* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 0
  • Edition : 0
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 0
  • Language : MARATHI
  • Category : NONE
  • Discount : Individual(Login to get best discount offers.)
Quantity
NA
सोशल मीडियाच्या काळात स्क्रोल डाऊन होणाऱ्या बोटावर संवाद संकुचित होऊ लागला . आणि संवादाचं सशक्त माध्यम असणारी पत्रं काळाच्या ओघात हरवू लागली आहेत. सरत चाललेली एक पिढी या बदलाची मूक साक्षीदार आहे. त्या पिढीत ‘आईचं पत्र हरवलं’ सारख्या खेळातही पत्रं केंद्रस्थानी होती. पत्रांनीच लेखनाची आणि वाचनाचीही गोडी रुजवण्यात हातभार लावला होता. या माध्यमानं व्यक्तिगत संवादालाही साहित्याचा आयाम दिला होता. त्यातून पत्ररुपी साहित्याची नवी परंपरा निर्माण झाली. या परंपरेची उजळणी आमच्या अंकातून करण्याचा मानस आहे. या अंकात कला,साहित्य,राजकारण अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या पत्रांचा आणि लेखांचा समावेश असेल . प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील, उमा कुलकर्णी, सुनीलकुमार लवटे, दादासाहेब मोरे,स्वाती चांदोरकर,यशोधरा काटकर,श्याम भूर्के अशा मान्यवरांच्या लेखांसोबत अनेक पुरातन दुर्मिळ पत्रांचं दर्शन या अंकात अनुभवायला मिळेल. ज्यात किशोर कुमार यांनी लता मंगेशकरांना लिहिलेलं हलकंफुलकं पत्र असेल , शान्ता शेळकेंनी रणजित देसाईंना लिहिलेली लडीवाळ पत्रं असतील आणि वॅन गॅगनं भावाला लिहिलेलं गहन पत्रंही असेल. हा अंक आपणास सरत्या काळातल्या एका टप्प्याशी पुन्ही जोडेल.
Keywords
Customer Reviews
  • Rating Starअंजनी नरवणे

    मेहता मराठी ग्रंथजगतचा ‘पत्र’ विशेषांक छानच आहे. स्वाती चांदोरकर म्हणजे वपुंची मुलगी. त्यांची लेखनशैली तिच्यात आली आहे. एकूणच अंकाची कल्पना व वैविध्य दाद देण्यासारखे. कव्हरवरचे चित्र चंद्रमोहन खास!

  • Rating StarLOKPRABHA 15-11-2018

    संपर्क साधण्याच्या माध्यमांमध्ये जसजशी प्रगती होत गेली तसे पत्रलेखन हा प्रकार इतिहासजमा होत गेला. आज जरी क्षणात नंबर फिरवून एखाद्याशी संपर्क साधणे शक्य झाले असले, तरी कधी काळी केवळ पत्र लिहून पाठवणे हाच काय तो पर्याय असायचा. त्या काळातील पत्र ही अर्थतच आठवणींचा अमूल्य असा ठेवाच म्हणावे लागेल. आजही ती पत्रं वाचताना त्यातून त्या त्या काळाचा पटच उलगडला जातो. असाच काळाचा पट उलगडण्याचे काम मेहता मराठी ग्रंथजगतच्या दिवाळी अंकाने केले आहे. किशोरकुमार-लता मंगेशकर, रणजीत देसाई, महात्मा गांधी, शिवाजी सावंत, कवी नीरज यांची काव्यमय पत्रे, जे.आर.डी.टाटा यांची पत्रे अशा अनेक पत्रांचा या अंकात समावेश आहे. त्याशिवाय सिग्मंड फ्रॉइड, गटे, अमृता प्रीतम अशांची प्रेमपत्रे देखील आहेत. साहित्यविश्वातला पत्रव्यवहार यामध्ये आहे. केवळ नजीकच्या इतिहासाचा नाही, तर शिवाजी महाराजांची पत्रे आणि राजर्षी शाहू छत्रपतींचा व्यवहार आणि कायदे या विषयावर स्वतंत्र लेखनदेखील आहेत. ...Read more

  • Rating StarNarendra Joshi

    या संग्राहक दिवाळी अंकामुळे माझ्या मामांची दीर्घकाल हरवलेली दुर्मिळ पत्रं एका क्षणातचं सापडलीत. धन्यवाद. शुभ दीपावली.

  • Rating StarArvind Sainekar

    `पत्र` संकल्पना आवडली.. खूप अनमोल पत्रं वाचायला मिळाली!

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Latest Reviews

CHEAPER BY THE DOZEN
CHEAPER BY THE DOZEN by Frank Bunker Gilbreth, Ernestine Gilbreth Carey Rating Star
Ravji Lute

डझनाच्या भावात स्वस्त पडते”(चीपर बाय दी डझन) असं म्हणणारे फ्रँक गिलब्रेथ (१८६८-१९२४) हे ‘टाईम अँड मोशन स्टडीज’ या संकल्पनेचे जनक म्हणून प्रसिद्ध पावलेले अमेरिकी इंजिनियर होते. अभियांत्रिकी अभ्यासक्रमात त्यांचे काळ आणि वेळ विषयक नियम त्यांच्या स्पेलिंची अक्षरे Gilbreth उलट्या क्रमाने घेतल्यास होणाऱ्या Therbligs (१८ प्रकारच्या हालचाली) या शब्दाने ओळखले जातात. कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कामे कशी करावीत याबद्दल औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना, दुसऱ्या महायुद्धावेळी अमेरिकी सैन्याला मार्गदर्शन करणारे गिलब्रेथ आपल्या डझनभर मुलांवर असे शैक्षणिक प्रयोग करत असत. त्यांच्या बारा मुलांपैकी(६मुली,६मुले) एका मुलाने व एका मुलीने (मूळ लेखक) मिळून गिलब्रेथ यांनी केलेले बहुतांश प्रयोग ‘चीपर बाय दी डझन’ या पुस्तकात मांडले आहेत. बारा मुलांना स्वावलंबी होण्यासाठी, वेगवेगळ्या भाषा येण्यासाठी, गणित, भूगोल, खगोलशास्त्र समजण्यासाठी फ्रँक गिलब्रेथ यांनी त्यांच्या घरी, सहलीला गेल्यावर, अंघोळ करताना, अगदी जेवतानासुद्धा मुलांवर विविध प्रयोग केले. मानसशास्त्र पदवीधर असलेल्या त्यांच्या पत्नीने (लिलीयन गिलब्रेथ) त्यांना या कामात कशाप्रकारे साथ दिली. त्याचप्रमाणे बारा मुलांच्या गमतीजमती. इत्यादी माहिती पुस्तकातून वाचावयास मिळते. चीपर बाय दी डझन हे पुस्तक जवळपास शंभर वर्षांपूर्वी घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. त्यातील काही गोष्टी आज कालबाह्य वाटत असल्या तरी सर्वच पालकांसाठी हे पुस्तक उपयोगी आहे. आजच्या घडीला एवढ्या मोठ्या संख्येने मुलं जन्माला घातली जात नाहीत. एक किंवा दोन मुलं असणाऱ्या नॅनो आवृत्तीमधील कुटुंबात मुलांच्या ‘फ्युचरची’ अति काळजी करून कायमच मुलावर चिडणाऱ्या/ डाफरणाऱ्या आणि त्यांना तणावाखाली ठेवणाऱ्या तरुण पालक वर्गाला ‘चीपर बाय दी डझन’ मधून नक्कीच काही शिकता येईल. 【फ्रँक गिलब्रेथ यांच्या मृत्यूनंतर त्या कुटुंबाचे काय झाले? असा प्रश्न माझ्या मनात पडल्याने मी या कुटुंबाबद्दल गुगुलवर शोध घेतला. त्यावेळी "बेलेज ऑन देअर टोज" या पुस्तकाबद्दल थोडी माहिती वाचली. ही माहिती इंग्रजीमधून आहे, सदर माहिती मराठीतुन वाचायला मिळाली नाही. फ्रँक गिलब्रेथ यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी लिलीयन गिलब्रेथ मोठ्या हिमतीने त्याचा व्यवसाय कसा सांभाळते, तिला काय अडचणी येयात, आणि आपल्या अपत्यांना ती कसे सांभाळते हा उत्तरार्ध असलेले पुस्तक "बेलेज ऑन देअर टोज" फ्रँक बंकर गिलब्रेथ (ज्यु.) आणि अर्नेस्टाइन गिलब्रेथ कॅरे याच दोन मुलांनी लिहिले आहे.】 ...Read more

AMRUTVEL
AMRUTVEL by V. S. Khandekar Rating Star
Rahul Deshmukh

भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुडपंखांचं वरदानही लाभला आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते सत्यसृष्टीत उतरावं म्णून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते सत्य भंग पावलं, तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागनं धावणं, हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो, तो यामुळं! ...Read more