* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE BLIND LADYS DESCENDANTS
  • Availability : Available
  • Translators : SHYAMAL CHITALE
  • ISBN : 9789387319998
  • Edition : 1
  • Publishing Year : APRIL 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 256
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : NOVEL
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
BORN TO SILENTLY WARRING PARENTS, AMAR HAMSA GROWS UP IN A CRUMBLING HOUSE CALLED THE BUNGALOW, ANTICIPATING TRAGEDIES AND IGNOMINIES. TRUE TO HIS DARK PREMONITIONS, BAD LUCK SOON STARTS CASCADING INTO HIS LIFE. AT TWENTY-SIX, HE DECIDES TO NARRATE HIS STORY TO AN IMAGINARY AUDIENCE, AND SKELETONS TUMBLE OUT OF EVERY CUPBOARD IN THE BUNGALOW.
"हम्सा आणि अस्मा या जोडप्यांची मुलं सोडली, तर त्या दोघांचं मिळून एकत्र म्हणावं असं काहीच नाही. अमर त्यांचा सगळ्यात धाकटा मुलगा. तो त्याच्या मामासारखा दिसतो. मामा आता या जगात नाही. अमरला एक रूपगर्विष्ठ बहीण आहे, जसिरा. त्याचा अकमल नावाचा भाऊ भलत्याच मार्गाला लागलाय. कर्मठ धर्म पाळता पाळता तो अतिरेकी बनतोय. त्याच्या सोफिया नावाच्या बहिणीचा बुडून अपघाती मृत्यू झालाय. एके काळी समृद्ध असणाऱ्या या कुटुंबाला उतरती कळा लागलीय. आपल्या आयुष्याला ते तोंड कसं देतायत, तेच या कादंबरीत सांगितलंय. दोन्ही भावांचा सुन्ता समारंभ आणि जसिराची शादी सोडली, तर त्यांच्या आयुष्यात सुखाचे प्रसंग येत नाहीत. शाळेच्या दिवसांपासून अमरचा संदीप नावाचा मित्र आहे. त्याचा अमरच्या आयुष्यावर बराच प्रभाव आहे. जसिराची शादी पार पाडण्यासाठी आंधळ्या आजीला फसवून तिचं घर विकतात आणि नंतर ती अमरच्याच घरी राहायला येते. अमरचं घर आणि आसपासचा परिसर याचं तपशीलवर वर्णन येतं. तिथंच तर बहुतांश कथानक घडतं. त्यांच्या छोट्याशा गावाच्या साध्याशा जीवनाचं परिणामकारक वर्णन केलंय. जसिराच्या शादीच्या वेळी घराची साफसफाई करत असताना त्यांच्या हाती फोटो लागतात. त्यामुळे अमर आणि त्याचा मामा यांच्या आयुष्यात असणारी समानता स्पष्ट व्हायला लागते. अमरची आत्या, तिची मुलगी जसिरा, संदीप, अमरच्या वडिलांचं दुसरं कुटुंब इत्यादी उपकथानकंही आहेत, त्यामुळे अमरच्या स्वभावचित्रणात भर पडते आणि कथानकही पुढे सरकतं. शेवटी अमरचं भविष्यही त्याच्या मामासारखं ठरतं. सविसाव्या वर्षी आत्महत्या. खरं तर, सुरुवातीलाच आपल्याला शेवटाची स्पष्ट कल्पना दिलीय. तरीही कथानकाची मांडणी आणि भाषाशैली आपल्याला गुंतवून ठेवते. "

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ANDHLYABAICHEVANSHAJ #THEBLINDLADYSDESCENDANTS #आंधळ्याबाईचेवंशज #NOVEL #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SHYAMALCHITALE #ANEESSALIM "
Customer Reviews
  • Rating StarKIRAN BORKAR

    ही आहे एका मुस्लिम कुटुंबात घडणारी कथा . कथेत एक आंधळी आजी आहे . तिच्या घरात ... मुलगी ..जावई ..आणि तिची नातवंडे राहातायत. तिचा एक नातू अमर या कथेचा नायक. तो नास्तिक आहे . नमाज पडणे त्याला मान्य नाही . आपला भाऊ आणि बहिणीबद्दल त्याला फारसे प्रेम नाही. स्वतःच्या स्वप्नरंजनात तो मग्न आहे .त्याने आपल्या मोठ्या बहिणीचा अपघाती मृत्यू अनुभवला आहे . तर नानीला झोपेचे औषध खिरीतून पाजताना आईला पाहिले आहे .वडिलांचा हृदविकाराच्या धक्क्याने झालेला मृत्यू पहिला आहे . वयाच्या सव्वीसाव्या वर्षी तो आपली कथा काल्पनिक श्रोत्यांना सांगतोय आणि या कथेतून बऱ्याच आठवणी बाहेर पडतात .हे पुस्तक म्हणजे एका कुटुंबाची गुंतवून टाकणारी कथा आहे . एका कुटुंबाची जगण्यासाठीची धडपड...भीती...कष्ट ...महत्त्वाकांक्षा अश्या सर्व गोष्टी आहेत . नायकाने ही कथा सांगताना विनोदाचा साज चढविला आहे . त्यामुळे त्यांचे संवाद वाचताना खूप हसू येते . "द हिंदू "चे 2013 सालचे पुरस्कार प्राप्त सर्वोत्कृष्ट पुस्तक . ...Read more

  • Rating StarTEJA KULKARNI

    नुकतेच वाचून सम्पवलं. एकदा वाचण्याजोगे आहे. एका कुटुंबाचे अधःपतन नर्म विनोदी पद्धतीने लिहिले आहे. अनुवादही चांगला आहे, त्यामुळे वाचावेसे वाटते.

  • Rating StarDAINIK LOKMAT 07-04-2019

    करुण विनोदाने भरलेली कादंबरी... ‘व्हॅनिटी बॅग’चे लेखक अनीस सलीम यांच्या ‘द ब्लाइंड लेडीज डिसेंडट्स’ या इंग्रजी कादंबरीचा ‘आंधळ्या बाईचे वंशज’ या नावाने मराठी अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. कादंबरीची कथा एका भारतीय मुस्लीम कुटुंबाची असून, यात त्या मुस्लीमकुटुंबाच्या रोजच्या आयुष्यातील धडपड, भीती आणि महत्त्वाकांक्षा रंगवल्या आहेत. अमर हा या कादंबरीचा नायक असून, सव्विसाव्या वर्षी फ्लॅशबॅक पद्धतीने तो आपली कहाणी सांगतो आहे. रेल्वे रुळाच्या जवळ जुन्या-पुराण्या घराला बंगला संबोधून तो कहाणी सांगू लागतो आणि बंगल्यातल्या प्रत्येक कपाटातून बाहेर येऊन आठवणींची भुते नाचू लागतात. अमरला आपलं आयुष्य दुर्घटनांच्या फेऱ्यातच गरगरत राहणार आहे, अशी भीती नेहमी वाटायची. पुढे दुर्दैवानं ही भीती सत्यात उतरते. करुण विनोदानं भरलेली ही कादंबरी वाचकाला गुंतवून ठेवते. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 24-06-2018

    कटुता रेंगाळत ठेवणारी कलाकृती… ‘द ब्लाइंड लेडीज डिसेंडंट्स’ या अनीस सलीम यांच्या कादंबरीचा ‘आंधळ्या बाईचे वंशज’ या नावाने श्यामल चितळे यांनी मराठीत अनुवाद केला असून, तो मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केला आहे. ही एका कुटुंबाची गुंतवून टाकणारी कथा आे. त्यात एका भारतीय मुस्लीम कुटुंबाच्या रोजच्या आयुष्यातील धडपड, भीती आणि महत्त्वाकांक्षा रंगविल्या आहेत. तसंच कुटुंबाचं पूर्ण अध:पतनही वर्णन केलं आहे. कारुण्याला विनोदाचा साज चढवून गुंतवून ठेवणाऱ्या या कादंबरीची कथा एखाद्या उमरावकथेच्या थाटात उलगडत जाते. अमर हम्साचा जन्म एकमेकांशी अबोला धरलेल्या आणि कायम युद्धाच्या पवित्र्यात असणाऱ्या पालकांच्या पोटी झाला. आपलं आयुष्य दुर्घटना आणि बदनामी यांनी भरलेलं असणार, असं त्याला नेहमी वाटायचं आणि त्याच्या मनात येणाऱ्या उदास कल्पना खऱ्याच ठरल्या. सव्विसाव्या वर्षी तो कल्पनेतल्या श्रोत्यांना आपली कहाणी ऐकवायचं ठरवतो आणि बंगल्यातल्या प्रत्येक कपाटातून बाहेर येऊन भुतं नाचायला लागतात. कादंबरीत लेखकानं त्या कुटुंबातील रोजच्या जीवनाचे तपशील बारकाईनं टिपले आहेत. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more