* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AKASHVEDH
  • Availability : Available
  • ISBN : 9788184980103
  • Edition : 2
  • Publishing Year : MARCH 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 164
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
LIFE IS LIKE AN OCEAN IN WHICH RESTLESSNESS EBBS AND FLOWS IN TIDAL WAVES. BUT EVEN WITHIN THIS, THE SENSITIVE MAN TREADS A DIFFERENT PATH, SEEKING HIS OWN HEAVEN. A RAY OF LIGHT FALLING IN A MUNDANE COURTYARD CAN ILLUMINE AN ENTIRE LIFE. TALES THAT CAPTURE THE DELICATE PULSATIONS OF THE HUMAN MIND, HEART-WARMING TALES THAT KINDLE A SENSE OF ‘SELF’ THROUGH THE TUMULT OF EMOTIONS. A COLLECTION RENDERED BY THE TALENTED AND DELICATE PEN OF GIRIJA KEER!
जीवनाच्या अथांग सागरप्रवाहात अस्वस्थतेच्या लाटा भरती-ओहोटीसारख्या उठतात. त्यातच मनस्वी माणूस स्वत:चं आभाळ शोधून वेगळ्या पाऊलवाटेनं प्रवासाला जातो. रोजच्याच अंगणात आलेला एखादा नवीन किरण सारं जीवनच उजळून जातो. मानवी मनाची स्पंदनं अलगद टिपत, भावभावनांचे कल्लोळ उरात बाळगून `स्व` जागृत करणाऱ्या हृदयस्पर्शी कथा. गिरिजा कीर यांच्या हळुवार लेखणीतून साकारलेला प्रतिभासंपन्न आविष्कार!
गिरीजा कीर यांना कै.सौ. उषा प्रकाश मोहाडीकर समितीतर्फे `समाजभूषण पुरस्कार`.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #AKASHVEDH #AKASHVEDH #आकाशवेध #SHORTSTORIES #MARATHI #GIRIJAKEER #गिरिजाकीर "
Customer Reviews
  • Rating StarDAILY TARUN BHARAT 14-6-2009

    ‘आकाशवेध’- गिरिजा कीर यांनी लिहिलेल्या कथांचा संग्रह, मेहता पब्लिशिंग हाऊसने देखण्या स्वरूपात प्रकाशित केला आहे. कथा, कादंबरी, बालसाहित्य अशा विविध साहित्यबंधांचे लेखन करणाऱ्या गिरिजा कीर यांच्या साहित्याचे उर्दू, कन्नड, तेलगू, गुजराथी, इंग्लिश अशा वविध भाषांमध्ये भाषांतरही झाले आहे. समाजातील उन्मार्गी स्त्रिया, मुलं, गुन्हेगार, कामगार स्त्रिया व मुले, आदिवासी यांच्याशी संवाद साधणाऱ्या लेखिकेला साहित्यलेखन पुरस्कारासमवेत समाज सेवेसाठीही पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विविध स्तरांतील मानवी मनोव्यापार आपल्या साहित्यातून, आविष्कृत करणाNया गिरिजा कीर यांचे अनुभव विश्व विशाल व वैविध्यपूर्ण आहे. लेखिकेने मानवी हृदयातील चांगुलपणा जसा डोळसपणे टिपला आहे, तसाच मानवी मनातील स्वार्थ, संकुचितता, आत्मवेंâद्रितता, लोभ, क्रौर्य सुज्ञपणे निरखिले आहे. ‘आकाशवेध’मधील कथांतून यांना अभिव्यक्ती मिळाली आहे. स्त्री-पुरुष स्वभावातील नैसर्गिक अंतर दर्शवीत व्यक्तिजीवनाचा- व्यक्तिमनाचा लेखिकेने घेतलेला वेध या कथातून दृग्गोचर होतो. व्यक्तिजीवनातील आर्थिक, व्यावहारिक, भावनिक, मानिसक पातळ्यांवरून निर्माण झालेल्या समस्या व समस्येसंदर्भातील व्यक्तिमनांच्या क्रिया- प्रतिक्रिया यांचे सूक्ष्म चित्रण करीत लेखिका अंतरंगाच्या गूढ- गहिNया, स्थूल- सूक्ष्म, सौम्य- प्रखर, भाव- विचारांना चित्रित करते. वेगानं बदलत गेलेली तरुण पिढीची मानसिकता केंद्रवर्ती ठेवून वेगवेगळ्या स्तरांवर तिची अभिव्यक्ती लेखिका करते. नात्यात दिराकडून पैशाची झालेली फसवणूक सहन करीत, वास्तवाचे चटके सोसत आपल्या लहान मुलाचे मोठा कलावंत होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी त्याच्यात आत्मबळ जिद्द निर्माण करत त्याचे ध्येय त्याच्या पदरात टाकणारी प्रेमळ, खंबीर आई, अशा आईच्या संस्कारातून घडलेल्या कलावंताचा स्वजीवन सार्थकी लावण्याच्या हेतूने गरीब-गरजू व कलेत रस घेणाNया मुलांना स्वत:च्या कलेचं ज्ञान देण्याचा उदात्त विचार व नि:स्वार्थी मन, आणि मोठ्या कलावंताकडून कलाज्ञान मिळवूनही जीवनात पैसा मिळत नाही म्हणून तारणाऱ्याचाच विध्वंस करून टाकणारी नवी पिढी अशा दोन पराकोटीच्या विरोधी जाणिवा- विचार- प्रवृत्ती यांच्या ताणाबाण्यातून सूक्ष्म- स्थूल संघर्षाचे धागे विणत लेखिका त्याचं आकाश कथा आकृतीत बांधते. व्यवहाराच्या पातळीवरून आई-वडील यांच्याविषयी विचार करणारी आजची ही तरुण पिढी, पैशांचा सुकाळ पण माणुसकीचा अभाव असल्याने जिवाभावाच्या नात्याविषयी जेव्हा, ‘बायकोचं बाळंतपण करायला, बाळ सांभाळायला आया हवीच, शिवाय ती घरची, विश्वासू दोन साड्या आणि बदाम पिस्त्याची पाकिटं यात हा सौदा नक्कीच चांगला असा विचार करताना दिसते तेव्हा लेखिकेला यातना होतात़ नव्या, आधुनिक मनांची मानसिकता, आचार- विचार, जीवनशैली नाईलाजास्तव स्वीकारताना जुन्या पिढीला जाणवणारी हतबलता, अगतिकता, खेद, विस्मितता, तगमग इ. भावच्छटांचे रंगमिश्रण लेखिका चितारते. मध्यमवर्गीय, सुशिक्षित, सुसंस्कृत वर्गाच्या व दोन- तीन पिढ्यांची मानसिकता अधोरेखित करणाNया या कथा कवी मनाला उजळून टाकतात तर कधी कातरवंâपित अंतर्मुख करतात. जुन्या- आधुनिक- संक्रमण काळातील वातावरण त्या त्या व्यक्तिचित्रांच्या भोवताली असल्याने त्यांच्या मनोधारणा, कृती, उक्ती, जीवनधारणा यातून ही व्यक्तिचित्रे उठावदार, जिवंत व स्वाभाविक होऊन अवतरतात. ही व्यक्तिचित्रे समंजस असोत, जिद्दी, कणखर असोत, प्रेमळ-दयाशील असोत, क्रूर-आततायी असोत. परंतु प्रसंग, परिस्थिती व व्यक्ती धारणा यांना साजेसे वातावरण कथातून निर्माण होतेच आणि वेगवेगळ्या पातळ्यांवरून ते कथानकात असे एकजीव होते की, कथाशयात, सूक्ष्म संघर्ष, विरोध नाट्य निर्माण करत कथांना सरसता व परिणामकारकता प्रदान करते. सहजसुलभ, प्रासादिक, ओघवती शैली, अनभुवांचं सहज- मोकळेपणानं केलेलं चित्रदर्शी शब्दांकन कधी क्वचित कथातून येणारं आदर्शवादी, गूढ, अद्भुतरम्य वातावण, कवचित विनोदाचा होणारा शिडकावा कथात रंजकता निर्माण करतात. कथांची बांधणी उत्कृष्ट, अनुभवाचे थेट प्रक्षेपण करणारी शब्दशैली, स्वत:च आभाळ शोधायचा प्रयत्न करणाऱ्या या कथांतील माणसांना त्यांच्या विचारांना वाचकांसमोर दृश्य करतात हे या कथांचे यश म्हणावे लागेल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more