* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BARI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664188
  • Edition : 9
  • Publishing Year : JANUARY 1990
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 192
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE` BARRE` TRIBE HAD TRADITIONALLY LIVED IN THICK AND BEAUTIFUL JUNGLES. THEY RESORTED TO DACOIT AND THEFT IN NEARBY LOCALITIES FOR THEIR LIVING. THEY HARDLY EVER DREAMT OF STABLE LIFE. THE SOCIO-POLITICAL CHANGES AROUND AND FALLING OF FORESTS SIGNIFICANTLY CHANGED THEIR LIFE STYLE AND INTRODUCED THEM TO NEW WAYS AND VALUES. `BARE’ RECOUNTS ALL THIS IN FORM OF A NOVEL. THE PICTURESQUE ENVIRONS, THE RUGGED LIFE-STYLE, THE PETTY FEUDS AND PLEASURES, THE NEW CHANGES ETC. HAVE BEEN POWERFULLY AND REALISTICALLY PRESENTED WITHOUT ANY ATTEMPT TO PASS ANY VALUE JUDGMENTS.
जंगलाच्या आसर्यानं वाढणाऱ्या बेरड जमातीची अस्सल कथा. कथाकार म्हणून साहित्यिक कारकीर्द सुरु करणाऱ्या श्री. रणजीत देसईंची हि पहिलीच कादंबरी. कथा व कादंबरी हे साहित्यप्रकार मुलतःच भिन्न प्रकृतीधर्माचे आहेत. त्यामुळं या दोन्ही साहित्यप्रकारांवर प्रभुत्व असलेले सव्यसाची ललितलेखक हाताच्या बोटांवर मोजण्याएवढेच आढळतात. श्री. रणजीत देसाई त्यापैकीच एक. आपल्या दृढ परिचयाचा भौगोलिक भाग त्यांनी या कादंबारीकता निवडला आहे. कोल्हापूर ते बेळगाव या रस्त्याच्या वाटेवर सुतगट्टी या नावाचं गाव लागतं. तिथून काकती गावापर्यंतची पंधरावीस मैलांची, अगदी दाट गहिऱ्या जंगलान वेढलेली वाट `सूतगट्टीची बारी` म्हणून ओळखली जाते. भर दुपारी अंधारून याव, असा हा भाग. त्या बरीचीची, त्या जंगलाच्या आसऱ्यान वाढणाऱ्या बेरड जमातीची हि कथा. श्री. रणजीत देसईंचा रहिवास जन्मापासूनच खेड्यात झालेला आहे. आजही रात्रंदिवस ते याच लोकांत वावरत आहेत. तिथल्या मातीतच त्यांची कला मूळ धरीत आहे. त्यामूळं हि कादंबरी म्हणजे सुरेख शहरी कुंडीत लावलेलं खेडेगावातल फुलझाड नाही. प्रसंगाचा, निसर्गाचा, भावविश्वाचा, भाषाशैलीचा आणि या जीवनावर जिची च्या पडली आहे, त्या समस्येचा अस्सलपणा या कादंबरीत अधिक प्रमाणात आहे. या ग्रामीण जीवनात जी सामाजिक, आर्थिक, राजकीय, यांत्रिक, शैक्षणिक अशी सर्वंकष स्थित्यंतरे होत आहेत, ती सारी कधी विकत हास्य करीत, तर कधी कारुण्यान काजळून जात लेखकापूढ प्रकट होत आहेत. या जीवनाविषयी त्याला आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, पोटतिडीक आहे. या जीवनाचाच एक लहानसा भाग असलेल, बेरड जमातीचं परंपरागत जीवन, त्या जीवनात होऊ घातलेली स्थित्यंतरे आणि त्या जमातीच्या भाविताव्याविशयीची काळजी या सर्वांतून `बारी` स्फुरली आहे, फुलली आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating StarPrasad Natu

    मला आठवते आहे, 2011-14 या काळांत आम्ही कोल्हापूरला होतो,तेव्हाची गोष्ट. मी बँक ऑफ इंडियाच्या कोल्हापूर मुख्य शाखेला वरिष्ठ प्रबंधक (कर्ज विभाग) होतो. “हॉटेल कृष्णा” चे प्रपोजल आमच्या कडे आले होते. त्या निमित्ताने स्वामीकार रणजीत देसाई ह्यांचे मेव्हण श्री.उदयसिंह शिंदे आणि त्यांचे सुपुत्र श्री. सिद्धार्थ शिंदे ह्यांचा परिचय झाला.आपले समूहाचे कर्ताधर्ता श्री. कृष्णा दिवटे सर ह्यांचा कोल्हापूर मधे कुणाशी परिचय नसेल अशी व्यक्ति भिंग घेऊन शोधावी लागेल.एक दिवस ते मला म्हणाले, स्वामीकार रणजीत देसाई यांचे गांव कोवाडला चलता का.शनिवारी,संध्याकाळी कार्यक्रम आहे.रणजीत देसाई यांची पुण्यतिथि होती. प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे देखिल येणार आहेत.त्यांचा कार्यक्रम देखील होईल.साहित्य आणि संगीत असा दुर्मिळ योग एकत्र येणं हे मोठ्या भाग्याचे.मी लगेच जाऊया म्हटले.त्या प्रमाणे साधारणतः संध्याकाळी 4.00 कडे मी,माझी पत्नी सौ भावना आणि श्री दिवटे सर आणि सौ. वहिनी असे चौघे आम्ही गेलो.तिथे बऱ्याच नवीन गोष्टी समजल्या.जसे रणजीत देसाई आणि प्रसिद्ध गायक वसंतराव देशपांडे ह्यांची घट्ट मैत्री होती.दरवर्षी कोवाड येथे त्यांचे येऊन रहाणे हे कळले.रणजीत देसाई ह्यांचे घर बघायले मिळाले,ज्याचे स्मारकांत रूपांतर झाले,त्यांचे साहित्य,त्यांचे हस्त-लिखित,राहुल देशपांडे यांच्याशी झालेली वैयक्तिक ओळख.हे सारे कधी विसरता येणार नाही.श्री.शिंदे ह्यांनी मला साहित्याची आवड म्हणून स्वामीकारांची 2-3 पुस्तके मला भेट म्हणून दिली.त्यातले एक पुस्तक म्हणजेच “बारी”.रणजीत देसाई ह्यांची पहिली कादंबरी.कथाकार म्हणून सुरुवात केलेल्या देसाई यांची ही पहिली कादंबरी. ह्या कादंबरीस प्रसिद्ध साहित्यिक श्री.वि.स.खांडेकर ह्यांची प्रस्तावना लाभली आहे. रणजीत देसाई ह्यांनी कादंबरीचा विषय त्यांच्या दृढ परिचयात असलेला भूभाग निवडला.कोल्हापूर ते बेळगाव रस्त्यावर सुतगट्टी नावाचे गांव लागते.तिथून 15-20 किमी आंत काकती नावाचे गावं लागते.ह्या गावापर्यंत अगदी गहिऱ्या जंगलाने वेढलेली वाट ही सुतगट्टीची बारी म्हणून ओळखली जाते.त्या जंगलात गुजराण करणाऱ्या बेरड जमातीची ही कथा आहे.ही कादंबरी लिहिण्यासाठी त्यांनी ह्या भागात राहणाऱ्या बेरड जमातीचे जीवन अगदी जवळून पूर्ण सहानुभूतीने पाहिले.ही कादंबरी वाचतांना हे पदोपदी लक्षात येतं की शहरातल्या आलीशान बंगल्यात बसून चितारलेले हे ग्रामीण जीवन नाही.त्यातील प्रत्येक प्रसंगात जिवंतपणा आढळतो. कारण रणजीत देसाईनी जवळपास 3-4 वर्ष ह्या भागात राहून त्या जीवनाचा जवळून अभ्यास केला. आपल्या समोरच सारे घडते आहे असे वाटू लागते.मला आठवते आहे की ही कादंबरी मी जेंव्हा पहिल्यांदा वाचली.त्यातील पात्रांची निवड,त्यांचे स्वभाव दर्शन, निसर्ग चित्रण, तेथील समस्या आणि स्वातंत्र्यानंतर बदलत चाललेले जीवनमान.हयात कुठेही काल्पनिकपणा वाटत नाही. वि.स.खांडेकर ह्यांनी लिहिलेली प्रस्तावना त्यांच्या साहित्यिक विद्वतेचा परिचय करून देणारी आहे.सर्वसाधारणपणे आपण पुस्तक चाळतो तेंव्हा आपण प्रस्तावनेकडे दुर्लक्ष करतो.पण मित्रांनो, प्रस्तावना देखील अवश्य वाचा.ही कादंबरी तेग्या ह्या नायकाच्या अगदी तरुण वयापासून ते म्हातारपणा पर्यन्तची कहाणी आहे.पण ही कहाणी केवळ तेग्याची नसून त्याच्या भोवती फिरणाऱ्या आणि गुंफलेल्या बेरड जमातीची कथा आहे. रणजीत देसाई यांची ही पहिली कादंबरी आहे हे कुठेच जाणवत नाही. कादंबरी वाचतांना लक्षात येते की,कोल्हापूर ते बेळगाव रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीवर रात्रीच्या वेळेस दरोडा घालून आणि जंगलातून लाकडे तोडून ती विकणारी,आणि त्यावर गुजराण करणारी ही बेरड जमात.स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी पासून ते स्वातंत्रोत्तर काळात ह्या जमातीच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनावर झालेल्या बदलांचे खूप सुरेख वर्णन ह्या कादंबरीत चितारले आहे.तेग्या हा गावचा नाईक असतो आणि ही वाटमारी किंवा दरोडे त्याच्या नेतृत्वाखाली घातले जातात.गावात ह्या तेग्याचा मोठा दरारा.कादंबरीच्या सुरुवातीलाच असे दाखविले आहे की,तेग्या जंगलातून वस्तीच्या रोखाने परतत असतांना,त्याला नदीच्या पाण्यात काही खळबळत असल्याची चाहूल लागते.त्याला वाटते कुणी तरी जंगली जनावर असावे.म्हणून तो शिकारीच्या उद्देश्याने तिकडे वळतो.तर नदीच्या काठाला एक व्यक्ति उभी असल्याचे त्याला दिसते.ती व्यक्ति त्याच्या भात्यातले मासे आपल्या स्वतःच्या घोंगडीच्या खोळीत टाकताना दिसते.तो त्या व्यक्तीस तसे करण्यापासून आडवायला जातो.तर त्याच्या लक्षात येत की,ती व्यक्ति म्हणजे एक स्त्री आहे.ती 15-16 वर्षाची एक तरुणी असते.ती सहजासहजी त्याचे मासे परत देत नाही.तिच्याशी झटापट करताना,त्या तरुणीच्या लक्षांत येते की,तेग्याची फरशी (हल्ला करण्यासाठीचे शस्त्र) ही झाडांत अडकली आहे.ती शिताफीने ती फरशी मिळविते आणि तेग्यावर उगारते.मी चेन्नटी गावच्या कल्लूची नात आहे अशी आपली ओळख देत, ती त्याची फरशी नदीत फेकून दिसेनाशी होते. तेग्या काही काळ तसाच उभा रहातो.तो बेरवाडीचा नायक असतो,म्होरक्या असतो.त्याला एका तरुणीने फसवावे आणि डोळ्या समोर त्याची फरशी घेऊन जावे.हे त्याला फारसं रुचत नाही.तो बेरडवाडीत येतो.तिथे तो त्याचा मामा मल्ला सोबत रहात असतो.घरी पोहोचल्यावर त्याचा मामा फरशी बद्धल विचारतो.(ती त्याच्या वडिलांकडून आलेली वारसाने फरशी असते) तो खोटच सांगतो की चंद्रोजीस दिली.ते मामाला पटत नाही. तेग्या विचार करीत असतो की,आई गेल्यावर गेल्या काही वर्षात घरात कुणी बाई माणूस नाही.तो मामाला म्हणतो त्याला लग्न करायचे आहे.तो घडलेली सगळी हकीकत त्याला सांगतो आणि चेन्नटी गावची कल्लूची नात आहे. तिच्या बाबत काही माहिती आहे का विचारतो.मामा त्याला तिच्याशी लग्न करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो.कारण तिच्या भांडकुदळ स्वभावाची मामाला कल्पना असते.पण तेग्या हट्ट धरून असतो की तरी त्याला तिच्याशीच लग्न करायचे आहे.ते दोघे चेन्नटीला जातात.कल्लूला मागणी घालतात.कल्लू तेग्याच्या वडिलांचा खास मित्र असतो.कल्लू लग्नाला तयार देखिल होतो.पण त्याची नात,नागी तिचं नांव असते,ती त्याला विरोध करते.ते दोघेही कल्लूला खूप खूप बोलून निघून जातात.कल्लू त्यांचा गावाच्या वेशी पर्यन्त पाठलाग करतो आणि म्हणतो की तुम्ही तिला रात्री पळवून घेऊन जा.कारण ती तशी तयार होणार नाही.माझी काही तक्रार नाही.दोघांना ते पटते.ते दोघे आणि चंद्रोजी असे तिघेही तिला चेन्नटीला जाऊन पळवून घेऊन येतात.दुसऱ्या दिवशी सकाळी ती घरात दिसत नाही तेव्हा ती पळून गेली असे वाटते.कारण ती घरांत कुठेच नसते.तेग्या आणि मल्ला शोधाशोध करू लागतात.तेग्या आणि मल्ला चेन्नटीला जाऊन कल्लूला विचारतात की तिथे आली कां,पण ती तिथे नसते. तेग्या घरी येतो तर ती घरांत असते.ती त्याला स्वयंपाक करण्यासाठी लाकडे आणायला गेली होती असे सांगते.शेवटी ते दोघे एकमेकांना स्वीकारतात. काळू हा खबऱ्या असतो.तो वाटमारीसाठी सावज आल्याची खबर देत असतो.एकदा चुकीची खबर आणल्याने तेग्याच्या मालकाच्या,इनामदाराच्या बैलगाड्यावर दरोडा टाकला जातो.त्यात इनामदाराची पत्नी असते.तिला पाहून तेग्या त्यांचा लुटलेला ऐवज परत करतो. इनामदारास न सांगण्याचे वचन घेतो.पण त्यांचा गडी बाळू सावकारास सर्व सांगतो. दसऱ्याला,तेग्या नेहमी प्रमाणे इनामदारास बिदागी मागण्यास जातो.इनामदार त्याला हाकलून देतात.तो माफी मागतो पण इनामदार एका अटीवर तयार होतो.तो म्हणतो सरोळीचा पाटील माझा वैरी आहे,त्याचा काटा काढ.तो तयार नसतो. कारण त्याचा जिगरी मित्र चंद्रोजी,पाटलाकडे कामाला असतो.पण तेग्या शेवटी तयार होतो.तो पाटलाचा खून करतो.इनामदार शब्द फिरवितो.त्याला वाचवत नाही आणि रु.5000/- ही देत नाही.त्याला पोलिस पकडून नेतात.त्याचा मित्र काळू त्याच्या साठी वकील करून त्याची फाशी टाळतो.पण तरी जन्मठेप होतेच.त्याची बायको नागी गर्भार असते.तो तिकडे जेल मधे असतांना,इकडे नागी मुलाला जन्म देते.13 वर्षाने तेग्या सुटून येतो तो पर्यन्त मुलगा ईश्वरा मोठा झालेला असतो. तेग्या घरी येतो.तेव्हा बरेच काही बदललेले असते. तो परत आल्या नंतर काही महिन्यातच नागी जळून मरण पावते. देशाला स्वातंत्र मिळालेले असते.त्यामुळे वाटमारीला आळा बसतो.वन विभागाचे काम सुरू होते. वृक्षतोड ऐवजी वृक्षसंवर्धनावर जोर दिला जातो.तेग्याचा मुलगा गावात एक गुरुजी असतात.त्यांच्या संपर्कात येतो.त्यांचे शिष्यत्व पत्करून त्याचे परंपरागत व्यवसाय बंद करतो.हळूहळू त्या गावातील सर्व परंपरागत व्यवसाय बंद होत जातात.लोक उदरनिर्वाहासाठी गावं सोडून बाहेर गांवी जातात. ह्या कादंबरीचा शेवट हा विशेष असा twist and turn वगैरे असलेला नाही. पण माझी इच्छा आहे की ही कादंबरी तुम्ही जरूर जरूर वाचली पाहिजे ह्या साठी शेवट सांगत नाही. मला खरोखर आश्चर्य वाटते की, ह्या कादंबरीवर आधारित एखादा चित्रपट कसा आला नाही किंवा आला असेल तर मला माहित नाही.मित्रांनी प्रकाश टाकावा. ...Read more

  • Rating StarPreeti Abnave

    बारी लेखक :रणजित देसाई प्रकाशन :मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या :180 " स्वामी"कार रणजित देसाई यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपैकी ही एक अप्रतिम कादंबरी. कोल्हापूर ते बेळगाव दरम्यानचा जगंलातील दाट झाडींनी वेढलेला रस्ता म्हणजेच बार ! दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. "बारी" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी ! ...Read more

  • Rating StarNitesh Patil

    #बारी - रणजित देसाई साधे सरळ आयुष्य किती नेटानं जगलो मी नवी आली क्रांती अन किती फरफटलो मी बारी ही रणजित देसाई यांची पहिली कादंबरी. वी.स. खांडेकरांनी तिचं प्रास्ताविक लिहिलंय. त्यांच्याच शब्दात म्हणायचं तर... लेखक व त्याच्याशी अपरिचित असलेला वाक यांच्यात जो अन्तरपाट असतो तो मंगलाष्टके म्हणून दूर करण्याकरिता प्रस्तावनकाराची आवश्यकता असते. आणि ते अगदी सूचक पद्धतीने प्रस्तावनेत मांडले आहे. कादंबरी बद्दल म्हणायचं झालं तर... एक बेरड समाजातील तेग्या या कादंबरीचा नायक आहे. यंत्रयुगाकडे वाटचाल करतांना, त्याच्या समाजातील, जीवनातील होणाऱ्या बदलाची आणि त्या बदलामुळे शेवटी सर्वस्व हिरावून गाव तरुणमुक्त होते आणि गावात सरतेशेवटी म्हातारेच कुढत राहतात असा केविलवाणी प्रवास, बेरड जमातीचे परंपरागत जीवन, त्या जीवनात होऊ घातलेली स्थित्यंतरे आणि या जमातीच्या भवितव्याची काळजी या कादंबरीत आहे. आयुष्य संपणार कधीतरी, मी जाणूनच आहे तूर्त ओझे आठवणींचे फार मज छळते आहे रानात पलोत्याच्या उजेडात दिसलेली नागी, त्याच्या मनाला भुरळ घालते. लग्नास तयार नसतानाही, तिच्या बाप संमतीने पळवून आणतो आणि लग्न करतो. दरोडा टाकण्याचा परंपरागत धंदा, आणि गावाचा नाईक असलेला तेग्या, एकवार चुकून सावकाराच्या बैलगाडीवरच दरोडा घालतो. ज्याकडे तो इमाने चाकरी करत होता. अर्थात ते कळल्यावर काही नुकसान न करता तो गाड्या सोडतो. पण नियती त्याच्याकडून त्याची खूप मोठी किंमत वसूल करते. सावकार त्याला शपतेत अडकवून, तुला काहीच होणार नाही ह्या शर्तीवर पाटलाचा खून करवतो. भोळ्या तेग्याचा जीव भांड्यात सापडतो आणि तो खून करतो. त्यात त्याचा मित्र पण ओढला जातो. त्याच्या पच्छात गावाचा नाईक त्याचा मुलगा ईश्वरा असतो. अकरा वर्षे कारावास भोगून येतो तेव्हा गावाचं चित्र पालटलेलं असतं. सावकाराला जाब विचारायला जातो आणि सावकाराची बायको त्याला शपतेत अडकवते. पोराचं लग्न करतो आणि त्याच दिवशी त्याच्या घराला आग लागते आणि नागी त्यात सुनेला वाचवून स्वतः मात्र जळून मरते. जंगलात एक दिवस वणवा लागतो तो युक्तीने सारेजण विझवतात. आणि तेव्हा पासून त्यांच्या आयुष्यात एका तंत्रयुगाची एन्ट्री होते. त्यांचे आयुष्य एक अदृश्य वणव्यात दिवसोदिवस होरपळत जाते. हळूहळू गावाचं गावपण राहत नाही. गावात माणसं राहत नाही. आणि त्यांनी जीवापाड जपलेलं जंगलही बोडकं होऊन जातं. शब्दाला जागलो मी, काय माझा गुन्हा काळोखच राहिला, पदरी माझ्या पुन्हा ©___नित (नितेश पाटील) ...Read more

  • Rating StarManasi Saroj

    "असंल हतच कुटतरी,पण लगमा कुटं दिसत न्हाई?तुमच्या संगच गेली व्हतं नवं जंगलात? "व्हय!जंगलात गार्डानं गाठलं अमास्नी!त्येनंच लगमाला ठिवून घेटलं मागं-" हा एक आणि असे अनेक प्रसंग अगदी मोजक्या शब्दांत तुरुतुरु पळताना बारी ही कादंबरी पूर्ण संपायची प्रचड ओढ लागते.तेग्या म्हणजे लगमाचा सासरे आणि ईश्वऱ्या म्हणजे तिचा पती...यांचे प्रसंग झटक्यात मनात हजारो विचार आणून ठेवतात.तेग्याच्या आयुष्यात घडलेल्या एकेक प्रसंगाचा ठाव घेता येतो.तेग्याची लगमाला सोडवून आणण्यासाठीची लगबग तीव्र तिखट शब्दांत दिसून येते.तिचं एवढसं लेकरू सिद्दा एक दिवस वाट विसरते आणि घरात सगळेजण त्याच्या शोधात चिंता करत असतात..तिथे त्यांचं भयात जगणं दिसून येतं... कादंबरीच्या शेवटी तेग्या नातवाला जुन्या आठवणींची गोष्ट सांगत होता. त्या बारीतून रात्री जाण्याची कोणाची हिंमत होत नसे इतके वर्चस्व या बेरड जमातीचे त्या वाटेवर होते.पण तरीही कादंबरी संपताना पश्चात्ताप या संपूर्ण कथेत दिसतो. कादंबरीचा नायक तेग्या हे व्यक्तिचित्रण अतिशय सुंदररित्या लेखकाने रंगवले आहे.लेखकाची पहिली कादंबरी असली तरीही एखाद्या जुन्या सराईत लेखकासारखे लेखन खुलले आहे. हॉलीवूडसारख्या श्रीमंत कथापट लिहीणार्या लेखकालाही कथेची ओढ लागेल इतके सुंदर शाब्दिक वर्णन या कथेत वाचायला मिळते. ही कथा नाहीच..तेग्या, लगमा आणि ईश्वऱ्याच्या रुपात बेरड जमातीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या व्यक्तिरेखांचा हा कोलाज आहे हे नक्कीच! कथाकार म्हणून साहित्यिक कारकीर्द सुरू करणाऱ्या श्री रणजित देसाई यांची पहिली कादंबरी म्हणजे `बारी` . कथा व कादंबरी हे साहित्यप्रकार मुलत: भिन्न प्रकृती धर्माचे आहेत त्यामुळे या दोन्ही साहित्य प्रकारांवर प्रभुत्व असलेले सव्यसाची ललित लेखक हाताच्या बोटांवर मोजण्याएवढेच आढळतात. श्री रणजीत देसाई त्यांच्यापैकीच एक. आपल्या दृढ परिचयाचा भौगोलिक भाग त्यांनी या कादंबरी करिता निवडला आहे. कोल्हापूर ते बेळगाव या रस्त्याच्या वाटेवर या नावाचं गाव लागतं तिथून काकती गावापर्यंतची पंधरा-वीस महिलांची अति दाट गहिऱ्या जंगलाने वेढलेली वाट ` सुतगड्डीची बारी` म्हणून ओळखली जाते. भर दुपारी अंधारून यावं असा हा भाग. त्या बारीची,त्या जंगलाच्या आसऱ्याने वाढणाऱ्या बेरड जमातीची ही कथा आहे. श्री. रणजीत देसाईंच्या रहिवास जन्मापासूनच खेड्यात झालेला आहे. आजही रात्रंदिवस ते यांच लोकांत वावरत आहेत. तिथल्या मातीतच त्यांची कला मूळ धरीत आहे. त्यामुळे ही कादंबरी म्हणजे सुरेख शहरी कुंडीत लावलेले खेडेगावातले फुलझाड नाही. प्रसंगांचा, निसर्गाचा, भावविश्वाचा, भाषाशैलीचा आणि या जीवनावरची जिची छाया पडली आहे त्या समस्येचा अस्सलपणा या कादंबरीत अधिक प्रमाणात आहे. या ग्रामीण जीवनात जी सामाजिक, आर्थिक, राजकीय, यांत्रिक, शैक्षणिक अशी सर्वंकष स्थित्यंतरं होत आहेत, ती सारी कधी विकट हास्य करीत तर कधी कारुण्यानं काजळून जात लेखकापुढे प्रकट होत आहेत. या जीवनाविषयी त्याला आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, पोटतिडीक आहे, या जीवनाचाच एक लहानसा भाग असलेलं, बेरड जमातीचं परंपरागत जीवन, त्या जीवनात होऊ घातलेली स्थित्यंतरं आणि त्या जमातीच्या भवितव्याविषयीची काळजी या सर्वांतून `बारी` स्फुरली आहे, फुलली आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book