याय शब्दकोशात किंवा थोडक्यात ‘प. श. कोशात’ एकेका शब्दाला पर्याय म्हणून वापरता येणारे सारे शब्द देण्यात येतात, तसेच शब्द पूर्णपणे समानअर्थी असतात असे नव्हे. तर त्या शब्दाला विविध अर्थछटा असलेले शब्दही ‘पर्याय’ शब्द म्हणून संग्रहित करण्यात येतात. साहजिकच या पर्याय शब्दांत संस्कृत, संस्कृतोद्भव शब्दांबरोबर अगदी माठमोळे शब्द येतात, त्याचप्रमाणे मराठीनं आत्मसात केलेले अन्य देशी भाषांतील शब्दांचा व परदेशी भाषांतील शब्दांचाही त्यात अंतर्भाव होतो. उदाहरण म्हणून ‘अन्न’ हा शब्द पाहावा. डॉ. प्र. न. जोशी यांच्या आदर्श मराठी शब्दकोशात अन्न या शब्दाचा अर्थ दिला आहे. ‘धान्य वगैरेचा खाद्यपदार्थ, आहार, भक्ष्य’. ज्या दृष्टीने ‘आदर्श शब्दकोश’ तयार केला आहे. त्या दृष्टीनं एवढा अर्थ पुरेसा आहे. प.श. कोशात ‘अन्न’ यापुढे देण्यात आलेल्या शब्दात ‘खाद्य, भक्ष्य’पासून ‘भंडारा दाणागोटा, खुराक’ हे पर्याय येतात. शिवाय अन्नाशी संबंधित ‘वनभोजन’ तसेच सूपशास्त्र यांचाही यात अंतर्भाव होतो. हे सारे शब्द १३० आहेत. अन्नाशी संबंधित ‘रांधणे’ वगैरे सहा क्रियापदे आणि माकडमेवा, च्याऊम्याऊसारखे ३५ वाकप्रचारही दिलेले आहेत. आपल्या भाषेतील शब्दांच्या या श्रीमंतीनं जीव लोभावतो या प.श. कोशात एका शब्दाच्या विविध अर्थछटा असलेले शब्द दिले आहेत. त्याचबरोबर या शब्दाशी संबंधित शब्दही दिले आहेत. ‘अंत्येष्टि’ शब्दाच्या पर्याय शब्दांत या शब्दाशी संलग्न असे ‘स्मशान’, ‘कबरस्थान’, ते ‘शववाहिनी’, नि ‘देहदान’ असे शब्दही आले आहेत. आज इंग्रजी भाषेला जे स्थान प्राप्त झाले आहे. ते लक्षात घेऊन मराठी शब्दांचे इंग्रजी पर्याय पर्याप्त प्रमाणात दिले आहेत, त्यामुळे या कोशाच्या गुणवत्तेत व उपयुक्ततेत मोलाची भर पडली आहे. येरा गबाळ्याचे काम नोहे वर दिलेली ‘अन्न’ व ‘अंत्येष्टि’ ही शलाका परीक्षेनं दिलेली भाषेच्या श्रीमंतीचे दर्शन हा कोश कसा करतो, ते लक्षात येतं. त्याचप्रमाणे कोणत्याही भाषेतून मराठीत अनुवाद करणाऱ्यांना हा पं.श. कोश किती उपयुक्त ठरणारा आहे. याचीही जाणीव होते. मराठीच्या विविध स्तरांवरील अभ्यासकांना हा प.शं. कोश संग्रही असणं अपरिहार्य वाटावं व इतरजनांना हा ग्रंथ आपल्यापाशी असल्याचा अभिमान वाटावा. वरील दोन उदाहरणांनीच आणखी एक गोष्ट लक्षात यावी. ती ही की प.श. कोशाची निर्मिती हे येरा गबाळ्याचे काम नव्हे. निरनिराळे शब्दकोश अभ्यासणे, महत्त्वाच्या ग्रांथिक साहित्याचे परिशीलन करणे, शब्द निश्चित करणे, त्यांच्या याद्या बनवणे, त्या पडताळून पाहणे, त्यांची उजळणी-फेरउजळणी वगैरे कामं वेळ खाणारी, डोकं चक्रावणारी नि चिकाटीचं टोक गाठायला लावणारी आहेत. श्री. ठकारांनी हे काम एकहाती केलंय, असं त्यांनी प्रारंभी दिलेल्या त्रोटक निवेदनावरून वाटतं. त्या निवेदनात बऱ्याचजणांनी प्रोत्साहन दिल्याचा त्यांनं साभार उल्लेख केलाय. ते प्रोत्साहन त्यांना महत्त्वाचं वाटलंही असेल, परंतु त्या ज्ञानशाखेबद्दल अतूट ओढ नि हृदयाच्या देठापासूनचा जिव्हाळा नसेल, त्याच्या जोडीला चिवट चिकाटी नसेल, तर दहा-पाच जणांच्या प्रोत्साहनानं अशी कामं सिद्ध होत नाहीत. हे अपवादस्वरूप गुण ठकारांपाशी आहेत, म्हणून हा ग्रंथ सिद्ध झाला. इंग्रजी थॅसॉरस इंग्रजीतील Rojet a Thesaurus of Synonyms and Antanyms प.श. कोश त्याच्या अनेक आणि अनेक प्रकारच्या आवृत्त्या निघाल्या आहेत. मोजकेच पर्यायी शब्द देणारी संक्षिप्त आवृत्तीही निघालीय. त्यात अमूर्त संकल्पना, वस्तुमान आदि प्रकारांत शब्दांचे वर्गीकरणे केले आहे. त्या वर्गीकरणानुसार क्रमांक देऊन शब्दांच्या नोंदी केल्या आहेत. पुढच्याच क्रमांकात त्याच्या विरुद्ध अर्थी शब्दाची नोंद. उदा. त्यातील क्र. १ची नोंद आहे. Existence तर क्रमांक २ची नोंद Non-existence परिशिष्टात इंग्रजी वर्णमालेनुसार सर्व शब्द दिले असून त्या शब्दांचे पर्याय कोणत्या (किंवा कोणकोणत्या) नोंदीत आहेत, ते क्रमांक दिले आहेत. ठकारांनी मराठी प.श. कोशात ही पद्धत अवलंबिली नाही. यात त्यांनी सर्व शब्द अकारविल्हे दिले आहेत. त्यामुळे पुष्कळ शब्दांच्या पुढं त्यांचा उल्लेख आधीच्या अथवा नंतरच्या ज्या नोंदीत आला आहे. त्या शब्दाकडे निर्देश करण्यात आला आहे. सहज उघडलेल्या पू. ३१४ वर डझनभर शब्दांपुढं असे निर्देश आढळतात. उदा. टाकलेली : पाहा : परित्यक्ता. टाकाऊ : पाहा : कुचकामी कोणती पद्धत अधिक चांगली, याबद्दल मतभेद होऊ शकतील. त्याचप्रमाणं कोशातील अधिक-उण्याबद्दल लिहिण्याचा अधिकार या विशिष्ट ज्ञानशाखेच्या अभ्यासकांना जाणाकारांनाच आहे. तो माझ्यापाशी नाही. कोशांना पूर्णविराम नाही शब्दकोश अथवा प.श. कोश यांचं काम कायम संपलं. असं कधी होत नाही. विविध ज्ञानशाखांत पडणारी भर, नव्या ज्ञानशाखांचा उगम आणि विकास, इतर भाषांशी वाढणारा संबंध अशा अनेकविध कारणांनी अशा कोशांना पूर्ण विराम संभवत नाही. हे जेवढं खरं, तेवढंच हेही खरं की कालौघाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांची निर्मिती आवश्यक असते. असे कोश म्हणजे केवळ ग्रंथ नव्हेत, असे कोश म्हणजे ग्रंथसंपदा होय. म्हणूनच विसाव्या शतकाच्या अखेरीस मराठीत अशा ग्रंथसंपदेची भर घालणाऱ्या ठकारांचं मन:पूर्वक अभिनंदन करावंसं वाटतं. माझा स्वत:चा ग्रंथसंग्रह अगदीच छोटा. परंतु बऱ्याच वर्षांपूर्वी ‘श्री तुकाराम बाबांच्या अभंगाची गाथा’ घेतल्यावर तो छोटा संग्रहच मला समृद्ध वाटला. ‘गाथे’हून सर्वस्वी भिन्न अशा ‘विश्रब्ध शारदे’च्या खंडाची भर पडली. तेव्हाही तसाच अनुभव मला आला. ‘गाथा’ व ‘विश्रब्ध शारदा’ यांच्यापेक्षा हा कोश अगदीच वेगळा. परंतु या कोशानं माझा छोटा संग्रह खूपच समृद्ध झाला, असं मला वाटलं. अर्थात असा अनुभव या कोशानं इतर काहीजणांना दिला असेल व यापुढंही अनेकांना तो देईल, यात शंका नाही. – वसंत फेणे ...Read more