* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: A CALL TO HONOUR : IN SERVICE OF EMERGENT INDIA
  • Availability : Available
  • Translators : ASHOK PADHYE
  • ISBN : 9788177668155
  • Edition : 4
  • Publishing Year : JANUARY 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 515
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
JASWANTSINGH`S UNIQUENESS WAS IMPRINTED DURING THE REIGN OF BHARATIYA JANATA PARTY`S RASHTRIYA LOKSHAHI AGHADI. THE MOST PROMINENT OF HIS WORK WAS THE WAY HE HANDLED THE CHAOS AFTER THE NUCLEAR PROGRAM AND TESTS CONDUCTED UNDER IT. NOT ONLY THIS, HE SUCCEEDED IN MAKING AMERICA UNDERSTAND INDIA`S STAND ON THE NUCLEAR FRONTS. THIS BOOK CASTS A LIGHT ON THIS VERY FACT.THIS BOOK ALSO INCLUDES VARIOUS SENSITIVE MATTERS WHICH WERE NOT BROUGHT INTO OPEN TILL TODAY, SUCH AS FORMATION OF PAKISTAN, NUCLEAR BOMB, SARDAR VALLBHBHAI PATEL`S WARNING TO PANDIT NEHRU 12 YEARS PRIOR TO THE ATTACK FROM CHINA, THE RECORDING OF MUSHARRAF`S SECRET PLANS, THE REAL SITUATION BEHIND THE RESCUE OF THE HIJACKED INDIAN AEROPLANE, KARGIL WAR, THE ATTACK ON THE PARLIAMENT, INDIA`S PROTECTION, THE DANGERS AND THE COGNIZANCE, ETC. THOUGH BASED ON POLITICS; THIS BOOK IS REALLY A VERY THRILLING ONE.
भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सत्ताकाळात श्री. जसवंतसिंग यांनी आपल्या कार्याने वेगळाच ठसा उमटविला. विशेषत: अणुचाचण्या केल्यावर जो जागतिक गदारोळ भारताविरुद्ध झाला, तो त्यांनी शमवला. इतकेच नव्हे, तर विरुद्ध गेलेल्या अमेरिकेला भारताच्या बाजूने वळवून दाखवले. या पुस्तकात त्याची रोमहर्षक कहाणी आहे. शिवाय पाकिस्तानची निर्मिती, अणुबाँब आणि पाकिस्तानी अस्मिता, चिनी आक्रमणाच्या १२ वर्षे आधी सरदार पटेल यांनी नेहरूंना दिलेला इशारा, मुशर्रफ यांच्या गुप्त खलबतांचे ध्वनिमुद्रण, पळवलेल्या भारतीय विमानाची सुटकेमागची परिस्थिती, कारगिल युद्ध, संसदेच्या इमारतीवरील हल्ला, ‘भारताचे संरक्षण-धोके व जाणिवा’ अशा अनेक बाबतीत अद्याप प्रकाशात न आलेली माहिती जसवंतसिंग यांनी या पुस्तकात दिली आहे. एक वैचारिक पण थरारक, राजकीय पण खिळवून ठेवणारे पुस्तक!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ACALLTOHONOUR #ACALLTOHONOUR:INSERVICEOFEMERGENTINDIA #एकॉलटूऑनर #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #ASHOKPADHYE #अशोकपाध्ये #JASWANTSINGH "
Customer Reviews
  • Rating StarPrabhakar Yerolkar

    जसवंतसिंगाचे हे आत्मचरीत्र. ते म्हणतात , " सावधगिरीने आणि दबकत दबकत वावरणाऱ्या भारताने मे २००४ नंतर एकदम आत्मविश्वास पुर्वक दमदारपणे वाटचाल सुरू केली . एका नव्या भारताचा उदय झाला होता . त्या भारताचा आवाज मला ऐकू येतो आहे. पुन्हा पुन्हा ऐकू येतो आे ." १९९८ ते २००४ या काळात भाजपाच्या आघाडी सरकारच्या काळात संरक्षण, परराष्ट्र आणि अर्थ खात्याचे मंत्री म्हणून जसवंतसिंग यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली . नंतर ते राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते होते . याशिवाय ते आँक्सफर्ड आणि वाँरविक विद्यापीठात मानद प्राध्यापक देखील होते . हार्वर्ड विद्यापीठात ते सिनीयर फेलो सुध्दा होते . त्यांचे हे सातवे पुस्तक. माझ्या कडे आले ते माझ्या नियमित स्तंभातुन या तब्बल४९० पानांच्या पुस्तकाची ओळख करून देण्यासाठी . मी या पुस्तकावर मागेच लिहीलेही आहे .आणि मला आठवते, अगदी तासाभरात तो लेख मी लिहुन काढला होता . याबाबतीत माझी एक अत्यंत वाईट खोड अशी की ,पुस्तक पुर्ण न वाचताच जणू काही ते पुस्तक दोन वेळा वाचून मी त्यावर लिहीले आहे, असे माझ्या वाचकांना आणि संपादकांना भासविणे. फक्त ते चाळत चाळत माझा लेख तयार होतो . मात्र आता या लाँकडाऊन मध्ये हे अत्यंत महत्त्वाचे पुस्तक मी वाचावयास घेतले आहे . जसवंतसिंग आज हयात नाहीत. पण त्यांना एकदा विचारले गेले ,आपल्याला वेळ कसा पूरतो ? यावर ते उत्तर देतात , " आपण काम करायचे ठरवलं तर वेळसुध्दा आपल्यासाठी प्रसरण पावत असतो . हे माझे सातवे पुस्तक आहे आणि अजुन बरीच पुस्तके मी लिहीणार असुन त्यातली काही निर्मिती च्या अवस्थेत आहेत . मेहता पब्लिशिंग हाऊसचे हे पुस्तक वाचनीय तर आहेच परंतु एका अशा कालखंडाचा ईतिहास आहे ज्यावर आधारित आजच्या विश्वगुरू आणि आर्थिक महासत्ता बणण्याची स्वप्ने पहाणारा आणि करोनाशी लढण्यासाठी सज्ज असलेल्या भारताची उभारणी झालेली आहे ...Read more

  • Rating StarHEMANT RANADE

    fantastic

  • Rating StarSAKAL SAPTARANG 16TH SEPT.2007

    भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते जसवंतसिंग हे राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारमधील बडे प्रस्थ होते. सुरवातीला नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, नंतर परराष्ट्र मंत्री, काही काळ संरक्षण मंत्री आणि सगळ्यात शेवटी अर्थमंत्रिपदाचा भारही त्यांना सांभाळावा लागा होता. सुमारे साडेचार वर्षे टिकलेल्या वाजपेयी सरकारमधील त्यांच्या आठवणींवर अधारित ‘ए कॉल टू ऑनर’ हे पुस्तक अर्थातच घटनांची जंत्री आहे. पुस्तकाची सुरवातीची काही प्रकरणे जसवंतसिंग यांच्या राजस्थानातील कौटुंबिक पाश्र्वभूमीमध्ये जातात. तयानंतर ते पाकिस्तानची निर्मिती, फाळणीची वेदना, द्विराष्ट्राचा सिध्दांत यांचा तात्त्विक अंगाने वेध घेतात. ‘आत्मसन्मानाचा शोधा’ ही जी या पुस्तकाची ‘थीम’ आहे, त्याच्याशी ही सगळी प्रकरणे विसंगत वाटत राहतात. त्यामुळे सुरवातीसच पुस्तकावरील जसवंतसिंग यांची लेखक म्हणून पकड ढिली होत जाते. पुढे मात्र ‘एनडीए’ सरकारच्या कारकिर्दीत घडलेल्या अनेक महत्त्वपूर्ण घटनांमागील कथा ते उलगडत जातात आणि वाचक त्यात गुंतत जातो. १९९८ मध्ये केलेला अणुस्फोट, कारगिलचे युध्द, सरकारवर झालेले भ्रष्टाचाराचे विविध आरोप, आग्रा येथील वाजपेयी - मुशर्रफ यांच्यातील अपयशी ठरलेली परिषद, कंदाहार अपहरण प्रकरण, संसदेवर झालेला हल्ला आणि त्यानंतर सीमेवर झालेली सैन्याची जमवाजमव यांचा ते चित्तथरारक तपशील देतात. चीनी आक्रमणाच्या १२ वर्षे पूर्वीच सरदार वल्लभभाई पटेल यांनी सविस्तर पत्र लिहून पंडित नेहरू यांना दिलेला धोक्याचा इशारा, अणुस्फोटाचा निर्णय वाजपेयी यांनी त्यांच्यापासूनही कसा गुप्त ठेवला होता, अणुस्फोटापूर्वी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम हे पोखरण येथे लष्करी वेशात कसे गेले होते, अशा आतापर्यंत फारशी माहीत नसलेल्या गोष्टी ते सांगतात. अमेरिकेशी ‘व्यूहतंत्रात्मक चर्चा’ सुरू करण्याचे श्रेय निश्चतपणे जसवंतसिंग यांना जाते. अमेरिकेचे तत्कालीन उप परराष्ट्रमंत्री स्ट्रोब टाल्बोट यांच्याशी ही चर्चा कशी सुरू केली, संशय-गैरसमज-भीती या अनेक अडथळ्यांना मागे टावूâन मैत्रीचा नवा धागा कसा विणला गेला, याचे त्यांनी केलेले वर्णन खूपच रोचक आहे. चीनबरोबरील ‘व्यूहतंत्रात्मक चर्चे’चा तपशीलही पुस्तकात सविस्तर येतो. जसवंतसिंग यांचे व्यक्तिमत्त्व लष्करी आहे. अवघड शब्द, लांबलचक पल्लेदार वाक्ये यामुळे त्यांचे बोलणे किचकट, गुंतागुंतीचे वाटते. नेमके याबाबीचे प्रतिबिंब त्यांच्या लिखाणात पडले आहे. त्यातच त्यांनी हाताळलेले विषय तितकेच अवघड आहेत. परिणामी त्याचे सोप्या, सरळ, ओघवत्या मराठीत भाषांतर करणे, हे कठीण काम. अनुवादक अशोक पाध्ये यांनी ते चांगल्या पध्दतीने पार पाडले आहे; तरीही त्यांनी मराठीत वापरलेले काही पर्यायी शब्द खटकत राहतात. इंग्रजीतील पल्लेदार वाक्यांचे भाषांतर करताना त्याची धावपळ झालेली स्पष्टपणे जाणवते. हे पुस्तक प्रकाशित करण्याच्या वेळीच जसवंतसिंग यांनी पी. व्ही. नरसिंहराव यांच्या कारकिर्दीत पंतप्रधान कार्यालयात अमेरिकेचा गुप्तहेर कार्यरत होता, असा आरोप करून मोठी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर जसवंतसिंग यांनी उलटसुलट वक्तव्ये करून ज्या कोलांट्या उड्या मारल्या होत्या, त्यावरून त्यांच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले. परिणामी या पुस्तकांबाबत ‘सेन्सेशन’निर्माण झाले खरे, पण त्याची विश्वासार्हता संपुष्टात येत गेली. नेमके हेच ‘इम्प्रेशन’ घेऊन पुस्तक वाचले जाते आणि जसवंतसिंहांनी ‘उगवत्या भारताच्या जयजयकारासाठी घातलेली साद’ अपूर्ण असल्यासारखी वाटत राहते. एकेकाळी फ्रान्सचे सर्वेसर्वा असणारे द गॉल यांच्या आत्मचरित्रावरून जसवंतसिंग यांनी या पुस्तकाचे नाव ‘ए कॉल टू ऑनर’ असे नाव ठेवले आहे; मात्र पुस्तकातील आशय बघता त्याचाही फारसा उपयोग झालेला दिसत नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more