* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ASHI MANE ASE NAMUNE
  • Availability : Available
  • ISBN : 9789386454751
  • Edition : 6
  • Publishing Year : JANUARY 1975
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 152
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
  • Available in Combos :SHIVAJI SAWANT COMBO SET - 10 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHIVAJI SAWANT IS KNOWN FOR HIS FICTIONS BASED ON HISTORICAL & MYTHOLOGICAL CHARACTERS , BUT HE ALSO PORTRAITS REAL LIFE HERO’S WITH SAME INTENSITY . THE BOOK ‘ASHI MANE ASE NAMUNE’ IS GREAT EXAMPLE OF HIS UNDERSTANDING OF HUMAN CHARACTERS & THEIR PRESENTATION IN THE LITERARY FORM. HE WAS BORN IN A SMALL FARMER FAMILY OF AAJRA VILLAGE IN KOLHAPUR DISTRICT IN MAHARASHTRA. HE FINISHED HIS SCHOOL EDUCATION IN VYANKATRAO HIGH SCHOOL AJARA. HE WORKED WITH RAJARAM PRASHALA, KOLHAPUR AS A TEACHER FOR 20 YEARS. DURING THESE GLORIOUS YEARS OF HIS LIFE HE CAME ACROSS VARIOUS HUMOROUS PERSONALITIES, WE CAN MEET THEM IN THIS BOOK.
‘अशी मने असे नमुने’ हा शिवाजी सावंत यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला व्यक्तिचित्रसंग्रह आहे. आजरा हे त्यांचं मूळ गाव. या गावातील त्यांच्या स्मरणातील व्यक्तींचं व्यक्तिचित्रण त्यांनी या संग्रहातून केलं आहे. आधी त्या व्यक्तीचं बाह्य वर्णन, मग त्या व्यक्तीचा लेखकाशी असलेला संबंध, त्या व्यक्तीशी संबंधित काही प्रसंग, त्यात त्या व्यक्तीचं वेगळेपण किंवा खास वैशिष्ट्य दर्शवणारा एखादा प्रसंग आणि त्या व्यक्तीबाबतची सद्य: परिस्थिती अशा पद्धतीने ही व्यक्तिचित्रे साकारली आहेत. लेखकाचे बालमित्र कांत्या आणि शंकऱ्या, नाटकात शिवाजीची भूमिका करणारा गणपा, शाळेत शिपाई असलेला मामू, शिकारी असलेला नारायण पावणा, समाजसेवक असलेले काका गवंडळकर अशा विविधरंगी व्यक्ती या व्यक्तिचित्रसंग्रहातून भेटतात. तर या व्यक्तींना भेटण्यासाठी, वैशिष्ट्यपूर्ण भाषेसाठी आणि भावनांची आंदोलने अनुभवण्यासाठी प्रत्येकाने हा व्यक्तिचित्रसंग्रह नक्कीच वाचला पाहिजे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#अशी मने असे नमुने #छावा #छावा #कांचनकण #कवडसे #मोरावळा #मृत्युंजय-नाटक #शेलका साज #युगंधर #ASHI MANE ASE NAMUNE #CHHAVA - NATAK #CHHAWA #KANCHANKAN #KAVADASE #MORAVALA #MRUTYUNJAY - NATAK #SHELKA SAJ #YUGANDHAR
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 01-07-2018

    तांबड्या मातीतली नमुनेदार माणसे... शिवाजी सावंत हे नाव उच्चारले की, ‘मृत्युंजय’कार हे शब्द आपोआपच आपल्या मनात येतात. महारथी कर्णावर ‘मृत्युंजय’, छत्रपती शंभूराजांवर ‘छावा’ आणि भगवान श्रीकृष्णावर ‘युगंधर’ अशा तीनच महाकादंबऱ्या शिवाजी रावांनी लिहिल्या पण त्या तीनही साहित्यकृतींनी त्यांना अमाप यश आणि वाचकांना भरभरून आनंद दिला. ‘मृत्युजंय’ची अनेक भाषांमध्ये भाषांतरे झाली. तर ‘मृत्युंजय’ आणि ‘छावा’ यांवर स्वत: शिवाजीरावांनीच नाटकेही लिहिली. २००२ साली वयाच्या ६२व्या वर्षी शिवाजीराव मरण पावले. म्हणजे आता त्यांना जाऊनही सोळा वर्षे उलटली. पण त्यांच्यावरील तीनही साहित्यकृतींची लोकप्रियता जराही उणावलेली नाही. प्रस्तुत ‘अशी मने असे नमुने’ हे पुस्तक मात्र कादंबरी नसून ललित व्यक्तिचित्रांचा संग्रह आहे. शिवाजीराव मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा या गावचे. त्यांचा जन्म आणि सगळी घडण आजरा गावच्या लाल मातीत झाली. महारथी कर्ण आणि भगवान श्रीकृष्ण रंगवताना शिवाजीराव अत्यंत मधूर अशी संस्कृतप्रचुर मराठी भाषा वापरतात. छत्रपती शंभूराजे उभे करताना ते शिवकालीन मराठी वापरतात. अभिजात अशी शब्दसंपत्ती आणि ओघवती शैली ही तर त्यांची वैशिष्ट्ये. तेच शिवाजी सावंत ही व्यक्तिचित्रे रंगवताना अस्सल लाल मातीतली भाषा वापरतात. घाट आणि कोकण यांच्या ऐन कण्यावर वसलेल्या आजरा गावच्या लाल मातीतला जिव्हाळा लेखकाच्या अंगी पार मुरून गेला आहे. कांत्या, गणपा, संतू, तातू अशी नमुनेदार व्यक्तिचित्रे काढताना लेखकाच्या शब्दकळेतून तोच जिव्हाळा ओसंडून आलेला दिसतो आणि तो इतका अस्सल, उमाळ्याने आलेला असतो की, वाचक ती व्यक्ती, ते वातावरण, ती भाषा आणि ते गाव यात पार गुंतून, रंगून जातो. ही व्यक्तिचित्रे प्रथम फुटकळ स्वरूपात वेगवेगळ्या नियतकालिकांत प्रसिद्ध झाली होती. प्रस्तावनेत लेखक आपल्याला सांगतो की, ‘खडकावरची म्हातारी’ हे व्यक्तिचित्र ‘मराठा’मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी दिल्यावर ते वाचून खुद्द आचार्य अत्र्यांचे डोळे पाणावले होते. एकंदरीत पुस्तक वाचनीय आणि संग्राह्य. मांडणी, मुद्रण, मुखपृष्ठ यांसह मेहता प्रकाशनाची निर्मिती सुबक. – मल्हार कृष्ण गोखले ...Read more

  • Rating Starसकाळ १५.१०.१७

    सावंत यांच्या साहित्यविषयक वाटचालीत आजरा या गावाचं योगदान फार महत्वाचा आहे. याच गावात भेटलेल्या नमुनेदार व्यक्तींचं चित्रण सावंत यांनी केलं आहे. अतिशय सूक्ष्म निरीक्षण आणि सावंत यांची खास शैली यामुळं ही व्यक्तिचित्रण सुरेख झाली आहेत.

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book