DEBORAH ELLIS

About Author

Birth Date : 07/08/1960


अविकसित, गरीब, मागास राष्ट्रांतल्या मुलांचं खडतर जगणं विकसित देशातल्या माणसांसमोर ठेवणारी एक अत्यंत संवेदनशील लेखिका. तिच्या अत्यंत धाडसी अनुभवांना तिनं तितक्याच रोमांचकारी शैलीत वाचकांसमोर मांडलं. जगभरातल्या सत्तासंघर्षात भरडल्या जाणाऱ्या अबोध, निरागस मुलांची वाताहत हाच तिच्या लेखनाचा केंद्रिंबदू आहे. तिच्या सगळ्याच पुस्तकांना देशविदेशांतून पुरस्कार मिळाले आहेत. गव्हर्नर जनरलचा प्रतिष्ठीत पुरस्कार, स्वीडनचा पीटर पॅन पुरस्कार , द रूथ स्वाटर्झ पुरस्कार , वॅÂलिर्फोनिया विद्यापीठाचे मिडल ईस्ट बुक अ‍ॅवॉर्ड , द जेन अ‍ॅडम्स बालसाहित्य पुरस्कार , विकी मेटकाल्फ पुरस्कार अशा बऱ्याच प्रतिष्ठीत पुरस्कारांनी तिला सन्मानित करण्यात आलं आहे. जगभरात तिची ब्रेडविनर ही ट्रायॉलॉजी खूप गाजली. जगभरातल्या सतरा भाषांमध्ये तिची ही पुस्तकं अनुवादित झाली आहेत. जगभरातल्या वाचकांनी या पुस्तकांना भरभरून प्रतिसाद दिला. तिला रॉयल्टी म्हणून मिळालेल्या रकमेतून लक्षावधी डॉलर्स स्ट्रीट किड्स इंटरनॅशनल आणि वुमन फॉर वुमन या संस्थांना दान देण्यात आले आहेत. वुमन फॉर वुमन ही संस्था अफगाणिस्तानातून पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या आणि निर्वासितांचं आयुष्य जगणाऱ्या मुलींच्या शिक्षणासाठी काम करते. डेबोरा एलिस ही ओन्टारिओ इथं राहते. स्त्री-मुक्तीवादी कार्यकर्ती म्हणून आणि शांतता मोहिमेअंतर्गत तिनं जगभरातल्या देशांत काम केलं आहे.

A VERY SENSITIVE WRITER WHO PUTS THE TOUGH LIFE OF CHILDREN IN UNDERDEVELOPED, POOR, BACKWARD COUNTRIES IN FRONT OF PEOPLE IN DEVELOPED COUNTRIES. SHE PRESENTED HER MOST DARING EXPERIENCES TO THE READERS IN AN EQUALLY THRILLING STYLE. THE CENTRAL THEME OF HER WRITINGS IS THE PLIGHT OF IGNORANT, INNOCENT CHILDREN WHO ARE CAUGHT UP IN POWER STRUGGLES AROUND THE WORLD. ALL HER BOOKS HAVE RECEIVED AWARDS FROM HOME AND ABROAD.
Sort by
Show per page
Books not found in this category.

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book