Ayaan Hirsi Ali

About Author

Birth Date : 13/11/1969


AYAAN HIRSI ALI IS A SOMALI-BORN DUTCH-AMERICAN ACTIVIST AND FORMER POLITICIAN. SHE IS A CRITIC OF ISLAM AND ADVOCATE FOR THE RIGHTS AND SELF-DETERMINATION OF MUSLIM WOMEN, OPPOSING FORCED MARRIAGE, HONOR KILLING, CHILD MARRIAGE, AND FEMALE GENITAL MUTILATION. WIKIPEDIA

सोमाली येथे जन्मलेल्या अयान हिरसी अली जागतिक कीर्तीच्या लेखिका, निबंधकार आणि राजकीय नेत्याही आहेत. १९९२ मध्ये वडिलांनी ठरवलेले लग्न मान्य नसल्याने त्यांनी घर सोडले आणि नेदरलँड्स येथे आश्रय घेतला. कालांतराने त्यांना नेदरलँड्सचे नागरिकत्व मिळाले. पोलिटिकल सायन्समध्ये डिग्री मिळवल्यानंतर त्यांनी तीन वर्षे डच संसदेत निर्वाचित सदस्य म्हणून काम केले. तेव्हापासून त्या इस्लाममधील एक सक्रिय समीक्षक, स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणाNया वकील आणि इस्लामच्या पुनर्रचनेसाठी चाललेल्या चळवळीच्या अग्रगणी म्हणून ओळखल्या जातात. रूढी-परंपरागत मुस्लीम धर्मश्रद्धांचा स्वीकार करायला नकार देऊन त्याबद्दल आपले मत स्पष्टपणे व्यक्त करण्याचे धाडस दाखवल्यामुळे त्या कायमच मुस्लीम जहालमतवाद्यांच्या धमक्या आणि हिंसेच्या लक्ष्य ठरल्या. आताचे जातीय आणि धार्मिक ताणतणावांनी भरलेले जग लहान मुलांच्या नजरेतून कसे दिसते, याची एक झलक अयान हिरसी अली यांनी या पुस्तकातून दाखवली आहे. त्यांना अशी आशा आहे की लहान मुलांसाठी लिहिलेल्या या पुस्तकावरून इतरही अनेक लेखक प्रेरणा घेतील. त्या म्हणतात, ``मला माहीत आहे की हे पुस्तक सोपे नाही, पण लहान मुलांची आयुष्यंही सोपी नसतात. लहान वयापासूनच मुलांनी वेगवेगळ्या संस्कृतींबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करीत आलो आहोत. माझ्या या पूर्वग्रहातून पुस्तकांनीच मला बाहेर काढले."
Sort by
Show per page
Items 1 to 3 of 3 total
ADAN & EVA Rating Star
Add To Cart INR 80
INFIDEL Rating Star
Add To Cart INR 410
NOMAD Rating Star
Add To Cart INR 280

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book