* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: A WOMANS COURAGE
  • Availability : Available
  • Translators : PRASHANT TALNIKAR
  • ISBN : 9788184980868
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 223
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IN RETROSPECT, I CAN SEE I WAS THE PERFECT CANDIDATE FOR CHILD ABUSE. MY PARENTS HAD DIVORCED AND MY MOTHER DIDN`T SHOW ME MUCH LOVE. HER SELF- IMPOSED ISOLATION KEPT ME AWAY FROM OTHER CHILDREN. MY ABUSER HAD NOBODY IN HIS WAY.` PLEASE LET IT STOP IS A GRIPPING AND ULTIMATELY INSPIRING MEMOIR OF SUFFERING AND DETERMINATION, OF OBSTACLES AND INNER BATTLES. JACQUELINE GOLD WAS ABUSED BY HER STEPFATHER FOR MANY YEARS, BUT ONE DAY SHE SUMMONED THE COURAGE TO ASK HIM TO STOP. JACQUELINE WENT ON TO BECOME CHIEF EXECUTIVE OF ANN SUMMERS, BUT THE JOURNEY WAS FAR FROM EASY. IN THIS, HER NO-HOLDS-BARRED AUTOBIOGRAPHY, JACQUELINE DESCRIBES HER ABUSED CHILDHOOD, HER TUMULTUOUS STRUGGLES TO FIND LOVE AND CONQUER DEPRESSION, AND THE HEARTBREAK OF UNDERGOING IYE TOLD WITH REMARKABLE HONESTY. HER STORY IS A TESTAMENT TO ONE WOMAN`S ABILITY TO OVERCOME THE DARKEST OF TIMES.
मी भक्ष किंवा बळी ठरण्याचं नाकारते - जॅकलिन गोल्ड जॅकलिन गोल्ड ही `अ‍ॅन समर्स`, या एका प्रचंड यशस्वी किरकोळ विक्री दुकानांच्या साखळीची धडाडीची मुख्य कार्यकारी अधिकारी- चीफ एक्झिक्युटिव्ह, आहे. `कॉस्मोपॉलिटन` मासिक आणि `डेली मेल` वृत्तपत्रानं ब्रिटनमधली सर्वांत प्रभावशाली स्त्रियांपैकी एक म्हणून तिची निवड केली आहे, आणि ब्रिटनमधल्या सर्वांत यशस्वी महिलांमध्ये तिची गणना होते. पण तिला हे यश सहजासहजी मिळालेलं नाही. `अ वुमन्स करेज`मध्ये पहिल्यांदाच तिनं आपली संपूर्ण आणि अद्भुत कहाणी लोकांसमोर मांडली आहे. सावत्र वडिलांनी लहानपणी केलेल्या छळाचं- तेव्हापासून तिच्या मानगुटीवर बसलेलं भूत तिनं कसं उतरवलं, खरं प्रेम मिळवण्याच्या प्रयत्नात तिच्या आयुष्यामध्ये घडलेली आणि तिचं हृदय भग्न करणारी अनेक वादळी प्रेमप्रकरणं आणि मूल होण्यासाठी, आपलं स्वत:चं कुटुंब निर्माण करण्यासाठी तिनं गर्भनलिका प्रजनन (आय.व्ही.एफ.) तंत्र वापरण्याचे जे अयशस्वी प्रयत्न केले, त्यातून पदरी आलेली निराशा आणि दु:ख, हे सगळं तिनं मोकळेपणानं सांगितलं आहे. बार्बरा टेलर ब्रॅडफर्डच्या `अ वुमन ऑफ सबस्टन्स`शी साम्य साधणाऱ्या आपल्या या कहाणीमध्ये जॅकलिन, एम्मा हार्ट या करारी, महत्त्वाकांक्षी आणि आवडण्याजोग्या काल्पनिक नायिकेचा आधुनिक अवतार वाटते. कहाणी वाचून समस्त स्त्री-वाचकांना ती आपल्यापैकीच एक असल्यासारखं वाटेल. ही एक ज्वलंत आणि प्रभावी कथा आहे. आपलं खरं मूल्य आणि क्षमता खूप उच्च आहेत, हे जाणून असणाऱ्या आणि ती पातळी गाठण्यासाठी प्रेरणा शोधत असलेल्या स्त्रियांसाठी हे पुस्तक म्हणजे एक मंगल स्तोत्र ठरेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #AWOMANSCOURAGE #AWOMANSCOURAGE #अवुमन्सकरेज #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #PRASHANTTALNIKAR #JACQUELINEGOLD "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 1-8-2010

    देशातील उत्तमोत्तम साहित्यकृती आपले मन घडवतात तर विदेशातील कसदार साहित्य आपल्या विचारांच्या कक्षा रुंदावते. देशात खुलीकरणाचे वातावरण अनुभवायला मिळायला लागल्यापासून जग हे वैश्विक खेडे बनल्याची जाणीव होत आहे. म्हणूनच विदेशातल्या लोकप्रिय साहित्यिकांचे ित्तथरारक लेखन आपला व्यासंग वाढवून जाते. सामान्य जीवन जगत असताना असामान्य अनुभवांचे जास्तच कौतुक वाटते. मात्र, असामान्य जीवन जगणा-यांची जीवनवाट जवळून पाहताना आपण कमालीचे अंतर्मुख होतो. कदाचित म्हणूनच बाजारात आलेले काही थरारक आणि चाकोरीबाहेरचे अनुवाद आवर्जून तपासून पाहण्याजोगे ठरतात. ‘द फर्म’ हा असाच एक थरारक अनुवाद प्रसिद्ध अमेरिकन लेखक जॉन ग्रिशॅम यांच्या या कादंबरीचा अनिल काळे यांनी केलेला अनुवाद एका वेगळ्या विश्वाची सफर घडवतो. काळा पैसा पांढरा करणे म्हणजे मराठीत मनी लाँडरिंग - टॅक्स हेवन, स्विस बँका, त्यातली ती फक्त नंबरनं ओळखली जाणारी गुप्त खाती या गोष्टी आता आपल्यासाठीही नवीन राहिलेल्या नाहीत. वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये, भारतीयांनी स्विस बँकांमध्ये दडवून ठेवलेला कित्येक लाख कोटी रुपयांचा काळा पैसा भारतात परत आणण्याबाबत बरीच चर्चाही झाली. नंतर ती अर्थातच थंडावली. ‘द फर्म’ याच विषयावर बेतली आहे. ही जॉन ग्रिशॅम यांची पहिली कादंबरी तिच्यामुळे त्यांना लेखक म्हणून प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि तोपर्यंत वकिली करत असलेले जॉन ग्रिशॅम पुढे पूर्णवेळ लेखक बनले. कादंबरीत सर्व काही आपल्यासमोरच घडत असते, पण असे असूनही आणि पात्रांची गर्दी होऊनही कादंबरी रोचक झाली आहे. नुकताच शिक्षण घेऊन बाहेर पडलेला एक हुशार मुलगा ‘फर्म’मध्ये नोकरी मिळाल्यावर सुंदर भविष्यकाळाची स्वप्नं पाहतो. त्याला आणि त्याच्या सुंदर बायकोला वाटते आता भरपूर पैसा आणि सुख आपल्यापुढे उभे राहील. प्रत्यक्षात मात्र दोघंही ‘फर्म’च्या सोनेरी जाळ्यात अडकतात. एकीकडे माफिया फॅमिली तर दुसरीकडे एफबीआयच्या कात्रीत सापडतात. त्यातून जीव वाचवत पळत सुटतात ते कायमचेच. या थरारक कथानकाला जॉन ग्रिशॅम यांनी आकार दिला तर अनिल काळे यांनी त्याचा रंजक अनुवाद केला. स्कॉट ग्रॅहॅमलिखित ‘शूट टू किल’ ही डॉ. देवदत्त केतकर यांनी अनुवाद केलेली कादंबरी मारेक-यांदरम्यान पुâललेल्या जगावेगळ्या प्रेमाची कहाणी आहे. स्कॉट ग्रॅहॅम एक कसलेला ‘एसएएस’ (स्पेशल एअर सव्र्हिस) सैनिक होता. उत्तर आयर्लंड आणि फॉकलंड मोहिमेबद्दल त्याला शौर्यपदक मिळाले होते. ‘आयआयए’बरोबरच्या चकमकीत त्याने अनेक अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते. मायरीड पॅâरेल ही ‘आयआयए’साठी बाँब पेरणारी एक लहानखुरी पण नितांतसुंदर तरुणी! या दोघांचे जीवघेणे आणि भयानक असे एक गुपित असते. आपल्या पक्षाच्या आणि सैन्याच्या नियमांना बगल देत ते अनेक वर्षे एकमेकांवर उत्कट प्रेम करत राहतात. ‘आयआरए’च्या तीन नि:शस्त्र अतिरेक्यांना रॉक ऑफ जिब्राल्टरवर गोळ्या घालून ठार करण्यात आले आणि स्कॉट आणि मायरिडच्या छुप्या प्रेमप्रकरणाचा शेवट झाला. ‘एसएएस’च्या इतिहासातला तो एक वादग्रस्त प्रसंग ठरला. स्कॉट ग्रॅहॅमच्या असाधारण प्रेमाचे आणि जगाला हादरवून सोडणाNया तीन हत्यांचे चित्तथरारक सत्यकथन ‘शूट टू किल’ मधून घडते. १४० पानांचा हा अनुवाद आपल्याला एका वेगळ्या विश्वाची सफर घडवतो. जॅकलिन गोल्ड ही ‘अॅन समर्स’ या एका प्रचंड यशस्वी ठरलेल्या रिटेल दुकानांच्या साखळीची, धडाडीची मुख्य कार्यकारी अधिकारी. ब्रिटनमधल्या सर्वात यशस्वी महिलांमध्ये तिची गणना होते. पण तिला हे यश सहजासहजी मिळालेले नाही. ‘अ वुमन्स करेज’मधून तिने आपली अद्भूत कहाणी लोकांसमोर आणली आहे. सावत्र वडिलांनी लहानपणी केलेला छळ. खरे प्रेम मिळवण्याच्या प्रयत्नात आयुष्यामध्ये घडलेली, हृदय भग्न करणारी अनेक वादळी प्रेमप्रकरणे, मूल होण्यासाठी आपले स्वत:चे कुटुंब निर्माण करण्यासाठी तिने केलेले अयशस्वी प्रयत्न, त्यातून पदरी आलेली निराशा आणि दु:ख तिने मोकळेपणाने सांगितले आहे. ‘अ वुमन्स करेज’ ही एक ज्वलंत आणि प्रभावी कथा आहे. प्रशांत तळणीकर यांनी केलेला अनुवाद आपल्याला खिळवून ठेवतो. लहानपणी वाचलेल्या गोष्टीतील राजा, ‘मी हात लावलेले सारे सोन्याचे होऊ दे’ असा वर मागत आजही सोन्यामागे धावत आहे. साNया जगभर तो वावरतो आहे. त्या कृतीचे परिणाम त्याला आणि इतर सर्वांना जाणवू लागले आहेत. परंतु प्रगतीचा मार्ग अजूनही धूसरच दिसतो आहे. अॅलेक्स पॅटाकोस लिखित ‘प्रिझनर्स ऑफ अवर थॉट्स’मधून स्वप्नापाठी पळण्याच्या या हव्यासाचे नेमके परिणाम दिसतात. व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात संपन्न मार्गाची दिशा दाखवणारे, सुप्रसिद्ध मनोवैज्ञानिक डॉ. व्हिक्टर फ्रान्क्ल यांच्या तत्त्वांवर हे पुस्तक आधारित आहे. डॉ. अॅलेक्स पॅटाकोस यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा हल्लीच्या काळातही समृद्ध, अर्थपूर्ण जीवन जगायला उपयोग होऊ शकतो. अॅलेक्स पॅटाकोसलिखित या पुस्तकाचा अनुवाद डॉ. विजया बापट यांनी केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more