KALE V.P.

About Author

Birth Date : 25/03/1932
Death Date : 26/06/2001


लेखक, कथाकथनकार, आर्कीटेक्ट, व्हायोलिन व हार्मोनियम-वादक, उत्तम रसिक आणि उत्तम फोटोग्राफर. सुंदर हस्ताक्षर आणि सुंदरतेचं वेड असणारे. सुंदर रस्ता, सुंदर इमारत, सुंदर सजावट आणि मनाने सुंदर असणाऱ्या माणसांचे चाहते. म्हणूनच त्यांच्या कथा ह्या सुंदर मनांवर अणि विचारांवर आधारित असणाऱ्या. मनाचे कंगोरे उत्तम निरीक्षणामुळे मांडता येणाऱ्या. विनोदी कथांमध्येही एक सत्यतेची किनार असणाऱ्या कथा. खरं तर त्या कथा नाहीतच. कारण त्या अतिरंजित किंवा काल्पनिक नाहीत. एका व्यक्तीच्या विचार-आचारांची पद्धत. वपु त्याला पॅटर्न म्हणायचे. वपुंनी पॅटन्र्स मांडले. जे आपल्यासहित, आपल्या आवती-भोवती दिसतात. आणि म्हणूनच त्या पॅटन्र्सना दाद मिळते. विनोदी कथांमधून हसवता-हसवता एक शल्य भिडत राहातं आणि चटका लावून जातं. ही अशीच जीवनाची तऱ्हा आहे, हे सहज सोप्या शब्दांत आकलन होत जातं. महाराष्ट्र सरकारनं त्यांना उत्तम लेखक म्हणून सन्मानित केलं आहे. पु.भा. भावे पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला. फाय फाउंडेशनने त्यांच्या साहित्याची दखल घेऊन अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले. अनेक रंग मनाचे दाखविणाऱ्या वपुंना अनेक जण आपला पार्टनर मानतात. हा पार्टनर आजही अनेकांच्या मनांत अगदी खोलवर विराजमान झालेला आहे. २५ मार्च, १९३२ ते २६ जून, २००१... आणि गणती पुढे चालूच आहे. कारण वपु काळे ह्यांचा काळ संपलेला नाही. त्यांचा हा विचारांचा हुंकार अजूनही वन फॉर द रोड करता दिला-घेतला जातोय. हा दोस्त असाच दोस्ती निभावत राहणार आणि रसिक वाचक वपुंच्या कथांमधून प्रत्येक पॅटर्नला भेटत राहणार.

Sort by
Show per page
Books not found in this category.

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book