फाईव्ह पॉइंट समवन
पोलिस यंत्रणेने बुद्धी, परिश्रम आणि आधुनिक तपासतंत्र यांच्या जोरावर गुन्हा आणि गुन्हेगार यांचा खुबीने घेतलेल्या शोधांच्या साहसपूर्ण पोलीसकथा....
अनुवादक : सुप्रिया वकील
मूळ लेखक : चेतन भगत
राष्ट्रीय स्तरावर "बेस्टसेलर' ठरलेली हलकीफुलकी कादंबरी.
या कादंबरीवर लवकरच चित्रपट बनणार आहे.
तुम्हाला या पुस्तकात आयआयटी या भव्यदिव्य स्वप्नाची पूर्ती कशी करावी किंवा तिथे कसा प्रवेश मिळवावा किंवा तिथे कसं तरून जावं याचं मार्गदर्शन मिळणार नाही, पण जर तुमची विचारसरणी "सरळ' नसेल तर तिथं काय घडू शकेल, ते मात्र नक्की समजेल!
अतिशय तरल विनोदाचा शिडकावा करतानाच अनेक सूक्ष्म गोष्टींवर नेमकं बोट ठेवणार्या ओघवत्या कथनशैलीतील वाचनीय कादंबरी. आयआयटी कॅम्पस व कॉलेज-जीवनाची पाश्र्वभूमी लालेली ही कादंबरी तीन मित्रांची कथा सांगतानाच आजूबाजूच्या अनेक गोष्टींवर भाष्य करत वाचकाला खिळवून ठेवते आणि एका आगळ्या विश्वाचं भावपूर्ण दर्शन घडवते,
ते सुद्धा हलक्याफुलक्या शैलीत.
--------------------------------------------------------------------------------------
"फाइव्ह पॉइंट समवन' हे पुस्तक "लाट' बनू शकेल.----आऊटलुक
निखळ मौजेच्या या कादंबरीला दहापौकी दहा------ द हिंदू
चेतन भगत यांचे हे पहिलेवहिले पुस्तक तुम्हाला आयआयटीच्या मौजेच्या सफरीला नेते.----इकॉनॉमिक टाईम्स
आयआयटीचा माजी विद्यार्थी असणारा लेखक त्याच्या पहिल्या कादंबरीत आपल्याला भारतातील सर्वात प्रतिष्ठित इंजिनिअरिंग संस्थांमधील विक्षिप्त व श्रेष्ठ मानणार्या जगताची झलक दाखवतो.---- इंडियन एक्स्प्रेस