* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ADOLF HITLER
  • Availability : Available
  • ISBN : 9789386888556
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 368
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :ATUL KAHATE COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AS THE MOST POPULAR PERSON OF THE TWENTIETH CENTURY, WE CAN NAME ADOLF HITLER. HITLER, WHO HAD BEEN SUBJECTED TO ACHIEVING THE ULTIMATE GLORY OF THE DEGRADED GERMANY IN WORLD WAR I, UNEXPECTEDLY PULLED DOWN THE POWER OF GERMANY AND TRIED TO DO SOMETHING THAT WOULD NOT WORK FOR THE WELFARE. AFTER SUCCESSIVELY ESTABLISHING A DOMINION OVER ONE COUNTRY, HITLER LOST ALL THE WORLD`S SLEEP. HIS DEVOTIONAL DREAM WAS BROKEN BUT LATER IN HIS GOVERNMENT CAREER FOR ONLY A DOZEN YEARS, HITLER ACTUALLY SHRUGGED OFF. IT IS IMPORTANT TO DEAL WITH THE LOSS OF THE JEWISH PEOPLE, BEHAVE VERY VICIOUSLY WITH OUR ENEMIES, SHOW GREAT UNBELIEF ON THEIR OWN COLLEAGUES, AND NOT TO SHOW PARTIALITY OF HUMANITY BY SPEAKING TO THEM. THE DICTATORSHIP AND MONARCHY FOUND THEIR STATUS IN HIS CAREER. MANY PEOPLE SEEM TO BE DORMANT ABOUT THE BADGE LEADING TO THE WORLD`S SECOND FASTEST WAR. IN FACT, HOW HITLER BECAME SO POPULAR AND WHAT IS SAID ABOUT IT EVEN TODAY, THIS DEEPLY DEBATED ISSUE OF THIS VERY IMPORTANT ISSUE IS DONE IN VERY SIMPLE LANGUAGE FOR MARATHI READERS OF ALL AGES. THE READERS OF THIS VIEW WILL ALSO BE ABLE TO SEE WHAT SHOULD BE DONE TO PREVENT THE CREATION OF HITLER IN THE NEW WORLD.
विसाव्या शतकामधला सगळ्यात गाजलेला माणूस म्हणून आपण अ‍ॅडॉल्फ हिटलरचं नाव घेऊ शकतो. पहिल्या महायुद्धात मानहानी झालेल्या जर्मनीला गतवैभव प्राप्त करून देण्याच्या ध्येयानं भारून गेलेल्या हिटलरनं अत्यंत अनपेक्षितरीत्या जर्मनीची सत्ता आपल्याकडे खेचून घेतली आणि भल्याभल्यांना जमणार नाही अशी कामगिरी करण्याचा चंग बांधला. एकामागून एका देशांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करत हिटलरनं सगळ्या जगाची झोप उडवली. त्याचं आसुरी स्वप्न मात्र नंतर भंगत गेलं. केवळ डझनभर वर्षांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत हिटलरनं अक्षरशः धुमाकूळ घातला. ज्यू लोकांचा संहार, आपल्या शत्रूंशी अत्यंत क्रूरपणे वागणं, आपल्याच सहकाऱ्यांवर विलक्षण अविश्वास दाखवणं, माणुसकीचा अंशही वागण्याबोलण्यातून न दाखवणं, अशा त्याच्या अनेक अवगुणांचं त्याच्या गुणांबरोबरच विश्लेषण करणं म्हणूनच महत्त्वाचं ठरतं. हुकूमशाही आणि एकाधिकारशाही यांचं थैमान त्याच्या कारकिर्दीत बघायला मिळालं. जगाला वेगानं दुसNया महायुद्धाकडे नेणाऱ्या या खलनायकाविषयी अनेक जणांना सुप्त आकर्षण वाटत असतं. मुळात हिटलर इतका लोकप्रिय कसा झाला आणि त्याच्याविषयी आजसुद्धा इतकं का बोललं जातं, या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याचा सखोल ऊहापोह अत्यंत सोप्या भाषेत सगळ्या वयोगटामधल्या मराठी वाचकांसाठी या पुस्तकात केला आहे. नव्यानं या जगात हिटलर निर्माण होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, यासाठीची दृष्टीही वाचकांना या निमित्तानं मिळेल!

No Records Found
No Records Found
Keywords
#ATULKAHATE#HITLER# "#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ADOLFHITLER #ADOLFHITLER #अ‍ॅडॉल्फ हिटलर #BIOGRAPHY #MARATHI #ATULKAHATE #अतुलकहाते "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 08-04-2018

    पुन्हा एकदा हिटलर... जगात जसे रावण, कंस आणि दुर्योधनाचे अवतार जेवढे क्रूर तेवढे लोकप्रिय का असतात? आधुनिक काळातील हिटलर काय किंवा सद्दाम, लादेन, इदी अमीन यांच्यासारखे राक्षस वर्षानुवर्षे सत्तेवर राहतात आणि इतिहास रक्ताने भरून टाकतात. अशा सत्तांध, नरधमांची चरित्रे किंवा आत्मचरित्रे प्रचंड प्रमाणात वाचली जातात, असे का? फ्रॉइडने म्हटले आहे, ‘प्रत्येक माणसात एक पशू लपलेला असतो.’ या विधानाचा प्रत्यय रोज छोट्या पडद्यावर बघायला मिळतो. ‘हिटलर’ हा असाच एक दानव होता, जो मानवाच्या जिवावर उठला होता. दरवर्षी हिटरलविषयक नवनवी पुस्तके येत असतात. जग जिंकण्याच्या लालसेने पिसाटलेला हा दैत्य अखेर ‘दो गज जमीन के नीचे’ गेला. पहिल्या महायुद्धात जर्मनी हरला होता, परंतु दुसऱ्या महायुद्धात त्या देशाने प्रचंड विजय मिळविला. या यशामागे होता हिटलर. अर्थात त्याचे चाहते त्याचे भक्तिभावाने समर्थन करतात, हा भाग वेगळा. ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नाच्या कला अकादमीत ते चित्रकला शिकत होते, पण नापास झाल्याने तिथे आणि म्युनिक (जर्मनी)मध्ये वयाची १८ ते २५ वर्षे वाया घालवली. वयाच्या तिसाव्या वर्षी तो एका राजकीय प्रवासाकडे निघाला आणि पुढे तब्बल २६ वर्षे तो सतत यश मिळवत गेला. त्याच्या आयुष्यात अनेक लावण्यवती आल्या. त्याला ठरावीक वेळी त्या हव्याशा वाटत. इतर वेळी तो अन् त्याचे राजकारण हेच महत्त्वाचे वाटत असे. या बारीकसारीक तपशिलांसह लेखकाने सखोल अभ्यास करून या चरित्रग्रंथाची वेगळी मांडणी केली आहे. हिटलरच्या अनेक उत्तम गुणांपैकी एका होता त्याचा अफाट वाचनाचा छंद. बेकारीच्या काळात त्याने जे असंख्य ग्रंथ वाचले होते त्यांचा उपयोग पुढे फार झाला. अर्थात वाचन कधीच वाया जात नाही? (हिंदुस्थानातले किती राजकारणी वाचन करतात याचा शोध घ्यायची गरजच नाही. अनेक घरांचे मालक असणारे मंत्री शाही घरात एक पुस्तक ठेवतील तर शपथ!) असो, हिटलरची जडणघडण त्याने स्वत:च केली. निग्रही वागणे, धाडसी स्वभाव, धैर्याबरोबर शौर्य आणि पराजय मान्य न करण्याची चिकाटी हे सद्गुण होते तर दुराग्रही वागणे, बदला घेण्याची क्रूर वृत्ती, कुणावरही विश्वास न ठेवण्याची सवय हे त्याचे दुर्गुण. या गुणदोषांचे बरे-वाईट परिणाम त्याला आणि त्याच्या सहवासात आलेल्या/असलेल्या अनेक निष्ठावंतांना भोगावे लागले. प्रस्तुत चरित्रग्रंथात कहाते यांनी हिटलरच्या गुणावगुणांचे समर्थपणे दर्शन घडवले असून त्याचे यश, त्याच्या चुका आणि यासंबंधी अनेक मुद्दे अधोरेखित केले असून त्याच्या शोकांतिकेनंतर काय काय घडले, हेही सविस्तर संदर्भासहित सांगितले आहे. ३० एप्रिल १९४५ या शुभविशी ईव्हा ब्राऊनसह त्याने दुपारी ३.३० वाजता आत्महत्या केली. पुढे त्याच्या साथीदारांनी काय केले. ते कुठे लपले व पळाले हेही चित्तथरारक प्रकरण आहे. रशियन सेनेने जर्मनी ताब्यात घेऊन युरोपात शांती प्रस्थापित कशी केली. जर्मन लोकांना हेही समले की, एका क्रूरकर्मा व्यक्तीच्या भूलथापांना भुलून आपण कंगाल झालो; पण तेव्हा उशीर कसा झाला होता, हा सारा इतिहास वाचायलाच हवा. – अरविंद दोडे ...Read more

  • Rating StarRanga Joshi

    हिटलर नसता तर ज्यु शास्त्रज्ञाना देश सोडावा लागला नसता आणि अजूनही चांगले चांगले शोध लागून मनुष्य सृष्टी आनंदी झाली असती

  • Rating Star‎Amruta Chougule

    विसाव्या शतकामधला सगळ्यात गाजलेला माणूस म्हणून आपण अ‍ॅडॉल्फ हिटलरचं नाव घेऊ शकतो. पहिल्या महायुद्धात मानहानी झालेल्या जर्मनीला गतवैभव प्राप्त करून देण्याच्या ध्येयानं भारून गेलेल्या हिटलरनं अत्यंत अनपेक्षितरीत्या जर्मनीची सत्ता आपल्याकडे खेचून घेतली णि भल्याभल्यांना जमणार नाही अशी कामगिरी करण्याचा चंग बांधला. एकामागून एका देशांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करत हिटलरनं सगळ्या जगाची झोप उडवली. त्याचं आसुरी स्वप्न मात्र नंतर भंगत गेलं. केवळ डझनभर वर्षांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत हिटलरनं अक्षरशः धुमाकूळ घातला. ज्यू लोकांचा संहार, आपल्या शत्रूंशी अत्यंत क्रूरपणे वागणं, आपल्याच सहकाऱ्यांवर विलक्षण अविश्वास दाखवणं, माणुसकीचा अंशही वागण्याबोलण्यातून न दाखवणं, अशा त्याच्या अनेक अवगुणांचं त्याच्या गुणांबरोबरच विश्लेषण करणं म्हणूनच महत्त्वाचं ठरतं. हुकूमशाही आणि एकाधिकारशाही यांचं थैमान त्याच्या कारकिर्दीत बघायला मिळालं. जगाला वेगानं दुसNया महायुद्धाकडे नेणाऱ्या या खलनायकाविषयी अनेक जणांना सुप्त आकर्षण वाटत असतं. मुळात हिटलर इतका लोकप्रिय कसा झाला आणि त्याच्याविषयी आजसुद्धा इतकं का बोललं जातं, या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याचा सखोल ऊहापोह अत्यंत सोप्या भाषेत सगळ्या वयोगटामधल्या मराठी वाचकांसाठी या पुस्तकात केला आहे. नव्यानं या जगात हिटलर निर्माण होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, यासाठीची दृष्टीही वाचकांना या निमित्तानं मिळेल! ...Read more

  • Rating StarYogesh Jadhav

    Good book By again my Favorite Author... Atul Kahate...

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more