Atul Gawande

About Author

डॉ. अतुल गवांदे हे तीन लोकप्रिय पुस्तकांचे लेखक आहेत. कॉम्प्लिकेशन्स, जे पुस्तक नॅशनल बुक अ‍ॅवार्डच्या अंतिम फेरीसाठी निवडलं गेलं होतं; बेटर, ज्याची निवड अ‍ॅमेझॉन डॉट कॉमनं दहा सर्वोत्तम पुस्तकांमध्ये केली होती आणि द चेकलिस्ट मॅनिफेस्टो हे त्यांचं तिसरं पुस्तक. बोस्टनमधल्या ब्रिहॅम अ‍ॅन्ड विमेन्स हॉस्पिटल चे ते शल्यतज्ज्ञ आहेत, द न्यू यॉर्करचे ते लेखक आहेत आणि हॉर्वर्ड मेडिकल स्कूल आणि हॉर्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे ते प्राध्यापक आहेत. विज्ञानावर लिहिलेल्या लेखांमुळे त्यांना लेविस थॉमस प्राइझ मिळाले आहे. मॅकऑर्थर फेलोशिप आणि दोन नॅशनल मॅगझिन अ‍ॅवार्ड मिळाले आहेत. सामाजिक आरोग्याविषयी त्यांचा सहभाग : ते अरियाडने लॅब्स चे संचालक आहेत, जे आरोग्यप्रणालीच्या पुनर्निर्माणासाठीचं संयुक्त केंद्र आहे आणि लाइफबॉक्स या ना नफा, ना तोटा तत्त्वावर चालणाऱ्या शस्त्रक्रिया जगभर सुरक्षितपणे व्हाव्यात म्हणून कार्य करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. ते आणि त्यांची पत्नी कॅथलीन आपल्या तीन मुलांसोबत न्यूटन, मॅसॅच्युएट्स इथे राहतात.

Birth Date : 05/11/1965
Death Date :

Sort by
Show per page
Items 1 to 4 of 4 total
25 %
OFF
ATUL GAWANDE COMBO SET OF 3 BOOKS Rating Star
Add To Cart INR 795 INR 599
BEING MORTAL Rating Star
Add To Cart INR 295
JIV JITHE GUNTALELA Rating Star
Add To Cart INR 300
YASHPRATICHA JAHIRNAMA Rating Star
Add To Cart INR 200

Latest Reviews

CHEAPER BY THE DOZEN
CHEAPER BY THE DOZEN by Frank Bunker Gilbreth, Ernestine Gilbreth Carey Rating Star
Ravji Lute

डझनाच्या भावात स्वस्त पडते”(चीपर बाय दी डझन) असं म्हणणारे फ्रँक गिलब्रेथ (१८६८-१९२४) हे ‘टाईम अँड मोशन स्टडीज’ या संकल्पनेचे जनक म्हणून प्रसिद्ध पावलेले अमेरिकी इंजिनियर होते. अभियांत्रिकी अभ्यासक्रमात त्यांचे काळ आणि वेळ विषयक नियम त्यांच्या स्पेलिंची अक्षरे Gilbreth उलट्या क्रमाने घेतल्यास होणाऱ्या Therbligs (१८ प्रकारच्या हालचाली) या शब्दाने ओळखले जातात. कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कामे कशी करावीत याबद्दल औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना, दुसऱ्या महायुद्धावेळी अमेरिकी सैन्याला मार्गदर्शन करणारे गिलब्रेथ आपल्या डझनभर मुलांवर असे शैक्षणिक प्रयोग करत असत. त्यांच्या बारा मुलांपैकी(६मुली,६मुले) एका मुलाने व एका मुलीने (मूळ लेखक) मिळून गिलब्रेथ यांनी केलेले बहुतांश प्रयोग ‘चीपर बाय दी डझन’ या पुस्तकात मांडले आहेत. बारा मुलांना स्वावलंबी होण्यासाठी, वेगवेगळ्या भाषा येण्यासाठी, गणित, भूगोल, खगोलशास्त्र समजण्यासाठी फ्रँक गिलब्रेथ यांनी त्यांच्या घरी, सहलीला गेल्यावर, अंघोळ करताना, अगदी जेवतानासुद्धा मुलांवर विविध प्रयोग केले. मानसशास्त्र पदवीधर असलेल्या त्यांच्या पत्नीने (लिलीयन गिलब्रेथ) त्यांना या कामात कशाप्रकारे साथ दिली. त्याचप्रमाणे बारा मुलांच्या गमतीजमती. इत्यादी माहिती पुस्तकातून वाचावयास मिळते. चीपर बाय दी डझन हे पुस्तक जवळपास शंभर वर्षांपूर्वी घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. त्यातील काही गोष्टी आज कालबाह्य वाटत असल्या तरी सर्वच पालकांसाठी हे पुस्तक उपयोगी आहे. आजच्या घडीला एवढ्या मोठ्या संख्येने मुलं जन्माला घातली जात नाहीत. एक किंवा दोन मुलं असणाऱ्या नॅनो आवृत्तीमधील कुटुंबात मुलांच्या ‘फ्युचरची’ अति काळजी करून कायमच मुलावर चिडणाऱ्या/ डाफरणाऱ्या आणि त्यांना तणावाखाली ठेवणाऱ्या तरुण पालक वर्गाला ‘चीपर बाय दी डझन’ मधून नक्कीच काही शिकता येईल. 【फ्रँक गिलब्रेथ यांच्या मृत्यूनंतर त्या कुटुंबाचे काय झाले? असा प्रश्न माझ्या मनात पडल्याने मी या कुटुंबाबद्दल गुगुलवर शोध घेतला. त्यावेळी "बेलेज ऑन देअर टोज" या पुस्तकाबद्दल थोडी माहिती वाचली. ही माहिती इंग्रजीमधून आहे, सदर माहिती मराठीतुन वाचायला मिळाली नाही. फ्रँक गिलब्रेथ यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी लिलीयन गिलब्रेथ मोठ्या हिमतीने त्याचा व्यवसाय कसा सांभाळते, तिला काय अडचणी येयात, आणि आपल्या अपत्यांना ती कसे सांभाळते हा उत्तरार्ध असलेले पुस्तक "बेलेज ऑन देअर टोज" फ्रँक बंकर गिलब्रेथ (ज्यु.) आणि अर्नेस्टाइन गिलब्रेथ कॅरे याच दोन मुलांनी लिहिले आहे.】 ...Read more

AMRUTVEL
AMRUTVEL by V. S. Khandekar Rating Star
Rahul Deshmukh

भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुडपंखांचं वरदानही लाभला आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते सत्यसृष्टीत उतरावं म्णून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते सत्य भंग पावलं, तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागनं धावणं, हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो, तो यामुळं! ...Read more