* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AADIPARVA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184981773
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 384
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
‘AADIPARV’ IS A HISTORICAL NOVEL WRITTEN BY DR. PRAMILA JARAG IS BASED ON LIFE OF MALOJIRAJE BHOSLE, A WARRIOR, ADMINISTRATOR AND STATESMAN AT HIS TIME AND GRANDFATHER OF ‘CHHATRAPATI SHIVAJI’ THE GREAT. THE NOVEL DEPICTS SOCIAL AND POLITICAL SCENARIO OF DECCAN INDIA DURING END OF 16TH CENTURY AND BEGINNING OF 17TH CENTURY, SPREAD OVER PERIOD OF 18 YEARS DURING WHICH MALOJIRAJE ASCENDED FROM A SOLDIER TO CHIEF OF ARMY. THESE 18 YEARS WERE THE MOST TURBULENT YEARS IN THE HISTORY AT ‘NIJAMSHAHI OF AHMADNAGAR’, THAT RULED OVER THE PART OF LAND, WHICH IS TODAY’S MAHARASHTRA, FOR A CENTURY DURING WHICH THERE WERE TWO WARS BETWEEN MUGHULS UNDER LEADERSHIP OF EMPEROR AKBAR AND CHANDBIBI, THE FIRST EMPRESS OF DECCAN. DR. PRAMILA JARAG HAS DONE A LOT OF STUDY OF LITERATURE ON THE SUBJECT IN DIFFERENT LANGUAGES INCLUDING URDU & PERSIAN AND HAS USED WORDS IN THESE LANGUAGES SO APTLY TO RELIVE THAT ERA TO THE READERS. EVENTS OF THE PERSONAL LIFE AND HISTORICAL EVENTS ARE INTERTWINED VERY INTRICATELY. THE MOST INSPIRING PART OF THE BOOK IS MAIN CHARACTER ‘MALOJIRAJE’, AS HIS WORK HAS DEFINITELY FOUNDED THE ROOTS OF VELOUR OF HIS SUCCESSORS ‘SHAHAJI MAHARAJ’ AND ‘CHHATRAPATI SHIVAJI’ WHO FOUNDED A SOVEREIGN MARATHA EMPIRE IN DECCAN.
मालोजीराजे- छत्रपती शिवरायांचे आजोबा. सोळाव्या शतकात निजामशाही, आदिलशाही, मोगल यांच्यात सत्तासंघर्ष सुरू होता, त्यात लढणारे मात्र या भूमीचे पुत्र होते. विध्वंस होत होता इथल्या भूमीचा. विध्वंस होणारी आपली भूमी, युद्धात आणि सततच्या दुष्काळात होरपळणारी रयत, श्रद्धास्थानांची होणारी दुरावस्था, याचा सल उरात ठेवूनच हा पराक्रमी योद्धा त्या काळाच्या निजामशाहीत वावरला. स्वपराक्रमाने `सरगु-हो`सारख्या सर्वोच्च दरबारी पदावर गेला. शहाजी महाराजांनी सहा वर्षे चालवलेली प्रतिनिजामशाही, स्वतंत्रपणे राज्यकारभार चालवण्याचा केलेला धाडसी प्रयत्न; पुढे त्यांच्या व जिजाऊंच्या प्रेरणेने शिवरायांनी स्थापन केलेले स्वतंत्र हिंदवी स्वराज्य- यामागे मालोजीराजेंच्या शौर्याचा, पराक्रमाचा वारसा आहे. छत्रपती शिवरायांच्या कर्तबगारीतून साकारलेल्या सार्वभौम हिंदवी स्वराज्याचा धागा मालोजीराजेंपर्यंत जातो. मालोजीराजेंच्या कर्तृत्वाची ओळख मराठी वाचकांना करून देण्याचा प्रयत्न आजवर झालेला नाही. `आदिपर्व` या कादंबरीने ही उणीव भरून काढलेली आहे. इतिहासाशी प्रामाणिक राहून लिहिलेली ही अभ्यासपूर्ण कादंबरी मराठी ऐतिहासिक कादंबरीची परंपरा समृद्ध करणारी आहे.
* जेष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार २०१० . * करवीर साहित्य परिषद पुरस्कार २०११. * कवी अनंत फंदी साहित्य पुरस्कार २०११.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #AADIPARVA(MALOJIRAOBHOSALE) #AADIPARVA #आदिपर्व #BIOGRAPHY #MARATHI #DR.PRAMILAJARAG #डॉ.प्रमिलाजरग "
Customer Reviews
  • Rating StarDevdutt Kamat

    छत्रपती शिवरायांचे आजोबा. सोळाव्या शतकात निजामशाही, आदिलशाही, मोगल यांच्यात सत्तासंघर्ष सुरू होता, त्यात लढणारे मात्र या भूमीचे पुत्र होते. विध्वंस होत होता इथल्या भूमीचा. विध्वंस होणारी आपली भूमी, युद्धात आणि सततच्या दुष्काळात होरपळणारी रयत, श्रद्धस्थानांची होणारी दुरावस्था, याचा सल उरात ठेवूनच हा पराक्रमी योद्धा त्या काळाच्या निजामशाहीत वावरला. स्वपराक्रमाने `सरगु-हो`सारख्या सर्वोच्च दरबारी पदावर गेला. शहाजी महाराजांनी सहा वर्षे चालवलेली प्रतिनिजामशाही, स्वतंत्रपणे राज्यकारभार चालवण्याचा केलेला धाडसी प्रयत्न; पुढे त्यांच्या व जिजाऊंच्या प्रेरणेने शिवरायांनी स्थापन केलेले स्वतंत्र हिंदवी स्वराज्य- यामागे मालोजीराजेंच्या शौर्याचा, पराक्रमाचा वारसा आहे. छत्रपती शिवरायांच्या कर्तबगारीतून साकारलेल्या सार्वभौम हिंदवी स्वराज्याचा धागा मालोजीराजेंपर्यंत जातो. मालोजीराजेंच्या कर्तृत्वाची ओळख मराठी वाचकांना करून देण्याचा प्रयत्न आजवर झालेला नाही. `आदिपर्व` या कादंबरीने ही उणीव भरून काढलेली आहे. इतिहासाशी प्रामाणिक राहून लिहिलेली ही अभ्यासपूर्ण कादंबरी मराठी ऐतिहासिक कादंबरीची परंपरा समृद्ध करणारी आहे. ...Read more

  • Rating StarTARUN BHARAT 2-1-2011

    आदिपर्व या ऐतिहासिक कादंबरीने धुक्यात लपेटलेल्या मध्ययुगीन कालखंडाला प्रकाशात आणले आहे. छत्रपती शिवाजीराजे यांचे प्रपितामह मालोजीराजे भोसले यांचा कालखंड १५७४ ते सप्टेंबर १६०६. म्हणजे बहामनी राज्याचे पाच तुकडे झाल्यानंतरचा. निजामशाही, आदिलशाही, कुतुबशही, इमादशाही,बरीदशाही यांच्यातल्या लढाया व सत्तासंघर्ष यांचा कालखंड. मराठा सरदार व शिलेदार यांच्यात महाराष्ट्रात हिंदुपद बादशाही स्थापन करता येण्याच्या शक्यतेचा विचारही कधी मनात न येण्याचा कालखंड. परकीय सत्तेची इमानाने चाकरी करण्याचा, वतनासाठी एकमेकांशी झुंजण्याचा आणि महाराष्ट्राच्या, भल्याचा विचार मनात नसण्याचा हा कालखंड होता. त्यातील एक मोठे राज्य म्हणजे निजामशाही. अहमदनगर ही त्याची राजधानी वऱ्हाड, बीड, पुणे, नाशिक हे चार प्रांत, कोकणातील चौल व रेवदंडा आणि कल्याण हा भूभाग निजामशाहीत मोडत असे. वेरूळला भोसले घराणे राहायचे. घृष्णेश्वर हे भोसल्यांचे दैवत. मालकर्ण भोसले हे मूळ पुरुष. त्यांना मालोजी व विठोजी असे दोन मुलगे. दोन वर्षांच्या अंतराचे. मालोजी उर्फ बाबाजी तीन वर्षांचे असताना त्यांचे वडील मालकर्ण एका जुझात मारले गेले तेव्हा विठोजी जेमतेम एक वर्षांचा होता. मालकर्ण यांच्याकडे वेरूळगाव वावी, मुंगी, बनसेंद्रे, देऊळगाव, जिंती, हिंगणी, बेरडी यांचे निजामशाही वतन होते. मालकर्ण वारल्यावर शहाने हा सरंजाम जप्त केला. पदरात दोन मुले असलेल्या आऊसाहेबांकडे खासगीतला काही भाग, वाड्या, मोकादम्या एवढे उरले. त्यानी त्या आधारावर पतिमागे घर सांभाळले. मुलांना मोठे केले. बाबाजींच्या पत्नीचे नाव रेखाऊ. मालोजी वसुलीचे काम बघत. तर धाकटा भाऊ विठोजी फडाचे जमाखर्चाचे काम करायचा. मालोजी सोळा वर्षांचे असताना आजीकडे हट्ट धरून त्यांनी शिलेदार बनण्याचा विचार स्पष्ट केला. त्यावेळी निजामशाहीत सिंदखेडचे जाधवराव, मुधोळचे घोरपडे, म्हसवडचे माने, मलवडीचे घाटगे, फलटणचे वणगोजी राजे नाईक निंबाळकर असे नामवंत सरदार होते. फलटणचे वणगोजीराव, (मूळ नाव अनंगपाळ) यांचा दरारा मोठा होता. राव वणंगपाळ बारा वजिरांचा काळ, असा त्यांचा लौकिक होता. निजामशाहीत त्यांचा दरारा होता. बाबाजींनी त्यांच्या कानांवर मुलाचा हट्ट घातला. मालोजी व विठोजी लवकरच वणगोजीराजांकडे शिलेदारीत दाखल झाले. कोल्हापूर मुक्कामी मालोजींनी अचानक घाला घालू पाहाणा-या आदिलशाही तुकडीला पेचात पकडून प्रसंग निभावून नेला. निजामशहीवरचे संकट समूळ नष्ट वेâले. वणगोजी राजेंनी निजामशाहीकडे मालोजी, विठोजींची शिफारस केली. त्यांच्या आजोबांचा जप्त केलेला सरंजाम त्यांना पुन्हा देण्यात यावा, असा तोंडी अर्ज केला. शहाने भोसलेबंधूंना, प्रत्येकी १५०० शिलेदारांची सरदारी, राजे ही किताबत शिवनेरी किल्ला व पुण्याचे वतन तर दिलेच आणि आजोबांच्या जप्त केलेला सरंजामही दिला. इथून भोसलेबंधुंच्या कर्तबगारीला वाव मिळत गेला. योजकता, झुंजाची आखणी, सैन्याची व्यूहरचना, शत्रूच्या हालचालींचा अंदाज घेणे, नजरबाजांची योजना करणे, रयतेवर प्रेम करणे, परोपकारी वृत्ती, देव धर्म, संतमहंत यांच्यापुढे लीन होणे यामुळे मालोजी सर्वांना प्रिय होत गेले. बघता बघता त्यांचे नाव मोेठे झाले. त्यातच त्यांचे लग्न वणगोजी राजेंची कन्या दीपा हिच्याशी झाले. हा संबंध उभयपक्षी हिताचा झाला. निजामशाही नेकजात मराठा सरदारांवर अवलंबून होती. त्यात आता मालोजी राजे भोसले यांची गणना होऊ लागली. मालोजीराजे यांनी नगरचे सावकार शेषाप्पा यांचा विश्वास संपादन केला तर निजामशाहीतील महत्त्वाची व्यक्ती व दफ्तरातील जबाबदार व एकूणच माहीतगार अशी महत्त्वाची व्यक्ती निळोपंत यांच्याशीही संबंध वाढवले. त्यामुळे निजामशाहीत कोठे काय चालले आहे. याची त्यांना खबर मिळायची. हा काळ अंदाधुंदीचा होता. मनगटशाहीचा होता. दगाबाजी, फंदाफितुरीचा होता. निजामशाहीत खुद्द शहाला आणि त्याच्या सरदारांनी सदैव जागृत राहावे लागे. त्यात निजामशाहीत खुद्द वजिराने बगावतीचे वर्तन केले. पंधराव्या शतकात भारतात पोर्तुगीजांचे पाऊल पडले. दीवदमण ते गोवा हा सागरी भाग निजामशाहीचा. चौल, रेवदंडा, कल्याण (खाडीमार्गे) इथे पोर्तुगीजांचा सतत त्रास असे. (त्याबरोबर जंजि-याच्या शिद्दीचा त्रास तर कानीकपाळी ठेवलेलाच. त्यावेळी स्त्रियांच्या तोंडी नेहमी म्हटले जायचे, ‘आजबाई सारवा । उद्या बाई तारवा’ म्हणजे आज तुम्ही तुमच्या घरी सुखरुप आहात. हौस म्हणून घर, अंगण सारवा. त्यावर रांगोळी रेखा. पण शिद्दीचे सैनिक कधी छापा टाकतील आणि पुरुषांची कत्तल करून, लुटालूट करून, घरांना आगी लावून बायकांना फरपटत आपल्या गलबतांकडे नेतील याचा काही नेम नाही. आदिलशहाचा एक सरदार फितूर होऊन निजामशहाला ३०० हत्तींची भेट आणि शेकडो होन घेऊन शहाकडे त्याने आसरा मागितला. शहाने त्याचा मोठा गौरव केला. मनसब दिली. शाही किताब दिला. आदिलशहाने दिलावरखानाला वजिरी देण्याचे मधाचे बोट लावून त्याला भेटीला बोलावले. भविष्याची मोठी स्वप्ने पाहात विजापुरला दिलावरखान आला. शहाने प्रथम त्याचे डोळे काढले आणि तुरुंगात पेटवून दिले. आदिलशहाने दिलावरखानाला वजिरी देण्याचे मधाचे बोट लावून त्याला भेटीला बोलावले. भविष्याची मोठी स्वप्ने पाहात विजापुरला दिलावरखान आला. शहाने प्रथम त्याचे डोळे काढले आणि तुरुंगात पेâवूâन दिले. आदिलशहाने चिडून नगरकडे फौजा वळवा, यावर तह करताना निजामशहांना नवीन बांधलेला किल्ला पाडण्याची अट आदिलशहाने घातली. शाहजादा मुराद दक्षिणेत चार वर्षे निजामशाही बुडवण्यासाठी मुक्काम ठोकून राहिला. तो अयशस्वी झाला. चांदबिबीने बालराजाच्या नावाने उत्तम कारभार केला. पण अंतर्गत बंडाळी व असहकार यामुळे ती अयशस्वी ठरली. पुढे तर तिची हत्या झाली. या सगळ्यांमुळे आणि त्यात सतत दोन वर्षे दुष्काळ पडल्याचे केवळ जगण्यासाठी वीस हजार माणसे विजापूरला गेली. मालोजीराजे हताश झाले. ते अतिशय दयावत्सल होते. श्री गोंद्याजवळ वाड्यासाठी पाया खोदताना त्यांना गुप्तधनाचे हंडे मिळाले. या धनातून त्यांनी घृष्णेश्वर मंदिराचे नूतनीकरण केले. सूफी साधू शेख महंमद बाबांना मठ बांधून दिला. शिखर शिंगणापूर इथे तळे बांधले. ओसाड गावे पुन्हा नांदती केली. शेतीला उत्तेजन दिले. डॉ. प्रमिला जरग यांनी ऐतिहासिक ढंगाची भाषा निवेदनात वापरली आहे. करीणा, बितपशील, सुक्रांना नमाज, निहाल होणे, सुलतानढवा, तजुबी, गौर, बगावत, सर्पâराजी, शुक्रगुजार, फिकरमं, हिफाजत, वल्द, रिश्ता, पैगाम, फरमानवाडी, खद्याल, तरक्की, अमन, इत्तेफाक असे उर्दू अरबी फारसी शब्द लोकांच्या तोंडी रूळून गेले होते. शिया, सुनी, मेहदवी यांच्यात वैर धुमसायचे. खंडेनवमी, नवरात्र, दसरा असे सण साजरे होत. फराह, बाग, ई रहुजा हाश्त बहिश्त या बागा नगरमध्ये होत्या. भिंगार खेड्याजवळ कुत्रे कोल्ह्यांचा पाठलाग करीत असता चिडलेल्या कोल्ह्याने कुत्र्यांवर चाल केलेली शहाने पाहिली तेव्हा ही जागा शकुनाची समजूत भिंगारला अहमदनगर वसवले. प्रसिद्ध मुलुख मैदान तोफ रुमीखानने घडवली. कोल्हापूरला तेव्हा २१ तळी होती. युवराज मुराद विजयी झाला तर दिल्लीला त्याचे वजन वाढेल म्हणून त्याचे सरदार वेढा अंगचोरपणे लढतात, अशी आवश्यक माहिती लेखिका देते. डॉक्टर, प्रमिला जरग पंधराव्या आणि सोळाव्या शतकाचे शब्दचित्र काढतात. या कादंबरीतला लेखिकेने कन्सिव्ह केलेला तिला स्पुâरलेला एक प्रसंग मला कळसाध्याय वाटतो. मालोजीराजे यांचे लग्न दीपाशी झाले तेव्हा ती केवळ आठ वर्षाची होती. वेरूळला सासरी आली होती. आजेसासूबाई पुजेला बसल्या होत्या आणि ही उमा पूर्वेकडून भिंतीवर पडणारे, नाचणारे तेजाचे पट्टे हातात धरू पाहात होती. तिचा पती मालोजी, त्याचे आजोबा मालकर्ण जुझात लढता लढता मारले गेले तेव्हा मालोजीचे वडील बाबाजी केवळ तीन वर्षांचे होते. उभा जन्म वैधव्यात करपलेल्या, कर्तव्यकठोर आऊसाहेब मुठीत सूर्याचे तेज पकडू पाहाणाNया नातसुनेला म्हणतात, मुली, आपल्या हातातून तेज निसटते. ते मुठीत पकडता येत नाही. त्या तेजाला प्रपंचात जखडून ठेवता येत नाही...’ आणि पुढे तेच घडते. जुझात मालोजी मारला जातो. उमाच्या मुठीतून तेज निसटते. सरलष्कर उर्फ सर गु-हो ही शाही, अति दुर्मिळ किताबत निजामशहाकडून मिळवलेले मालोजी राजे शहाजी व शरीफजी या बालकांना आणि उमेला पकडून ठेवता आले नाहीत. मला हा प्रसंग स्वामीच्या शेवटी रमा सती जाते. या प्रसंगाच्या व त्यातील शेवटच्या वाक्याच्या उंचीचा वाटतो. मेहता पब्लिशिंगने राजहंसच्या द्रोहपर्व नंतर लगेचच एक उत्तम ऐतिहासिक कादंबरी पेश केलीय. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more