* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AMINA
  • Availability : Available
  • Translators : UDAY BHIDE
  • ISBN : 9788184980875
  • Edition : 2
  • Publishing Year : OCTOBER 2009
  • Weight : 239.00 gms
  • Pages : 264
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE MOVING STORY OF A WOMAN WHO CHALLENGES THE RESTRICTIONS OF THE LIFE SHE IS BORN INTO, AND IN SO DOING HELPS TO BRING ABOUT CHANGE FOR MORE THAN JUST HERSELF. IT ILLUMINATES ISSUES WHICH RARELY APPEAR IN FICTION BUT WHICH STRUCTURE THE LIVES OF MILLIONS OF WOMEN - THE LEGAL STATUS OF MUSLIM WOMEN, THE LIMITATIONS IMPOSED ON THEM BY TRADITIONAL AND RELIGIOUS CONVENTIONS, THE RESTRICTIONS ON THEIR ECONOMIC ACTIVITIES, THE HUMILIATIONS VISITED ON THEM AS A RESULT OF UNQUESTIONED MALE POWER IN PERSONAL RELATIONSHIPS. IT ENGAGES THE READER`S SYMPATHY THROUGH ITS BELIEVABLE PORTRAYAL OF ONE REMARKABLE CONTEMPORARY WOMAN. WRITTEN WITH THE PASSION BORN OF REAL EXPERIENCE, THIS REMARKABLE PORTRAYAL THROUGH THE EYES OF A WOMAN BY A NORTHERN NIGERIAN MAN LEAVES THE READER WITH HOPE FOR THE FUTURE. 1ST PUBLISHED IN ENGLISH BY AFRICA WORLD PRESS, NEW JERSEY, AMINA HAS BEEN TRANSLATED INTO 20 LANGUAGES - GREEK, SERBIAN, ARABIC, AZERI, URDU, HINDI, MALAYALAM, TAMIL, BAHASA INDONESIA, KOREAN, MARATHI, PUNJABI, RUSSIAN, SPANISH, FINNISH, ESTONIAN, KANNADA, HAUSA, VIETNAMESE AND CHINESE. IT HAS BEEN RECEIVED BY THOUSANDS OF WOMEN AND MEN AS A BOOK THAT `TELLS IT AS IT IS.`
नायजेरियाच्या उत्तर भागातील लेखकांनी इंग्रजीत लिहिलेल्या कादंब-यांची संख्या अत्यल्पच आहे, त्यामुळे अशा प्रकारची एखादी कादंबरी प्रकाशित होणे म्हणजे साहित्यिक विश्वातली एक महत्त्वाची घटनाच ठरते. कथानायिका आणि तिच्या साथीदारांनी नायजेरियाच्या समाजव्यवस्थेतील महिलांच्या परिस्थितीत बदल घडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या या नाट्यपूर्ण कथेतून - कथा-कादंबNयांतून अभावानेच आढळणारा राजकीय समस्यांचा आलेख - मुस्लीम महिलांचे कायद्याच्या दृष्टीने असलेले स्थान, परंपरांनी आणि धार्मिक रूढी, समजुतींनी त्यांच्यावर लादलेल्या मर्यादा, आर्थिक व्यवहाराच्या कामांमधील त्यांच्या सहभागावर असणारी बंधने, भ्रष्ट पुरुषप्रधान समाजव्यवस्थेचे एकूणच समाजावर आणि विशेषत: स्त्रियांवर होणारे विघातक परिणाम, व्यक्तिगत आयुष्यातही पुरुषी ताकदीच्या बळावर महिलांना दिली जाणारी अत्यंत अपमानास्पद वागणूक- असा विस्तृत पट एका स्त्रीच्या दृष्टिकोनातून आपल्यासमोर उलगडतो. आत्मपरीक्षणातून बंधमुक्ती साधणा-या नायजेरियन स्त्रीची अत्यंत कल्पकतेने आणि कुशलतेने बांधलेली ही कथा आहे. ही कादंबरी निव्वळ सामाजिक दस्तऐवज न राहता वाचकाला त्यातील कथानायिकेच्या - अमिनाच्या सहवेदना भोगायला भाग पाडते. ‘अमिना’ ही एक अत्यंत सुयोग्य वेळी प्रकाशित झालेली कादंबरी आहे आणि हे कथानक इतक्या उत्तम रीतीने आपल्यासमोर आकार घेत जाते की त्याची तुलना ऐतिहासिक दंतकथांमधील १६व्या शतकातील झज्जाऊ येथील साहसी राणी हौसा आणि अमिना यांच्या आयुष्याशी केल्याशिवाय आपण राहात नाही. नायजेरियामध्ये बदल घडून येण्यास वाव आहे असा आशेचा किरण ही कादंबरी निश्चितच दाखवते.
आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्रातर्फे उत्कृष्ट अनुवादासाठी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार २००८-०९
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #AMINA #AMINA #अमिना #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #UDAYBHIDE #उदयभिडे #MOHAMMEDUMAR
Customer Reviews
  • Rating StarDAINIK PRABHAT 21-02-2010

    नायजेरियातील महिलांचा आक्रोश... नायजेरियासारख्या फारशा प्रकाशात नसलेल्या भागातील ही साहित्यकृती आहे. धार्मिक रूढी, परंपरा आणि त्यामुळे महिलांना मिळणारी अपमानास्पद वागणूक याबद्दलचे वर्णन अमिना या कादंबरीत येत राहते. महिलांवर होणारे अत्याचार आणि अजिबा हालचाल करता न येणारी परिस्थिती याचा परखड लेखाजोखा या कादंबरीत प्रामाणिकपणे आला आहे. ‘अमिना’ या मोहंमद उमर यांच्या पुस्तकाचा उदय भिडे यांनी केलेला अनुवाद महिलांच्या मानसिकतेवर प्रकाश टाकतो. नायजेरियातील महिलांवर टाकलेली बंधने त्यांनी कुशलतेने मांडली आहेत. परखड भाषेत मांडलेला हा आविष्कार आपल्याला अंतर्बाह्य हलवतो. ...Read more

  • Rating StarDAINIK PUNYANAGARI 7-2-2010

    `अमिना` या मोहम्मद उमर यांच्या पुस्तकाचा उदय भिडे यांनी केलेला अनुवाद महिलांच्या मानसिकतेवर प्रकाश टाकतो. नायजेरियातील महिलांवर टाकलेली बंधने त्यांनी कुशलतेने मांडली आहेत. परखड भाषेत मांडलेला हा अविष्कार आपल्याला अंतर्बाह्य हलवतो.

  • Rating StarDAILY SAKAL 4-4-2010

    नायजेरियासारख्या फारशा प्रकाशात नसलेंल्या भागातील ही साहित्यकृती. धार्मिक रूढी, परंपरा, महिलांवरची असह्य बंधन यांचं हे कुशलतेनं केलेलं प्रामाणिक कथन आहे. मोहंमद उमर यांचा हा कथाविष्कार वाचकाला अंर्तमुख करतो.

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more