अमृतवेल
प्राण्यांच्या धम्माल गोष्टींचे रंगीत पुस्तक
लेखक : वि. स. खांडेकर
बेकारीच्या उग्रप्रश्नामुळं उच्चशिक्षित तरुणांच्या उद्धस्त जीवनाचे विदारक चित्रण करणार्या 1970 च्या सुमारास प्रसिद्ध झालेल्या "निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी' या ह. मो. मराठे यांच्या छोटेखानी कादंबरीने मराठी साहित्यसृष्टीत विलक्षण खळबळ माजवून सोडली होती. पराकोटीची टीका आणि पराकोटीचे कौतुक अशा दोन्ही गोष्टी तिच्या वाट्याला आल्या. अनुकूल प्रतिकूल टीकेचे वादळ पचविलेल्या या कादंबरीचे मराठी कादंबरीच्या इतिहासातील स्थान गेल्या पस्तीस वषा|त निर्विवादपणे मान्य झाले आहे. या एकाच कादंबरीवर आधारित तीस वषा|च्या अंतराने सादर झालेली दोन प्रायोगिक नाटके आणि "निष्पर्ण वृक्षावर भरदुपारी-संहिता आणि समीक्षा' हा मराठीतील तीन पिढ्यांच्या समीक्षकांनी या कादंबरीविषयी लिहिलेल्या लेखांचा समावेश असलेला समीक्षाग्रंथ हे याचे दोन ठळक पुरावे!
अशा या कादंबरीची ही तिसरी आवृत्ती! व्यवसायाने पत्रकार असलेल्या ह. मो. मराठे यांनी पत्रकार, संपादक म्हणून नाव कमावले तसेच मराठीतील एक आघाडीचे कथाकार, कादंबरीकार म्हणूनही मान्यता मिळविली. त्यांचे "पक्षिणी', "घोडा', "युद्ध' इत्यादी कथासंग्रह गाजले; "इतिवृत्त', "सॉफ्टवेअर', "मार्केट' इत्यादी कादंबर्याही गाजल्या. "बालकाण्ड' या त्यांच्या आत्मकहाणीने सर्वसामान्य वाचकांच्या मनात कालवाकालव निर्माण केली तर जाणत्या समीक्षकांची मान्यता मिळविली.
अनेक साहित्यिक पुरस्कारांनी ह. मो. मराठे यांचे साहित्य गौरविण्यात आले आहे.