SUPRIYA VAKIL

About Author

Birth Date : 12/04/1969


SUPRIYA VAKIL HAILS FROM KOLHAPUR, HOLDS DEGREES IN CIVIL ENGINEERING AND JOURNALISM AND MASS COMMUNICATION. SHE IS ACTIVELY INVOLVED IN THE THREE MEDIUMS OF RADIO, TELEVISION AND LITERATURE. SHE IS CURRENTLY WORKING IN THE FIELD OF INDEPENDENT WRITING AND TRANSLATION. SHE HAS WORKED AS A NEWS CORRESPONDENT FOR A LOCAL TELEVISION CHANNEL IN KOLHAPUR FOR 13 YEARS AND IS AN ACCLAIMED POETESS OF ALL INDIA RADIO. SHE IS ACTIVELY INVOLVED IN VARIOUS LITERARY AND CULTURAL ACTIVITIES. MAIFAL AND UTSAV ARE HER COLLECTIONS OF POETRY AND POPCORN IS HER COLLECTION OF PROSE. HIS MARATHI TRANSLATION OF ENGLISH LITERARY WORKS BY INDIAN AND FOREIGN AUTHORS HAVE BEEN PUBLISHED. (INCLUDING LITERATURE BY HILLARY CLINTON, ARUN SHOURIE, JRD TATA, DR. APJ ABDUL KALAM, KIRAN BEDI, KHUSHWANT SINGH, TASLIMA NASREEN, CHETAN BHAGAT, ETC.) SHE HAS RECEIVED GOVERNMENT OF MAHARASHTRA BEST LITERARY AWARD, SWAMI KAR RANJIT DESAI BEST TRANSLATION AWARD, APTE READING MANDIR, ICHALKARANJIS BEST TRANSLATED LITERARY AWARD, TUKA MHANE AWARD, ASHIRWAD AWARD, SPECIAL AWARD FROM DAKSHIN MAHARASHTRA SAHITYA PARISHAD. SHE HAS BEEN HONORED WITH MANY AWARDS LIKE YUVA GAURAV PURASKAR, PATRAKAR PURASKAR AND MUKTAI PRAKASHAN (KOLHAPUR) SAI SAMRADNNI PURASKAR 2018.

कोल्हापूर येथे वास्तव्य असलेल्या सुप्रिया वकील यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग व वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका प्राप्त केल्या आहेत. आकाशवाणी, दूरचित्रवाणी व साहित्य या तिन्ही माध्यमांत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. सध्या त्या स्वतंत्र लेखन व अनुवाद या क्षेत्रांत कार्यरत आहेत.कोल्हापुरातील स्थानिक दूरचित्रवाहिनीवर वृत्तनिवेदिक म्हणून १३ वर्षे काम केले तसेच त्या आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कवयित्री आहेत. विविध साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. मैफल व उत्सव हे काव्यसंग्रह आणि पॉपकॉर्न या ललितगद्य संग्रहासह त्यांचे भारतीय व परदेशी लेखकांच्या इंग्रजी साहित्यकृतींचे मराठी अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत. (ज्यामध्ये हिलरी क्लिंटन, अरुण शौरी, जेआरडी टाटा, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, किरण बेदी, खुशवंतसिंग, तसलिमा नसरीन, चेतन भगत इत्यादी मान्यवरांच्या साहित्याचा समावेश आहे.)महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार, स्वामी कार रणजित देसाई उत्कृष्ट अनुवाद पुरस्कार, आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी यांचा उत्कृष्ट अनुवादित साहित्यकृती पुरस्कार, तुका म्हणे पुरस्कार, आशीर्वाद पुरस्कार, दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषद यांचा विशेष पुरस्कार. युवा गौरव पुरस्कार, पत्रकार पुरस्कार व मुक्ताई प्रकाशनातर्फे (कोल्हापूर) सई सम्राज्ञी पुरस्कार 2018 अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मान प्राप्त झाला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 42 total
ADAMYA JIDDA Rating Star
Add To Cart INR 250
ANUP Rating Star
Add To Cart INR 250
ASAMANYA YASHPRAPTISATHI DAHA SAMANY... Rating Star
Add To Cart INR 120
BE THE CHANGE FIGHTING CORRUPTION Rating Star
Add To Cart INR 150
25 %
OFF
CHETAN BHAGAT COMBO SET- 3 BOOKS Rating Star
Add To Cart INR 720 INR 540
CHICKEN SOUP FOR THE FATHERS SOUL PART 1 Rating Star
Add To Cart INR 150
CHICKEN SOUP FOR THE FATHERS SOUL PART 2 Rating Star
Add To Cart INR 150
CHICKEN SOUP FOR THE MOTHERS SOUL Rating Star
Add To Cart INR 200
CHICKEN SOUP FOR THE TEENAGE SOUL Rating Star
Add To Cart INR 195
CURED Rating Star
Add To Cart INR 595
CUTTING FREE Rating Star
Add To Cart INR 260
DESIGN YOUR CAREER Rating Star
Add To Cart INR 130
1234

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more