लेखक : विश्वास पाटील
औरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्षे कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती, ज्याने वयाच्या बत्तीसाव्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपले मस्तक दिले; पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्त्वपूर्ण किल्ला किंवा आपल्या आरमारातील एकही जहाज गमावले नाही! गेली सव्वातीनशे वर्षे या विचारी, कवी-राज्यकत्या|ची आणि पराक्रमी सेनानीची गाथा संशयाच्या धडप्यामध्ये गुंडाळून ठेवली गेली होती!
आजचे अग्रगण्य प्रतिभावंत कादंबरीकार विश्वास पाटील यांना सह्याद्रीच्या निबिड दर्याखोर्यांनी, सागरखाड्यांनी आणि दुर्लक्षिलेल्या दुर्मिळ कागदपत्रांनी सांगितलेली शिवपुत्र संभाजीराजांची चित्तथराक, वादळी, पण वास्तव गाथा!!
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील पुरस्कार 2005
कवी माधव पुरस्कार 2006
अक्षरगंध पुरस्कार 2006